किमयागार - 21 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 21

किमयागार -उंटचालक
या पुरामुळे सर्व काही नष्ट झाले व मला जगण्यासाठी दुसरे काम शोधावे लागले व मी उंटचालक झालो.
या संकटामुळे मला अल्लाहची जाणिव झाली व समजले की माणसाने संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवावी, घाबरून जाऊ नये. त्याने हे समजून घेतले पाहिजे की, आपल्याला काय हवे आहे व आपण ते कसे मिळवू शकतो.
आपण आपले सर्व काही गमावून बसू अशी आपल्याला भीती वाटत असते पण ही भीती त्यावेळी संपते जेव्हा आपण इतर लोकांचे जीवन बघतो व जगातील इतिहास पहातो. तेव्हा कळते की हे सर्व लिहिणारा हात एकचं आहे.
प्रवासातील घटना.
काही वेळा दुसरा प्रवासी तांडा भेटत असे.
एकमेकांना हव्या असलेल्या वस्तू त्यांना मिळत असतं.
जणूकाही त्या लिहून ठेवल्या आहेत.
काही वेळा काही टोपी घातललेली विचित्र वाटणारी माणसे येत असत त्याना बदाऊन म्हणत.
ते तांडा प्रवास करत असलेल्या मार्गावर तपासणी करत व तांडामालकाला मार्गावरील माहिती देत.
चोर दरोडेखोरांबाबत माहिती देत.
ते नेहमी पूर्ण काळे कपडे घालून येत व त्यांचे फक्त डोळे दिसत.
एका रात्री एक उंटचालक, इंग्रज व मुलगा शेकोटी जवळ बसले होते तेथे आला व म्हणाला की, येथील जमातींमध्ये लढाई सुरू झाली आहे असे कळते.
तीघेही शांत बसले. मुलाच्या लक्षात आले की, जरी ते एकमेकांशी बोलत नसले तरी, वातावरणात एक भीतीची लहर आली आहे. परत एकदा शब्दरहित वैश्विक भाषेचा अनुभव तो घेत होता. इंग्रजाने विचारले
' घाबरण्याचे काही कारण नाही ना? ' उंटचालक म्हणाला, एकदा तुम्ही वाळवंटात प्रवेश केलात की परत मागे जाणे शक्य नसते. उत्तम मार्ग म्हणजे सर्व काही अगदी संकटांची भिती पण " अल्लाहवर " सोपवून निर्धास्तपणे पुढे जात राहणे. व जाताना त्याने तो गुढ शब्द उच्चारला
' मक्तुब '.
प्रवासातील भयप्रद काळ
उंटचालक गेल्यावर मुलगा इंग्रजाला म्हणाला, तुम्ही तांडा कसा चालला आहे, काय घटना घडतं आहेत तिकडे लक्ष दिले पाहिजे.
आपण रस्ते बदलतो पण प्रवासाची दिशा एकच असते.
इंग्रज म्हणाला, आणि तू पण वाचन वाढवून ज्ञान वाढवले पाहिजेस.
पुस्तके एका अर्थी तांड्यासारखीच असतात.
आता हा प्रवासी व प्राण्यांचा तांडा जास्त वेगाने जाऊ लागला होता.
दिवसा तर शांतता असेचं पण रात्री शेकोटी जवळ होणाऱ्या चर्चा पण बंद झाल्या होत्या. एक दिवस तांड्याच्या नेत्याने सांगितले की, त्यांच्याकडे कोणाचे लक्ष जाऊ नये यासाठी आजपासून शेकोटी पेटवणे बंद करण्यात आले आहे.
सर्व प्रवाशांनी थंडी पासून वाचण्यासाठी बाजूने प्राण्यांचे वर्तुळ करून मध्यभागी झोपण्यास सुरुवात केली. तांडा नेत्याने काही पहारेकरी लक्ष ठेवण्यासाठी नेमले होते.
एका रात्री इंग्रजाला झोप येत नव्हती, त्याने मुलाला बोलावले व म्हणाला की , आपण एक फेरफटका मारू. ते दोघे वस्तीच्या परिसरात फिरत होते. त्यावेळी पोर्णिमा होती. मुलाने इंग्रजाला आपली कहाणी सांगितली. मुलाने क्रिस्टल दुकानात जी प्रगती केली तो भाग इंग्रजाला आवडला.
तो म्हणाला, हाच तो सिद्धांत आहे की सर्व काही एकमेकाशी जोडले आहे. किमयागारी मध्ये याला सृष्टीचा आत्मा म्हणतात.
किमयागार- पुस्तके -
इंग्रज म्हणाला: मी आता तांड्याकडे जास्त लक्ष देणार आहे. मुलगा म्हणाला, मी तुमच्या कडील पुस्तके वाचण्यात वेळ घालवणार आहे.
इंग्रजाकडची पुस्तके वेगळीचं व विचित्र होती. त्यात मर्क्युरी, मीठ, ड्रॅगन आणि राजे यांच्या बद्दल लिहिलेले होते.
मुलाला त्यातले काही कळत नव्हते.
पण त्या सर्व पुस्तकांतून एक विचार मात्र सर्वत्र प्रगट होत होता की सर्व वस्तू एकाच वस्तूची अनेक रुपे असतात.
त्यातील एका पुस्तकातून त्याला कळले की, किमयागारीतील सर्वात महत्वाची माहिती कांही ओळींमध्ये पाचूवर (हिरवा मणि) लिहिली आहे, त्याला पाचुची गोळी असे म्हणतात.
'पण मग तुम्ही एवढी सगळी पुस्तके कां वाचता आहात? '
मुलाने इंग्रजाला विचारले.
'त्या कांही ओळींमध्ये काय लिहिलेय ते समजण्यासाठी "इंग्रज म्हणाला.
मुलाला आवडलेले पुस्तक ते होते ज्यात प्रसिद्ध किमयागारांच्या गोष्टी लिहिल्या होत्या.