किमयागार - 23 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 23

किमयागार- किमयागिरी
एक दिवस मुलाने सगळी पुस्तके इंग्रजाला परत केली. इंग्रजाने अत्यंत उत्सुकतेने व उत्तराच्या अपेक्षेने त्याला विचारले, तू यातून काही शिकलास का?.
इंग्रजाला कोणीतरी बोलण्यासाठी हवे होते कारण त्याच्या मनात सतत युद्धाबद्दल विचार येत होते व त्याला बदल हवा होता.
मला समजले की, या जगाला एक आत्मा आहे.ज्याला हे समजेल त्याला वैश्विक भाषा कळेल. मला लक्षात आले की अनेक किमयागारांनी आपले आयुष्य आपले भाग्य शोधण्यात घालवले आणि त्यांना जगाचा आत्मा, परिस व अमृत याचा शोध लागला.
इंग्रज निराश झाला. वर्षानुवर्षे चालू असलेले संशोधन, विशिष्ट खुणा, चिन्हे, विचित्र शब्द, प्रयोगशाळेतील साहित्य या सगळ्या गोष्टींचा मुलावर काही परिणाम झालेला दिसत नव्हता.
त्याने सर्व पुस्तके घेतली व बॅगेत ठेवून दिली. मुलाला म्हणाला तू तांड्याकडे लक्ष दे, तसेही मला त्यातून काही ज्ञान मिळाले नाहीए.
किमयागार-वाळवंट
मुलगा परत वाळवंटाचे व प्राण्यानी उडवलेल्या धुळीचे निरीक्षण करू लागला.
तो मनात म्हणाला, प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते. माझी पद्धत त्याच्यासारखी नाही व त्याची माझ्यासारखी नाही. पण आम्ही दोघेही स्वतःचे भाग्य(नियति)शोधत आहोत आणि म्हणूनच मला इंग्रजाचा आदर वाटतो.
तांड्याचा प्रवास चालूच होता. डोक्यावर टोपी घातलेले बदाउन परत परत येत होते.
आणि मुलाचा चांगला मित्र झालेल्या उंटचालकाने सांगितले की टोळीयुद्ध सुरू झाले आहे. ओऍसिसपर्यंत पोहोचणे आता नशिबावर अवलंबून आहे.
प्राणि खूप थकले होते. माणसे एकमेकांशी कमीचं बोलत होती.
रात्रीच्या वेळी ही शांतता भयाण वाटत असे. एखाद्या प्राण्याचे ओरडणे जे एरव्ही फक्त एक आवाज वाटे ते आता थरकाप उडवणारे वाटत होते कारण ही हल्ला होत असल्याची सूचना असू शकत होती.
उंटचालक मात्र या युद्धाच्या बातमीने फारसा विचलित झाला नव्हता.
एका रात्री दोघे खजूर खात बसले होते. चंद्रप्रकाश कमीच होता आणि शेकोटी पेटवता येत नव्हती. तो उंटचालक म्हणाला, मी जेव्हा काही खात असतो तेव्हा मी फक्त तेवढाच विचार करतो. आत्ता तरी मी जिवंत आहे आणि लढण्याची वेळ आली तर इतरांप्रमाणेच कधीतरी मृत्यूला‌ सामोरे जावे लागेलचं.
किमयागार - ओऍसिस
मी भुतकाळ अथवा भविष्याचा विचार करित नाही. मी वर्तमानात जगतो. मी फक्त आत्ताच्या क्षणाचा विचार करतो. तू पण वर्तमानात जगायला शिकलास तर आनंदी राहशिल. तुला दिसेल की, या वाळवंटात जिवंतपणा आहे, आकाशात तारे आहेत आणि टोळ्या युद्ध करतात कारण ते मानववंशाचा भाग आहेत. जिवन म्हणजे समारंभ आहे, उत्सव आहे. जिवन म्हणजे तुम्ही आता ज्या क्षणात आहात तो क्षणचं असते.
दोन रात्रीनंतर मुलगा झोपायची तयारी करत असतांना त्याला वाटले की, क्षितिज जवळ आले आहे कारण त्याला तारे वाळवंटात आहेत असे वाटले.
उंटचालक म्हणाला ते ओऍसिस आहे. मग आपण तेथे आताचं का नाही जात आहोत? मुलाने विचारले. कारण आत्ता आपल्याला झोपायचे आहे.
मुलाला सूर्योदयाबरोबर जाग आली. आणि जिथे तारे दिसत होते तिथे सगळीकडे खजूराच्या झाडांच्या रांगा दिसतं होत्या.
इंग्रज त्याच्या आधीचं उठला होता.
तो उत्साहाने मुलाजवळ येऊन म्हणाला, "आपण जिंकलो". आपण ओऍसिसजवळ पोहोचलो. पण मुलगा मात्र शांत होता. वाळवंटाच्या शांततेने तो भारून गेला होता. आणि खजूराची झाडे पाहून आनंदित झाला होता.
किमयागार - ओॲसिस
त्याला अजून बराच पल्ला गाठायचा
होता. त्याला पिरॅमिडपर्यंत पोहोचायचे होते. आणि एक दिवस ही सकाळ म्हणजे फक्त एक छान आठवण बनलेली असेल.
आणि उंटचालक म्हणाला तसे हा क्षण त्याला तो आजपर्यंत तो जसा जगला होता, म्हणजेच भूतकाळापासून धडा घेऊन व भविष्यकाळाची स्वप्ने बघून घालवायचा होता.
जरी हे वृक्षांचे दृश्य एक आठवण बनणार होते तरी आत्ता तरी त्यामुळे सावली, पाणी, आणि युद्धाच्या भीतीपासून मुक्ती मिळाली होती. काल प्राण्यांचे ओरडणे भयावह वाटत होते तर आज ही खजूर वृक्षांची रांग चमत्कार वाटत होती.