किमयागार - 24 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 24

किमयागार - ओॲसिस

जग बऱ्याच भाषेत बोलत असते.
काळ पुढे चालत असतो तसेच तांडेही.
किमयागार ओॲसिसवर पोचणाऱ्या लोकांकडे व प्राण्यांकडे पाहत विचार करत होता.
नविन आलेले लोक आनंदाने ओरडत होते आणि वाळवंटातील सूर्याला धुळीचे लोट झाकत होते.
ओॲसिसवर असलेली मुले नवीन लोकांचे स्वागत उत्साहाने ओरडून करत होती. किमयागाराने पाहिले की, स्थानिक लोक तांडा नेत्याचे अभिनंदन करत होते. तसेच बराच वेळ संभाषण करत होते.
पण हे सर्व किमयागाराच्या दृष्टीने महत्त्वाचे नव्हते. आतापर्यंत अनेक लोक वाळवंटात आलेले व गेलेले बघितले होते. पण वाळवंट तेथेचं होते. त्याने अनेक राजे व रंक या वाळवंटात फिरताना बघितले होते.
वाळूचे ढिगारे वाऱ्यामुळे बदलत असतात पण तो लहान असल्यापासून वाळू मात्र तिचं होती. अनेक आठवडे पिवळी वाळू व निळे आकाश बघत प्रवास करणाऱ्या लोकांना खजूराच्या झाडांची हिरवळ पाहून होणारा आनंद पाहणे त्याला आवडत असे.
त्याच्या मनात आले की, खजूराच्या झाडांचे महत्व कळावे म्हणूनच की काय देवाने वाळवंट निर्माण केले आहे.
त्याने आता जास्त महत्वाच्या व उपयुक्त गोष्टी वर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले.
त्याला माहीत होते की तांड्यात असा एक माणूस आहे ज्याला तो काही गुप्त गोष्टी शिकवणार आहे. तशी शकून चिन्हे त्याला दिसली होती.
त्याला तो नेमका माणूस माहीत नसला तरी तो समोर आल्यानंतर त्याला लगेच ओळखता येणार होते. त्याची अपेक्षा होती की तो माणूस त्याच्याकडे शिकण्यास समर्थ असेल.
तो विचार करित होता की या गोष्टी नेहमी शब्दांनी व तोंडाने सांगण्यासारख्या का असतात. खरेतर त्या गुप्त नव्हत्याचं.
देव त्याची गुपिते त्याच्या बालकांना सहजपणे सांगत असतो.
या गोष्टी अशा सांगाव्या लागण्याचे एकमेव कारण असे होते की‌ या गोष्टी शुद्ध जिवनातून निर्माण झाल्या होत्या आणि असे जिवन शब्दांत किंवा चित्रांद्वारे मांडणे शक्य नाही. लोक शब्द व चित्रात एवढे गुरफटले की ते जगाची भाषा विसरले.
मुलाचा आपण ओॲसिस पाहत आहोत यावर विश्वास बसत नव्हता.
त्याने भुगोलाच्या पुस्तकात वाचले होते की, ओॲसिस म्हणजे सभोवताली झाडे असलेली विहीर असते.
पण हे काही वेगळेच होते. स्पेनमधील एखाद्या शहरापेक्षा पण मोठे होते. तिथे जवळपास तीनशे विहिरी, पन्नास हजार खजुराची झाडे होती. आणि त्यामध्ये अनेक रंगीबेरंगी तंबू बांधलेले होते.
इंग्रज किमयागाराला भेटण्याच्या कल्पनेने उत्साहीत झाला होता.
तो म्हणाला हे सर्व "एक हजार एक रात्री" सारखे वाटते आहे.(अरेबियन‌ नाईटस्).
त्यांच्या आजूबाजूला अनेक मुले जमली होती व येणारे प्राणी आणि माणसे यांच्याकडे चौकस नजरेने पाहत होती.
तेथील पुरूष हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते की त्यांना एखादी लढाई पहावयास मिळाली होती का?.
स्त्रिया व्यापाऱ्यांनी आणलेले स्टोन, दागिने, कपडे मिळवण्यासाठी एकमेकीशी भांडत होत्या.
वाळवंटातील शांतता एकदम गलबल्यात बदलून गेली होती. प्रवासी गप्पा मारत होते, हसत , ओरडत होते. जणूकाही ते एका वेगळ्या जगातून माणसांच्या जगात आले होते. सुरक्षिततेच्या भावनेने ते एकदम आनंदित झाले होते.
वाळवंटात त्यांनी खूप काळजीपूर्वक प्रवास केला होता. उंटचालकाने सांगितले की, ओॲसिस हे तटस्थ (शांत) प्रदेश म्हणून ओळखले जातात. तेथे राहणाऱ्या मध्ये मुले, महिला व वृद्ध जास्त असतात.
वाळवंटात अनेक ओॲसिस असतात पण टोळ्यामधील युद्धे वाळवंटातच होतात व ओॲसिस विश्रांती स्थान असतात.
किमयागार- ओॲसिस
तांड्याच्या नेत्याचा इकडे तिकडे गेलेल्या लोकांना एकत्र आणण्यात वेळ गेला पण त्याने सर्वांना एकत्र करून काही सूचना दिल्या. ते सर्व आता लढाई संपेपर्यंत तेथे थांबणार होते. तांड्याचा मालक सर्वाना राहण्यासाठी चांगली जागा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार होता. पण ते बाहेरून आलेले असलेने तेथे आधी राहतं असलेल्या लोकांबरोबर राहवे व जमवून घ्यावे लागणार होते. आतिथ्यशिलतेचा हा एक नियम आहे.