किमयागार - 28 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 28

किमयागार -मक्तूब
फातीमा म्हणाली, आणि म्हणूनच मला वाटते की, तू तुझे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा. युद्ध संपेपर्यंत थांबावे लागले तरी थांब.
पण तुला आधी जायचे असले तरी तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न कर.
वाळूच्या टेकड्यांचा आकार वाऱ्यामुळे बदलत असतो, पण वाळवंट बदलत नाही आणि आपल्या प्रेमाचे असेचं होणार आहे.
ती पुढे म्हणाली "मक्तूब". मी जर खरेच तुझ्या स्वप्नाचा एक भाग असेन तर तू नक्कीच परत येशील.
त्या दिवशी तरुणाला उदास वाटत होते. त्याच्या मनात लग्न झालेल्या मेंढपाळांबद्दल विचार येत होते. त्यांना आपल्या पत्नीला हे समजवावे लागे की त्यांना दूरवरच्या प्रदेशात जाणे आवश्यक आहे.
प्रेम माणसाला एकमेकांसोबत राहाण्यास भाग पाडत असते. हे विचार त्याने फातिमाला सांगितले.
फातिमा म्हणाली, वाळवंट आमच्या माणसांना दूर नेत असतें आणि काही जण तर परत पण येत नाहीत. आम्हाला हे माहित असते व त्याची आम्हाला सवय झालेली आहे. जे परत येत नाहीत ते ढगाचा भाग होतात किंवा दऱ्या मधील अथवा पाण्यातील प्राण्यांचा भाग होतात. ते या विश्वात सामावलेले असतात ते या जगाचा आत्मा होतात.
काहीजण परत येतात तेव्हा इतर बायकाही आनंदित होतात कारण त्यांना असे वाटते की आपलाही नवरा असाचं परत येईल. मला अशा बायकांच्याकडे बघून हेवा वाटत असे.
आता मी पण या बायकांसारखीच
" वाट पाहणारी " होईन.
किमयागार -वाळवंट -
मी वाळवंटात राहणारी स्त्री आहे.
आणि मला त्याचा अभिमान आहे. मला नवरा मात्र असाच पाहिजे आहे जो वाऱ्यासारखा स्वतंत्र असेल आणि तशाच परिस्थितीत, मी हे पण मान्य करीन की तो ढगांचा, प्राण्यांचा अथवा वाळवंटातील पाण्याचा भाग झाला आहे.
तरुण इंग्रजाला भेटण्यासाठी गेला. इंग्रजाला तो फातिमा बद्दल सांगणार होता. इंग्रजांच्या तंबू जवळ गेल्यावर तेथे बाहेर एक भट्टी बघून त्याला आश्चर्य वाटले. ही भट्टी जरा वेगळीच होती. लाकडे घातली होती आणि वरती पारदर्शक धातुची बाटली लावलेली होती. इंग्रजाचे डोळे तो पुस्तके वाचत असे तेव्हापेक्षा चमकदार दिसत होते.
ही माझ्या कामाची सुरुवात आहे. यातून मला सल्फर बाजूला काढायचा आहे.
मला अपयशाची भीती न बाळगता हे करणे आवश्यक आहे तरच मी यशस्वी होईन. मला आधी या कारणामुळे अपयश आले. तो भट्टीत लाकडे टाकत बसला होता.
सूर्यास्ताच्या वेळी, जेव्हा वाळवंट गुलाबी दिसू लागते तोपर्यंत तरूण तेथे थांबला. तरुणाला वाटत होते की, वाळवंटात फिरावे आणि वाळवंटाच्या शांततेत आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतातं का पहावे.
तो थोडा वेळ वाऱ्याचा आवाज ऐकत इकडे तिकडे फिरत होता. त्या वाळवंटात शिंपले सापडत होते, याचाच अर्थ हे वाळवंट एकेकाळी समूद्र होते.
किमयागार -विचार -
दगडावर बसून क्षितीजाकडे बघताना तो मंत्रमुग्ध झाला होता. प्रेम व अधिकाराची भावना वेगळी करता येईल का याचा विचार तो करत होता. फातिमा वाळवंटातील मुलगी होती व तिला समजून घेण्यासाठी वाळवंट समजून घेणे आवश्यक होते. तो असा विचार करत असतानाच त्याला त्याच्या आसपास हालचाल जाणवली, दोन बहिरी ससाणे आकाशात विहरत होते.
त्या पक्ष्यांना वाऱ्याबरोबर झुलताना तो पाहत होता. त्यांच्या उडण्याची विशिष्ट अशी पद्धत नसली तरी त्यामध्ये एक लय होती, त्यामध्ये त्याला एक जाणिव होत होती पण ती जाणिव काय होती त्याला समजत नव्हते.
तो त्यांच्या कडे अगदी बारकाईने पहात होता जणू काही त्यातून त्याला काही ज्ञान मिळणार होते.
हे वाळवंटातील पक्षी प्रेमभावना, व मालकी भावना याबद्दल काही सांगू शकतात का हे तो पहात होता.
त्याला एकीकडे झोप पण येत होती व जागे राहवेसे पण वाटत होते.
मी जगाची भाषा शिकत आहे आणि जगातील सर्व गोष्टींमध्ये काहीतरी अर्थ मला दिसतं आहे अगदी पक्ष्यांच्या विहरण्यात देखील.
आणि आपण प्रेमात पडलो असल्याने आपण आनंदी आहोत असे वाटून त्याला प्रेमभावनेबद्दल कृतज्ञता वाटली. त्याच्या मनात आले, प्रेमात असताना सर्व गोष्टी वेगळ्याच वाटतात.
अचानक एक ससाणा वेगाने दुसऱ्या ससाण्यावर हल्ला करण्याच्या इराद्याने वेगाने खाली येत असल्याचे त्याला दिसले.
आणि हे बघताना तरुणाच्या मनात ओॲसिस मध्ये हातात तलवारी घेऊन सैनिक उभे असल्याचे त्याला दिसले, हा विचार मनातून लगेचच गेला असला तरीही या विचाराने त्याला भीती वाटली.
त्याने मृगजळांबद्दल ऐकले होते व काहींचा अनुभवही घेतला होता. मृगजळ म्हणजे वाळूवर दिसणाऱ्या (भासणाऱ्या) मनातील तिव्र विचार,इच्छाच असतात. पण आत्ता तरी ओॲसिसवर आक्रमण होऊ नये असे त्याला वाटले.