किमयागार - 34 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 34

किमयागार -ओॲसिसकडे परत - Girish

काय घडेल ते मी तुला सांगतो.
तू ओॲसिसचा सल्लागार होशील. तुझ्याकडे खुप मेंढ्या व उंट घेण्याइतके सोने असेल.
तू फातिमाशी लग्न करशील.
एक वर्षे तुम्ही आनंदाने संसार कराल.
तू पन्नास हजार खजुराच्या वृक्षामधील सर्वांना ओळखू लागशील.
तुला जग कसे बदलते ते दिसेल. तू अधिकाधिक शकून ओळखू लागशील कारण वाळवंट हेच मोठे शिक्षक आहे. दुसऱ्या वर्षी तुला खजिन्याची आठवण होईल. शकून दिसू लागतील पण तू तिकडे दुर्लक्ष करशील.
ओॲसिसच्या रहिवाशांप्रमाणे तू युद्ध विद्येचे ज्ञान वापरशील.
टोळी प्रमुख तुझी स्तुती करतील. आणि तुझे उंट तुला पैसा व सत्ता देतील. तिसऱ्या वर्षीही तुझे भाग्य आजमावण्यासाठीचे शकुन तुला दिसतील.
तू वाळवंटात फिरत राहशील आणि फातिमाला तुझे भाग्य शोधण्याच्या मार्गातील अडसर बनल्याचे दु:ख होइल.
पण दोघांचे प्रेम तसेच राहील. तुला कळेल की, फातिमाने तुला कधीच थांबायला सांगितले नव्हते कारण वाळवंटातील स्त्रियांना बाहेर गेलेल्या पुरुषांची वाट बघण्याची सवय असते. त्यामुळे तू तिला दोष देऊ शकणार नाहीस. आणि वाळूवर फिरताना तुला वाटेल की आपण बाहेर पडलो असतो तर.
आपण फातिमाच्या प्रेमावर विश्वास ठेवून बाहेर पडायला हवे होते असे वाटेल. कारण तुला ओॲसिसवर थांबण्यासाठी तुझी ही भीतीच कारणीभूत असणार आहे की आपण परत कधी येणार नाही आणि मग तुला संकेत मिळतील की खजिना कायमस्वरुपी खोल जमिनीत पुरला गेला आहे.

चौथ्या वर्षी तू संकेतांकडे दुर्लक्ष करत असल्याने तुला संकेत मिळणे बंद होईल.
तुला सल्लागार पदावरून हटवले जाईल. पण तोपर्यंत तू उंट, निरनिराळ्या वस्तूंचा मालक व श्रीमंत माणूस असशिल आणि उर्वरित आयुष्य तू या विचारात घालवशिल की मी माझ्या भाग्याचा शोध घेतला नाही व आता वेळ गेली आहे.
तू हे लक्षात घे की, प्रेम कधीही माणसाला त्याच्या नियतीच्या शोधाच्या मार्गात अडसर होत नाही आणि जर ते तसे होत असेल तर ते खरे प्रेम नाही. असे प्रेम जे जगाची भाषा बोलते.
किमयागाराने वर्तुळ पुसून टाकले.
साप दगडांच्या दिशेने पळाला.
तरुणाला आठवले की, क्रिस्टल व्यापारी मक्केला जाण्याचा विचार करीत असे आणि इंग्रज किमयागाराच्या शोधात फिरत आहे.
त्याला फातिमाची आठवण झाली आणि त्याने ज्या वाळवंटाने त्याच्या प्रिय स्त्रीपर्यंत पोहचवले होते तिकडे एक नजर टाकली.
ते दोघे परत घोड्यावर बस
ले व ओॲसिसच्या दिशेने परत चालले. वाऱ्याने ओॲसिस मधील आवाज येउ लागले, तरुण फातिमाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागला.
त्याने वर्तुळातील साप पाहीला होता.
खांद्यावर बहिरी ससाणा असलेल्या किमयागाराकडून त्याने खजिना, प्रेम, वाळवंटातील प्रेयसी, आणि नियती विषयी ऐकले होते.
तरुण म्हणाला मी तुमच्या बरोबर येतोय.
हे वाक्य बोलल्यावर तरुणाला एकदम शांत व प्रसन्न वाटले.
किमयागार म्हणाला आपण उद्या सकाळी लवकर निघणार आहोत.
त्या रात्री तरुणाने त्याच्या बरोबर असलेल्या अरबाला उठवले व फातिमा राहत असलेला तंबू दाखवण्यास सांगितले.
ते तिच्या तंबू जवळ पोहोचल्यावर मित्राला सोने दिले व सांगितले की फातिमाला जाऊन सांग की तिची वाट पाहत तो बाहेर उभा आहे. भरपूर बक्षिस मिळाले असल्याने मित्राने फातिमाला निरोप दिला.
फातिमा आल्यावर तरुणाने अरबाला जाण्यास सांगितले. अरब निघून गेला, त्याला बक्षिसी मिळाल्याने व सल्लागाराला मदत केल्याचा अभिमान वाटला होता.
फातिमा बाहेर आली व दोघे वृक्षराजीतून चालू लागले. हे खरेतर परंपरेच्या विरुद्ध होते पण तरुणाला आता त्याची पर्वा नव्हती.
तरुण म्हणाला, मी आता खजिन्याच्या शोधात जाणार आहे.
मी तुला सांगतो की, मी परत येणार आहे, माझे तुझ्यावर प्रेम आहे कारण .. तो असे बोलत असताना फातिमा म्हणाली‌, काही बोलू नकोस,
एखादा माणूस प्रेम करतो तेंव्हा प्रेम करतो , प्रेमासाठी त्याला कोणत्याही कारणाची गरज नसते.