किमयागार - 35 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 35

किमयागार -फातिमा - Girish

तरूण पुढे बोलू लागला. मला एक स्वप्न पडले, मग माझी राजाची भेट झाली.
मी क्रिस्टल विक्री केली आणि वाळवंट पार केले आणि युद्धामुळे मी इथे थांबलो, विहीरीजवळ किमयागाराच्या शोधात गेलो, तिथे तू भेटलीस आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे.
वैश्विक शक्तीनी मला तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली, ही त्यांची स्पर्शाची पहिलीच वेळ होती. मी परत येईन , तरुण म्हणाला.
फातिमा म्हणाली, यापुर्वी मी वाळवंटाकडे बघताना काही इच्छा करत असे पण आता मी अपेक्षेने तिकडे पाहीन.
माझे वडील पण बाहेर गेले व परत आले आणि ते परत येतातच.
ते दोघे आता शांतपणे चालत होते. तरूणाने तिला तिच्या तंबूच्या दारात सोडले.
तुझे वडील परत आले तसेच मीही परत येईन. त्याला फातिमाच्या डोळ्यात अश्रू दिसले. तू रडते आहेस?
त्याने विचारले ती चेहरा लपवत म्हणाली मी वाळवंटातील स्त्री असले तरी एक स्रीच आहे.
किमयागार -प्रवास -

फातिमा तंबूमध्ये गेली. दिवस उजाडल्यावर ती जी कामे वर्षानुवर्षे करतं आली होती ती करु लागली. पण आता सर्व बदलले होते.
तरूण ओॲसिसवर नव्हता आणि कालपर्यंत ओॲसिसवर जो आनंद वाटत होता तो राहिला नव्हता. तीनशे विहिरी, पन्नास हजार पाम वृक्ष असलेले व यात्रेकरूंचे विश्रांती स्थान असलेले ओॲसिस आता रिकामी जागा वाटत होते.
आता वाळवंटाला अधिक महत्त्व आले होते. ती आता वाळवंटाकडे रोज बघणार होती. खजिन्याच्या शोधात गेलेल्या तरुणाची वाट पाहणार होती.
त्याला वाऱ्यासोबत प्रेम संदेश पाठवणार होती जो त्याला ती जिवंत आहे असे सांगणार होता. ती आता खजिन्याच्या शोधात निघालेल्या धैर्यवान पुरुषाची वाट बघणारी स्त्री असणार होती. आणि वाळवंटाकडून तरुणाच्या परत येण्याची अपेक्षा करणार होती.
दोघे प्रवासाला निघाले. किमयागार तरुणाला म्हणाला, तूं काय मागे सोडले आहेस याचा विचार करू नको. जगद्आत्म्याने सर्व काही लिहीलेले असते. तरूण आता वाळवंटातील शांततेशी जुळवून घेत होता.
तो म्हणाला, माणसे प्रवासाला जाताना घरी परत येण्याचाच जास्त विचार करतात. एखाद्याला जे काही सापडणार असते ते शुद्ध असेल तर नुकसान होत नाही आणि जाणारा परत येऊ शकतो. पण जर ती गोष्ट क्षणीक प्रकाश देणारी असली तर परतीचा प्रवास फोल ठरतो.
आपण काय मागे सोडले आहे याचा विचार न करणे अवघड होते.
वाळवंटातील शांतता त्याला मागे बघायला लावत होती.
त्याला खजुराची झाडे, विहिरी आणि प्रेमिकेचा चेहरा दिसतं होता. त्याला प्रयोग करण्यात मग्न असलेला इंग्रज, उंटचालक जो त्याचा शिक्षक बनला होता असे सर्व दिसत होते. तरुणाच्या मनात आले किमयागार कधी प्रेमात पडला असेल का?.
किमयागार ससाण्याला खांद्यावर घेऊन पुढे जात होता. पक्ष्याला वाळवंटाची भाषा कळत होती , ते जिथे थांबत तिथे ससाणा शिकार घेऊन येत असे त्याने एकदा ससा पण आणला होता.
रात्री ते तंबूमध्ये झोपत. वाळवंटातील रात्र थंड असे व जसा चंद्र पुढे जाईल तसा अंधार वाढत असे.
ते आठवडाभर प्रवास करत होते आणि
या काळात त्यांचा बोलण्याचा विषय एकचं असे आणि तो म्हणजे टोळीयुद्धापासून वाचण्यासाठी काय सावधगिरी बाळगावी लागेल.
युद्ध चालू होते आणि कधी कधी रक्ताचा वास येत असे आणि वारा त्याला या गोष्टीची आठवण करून देत असे की तरी शकुनांची भाषा त्यांच्याबरोबर कायम आहे.
सातव्या दिवशी किमयागार नेहमीपेक्षा जरा लवकरच थांबला. ससाणा भक्ष्य शोधण्यासाठी गेला. किमयागाराने तरुणाला पाणी दिले व म्हणाला,
तू तुझ्या प्रवासाच्या अंतिम टप्प्यात आहेस. तू तुझे भाग्य शोधण्याच्या मार्गावर आहेस, तुझे अभिनंदन.
पांचूची गोळी -
तरूण म्हणाला, प्रवासांत तुम्ही मला काहीच सांगितले नाही, मला वाटतं होते की, तुम्ही मला नवीन काही शिकवाल. काही दिवसांपूर्वी मी अल्केमीची(रसशास्त्र) पुस्तके वाचणाऱ्या माणसाबरोबर प्रवास केला पण त्यातून मी काहीच शिकू शकलो नाही.