भाग -
७हर्षा सगळ्यांच्या पाया पडून कॉलेज ला जायला निघते.....
दोघीही कॉलेज मध्ये येतात.......आदीती हर्षाला सगळं सांगते तिचा क्लास दाखवते तिचा सेक्शन कुठे आहे ते सगळं सांगते आणि तिच्या क्लास मध्ये निघून जाते......
पुढे..........
आदीती हर्षाला सगळं सांगून तिच्या क्लास मध्ये निघून गेली..... आतापर्यंत आदिती सोबत होती म्हणून हर्षा रिलॅक्स होती पण आता सगळं नवीन असल्यामुळे तिला थोडीशी भिती वाटु लागलेली.....तिने तिच्या क्लास मध्ये एंट्री केली......अजून तरी लेक्चर चालु झाले नव्हते असं काहीस चित्र दिसत होतं......स्टुडंट्सची बडबड ओरडणे, मस्ती हे चालूच होतं.. हर्षा सगळीकडे एक नजर फिरवते.....काही नजरा तिलाच भिरभिरुन पाहत होत्या...तशी तिची धडधड वाढत होती........ती लगेच जिथे बेंच रिकामा आहे तिथे जाऊन बसली.... आणि तिच्या बॅग मधून पाण्याची बाटली काढली एक दोन घोट पाणी पिऊन ती रिलॅक्स झाली.......
नंतर हर्षाची ओळख रेवा सोबत होते.....रेवा तिच्या ग्रुपमध्ये असणार्या मुलामुलींसोबत हर्षाची ओळख करून देते.....
" Heyy guys!!! ही हर्षा आपल्या क्लास मध्ये न्यु ॲडमिशन "रेवा
हर्षा हे माझे फ्रेंड्स.....शामल, नेहा ,रोहित,अनिकेत, विनय....रेवा
सगळ्यांसोबत हर्षांची ओळख होते तीही त्यांच्यात नॉर्मल होउन जाते
तुझं न्यु ॲडमिशन आहे ना .....तुला काहीही हेल्प हवी असेल तर बिंदास सांग.....रोहीत हसत तिला म्हणाला
ह..हो... हर्षा
थोड्यावेळाने लेक्चर चालु झाले....
दुपारी सव्वा दोन च्या सुमारास ब्रेक टाईम होतो..... आदिती तिचा फ्रेंड ग्रुप सोबत घेऊन हर्षाच्या क्लास मध्ये येते.......
हर्षाला आदितीला पाहुन आनंद होतो......ती लगेच तिच्याकडे जाते...
आदिती तिच्या मैत्रिणींना हर्षाची ओळख करून देते...
"Guys......ही माझी वहीनी....."आदिती
" हाय..यय......"सगळ्याजणी एकसाथ म्हणाल्या...
हर्षानी सगळ्यांना हसुन प्रतिसाद दिला....हर्षा ची ही सगळ्यांसोबत चांगली ओळख झाली......रिसेस नंतर सगळ्या आपापल्या क्लास मध्ये निघून जातात......
कॉलेज सुटल्यावर दोघीही घरी जातात.......
संध्याकाळी जेवण आटोपून हर्षा रुममध्ये बेडवर बसून तिच्या नोट्स कंप्लीट करत होती...तिला लिहायचा तर खुप कंटाळा आला होता पण तिला ते कंप्लीट करणं गरजेचं होतं........
थोड्यावेळाने शिवम रुममध्ये आला....
त्याने एक नजर हर्षाकडे टाकली.....ती लिहीत होती....तो तसाच स्टडी रुम मध्ये गेला.....
अर्ध्या तासात तो बाहेर आला...अजूनही हर्षाच लिहीण काय थांबलं नव्हतं.....
शिवम बेडच्या एका साइडला जाऊन झोपी गेला........ हर्षाला ही आता थोडी थोडी झोप येऊ लागली होती....ती तशीच झोपी गेली...... थोड्यावेळात शिवमला जाग आली त्याने पाहिले तर लाइट्स ऑनच होत्या...त्याने एक नजर हर्षाकडे टाकली ती तशीच निपचित झोपून होती....त्याने उठून सगळ्या बुक्स टेबलावर ठेऊन दिल्या......आणि हर्षाला नीट झोपवतच होता की ती जोरात किंचाळली भुऽऽऽऽऽऽततत.....तो तर दचकलाच त्याने लगेच तिच्या तोंडावर हात ठेवला....हर्षा नी डोळे उघडून पाहिले तर समोर शिवम होता ती शॉकच झाली तिची धडधड वाढायला लागली....
shut upp stupid.....मी तुला नीट झोपवत होतो....किती केअरलेस आहेस तू सगळं अस्ताव्यस्त करुन निवांत झोपलेलीस......आणि मी काही भुतं वगैरे नाही शिवम रागातच म्हणाला......
सॉ..ररी... हर्षा मान खाली घालून म्हणाली
शिवम ने लाइट्स ऑफ केल्या आणि तो झोपी गेला....हर्षाही विचार करतच झोपी गेली......
सकाळी हर्षाला जाग आली तशी तिने बाजूला नजर टाकली शिवम अजुन झोपलाच होता......ती लगेच बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेली......ती तिचं आवरुन आली....पण रुममध्ये कोणीच नव्हतं......तिने साधासा मेकअप केला आणि खाली हॉलमध्ये आली.......
" ये हर्षा नाश्ता करून घे....आदुचं काय माहित आवरलं का नाही मी बघून येते.... तोपर्यंत तू नाश्ता करुन घे " कुसुम
हो आई.... कुसुम आदिती च्या रुममध्ये जाते......
हर्षा जरा घरात पण लक्ष देत जा कॉलेज च्या नावाने घराकडे दुर्लक्ष करशील घरातली मोठी सुन आहेस तु ......अनिता जी तिथे नाश्ता करत होती...
हो छोटी आई.... हर्षा खाली मान घालून नाश्ता करु लागली
तेवढ्यात शिवम ही खाली आला..... राधाबाईनी शिवमला ज्युस आणि नाश्ता सर्व्ह केला....
वहीनी तुझं झालं ना आवरुन....चल जाऊयात आदींती घाई करतच म्हणाली.....
आदु आधी नाश्ता कर बाळा होऊ देत उशीर कॉलेज कुठे पळून नाही जाणार...उगाच नखरे करु नकोस तब्येत बघ किती कमी झालीय...बस पटकन खाऊन घे..... कुसुम
कुसुम आदितीला पाहुन हर्षाला माधवीची आठवण झाली...... तिचं मन भरुन आलं...पण तिने कसंबसं कंट्रोल केलं.... कॉलेज सुटल्यावर मम्मी ला कॉल करु असं तिने ठरवलं....
नाश्ता करुन दोघीही कॉलेजला गेल्या......
हर्षा तिच्या क्लास मध्ये आली....... आणि रेवाजवळ जाऊन बसली त्यांच्या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालु झाल्या...
हर्षा सगळ्यांसोबत कंफर्टेबल होउन बोलू लागली.......फक्त त्यांच्या ग्रुपमधली नेहा हर्षासोबत बोलत नव्हती त्याच कारण म्हणजे रोहीत..... नेहा रोहित वर एकतर्फी प्रेम करत होती....पण हर्षा आल्यापासून रोहीत तिला जास्तच importance देत होता त्यामूळे तिचा राग उफाळून येत होता पण ती तसं दाखवत नव्हती.......
By the way तु आधी कोणत्या कॉलेजमध्ये होतीस..... रोहित
मी आधी पुण्यात राहायला होते कॉलेजही तिकडेच होतं....आता लग्न झाले म्हणून मी इकडे राहते....
ओह्ह म्हणजे तु मॅरिड आहेस.....रोहित ज्याचा हे ऐकून चेहराच पडला....
हो हर्षाने तिचं मंगळसूत्र नीट वर काढून दाखवलंं....
तसा नेहाचा चेहरा खुलला
नंतर क्लास मध्ये मॅम आल्या आणि लेक्चर चालु झाले........
संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर दोघी घरी जायला निघाल्या......
********************
क्रमशः
©® ~ पल्लवी