इंद्रजा - 25 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इंद्रजा - 25

भाग - २५

{....पास होके भी दूर हम!❤‍🩹....}
.
.
.
.
{...मुंबई...}


ममता - झाला का सगळा स्वयंपाक?


अनुसया - हो माई झालाय स्वयंपाक आणि सगळा इंद्राच्या आवडीचा...आज तो परत येतोय...आला ना कि वाढदिवसा पण साजरा करूयात....


ममता - हो मग... आता येईलच तो...


राजाराम - त्याच्याच येण्याची तर वाट पाहतोय आपण..


अभिजीत - भाऊ कधी येतोय असं झालंय...


ओवी - अभि मामू कधी येईल इंद्रा मामू..


अभिजीत - लवकरच येईल हं ओवी..


तारा - अरे ऐका सगळ्यांनी..इंद्रा घराजवळ पोहोचलाय...पण तो म्हणत होता कि काय तरी सरप्राईज आहे....!!


ममता - सरप्राईज?


राजाराम - असेल त्याच काहीतरी...😆


अनुसया - गाडीचा आवाज आला...इंद्रा आला... 😄


ममता - चला चला...सगळे बाहेर...


इंद्रजीत - माई....आबासाहेब...अनु....ओवी... अभि.... तारा.....सगळ्यांनी या...



सगळे बाहेर येतात....इंद्राला बघताच खुश होतात...
मग त्यांचं लक्ष इंद्राच्या कुशीत असलेल्या चार वर्षाच्या मुलाकडे जात...शिवांश शांतपणे झोपला होता.....


ममता - इंद्रा हा मुलगा कोण?


अनुसया - कोण आहे हा इंद्र?


इंद्रजीत - शुईई सांगतो मी...चला आत...


राजाराम - हा चला चला...


इंद्रा शिवांशला त्याच्या खोलीत झोपवतो...आणि त्याच्या बाजूला उशी लावतो, दार लॉक नं करता खाली निघून येतो.....सगळे विचारात पडले होते कि हा मुलगा कोण?


राजाराम - कोण आहे हा लहान मुलगा इंद्रा?


अनुसया - त्याला इकडे का आणलास तू?


अभिजीत - हा भाऊ सांग ना काय झालंय त्याच?


तारा - कोण आहे हा लहान मुलगा इंद्रा?


इंद्राजीत - हा लहान मुलगा....*शिवांश इंद्रजीत भोसले * आहे...माझा आणि जिजाचा मुलगा..


ममता - काय????


राजाराम - कस शक्य आहे? जिजाच जिवंत नाही आणि तुमचा मुलगा?


तारा - नक्की काय झालंय इंद्रा सांग ना?


इंद्रजीत - सांगतो....मी कोल्हापूर ला गेलो होतो तेव्हा....(सगळी गोष्ट सांगतो...!)



सगळी कथा ऐकून, सर्वांच्या डोळ्यातून पाणी येता....आनंद करावं कि रडावं हेच कळत नव्हतं...?



ममता - इंद्रा अरे काय सांगतोयस हे? माझा नातू आहे तो...अरे पण एवढी वर्ष का जिजाने दूर राहायचं...त्यादिवशी पलूनच का गेली....? का थांबली नाही तुझ्यासाठी? का मागे वळून नाही पाहिलं तिने...



इंद्राजीत - ती घाबरली होती माई....आमच्या मुलाला वाचवायला तिने असं केल...त्यावेळी आपलेच शत्रू एक झाले आणि त्यांनी डाव सादला...नशिबात होत ते घडलं...तुम्ही सगळे तिला माफ करा..प्लिज...


राजाराम - अशक्य आहे!


अनुसया - यात मी काय बोलू...? ती वागली ते चुकीचं होता...


तारा - मी ताईला कधीच माफ नाही करू शकत... ❤‍🩹🥺


अभिजीत - मला वाटतं भाऊ बोलतोय तस आपण बाजू समजून घ्यावी जिजाची...तो काळ वेळ तस होत....शेवटी देवाने जे ठरवलंय ते होणारच ना...


राजाराम - तरीही आम्ही असं लगेचच काही नाही सांगू शकत....


ममता - बघून येऊ का रे माझ्या नातवाला...


इंद्रजीत - नको..कुणीच नका जाऊ...झोपू दे शिवा ला...उद्या भेटा ओके...आज त्याला कुणीच काही बोलू नका काही करू नका....


अभिजीत - शिवा?


इंद्रजीत - हा जिजाने त्याच नाव शिवांश ठेवलंय ना,शिवा बोलतात त्याला....


तारा - किती छान नाव ठेवलंय..


ममता - मी ना त्याच्यासाठी खाऊ बनून ठेवते उठला कि देऊ त्याला...बाकी गोष्टी नंतर बोलू....आज आनंदाचा दिवस आहे....चल अनु, तारा, ओवी चला....


अनुसया - हो माई...


तारा - चल माई...

ओवी - हो...


अभिजीत - भाऊ.. Are You Ok?



इंद्रजीत - Still Im not ok?
(तिकडून निघून जाताना....)



इंद्रा खोलीत जातो....फ्रेश होतो...आणि दरवाजा लॉक करून.....शिवाच्या बाजूला झोपतो....
छान झोपला होता शिवांश, इंद्रा त्याला एकटक निरखून पाहू लागला....👀
गोबरे गाल, गोरपान रंग, छोटस नाक, काळेभोर मोठे डोळे, गुबगुबीत गोलू मोलू असा....अगदीच कुणाला ही आवडेल असा...!!
मग त्याच लक्ष शिवाच्या कानाच्या खाली असलेल्या छोट्याशा तिळावर गेलं....!


इंद्रजीत - अरे!! जिजाच्या ही काना खाली असाच तीळ आहे? सेम टू सेम आईवर गेलाय दिसण्याच्या बाबतीत...स्वभाव कसा आहे कुणास ठेऊक?
असं वाटतय जिजाच झोपले माझ्यासमोर...कार्बन कॉपी आहे जिजाची....🫂
तुझा आई आणि माझे किती असे गोड क्षण आहेत तुला माहिती आहे का बाळा?
आधी किती छान होती तुझी आई...आता मला दुष्मन समजते...माझं किती जीव तुटतो तिच्यासाठी समजतं नाही तिला...
आधी कसे होतो आम्ही!!अजूनही आठवतात ते क्षण.....:)




इंद्रा त्याच्या आणि जिजाच्या काही गोड क्षणात हरवून जातो....!! डोळे मिटतो, जिजाला आठवतो....
नटखट, मस्तीखोर, प्रेमळ, तेवढीच भांडखोर जिजा त्याला आठवते....❤️तिची तुटक हिंदी भाषा...😂
सर्वकाही.....!!❤‍🩹

*******************

पहाटे चे चार वाजतात.....जोरजोरात कुणीतरी बेल वाजवत.....सगळे जण जागे होतात.....इंद्रा सुद्धा जागा होतो...कंटिन्यू कुणीतरी बेल वाजवत होता....सगळे हॉल मध्ये येतात, इंद्रा दार उघडतो...
तर समोर जिजा उभी होती....

तिला पाहून सगळे थक्क झाले...!! जिजा मात्र भरलेल्या डोळ्यांनी, तेवढीच रागारागात आली होती....!!


जिजा - इंद्रा....कुठे आहे माझा शिवा? 😡🥺
(त्याची कॉलर धरून....)

इंद्राजीत - तू आता इकडे? काय करतेस?


जिजा - मी सगळं सोडून, काही विचार नं करता फक्त माझ्या मुलासाठी आले....समजलं 🥺😡माझा शिवा कुठेयssssssss 😤😫😫😫😫
(जोरात ओरडताना.....)


इंद्रजीत - आहे तो झोपलाय ओरडू नकोस...


जिजा - माझा शिवा मला दे....मला बघायचंय त्याला..... अअअअ 😫🥺😡


इंद्रजीत - थांब....जिजा थांब...आणतो मी त्याला...


इंद्रा लगेचच खोलीत जातो.....आवाजामुळे शिवा जागा झालाच होता....इंद्रजीत त्याला खाली घेऊन येतो...शिवांश समोर जिजाला पाहून तिच्याजवळ पळत जातो...

जिजा शिवाला मिठीत घेते, जोरजोरात रडते....हे पाहून सगळ्यांच्या डोळयांत पाणी येत..


जिजा - ग माझं बाळ...🥺माझा शिवा...माझा शिवा..🥺


शिवांश - मम्मा तू रलते का? का झाला...?🥺


जिजा - काही नाही तू मना सोडून आला ना तिकलून म्हणूंन.... 🥺


शिवांश - मनून रलते तू....शॉली मम्मा.... आता तुला शोलून नाही येणान मी कधीच....🥺शॉली... 🙏


जिजा - ईश ओते बेटू...🥺🙂
माझा पिल्लू...🥺


इंद्रजीत - एवढ्या पहाटे तू का आलीस जिजा....


जिजा - का म्हणजे...तू.... 😡
अअअअ शिवाला कुणीतरी आत घेऊन जा प्लिज...


इंद्राजीत - ओवी...आत घेऊन जा त्याला...आणि बाकीच्यांनी पण आत जा..... झोपा..... कळलं....


ओवी - ओके मामू....


ममता - ठीके.... 🤨


सगळे आत निघून जातात.....


शिवांश - अअअअ मम्मा....


जिजा - शिवा, जा बेटू... मी आहे इकडेच...


शिवांश - ओते... 🙂


इंद्रजीत - हम्म बोल आता..


जिजा - तू माझ्या मुलाला जबरदस्ती घेऊन आलसच कसा?आणि मलाच विचारतोस कि काय झालं? का. आलीस?


इंद्रजीत - मग आता कस वाटलं तुला? तू लांब नाही राहू शकत मग मी राहू शकतो का माझ्या मुलापासून....चार वर्ष वाया घालवली मी आता नाही.... 😡किती समजून घेऊ तुला मी...समजवून सांगितलं होत तू ऐकलंस का? नेहमी वादच घालत बसायचे का???



जिजा - मला माझा शिवा पाहिजे....🥺


इंद्रजीत - नाही देणार...😡


जिजा - ठीके मग त्याला मिळवायला मला, कायदाची मदत घ्यावी लागेल पण मला शिवा समोर हे सगळं नाही करायचंय.... मला भाग नको पडूस..


इंद्रजीत - तू पण नको पाडूस मला..असं वागायला....मला नाही वागता येत तुझ्याशी वाईट....कस समजतं नाही तुला....🥺आता सगळं बदलल आहे ना...मी आता तो इंद्रा नाही राहिलोय...
कस पटवून देऊ...आपण हेच करत राहिलो तर काही फायदा नाही याचा.....यात शिवाची पण ओढातान होईल.... मार्ग काढावा लागतो...निघत नाही...
(भरलेल्या डोळ्यांनी...)


जिजा - पटवून दे...पटवून दे कि तू बदलला आहेस....तरच आपण एक होऊ शकतो....कारण झालं त्यात चूक कुणाची हे शोधण्यापेक्षा काय झाली हे बघुयात? आणि सुधारूयात....मला पटवून दे..हा पण जर नाही पटल मला तर?



इंद्रजीत - तर तू शिवाला घेऊन जा कायमच....मी काही नाही बोलणार....पण तुला पटवूनच दाखवेन मी....पण तोवर इकडेच रहावं लागेल तुला....आणि पटल तुला कि पुन्हा आधीसारखं करू आपल नातं? मान्य?


जिजा - हो मान्य..... 🙏


इंद्रजीत - ठीके, बाकी नंतर बोलू...इकडून वरती जा आपल्या खोलीत शिवा आहे तिकडेच....जाऊन झोप.... उद्या बोलू....



जिजा - थँक्यू....!!



जिजा वरती खोलीत निघून जाते.....इंद्रा गार्डन मध्ये निघून जातो....तिकडे जाऊन बसतो....
जिजा वरती जाते, शिवा पुन्हा झोपला होता....
जिजा फ्रेश होऊन बाहेर येते, शिवा जवळ बसते.......
खोली अजून ही तशीच होती, जशी जिजाने सावरली होती....एक ही गोष्ट बदलली नव्हती....

त्यांचे फोटोज, जिजाचे टेडी बेअर्स, तिच्या आवडीचे पडदे....तोच कलर....सगळं जपलं होत इंद्राने...❤‍🩹

जिजाच्या डोळ्यात पाणी आलं....नव्याने काहीतरी जुनं आठवावं...!!

इंद्रा सिगरेट ओढत बसला होता...जिजाने त्याला बाल्कनी मधून पाहिलं....जिजाला खरच असं वाटलं कि इंद्रा बदलला आहे? पण बदल हा वाईटच झालाय.....!! तिने विचार झटकले आणि जाऊन शिवाच्या बाजूला झोपली....!!

********************

सकाळी कसल्या तरी आवाजाने जिजा पटकन जागी झाली.....
उठल्या उठल्या, समोर इंद्रा दिसला....
जस्ट एक्सरसाईज करून आला होता....शर्टलेस होता, त्याची बॉडी बघून.....लुक्स बघून जिजा त्याला बघतच बसली....
एवढ्या वर्षानी आज पुन्हा असं त्याला पाहत होती....तिला भूतकाळातल्या काही गोष्टी नजरे समोर यायला लागल्या.....!!!!



(छोटासा भूतकाळ )
.
.
.

जिजा - अअअअ इंद्रा, काय रे सकाळी लवकर उठवलंस आज आणि व्यायाम काय करायला लावलस.... दमले मी......पाय दुखायला लागले,. 😫
(स्वतः ला बेडवर झोकून देत...)


इंद्रजीत - लाज वाटून घे आपल्याच घरात जिम आहे तरी जायचा कंटाळा.....सकाळी लवकर उठतेसच ना मग थोडासा वेळ इकडे द्यायला काय झालं? व्यायाम करायला कंटाळा नको करुस...समजलं....
तस पण तुला आता गरज आहे व्यायामाची....😂
(तिच्या बाजूला बसून....)

जिजा - गरज आहे म्हणजे?


इंद्रजीत - पोट बग पुढे यायला लागलंय... 😂आणि मला पण वजन जाणवत तुझा...


जिजा - हो का🤨जास्त डोक्यात जाऊ नकोस हा...नाहीतर रात्री जेवण खारट तुरट बनवून देईन.... 🤨


इंद्रजीत - नको बाई 🙏😂जेवणाशी मस्ती नको 😂चल आता फ्रेश होऊयात....
(त्याच शर्ट काढतांना म्हणाला....)


जिजा - उफ्फ!! तुला शर्टलेस बघितलं ना कि माझा स्वतः वरील ताबाच हरवतो 😍असं वाटतं कि.... 🫂


इंद्रजीत - काय?


जिजा - सांगू? सांगू 👀


जिजा इंद्राला बेडवर ढकलते....आणि त्याचा अंगावर झोपते......नजरेला नजर मिळवते, हळूहळू त्याच्या जवळ जाते.....👀


इंद्रजीत - ओय ओय थांब थांब...😂आताच जिम वरुण आलोय अजून गरम नको करुस...उठ मला फ्रेश होउदे 😂


जिजा - शुईईई 🥵आवाज बंद...तुझं मन असो किंवा नसो मला करायचंय.... 👀❤️🫂


इंद्रजीत - जिजा..... नो..... नो....


जिजा - इंद्रा...... हो..... हो....😚😘



जिजा इंद्राच्या ओठांचा ताबा घेते......इंद्रा सुद्धा स्वतःला झोकून देतो......!!🫂👀



#लबो को लबो पे सजा दो....👀
#क्या हो तुम मुझे अब बता दो..❤‍🩹
#देख लो खुद को तुम बाहो में मेरी बाहो मेंsss.....🫂

**********************

(वर्तमान)



इंद्रजीत - काय??? 🤨🫡


जिजा - अअअअअ क काही नाही...
(ब्लॅंकेट अंगावर घेताना....)


इंद्रजीत - 😆
.
.
.
.
.
.
जिजा तीच आणि शिवाच आवरून खाली आली.....जस शिवा खाली आला सगळे त्याला बघत बसले....खूप गोंडस दिसत होता....सगळे त्याला घ्यायला उत्सुक होते.....पण तो कुणाकडे जात नव्हता....


ममता - शिवा...ये माझ्याकडे....😄


शिवांश - नाय.... 😫


जिजा - शिवा..असं नाही करायच तुला माहिते ही तुझी आज्जी आहे, ते आजोबा....ते छोटा काका, ती अनुसया आंटी....आणि ती ओवी दीदी, ती तारा माऊ....


इंद्राजीत - अनुसया आंटी नाही.... छोटी काकी....


जिजा - काय?


अभिजीत - अनुसया आणि माझं लग्न झालंय तीन वर्ष झाली...


जिजा - काय...... 😶


शिवांश - मम्मा..मम्मा....


जिजा - अअअ हा हा बाळ..


शिवांश - म्हणजे पोलिश अंकल माझे पप्पा...? मग ते इतकी वलस कुते होते


जिजा - अअअ ते शिवा... अरे ते काय झालं ना कि तुला पोलिश खूप अवलतात ना...म्हणून तुझे पप्पा बोलें कि मी माझ्या शिवा साठी पोलिश बनून येणार.... जेव्हा तो मोठा होईल तेव्हाच मी त्याला भेटेन...म्हणजे मी शिवाचा सुपर हिरो असेल ना म्हणून....तुजसाठी असं लांब राहिले पप्पा तुझे..



शिवांश - आई शपत...खल मम्मा... 😃



जिजा - हो आई शपत बेटू 😆आणि हे सगळे आपली फॅमिनी आहे ना....तू यांच्यावर पण प्रेम कर...यांचा सोबत खेळ....असं वाईट नाही वागायचं....ओके बेटू....जा सगळ्यांना भेट....


शिवांश - ओके मम्मा....
म्हणजे तुमी माझे पप्पा आहे...
(इंद्रा जवळ जाऊन...)



इंद्रजीत - हो हो शिवा.... 🥺


शिवांश - पप्पा.... माझे सुपलं हिलो पप्पा....
(त्याला मिठी मारून....)



इंद्रजीत - हा...तुझाच सुपल हिलो...🥺
(इंद्रा त्याच्या मिठीने सुखावला...)


ममता - माझ्याकडे ये शिवा... 🥺


शिवांश - आज्जी....


राजाराम - माझ्याकडे पण ये.... 🥺


शिवांश - हो आजोबा तुमाकडे पण येणान मी... 😂



सगळे शिवाचे लाड करू लागतात....त्याला उचलून घेतात मिठी मारतात.....सगळे आज खूप खुश होतात....खूप सुखवतात....त्या निरागस जीवाचा स्पर्शच त्यांना आनंद देऊन जातो.....



तारा - ओवी जा आपल प्ले रूम दाखव त्याला....


ओवी - हो हो चल... चल शिवा..



ममता - सांभाळून जा ग..... शिवाची काळजी घे...


ओवी - हो माई....


शिवा - बाय मम्मा...


जिजा - बाय बाळा... 🥺


इंद्रजीत - थँक्यू जिजा... 🥺🙏हे मी कधीच नाही विसरणार....


जिजा - हम्म... 🙂तुझा हक्क आहे तो...


ममता - आभारी आहोत तुझे....


जिजा - माई असं का बोलताय...आणि कसे आहात तुम्ही सगळे....तुमच्याशी नीट बोलायला ही नाही भेटलं....काल पासून 🥺चार वर्षानी बघतेय तुम्हाला...



तारा - आता आठवण झाली तुला 🥺😡



जिजा - अरे देवा! शोना किती मोठी झालीस ग...काल तुला भेटायचं होत पण इंद्रा ने तुम्हाला आत पाठवलं.....🥺मला माफ कर मी त्यावेळी तुला....



तारा - शुईईईई बस्स काहीच नको ऐकवू...मला ऐकायचं नाही....काही कारण होत म्हणूंन तू गेलीस माझा विचार नाही आला.... 🥺


जिजा - आला ना पिल्लू...पण मी इकडे नव्हते ग... समज ना थोडं मला....मी कोणत्या.....



तारा - काय समजू आम्ही? का समजू? आमची आणि इंद्राची बाजू कधी समजलीस का? त्यावेळी पण त्याला समजून नाही घेतलंस तो बोलत होता ना तेच झालं.....? नेहमी वाद घातलेस....आता पण तेच....प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात..टाळी एका हाताने नाही वाजत अशक्य आहे ते....



राजाराम - त्यादिवशी निघूनच का गेलीस..आमच्या इंद्राने जीवाचा आकांत केला होता तुला वाचवायला.....किती वेड्यासारखं शोधत होता तुला तो...आम्ही पण इकडे वेडे झालो होतो....



अभिजीत - तुझी बाजू मी समजतो जिजा...पण भाऊने खूप सहन केल ग.... वेडा झाला होता वर्षभर...🥺आणि आम्ही पण 🥺



जिजा - मी पण तर केल अभि....मला पण सगळ्यांची आठवण यायची पण... माझ्यासोबत....




तारा - हा हा माहिते, इंद्राने आम्हाला सांगितलंय त्या रात्री तू का पळून गेलीस, तू तुझ्या जागी योग्य होतीस आहेस नेहमी असणार त्यावर आम्ही नाही काही बोलणार....मला एवढंच बोलायचंय कि, तू तुझा दुःख सांगतेस...इंद्राने त्याच एका रात्रीत काय सहन केलंय माहिते तुला 😡🥺कधी ऐकलंस? विचारलंस?


इंद्राजीत - ए तारा.... नको...नको हा विषय....


तारा - गप रे तू...इंद्रा...समजू दे हिला पण...
त्या रात्री.......तू गोळीचा आवाज ऐकून निघून गेलीस.......इंद्राच्या हाताला पायाला गोळी लागली होती तरी त्या घनदाट जंगलात तो तुला शोधत होता.......आणि इकडे आपल्या या वाड्याला त्या लोकांनी आग लावलेली माहिते.......आख्खा वाडा जळाला होता........आम्ही सगळे आगीत अडकलेलो......जिवा, मल्हार यांनी आम्हाला बाहेर काढलं......जीवाचा हात त्यात जळाला होता...मल्हार चा अर्धा पाय भाजला......बाहेर आलो तस सगळ्यांनी आग विझवायचं प्रयत्न केला......पण आग वाढत गेली....
आणि तुला माहिती आहे त्याच आगीत, अर्चना ताई, अंकुर जीजू आणि उषा मावशी जळून गेले, आज ते या जगात नाहीत......🥺😭त्या तिघांनी आम्हाला बाहेर काढलं स्वतः मात्र आगीत अडकले.....🥺



जिजा - कायssss...... 🥺❤‍🩹😭बापरे....अर्चू...अर्चू त ताई....? 🥺अंकुर दादा, उषा मावशी... 🥺


तारा - आणि हा इंद्र तुला शोधत होता......पहाटे घरी आला तेव्हा समजलं कि आग लागलेली वाड्याला.....काय डोंगर कोसळला असेल याच्यावर.....सगळं संपल होत त्याच.....त्याच क्षणी त्यांनी हे सगळे काम धंदे सोडायचं ठरवलं....होता नव्हता तेवढा सगळा पैसा इंद्राने वाड्यावर लावला.....जसा आधी होता तसाच पुन्हा आपल घर उभ केल त्याने, वाटतं तरी का इकडे आग लागली होती म्हणून चार वर्षा आधी? कुणी नाही म्हणणार.....फोटोज पासून, घराच्या कलर पासून सगळं सारखंच केल.....हे सगळं कुणी केल या एकट्या इंद्राने...... समजलं 🥺😡

एका रात्री एका झटक्यात काय काय गमावलं याने..... तू सहन केलंस त्याची amhala खंत आहे ....तसेच याने पण केल.....
हे सांगायचं तात्पर्य एवढंच.... स्वतः सोबत समोरच्याच ही दुःख समजावं, जपावं...नेहमी स्वतःच खरं करून नुकसान होत..... जे तू भोगलंस... आणि आम्ही पण... 🥺

ओवीला कस सावरलंय आमचं आम्हाला माहिती.....स्वतःच्या निघून गेलेल्या बायकोच्या बहिणी ला कुणी नाही संभाळणार आजच्या युगात......पण या सगळ्यांनी माझे नखरे, हाऊस मौज, शिक्षण, सगळं काही केलंय करत आलेत.....समजलं !! अजून बरच काही आहे....हळू हळू कळेलच तुला..... 🥺
पण तू खूप निर्दयी आणि स्वार्थी आहेस ताई...I hate You......🥺
(तारा, निघून जाते....)



जिजा - तारा अग मला नव्हतं माहित मी..... 🥺



ममता - तारा जाऊदे...शांत हो बाळा....तारा.... 🥺
(ताराच्या सोबत जाताना....)



राजाराम - आम्ही माफ नाहीच करू शकत तुला...सध्या तरी....🥺माफ कर लेकरा...
(निघून जाताना.....)



जिजा - आबासाहेब....🥺



अभिजीत - मी यात काहीच नाही बोलू शकत...सॉरी जिजा..... 🥺



अनुसया - I'm also Sorry!!



जिजा - बापरे....एवढं सगळं घडलं....आणि मला...🥺


इंद्रजीत - जिजा...ऐक....


जिजा - नाही... 🥺😭
(तिकडून, पळत जाताना....)



इंद्रजीत - जिजा, जिजा.....अरे यार!!
गुंता कमी व्हायच्या ऐवजी वाढत जातोय.....

> > > > > > > > > >


जिजा - बापरे, इंद्रा एवढं सहन करत होता....? मी विचार करत होते कि.... 🥺😭
देवा! हे काय घडलं होत रे आमच्या आयुष्यात सगळं चांगल चालू असताना....



इंद्रजीत - जिजा....


जिजा - का नाही सांगितलं हे सगळं? मी सहन केल तू ही केलंस? सांगितलं का नाहीस 🥺


इंद्राजीत - काय सांगू? कोणत्या तोंडानी? आपणच एकत्र नव्हतो तर काय सांगू? सांगणार होतो त्या आधी विषय निघाला...


जिजा - 🥺😭


इंद्रजीत - जिजा रडू नकोस..आवर स्वतः ला.... झालं ते झालं...


जिजा - यासाठी सॉरी 🥺खरच तुझे उपकार कसे फेडू मी...


इंद्रजीत - its ओके..उपकाराची भाषा नको करू 🙏


जिजा - 🥺🥺

***********************

रात्री इंद्रा ड्युटी वरुनं घरी आला......तो पूर्णपणे दारूच्या नशेत आलेला..... शिवा पळतच त्याच्या जवळ आला....शिवांश ला बघताच इंद्राने त्याला उचलून घेतलं....


इंद्रजीत - अरे पिल्लू तू अजून जागा आहेस?


शिवांश - हा पप्पा आज माझा पहिला दिवश होता या घलात तुमी लवकलं आला पन नाय घरी माजा सोबत खेळाला.... 🥺


इंद्रजीत - सॉरी शिवा...उद्याचा दिवस तुझासाठी ओके


शिवांश - ओते...



ओवी - शिवा आज्जी बोलवते....



जिजा - शिवा जा आज्जी च्या खोलीत आज तू त्यांच्यासोबत झोपणार ना..
(इंद्रा जवळून त्याला खेचताना )



शिवांश - हा मम्मा...


जिजा - झोपशील ना नीट बाळा.. रडणार नाही ना


शिवांश - नाही मी मोटा झालोय आता


जिजा - गुड बॉय... जा आता ❤️


शिवांश - बाय गुद नाईत...
(तिकडून पळत जाताना..)


जिजा - तुला जरा तरी लाज आहे?
लहान मुला जवळ दारूच्या नशेत येतोस...केलेलं प्रॉमिस लक्षात तरी राहणारे का नशेत...



इंद्रजीत - नशेत आहे, बेशुद्ध नाही....
आणि लाज तुला वाटते का?


जिजा - का मी काय केल 🤨


इंद्रजीत - काय म्हणजे?? शिवाला तिकडे पाठवलंस कारण तुला माझ्यासोबत स्पेशल टाइम घालवायचा होता...


जिजा - आ ए ए अस काही नाही ओके... ते माई नी बोलवलं..



इंद्रजीत - खोटं ❤️👀
ह्म्म्म? 💞


इंद्रा तिच्या जवळ येतो, जिजा बेडवर बसते आणि मागे मागे जाते.....इंद्रा जिजाच्या ओठांजवळ जातो......जिजा घाबरते, डोळे बंद करते.....तर इंद्रा सरळ बेडवर पडतो आणि झोपी जातो....
😂❤️


जिजा - बाई...काय माणूस आहे हा..क्षणात बदलतो... हुसह्ह्हह्ह 🫡🥵


इंद्राजीत - अअअ जिजा...शिवा...जाऊ नका.. थांबा.. अम्म्म
(झोपेत बोलताना...)


जिजा इंद्राचे शूज, टी शर्ट काढते, आणि त्याला सरळ झोपवते.....अंगावर पांघरून देते...
इंद्रा जिजाचा हात डोक्यावरून फिरताच शांत झोपतो...जिजा त्याला एकटक बघत बसते...
तिच्या डोळ्यात नकळत पाणी येत..



असे एकटी मी जरी दूर तू.... ❤‍🩹
तुझी ओढ खोल काळजात आहे...... ❤‍🩹

********************


सकाळी इंद्रा आणि शिवाचा आवाज ऐकून जिजा जागी झाली.....शिवाला शोधत ती बाहेर आली, तर इंद्रा आणि शिवा दोघ ही क्रिकेट खेळत होते...ओवी, तारा, अभिजीत सुद्धा त्यांना जॉईन झाले होते...
आज भोसलेंच्या घरातल वातावरणच वेगळं होत..संडे विकएंड सारखं....!!



शिवांश - आऊत आऊत अभि टाका तू आऊत आहेस...


अभिजीत - शिवा मी आऊट नाही आहे हा.. 😂



शिवांश - टाका तू आऊत आहेस...
मिनी बॉणीन जोलात केनी तर तुझी बेट तेना लागलीच नाय... तू आऊत आहेस टाका🥺🥺



इंद्राजीत - ए अभि टाका माझा पोरगा बोला ना आऊट तर आऊट कळलं का टाका.....😂



ओवी - अभि मामा हो ना रे आऊट....



तारा - शिवा साठी एवढं नाही करणार का तू अभि दादा....



अभिजीत - ओते मी आऊत 😂


शिवांश - ये.. ये 🤓आता माझी बॅटिन....



जिजा - किती समजूतदार आहे माझा शिवांश, देवाने खरच याला अनोख बनवलंय....या वयात इतका हुशार आहे....असं वाटतच नाही कि त्याच्या बाबांना तो इतक्या वर्षानी भेटलाय....असं वाटतं सगळ्या परिवारा सोबत किती वर्षांपासून राहतोय आम्ही.. खरच माझा शिवा अनोखाच आहे🥺
(मनात....)



शिवांश - मम्मा...मम्मा....तू पन येणन खेळाला...आपण टी टोन्टी खेळू....गुलुप करू..


जिजा - नको तू खेल 😂


तारा - आलीस तर बरच होईल... शिवा म्हणतोय तर..


जिजा - चालेल खेळूया..


इंद्रजीत - ठरल तर मग एका बाजूला गँग शिवा त्यात आहेत, आबासाहेब - माई - ओवी - अनुसया..
आणि एका बाजूला गँग इंद्रा त्यात आहेत जिजा - तारा - अभिजीत..
अरे आम्हाला एक मेम्बर कमी पडतोय 🤨आता?



जीवा / मल्हार - आम्हाला विसरलात काय भाऊ?? 🥺


इंद्रजीत - जीवा मल्हार..... अरे कधी आलात ट्रेनींग हुन.... 🥺🥹


जीवा - आजच...


मल्हार - इन्स्पेक्टर मल्हार रिपोर्टींग सर..


जीवा - कॉन्स्टेबल जीवा रिपोर्टींग सर.... 🫡


ममता - वाह माझ्या पोरांनो चांगल्या मार्गाला लागलातच शेवटी.... करून दाखवलतच..


राजाराम - वाह पोरांनो मान राखलात आमचा...



ओवी / तारा - अभिनंदन मल्हार दा जीवा दा... ❤️


मल्हार - धन्यवाद पोरींनो...


जीवा - थँक्यू बर का... 😂



मल्हार - भाऊंचा शब्द कधीच खाली पडू नाही देणार आम्ही...


जीवा - भाऊ जे काम करतील तेच आम्ही बी करणार... करून दाखवणार.. म्हणून भाऊंच्या स्टेशनात बदली घेतली...


इंद्रजीत - वाह बर झालं...


अभिजीत - खूप छान तुम्हा तिघांची मैत्री उदाहरणं देण्यासारखी आहे ❤️


अनुसया - हो ना


इंद्रजीत - तुम्ही पाहिलं नाहीत कोण आलंय..


जीवा - ताईसाहेब 🥺


मल्हार - ताई तुम्ही जिवंत?


इंद्रजीत - ह्म्म्म...
(इंद्रा त्यांना सगळी हकीकत सांगतो...)


जीवा - भाऊ तुम्ही म्हणायचं ना खरं झालं... तुमचं प्रेम मरणार नाही हेच खरं झालं... 🥺


मल्हार - हो भाऊ..


जिजा - अभिनंदन जीवा भाऊ मल्हार भाऊ.. 🥺


जीवा - थँक्यू ताईसाहेब

मल्हार - धन्यवाद ताई..


इंद्रजीत - आणि याला भेटा....
तुझं नाव सांग...



शिवांश - नमशकाल 🙏मी शिवांश इंद्रजीत भोसले.... उल्फ शिवा 🫡🥰



जीवा - आई शपथ भाऊ....तुमचा होय..🥹कसला भारी हाय..


मल्हार - भरपूर गोड आहे भाऊ..एकदम गुबगुबीत 🥺❤️


शिवांश - आता तुझी माजी जोली जमेल कालन आपण जीवा आणि शिवा ना...


जीवा - हो लई जमलं छोटे सरकार 🙏


जिजा - हे काय जीवा भाऊ... शिवाच म्हणा...
शिवा जा तुझ्या जीवा मामा आणि मल्हार मामा च्या पाया पड...


शिवांश - नमशकाल जीवा मामा...
नमशकाल मलाल मामा...


अनुसया - मल्हार मलाल नाही... 😂


शिवांश - म म मलाल... 🥺


मल्हार - अरे असुदे तुला जे वाटलं ते बोल र माझ्या सोन्या तुला बघून माझं ह्रदय असच विरघळलं.. ❤️🥺



शिवांश - चला आता टी टोन्टी खेळाची आहे.. मलाल मामा तू पप्पाच्या गँग मदी जा.. आणि जीवा मामा तू ते अंपोयर हो..


मल्हार - yes सर


जीवा - yess अंपोयर बनतो मी...


शिवांश - चलो लेट्स पले 😂


इंद्रजीत - हो हो पले पले..


जिजा - Yehhh पले 😂


क्रिकेट चा खेळ सुरु होतो......सगळे खेळात दंग झाले होते......छोट्याशा शिवाला बॅट सावरत नव्हती पण त्याला एवढं दिलखुलास खेळताना पाहून सगळेच हसत होते.....

इतक्या वर्षानी जिजा आणि इंद्रा एकत्र काहीतरी करत होते....
खेळ शेवटच्या टप्प्यावर आला होता......शिवाची टीम पुढे होती इंद्राच्या टीम ला तिला हरवायला चार रन हवे होते.....एक बॉल आणि चार रन बॅटिंग जिजा आणि इंद्राची होती....

जिवाने फिरवून बॉलिंग केली.....जिजाने पूर्ण जोर लावून बॅटिंग केली....... आणि बॉल सरळ पार झाला.....ओवी बॉल पकडायला पळत गेली...जिजा आणि इंद्राने रन सुरु केले.... शेवटचा एक रन करत असताना.... जिजाने जोरात पल काढली रन पूर्ण झाले पण जिजा जोरात घसरून पडली....

इंद्रजीत - अअअ जिजाsssss

माई / आबासाहेब - जिजा हळू....

ओवी - मामी....🥺

तारा - दिदाsssss🥺

इंद्रा तिचाजवळ पळत गेला......जिजाच्या गुडघ्याला घसरल होत..... आणि हाताला ही खूप लागलं होत....सगळे तिला खोलीत घेऊन जातात... बसवतात...


अभिजीत - जिजा सांभाळून खेळता नाही येत का ग तुला?


अनुसया - फार लागलं का ग 🥺थांब थांब फस्टेड आणते....


ममता - दुखतंय का ग पोरी... खूप लागलं ग पोरीला..डॉकटर बोलवायचं का...


आबासाहेब - जिजाला फस्टेड करा रे...
इंद्रा....


ओवी - मामी दुखतंय का ग खूप 🥺


तारा - दिदे लागलं का ग खूप 🥺 अशी कशी पडलीस..


शिवांश - मम्माssss😭😭मम्माss😭


इंद्रजीत - थांब थांब दुखेल पण बरं होईल... डॉकटर कडून क्रीम घेतले मी...
बघून खेळायला काय होत ग तुला..
किती लागलं बग...नशीब एवढ्यावर निभावलं जास्त दुखापत झाली असती तर.


जिजा - असुदे निदान लागलं म्हणूंन सगळेच माझ्याशी बोलात तरी थोडं.....जर असं असेल तर मी मरायला पण तयार आहे... 🙂


ममता - जिजा अग..

आबासाहेब - अअअ.

सगळेच काहीच न बोलता आपापल्या खोलीत निघून जातात......त्यांच्या मौनातच उत्तर होतं.....जिजाला मनातल्या मनातलं सुखवलं....
इंद्रा मात्र जिजाच्या जखमाकडे बघत होता.... काळजाला ठेचं लागली असावी असं त्याला झालं..

जिजा - अरे माझ्या शिवा मम्मा ला कही नाही झालंय बाळा..रडू नको तू...


शिवांश - पण मी रलत नाही आहे...


जिजा - मग आवाज कुठून येतोय..


शिवांश - पप्पा..


जिजा - इंद्रा... अरे अरे काय झालं... असं रडायला...


इंद्रजीत - माहित नाही पण. तुझी जखम बघून पाणी आलं डोळ्यात 🥺
( भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत )


जिजा - तू अजूनही तोच इंद्रजीत आहेस..?खरच ज्याच्या वर मी वेड्यासारखं प्रेम केलं...


इंद्रजीत - मी आधी हीं तोच होतो...आहे आणि राहणार कायम.. समजण्यात तू कमी ठरलीस...
(बोलून.... तिकडून निघून गेला....)



जिजा - आता कळतंय मला, मी चुकले ते...पण जाणीव नाही होते अजून..मन मानतच नाही की सगळं आधी सारखं होईल.... 😔

............................

इंद्रा जिजाच्या विचारात खूप बुडत होता.....तीच जवळ असूनही लांब राहणं त्याला सहन होतं नव्हतं....इंद्रा जिजा जवळ असूनही नशेचा सहारा घेत होता...


अनुसया - जिजा आत येऊ का?

जिजा - हा अनु ये ना ग..

अनुसया - खरं तर सांगायला आले होते की आम्ही सगळेच बाजूच्या खानविलकर यांच्याकडे चाललोय बारशाला....म्हंटल तू येतेस का?


जिजा - नाही तुम्ही जाऊन या.. तस हीं हाताला घसरल आहे ते जरा जळजळतंय सो नकोच...

अनुसया - बरं जेवण आहे जेवून घ्या.. आम्हाला उशीर होईल आणि हो शिवाला घेऊन जातोय...घरात गार्ड्स आहेत आणि जीवा मल्हार पण आहेत ओके...


जिजा - बरं चालेल... शिवाची काळजी घे... थंड देऊ नकोस त्याला


अनुसया - हो.
आ बरं जिजा एक विचारू?


जिजा - बोल ना


अनुसया - तू चूक करतेस जिजा, इंद्राच अजूनही तुझ्यावर प्रेम आहे.... वेळ निघून जयच्या आधी त्याला जवळ घे... गरज आहे ग जिजा त्याला खूप


जिजा - पण


अनुसया - कळतंय मला तुझ्या मनातले प्रश्न.. मी उत्तरं देते.
त्या दिवशी रात्री घडलेला प्रसंग, त्यानंतर इंद्र तुला वेड्या सारखा शोधत होता, नेमक घर जळालं त्यात ताई आणि भाऊजी गेले....उषा मावशी गेली...बिजिनेस लो झाला.. विचार केलास तू कधी? इंद्राच यात किती मरण झालं...? तरी त्याने पुन्हा सगळं उभ केलं...घरच्यांना उभ केलं...तुझी इच्छा होती ती पण पूर्ण केली आज तो ACP इंद्राजीत आहे.... आणि अग त्यांनी नाही संपर्क केला तू केला का मग?
तुझ्या मुलाचा जीवाचा विचार केलास तू योग्य आहेस, पण चूक इंद्राची तरी काय होती ग यात? त्यांनी आधीपासून लोकांचं भलं केलं त्यात झाले शत्रू तयार, पण तो रक्षण करत होता तुमचं समजलं.. आणि तू इंद्राचं बोलतेस? तुझे बाबा पोलीस होते पण त्यांचे नव्हते शत्रू? त्या रात्री दोन मोठे शत्रू समोर होते इंद्राचा आणि एक शत्रू तुझ्या बाबांचा होता जिजा.....मग तुझ्या बाबांशी अबोला नाही धरलास? प्रेम हे नसतं जिजा, समजून घेणं, पाठीशी उभ राहणं, प्रेम....बग समजलं तर....
आणि राहील प्रश्न याचा तर घरचे इंद्रा साठी मुलगी शोधत आहेत.. भेटली की लग्न इंद्राने पण होकार भरलाय माईंच्या हो ला... इंद्राला खूप गरज आहे तुझी....मेंटली डिस्टरब झालाय तो..... त्याला मेंटली, फिजिकली तुझी गरज आहे..... हीं गरज दुसरीकडे भेटली तर.....आता तू ठरव... चल येते इंद्रा पण आहे त्याला हीं जेवायला दे. 👍बाय..


अनुसया चे शब्द जिजाच्या कानात घुमत होते.....जिजाला कळल होतं चूक तिची होती....ती स्वतः ला खूप अपमानित समजू लागली.... पण हा प्रश्न मनात होताच की आता सगळं नीट होईल का? घरच्यांचं काय? इंद्राच काय?


घरात कुणी नव्हतं.......रेडिओ ऑन करून,विचार करत करतच जिजा शिवाची खेळणी उचलत होती....तेवढ्यात इंद्रजीत तिकडे येतो.....तो पाहतो जिजाने कॉटन ची ग्रीन साडी नेसली होती......जिजा रूम आवरत होती....इंद्रा तिच्या मागे येऊन उभा राहिला.....इतक्या वर्षानी तो तिच्या इतक्या जवळ आलेला..... तिच्या शरीराच सुंग्ध त्याला आता वेड लावत होतं...

नकळत तो जिजाच्या जवळ गेला......जिजा खाली पडलेली खेळणी हातात उचलून उभी राहताच मागे इंद्राला पाहताच ती अचानक थांबली.......इंद्राला एवढ्या जवळ आलेलं पाहून जिजाच हृदय धडधड करत होतं....


दोघांची नजरानजर झाली 👀🫠, इंद्राने जिजाच्या कमरेवर हात ठेवला....तस जिजाच्या हातून सगळी खेळणी खाली पडली..... इंद्राच्या नजरेतील प्रेम बघून ती सुद्धा स्वतः ला थांबवू नाही शकली....


जिजा - अअअ इंद्रा, काय काय झालं त तुला?


इंद्राजीत - जिजा, जिजा 🥺 I Love You जिजा❤️🥺मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत जिजा, म म मला त तुझी गरज गरज आहे... नाहीतर म मी वेडा होईन.


जिजा - इंद्रा रडू नकोस ना, तू तू दारू प्यायलास..


इंद्राजीत - हो प्यायलोय मी पण, ते महत्वाचं नाही...जिजा आपण पुन्हा आधी सारखं होऊयात...मी खूप प्रयत्न केले.. तुला विसरायचा नाही होतं ग...🥺 मला तुझी गरज आहे...


जिजा - अअअ इंद्रा आता तू झोप...मला पण बोलायचंय आहेच पण आपण नंतर....



इंद्राजीत - शुईईईई शांत बस..
(तिच्या ओठांवर बोट ठेऊन)



इंद्रा जिजाला बेडवर झोपवतो.....हळुवार केसांमधून हात फिरवतो......
दुराव्या नंतर आज ते जवळ आलेले....तो स्पर्श हवाहवासा वाटतं होता....इंद्राच्या डोळ्यांत पाणी साचल होतं, त्याचं भरलेल्या डोळ्यांनी इंद्रा जिजाच्या ओठांजवळ जातो....

बघताच इंद्रा जिजाच्या ओठांचा ताबा घेतो....जिजा सुद्धा त्याला थांबवू शकत नव्हती... इंद्रा स्वतः ला हरवून जिजाला किस करत होता....विरह संपत होता....इंद्रा आतूनच सुखावत होता....

आजची रात्र त्यांची होती...🌿🥀


क्रमश :

काय होणार पुढे? इंद्रजाच.....?


~Pratiksha Wagoskar