मला स्पेस हवी पर्व २ भाग ३१ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३१

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३१

मागील भागात आपण बघीतलं की नेहा आल्यामुळे घरातील सगळे आनंदी झाले. आता पुढे बघू.



“आई मला दोष्त शांग.”

ऋषी गोष्ट सांग म्हणून नेहाच्या मागे लागला. नेहाने पण लाडाने त्याला कुशीत घेतलं आणि म्हंटलं,

“ सांगते हो पिल्लू कोणची सांगू ?”

यावर ऋषी म्हणाला,

“ आजोबा सांगतात तीच गोष्ट सांग.”

यावर नेहाला हसायला आलं ती म्हणाली,

“ ठीक आहे तुला ताडोबाची गोष्ट ऐकायची आहे ना सांगते.”

नेहा हावभाव करून ऋषीला गोष्ट सांगू लागली. ऋषी लाडांनी वेगवेगळे आवाज काढत होता. ऋषी आणि नेहाचं हे लडीवाळ प्रेम सुधीर डोळ्यात साठवून घेत होता. कितीतरी महिने झाले सुधीरला नेहा आणि ऋषीचं हे रूप बघायलाच मिळालं नव्हतं. नेहा गोष्ट सांगण्यात तर गुंग झाली होती. गोष्ट ऐकता ऐकता हळूहळू ऋषी पेंगायला लागला.

त्याचवेळी सुधीरच्या मोबाईलवर मेसेज आला सुधीरने मेसेज वाचला त्याच्या बाबांचा मेसेज होता ऋषी झोपला की आमच्या जवळ आणून दे. या मेसेजवर हो असं उत्तर दिल्यावर सुधीरला हसू आलं त्याच वेळेला नेहाचं सुधीरकडे लक्ष गेलं. तिला कळेना मेसेज वाचून सुधीर का असतो आहे. सुधीरने नेहाकडे बघून डोळे मिचकावले.नेहा सुधीरच्या डोळे मिचकावण्याने एकदम शहरली.

हळूहळू ऋषी झोपला ऋषी जसा झोपला तसा पटकन सुधीर उठला आणि ऋषीला उचलून घेऊ लागला तसं नेहा म्हणाली ,

“ अरे त्याला उचलून कुठे नेतो आहेस ?त्याला जाग येईल. “

सुधीर डोळे मिचकाऊन म्हणाला,

“ आई-बाबांच्या खोलीत नेतो आहे.”

सुधीरने इतकं स्पष्ट सांगितल्यावर मात्र नेहा लाजली आणि तिच्या अंगावर रोमांच उठला. सुधीर ऋषीला घेऊन आई-बाबांच्या खोलीत गेला.

नेहाला एक वेगळंच फिलिंग आलं. तिच्या लक्षात आलं हे असं ती फिलिंग पाच महिने आपल्यापासून खूप दूर गेलं होतं. सुधीरचं फोनवर बोलणं सुद्धा आपल्याला रोमांचित करत नव्हतं पण अचानकपणे पाच महिन्यात आपल्याला सगळ्या गोष्टी स्पष्ट जाणवल्या सुधीरच बघणं, सुधीरच बोलणं जेव्हा तो बंगलोरला आला होता तेव्हाच आपल्याला रोमांचित करून गेला. आपण त्याचमुळे आता पुण्याला यायचं ठरवलं नव्हे एका वेगळ्या ओढीनं आपण पुण्याला आलो हे नेहाने स्वतःशी कबूल केलं

आज नेहाला तिची पहिली रात्र आठवली. त्या दिवशी सारखाच रोमांच तिच्या मनावर आणि शरीरावर उठला. तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता. ती आज मनापासून सुधीरच्या प्रेमात एकरूप होण्यासाठी आतूर झाली होती.

सुधीर ऋषीला आईबाबांच्या खोलीत ठेऊन आला. तो हळूच नेहाच्या जवळ गेला. नेहाने डोळे मिटले असले तरी ती सुधीरची चाहूल घेत होती आणि मनोमन उत्तेजीत होत होती. सुधीर नेहाच्या जवळ सरकला आणि तिच्या चेहऱ्यावरून अलवार पणे आपलं बोट फिरवू लागला. सुधीरच्या बोटाच्या स्पर्शाने नेहाच्या चेहऱ्यावर अलगद प्रेमाचे भाव उमटले. तिचे शरीर क्षणभर थरथरले. हळुहळू सुधीरचं बोट नेहाच्या शरीरावरून अलगद फिरू लागलं. नेहाच्या शरीराची थरथर सुधीरच्या बोटाला जाणवली. त्या थरथरीमुळे सुधीरही उत्तेजीत झाला.

सुधीरने हळूच नेहाने चुंबन घेतले. आणि म्हणाला,

“ नेहा आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे असं समज”

“ हं”

नेहाने उत्तेजीत स्वरात ऊत्तर दिलं.

“ बंगलोरचं सगळं विसर. अगदी रमण शहाला विसर आणि माझ्याशी एकरूप होऊन जा.”

सुधीरने जसं रमण शहाचं नाव घेतलं तसं नेहाने खाडकन डोळे उघडून सुधीरकडे रागाने बघीतलं.

“ काय झालं? एवढी रागाने का बघते आहेस?’

“ सुधीर रमण शहा आपल्या रोमान्स मध्ये का कडमडला?”

“ तू सगळं विसरावं म्हणून म्हटलं.”

“ तुझ्या सानिध्यात आल्यावर मी रमण शहाला विसरले होते. तूच नाव घेतलंस. त्या रमण शहांची आठवण काढून आजच्या आपल्या प्रेमाला फुलण्यापासून नको रोकूस. गेले पाच महिने मी मनावरचा ताण घालवण्यात यशस्वी झाले आहे. तुझ्या आवाजालाही कंटाळलेली मी तू बंगलोरला आल्यावर मला जाणवलं मला तुझीच साथ हवी आहे. मी ज्या आशेने बंगलोरला आले त्यात मला हवं तसं काम करायला मिळालं पण त्या रमणची डोकेदुखी मागे लागली. तू हे सगळं कळूनही मला समजून घेतलं म्हणून मी अभिसारिकेच्या ओढीने इथे आले. आता हे सोनेरी क्षण नको वाया घालवायला.”


नेहाचा बोलणं सुधीरला पटलं.

“ साॅरी नेहा मला रमणचं नाव घेण्यापूर्वी तुझ्या भावना कळल्या नाहीत. आता मी चुकूनही त्यांचं नाव घेणार नाही. तूही समोर रमण आला तरी घाबरायचे नाही किंवा डगमगायचं नाही.कळलं.”

“ हो”

म्हणत नेहाने सुधीरच्या कुशीत शिरली.

ती रात्र सुधीर आणि नेहाच्या प्रेमाने न्हाऊन निघाली. प्रत्येक क्षण दोघांमधील एकरूपतेचा साक्षीदार होता. लाजेने युक्त नेहा प्रेमळ पण थोडा आक्रमक अशा सुधीरच्या पुढाकारापुढे स्वतःला थांबवू शकली नाही.

सुधीरशी एकरूप होताना अतीव आनंदाने नेहाने डोळे मिटले. नेहाला गेल्या पाच महिन्यांत किती सोनेरी क्षण आपण गमावले याची जाणीव झाली. ही जाणीव होताच तिने आवेगाने सुधीर मध्ये एकरूप होण्यासाठी पुढाकार घेतला.

“ नेहा आज तू मर्लिन मन्रो पेक्षाही सुंदर दिसतेय.”

घोग-या आवाजात सुधीर म्हणाला.

“ चल काहीतरीच.”

“ अगं खरंच सांगतोय.”

“ तू माझ्या प्रेमात आहेस नं म्हणून तुला मी मर्लिन मन्रो वाटतेय.”

किंचीत हसत बोलून नेहाने सुधीरच्या गालावर हळूच चापट मारली.

“ असेल तसं. पण तू माझी मर्लिन मन्रोच आहेस.”

“ बरं बाबा.तू म्हणतोस तर आहे.”

यावर दोघंही हसले. दोघांच्या हसण्यात फरक होता. सुधीरचे नेहा वर असलेले नितांत प्रेम त्यांच्या हसण्यात झळकत होते तर नेहाच्या हसण्यात लाजेचे गुलाबी रंग भरले होते.

हळुहळू रात्र सरत होती तसा सुधीर आणि नेहाच्या प्रणय क्रिडेला रंग चढत होता. रात्रीने सुद्धा आपल्या मखमली स्पर्शाने ती खोली भारून टाकली होती. प्रणयात रंगलेल्या या जोडप्याची लय कुठे तुटणार नाही याची काळजी रात्रीने घेतली. ही तिची जबाबदारीच होती जणू.


प्रेमाच्या कैफात आकंठ बुडालेले हे दोन जीव प्रत्येक क्षण आपल्या मुठीत पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या पाच महिन्यांत दोघांच्या मनावर आलेला ताण दूर करून त्यांना पुन्हा नव्याने डाव मांडण्याची संधी परमेश्वराने दिली . त्या संधीचा पुरेपूर उपयोग सुधीर आणि नेहा करीत होते.

प्रेमात आकंठ बुडून मांडलेला डाव खेळून शेवटी दोघंही क्लांत होऊन एकमेकांच्या बाहुपाशात निद्रिस्त झाले. त्यांनी उत्कटपणे मांडलेला डाव बघून रात्रही पुलकीत झाली. रात्रीला आता परतायचे वेध लागले कारण सूर्य देवाचं आगमन काही काळानंतर होणार असल्याने तिला प्रस्थान करणं गरजेचं होतं.

****

सकाळ झाली. रस्त्यावर रोजचे आवाज सुरू झाले आणि नेहाने डोळे उघडले. शेजारी सुधीरला झोपलेलं बघून तिला काल घडलेलं सगळं आठवलं आणि लाजून हसू आलं. सुधीरच्या चेहे-यावर समाधान दिसत होतं. नेहाच्या लक्षात आलं आपण सुट्टी वर आलो आहे पण इतक्या उशिरा ऊठणं बरं नव्हे. तिने हलकेच आपल्या शरीरावरचा सुधीरचा हात बाजूला केला आणि ती ऊठली.

सुधीरने आई बाबा मगाशीच उठले होते. नेहाला बघताच सुधीरची आई हलकेच हसली. त्यांना हसताना बघून नेहा लाजली तरीपण तिने विचारलं

“ आई काय झालं हसायला?’

” अगं तुझ्या चेहऱ्यावरचं तेज सांगतंय मला तुझं गुपीत. अशीच हसत रहा.”

नेहाच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने म्हणाल्या.

“ चल चहा केलाय.सुधीर उठला का?”

“ नाही.”

“ झोपू दे. गेल्या काही महिन्यांत त्याला शांत झोप लागली नाही. तशीही आज सुट्टी आहे. तूही झोपायचं होतास जरावेळ.”

“ माझी झाली झोप. नाश्त्याला काय करायचं?”

“ तुला दही वडे आवडतात नं ! आत्ता उडदाची डाळ दळते आणि वडे करते.”

“ आई मी दळते. तुम्ही नका तडतड करू.”

“ अगं किती महिन्यांनी आलीस. तुझं कोडकौतुक करू दे.”

“ आई मी काय पाहुणी आहे का? तुम्ही व्हा बाजूला मी दळते. तुमचे पाय दुखतात त्यात कशाला उभं राहून दळताय?”

“ आज तू आलीस नं आता अजीबात माझे पाय दुखणार नाही.”

सुधीरची आई हसत म्हणाली.

“ तरीही तुम्ही डाळ दळायची नाही. मी करते सगळं.”

“ वा! आज कान तृप्त झाले.”

सुधीरने बाबा हसत म्हणाले.

“ कशामुळे?”

आईने विचारलं.

“ किती महिन्यांनी सासू सुनेचआ प्रेमळ संवाद ऐकतोय. म्हणून कान तृप्त झाले असं म्हटलं.”

“ बाबा आईंचे पाय दुखतात म्हणून मी त्यांना डाळ दळून देत नाही. त्या ऐकत नाहीत. त्यांना बाहेरच्या खोलीत घेऊन जा.”

“ जशी आज्ञा. बाईसाहेब सुनबाई बरोबर बोलतात आहे. चला बाहेर.”

“ अहो दोन दिवसासाठी पोरं आली आहे आणि तिला काय कामाला लावताय?”

आई म्हणाली.

“ आई मी पाहुणी नाही. सून आहे या घरची दोन दिवसांसाठी आले म्हणून काय झालं! घरचच काम करतेय.”

यावर सुधीरच्या बाबांनी नजरेनेच बायकोला बाहेरच्या खोलीत चलायला सांगीतलं. दोघंही बाहेरच्या खोलीत गेले.

नेहा डाळ वाटतं होती पण तिच्या मनामध्ये कालच्या रात्रीचा सुगंधी मोगरा बहरून आला होता त्याचं अस्तित्व नेहाच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
_______________________________
क्रमशः