तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 8 Sadiya Mulla द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 8

भाग -८
आत्तपर्यंतच्या भागात आपण वाचले की, अंजू आता घरी परतल्यानंतर सगळे खुश होते. मयंक आणि अनु मधील दुरावा सुध्दा कमी झाला होता. आणि पुढच्या दिवशी त्यांच्या कॉलेज ची ट्रीप जाणार होती. सगळे जण खूप excited असतात.

आता पुढे,

दुसऱ्या दिवशी,

अनु - आई माझी बॅग रेडी आहे ना?

अंजू - अगं दी मी सर्व रेडी करून दिलं आहे. तू काळजी करू नकोस.

अनु - मी खूप excited आहे. खूप दिवसांनी जाणार आहे मी ट्रीप वर. भीती पण वाटत आहे.

अंजू - इट्स ओके दी. टेन्शन घेऊ नकोस. शालू दि पण आहे ना सोबत.
आणि हे बघ आई ने तुझे आवडीचे शेंगदाण्याचे लाडू सुध्दा दिले आहेत. आणि काही हलका फुलका स्नॅकस्.

अनु - थँक्यू यार.

इतक्यात शालू येते.

हॅलो मॅडम रेडी आहे ना....

अनु - हो ग. सब कूछ रेडी. तुझीच वाट पाहत होते.

आई - शालू बाळा नीट जावा आणि नीट या.

शालू - हो काकू. टेन्शन घेऊ नका. आम्ही नीट जाऊ अन् येऊ.

दोघेही घरातून निघतात. सकाळी 6 वाजता बस कॉलेज वरून च निघणार होती. म्हणून त्या दोघीही डायरेक्ट कॉलेजला जातात. कॉलेज मधे पोहोचल्यावर,

मयंक - अरे किती वेळ अनु. मला वाटल तुम्ही येणारच नाही. चला लवकर तुमच्या साठीच थांबली आहे बस.

तिघेही बस मधे चढतात तोपर्यंत सर्व आलेले असतात. मुलं जास्त असल्याने दोन बस केल्या होत्या. मयंक ने दोघांसाठी आधीच सीट रिझर्व्ह करून ठेवल्या होत्या.
मयंक ज्या बस मधे होता त्याच बस मधे सचिन आणि त्याचे मित्र होते. मयंक चे मित्र ही त्याचं बस मधे होते. त्यांना माहीतच होते की मयंक च्या मनात अनु बद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. मयंक अनु आणि शालू ला सीट दाखवून आपल्या मित्रांकडे गेला. अनु खूप जास्त excited होती. खूप दिवसांनी कुठे बाहेर जायला भेटलं होतं तिला.

गणपती बाप्पा मोरया म्हणत गाडी सुरू होते.

मग काय गाण्याच्या भेंड्या आणि त्यावर डान्स चालूच असतो. अनु आणि शालू मात्र सर्वांना पाहत एंजॉय करत होत्या. 8 तासांच्या आत ते कोकणात पोहचतात. पोहचेपर्यंत २ वाजलेले असतात. कॉलेज ने राहण्या साठी फार्महाऊस बुक केला होता. गाडी त्या फार्महाऊस समोर जाऊन थांबते आणि सर्वजण आपापल्या रूम च्या चाव्या घेऊन रूम मधे जातात. शालू आणि अनु सोबत अजून एक क्लासमेट असते. त्यांच्या रूम शेजारीच मयंक ने स्वतःची रूम निवडली. कारण तर अर्थातच साहजिक होतं त्याला अनु ची खूप काळजी होती. तिला जर कुठल्या गोष्टीची गरज पडली तर असा विचार करूनच त्याने जवळची रूम निवडली.

दुपारचं जेवण उरकून त्यांच्या बिच वर जाण्याचा प्लॅन असतो. सर्वजण आपापली जेवणं उरकून तयार होतात. आणि गाडी मधे जाऊन गाडी निघण्याचा वेट करतात. पण अजून अनु आली नाही हे मयंक नोटीस करतो आणि त्यांच्या रूम कडे जातो.

इथे अनु आणि शालू च संवाद चालू असतो.

अनु - शालू मला थोड चक्कर आल्या सारखं वाटत आहे. तू जा मी नाही येत.

शालू - काय. तू तुझी औषध घेतली होती ना..

अनु - हो पण खूप दूरचा प्रवास झाला ना. मला यायलाच नव्हत पाहिजे... पण यार तू माझ्यामुळे स्वतची ट्रिप खराब नको करू . तू जा.. मी आराम करते.

शालू - मी तुझ्याशिवाय कशी जाणार मंद.. ठीक आहे तू कर आराम मी इथेच बसते.. तुझ्या शेजारी. डोन्ट वरी..

इतक्यात दरवाज्यावर कोणीतरी नॉक करत.. शालू दरवाजा उघडते. आणि समोर मयंक...

मयंक - अरे तुम्ही इथे काय करत आहात... चला ना उशीर होत आहे तिथून आपल्याला लवकर फार्महाऊस वर पण पोहोचायच आहे.

शालू - अरे अनु ला बर नाही वाटत आहे. पण डोन्ट वरी मी आहे तिच्या जवळ. टीचर ना सांग आम्ही नाही येत.. तुम्ही जा...

अनु - अरे यार.. मयंक तूच हिला सांग.. इतक्या दुरून आपण ट्रीप वर आलो आहोत.. आणि आता एन्जॉय करायचा सोडून इथे बसणार . मी करेन आराम. काही वाटलं तर कॉल करेन.

मयंक - अनु बरोबर बोलत आहे शालू .. तू जा... आणि इथे थांबायचं आहे ना.. मी थांबतो.. मी हा बीच आधी ही पाहिला आहे. So u go and enjoy.

अनु ला आता आपल्या दोन्ही फ्रेंड्स साठी वाईट वाटतं कारण ते दोघे ही तिच्या साठी आपली ट्रीप एन्जॉय करू शकत नव्हते. मयंक च्या आग्रहा मुळे शालू बाकी लोकांना जॉईन करते. आणि इथे मयंक आणि अनु दोघेच बाल्कनी मधे बसून सी व्ह्यू एन्जॉय करत बसतात.

क्रमशः