Tujhya vina ure na arth jivna - 7 books and stories free download online pdf in Marathi

तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 7

भाग - ७
आत्तपर्यंतच्या भागात आपण वाचले की मयंक आणि अनु च प्रेम बहरायला लागलच होतं की सचिन म्हणजेच मयंक चा दुश्मन त्यांच्या मधे गैसमज वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे घरी अंजू ज्या व्यक्ती मुळे अनु आणि घर सोडून आजीकडे गेली होती. तीच व्यक्ती तिला सोडून निघुन गेली.
आता पुढे..
फ्लॅशबॅक
इंद्रजीत पाटील... एका वर्षा आधी पर्यंत तो अनु च्या सोबत रिलेशन मधे होता. अर्थात घरी आई बाबांना ही माहिती होती याची. त्यांच्या लग्नाची बोलणी मोठी लोक करतच होते. पण अचानक एके दिवशी अनु काही कारणास्तव इंद्रजीत चा फोन घेते त्यात तिला अंजू चे काही फोटो सापडतात. तिला थोडं विचित्र वाटतं म्हणून ती व्हॉट्स ॲपवर जाऊन मेसेज चेक करते आणि तिच्या पायाखालची जमीन नाहीशी होते.
त्या chat मधे अंजू ला केलेले मेसेज देखील होते. ते सर्व वाचून तिला कळतं की इंद्रजीत अनु सोबत अंजू ला देखील फसवत आहे. त्याच्या बद्दल हे कळताच ती अंजू ला आणि इंद्रजीत भेटायला एका कॉफी शॉप मधे बोलावते. आणि त्यांना तिला सगळं काही कळल्या च सांगते. त्यावर ते दोघेही याची कबुली देतात की त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अनु सोबत रिलेशन मधे असताना त्याला कळलं की अनु खूप introvert आहे आणि दुसरीकडे अंजू तिच्या एकदम वेगळी. आणि त्याला अंजू आवडायला लागली.
आता हे सर्व तिला सहन होत नव्हत पण तिला कळून चुकलं होतं की ती आता त्यांच्या मधे आली आहे. ती त्यांना तसेच सोडून स्कूटी घेऊन घरी जायला निघते. पण त्याच वेळी तिचा अपघात होतो ज्यामधे तिचे पाय निकामी होतात.

हे सर्व जेव्हा घरी कळतं तेव्हा आई बाबा अंजू वर नाराज होतात. त्यांना वाटतं हे सगळं इंद्रजीत मुळे झालं आहे आणि इंद्रजीत बद्दल घरामधे एक ही चर्चा करायची नाही असं तिला बजावून सांगतात. म्हणूनच अंजू घर सोडून आजी कडे निघून गेली होती.

आणि आज ती रडत होती कारण इंद्रजीत ने जे तिच्या बहिणी सोबत केलं तेच त्याने आज अंजू सोबत केलं... कोणत्या दुसऱ्या मुलीसाठी अंजू शी ब्रेक अप केलं...

अनु - अंजू मी तुला त्या दिवशी बजावून सांगितलं होतं ना यार.. ही अशी मुलं मुलींना फक्त खेळण्याचं साधन समजतात. मी ते experience केलं. मला माहिती होतं कधी ना कधी हे होणार. पण आता जाऊदे. चला तुला कळलं तरी.. It's better late than never... आता प्लिज तू आम्हाला सोडून कुठे ही जाऊ नको.😓😭
आणि दोघे ही रडत रडत एकमेकांना hug करतात.
बाबा आल्या वर अंजू त्यांच्या समोर जाते आणि त्यांच्या शी देखिल माफी मागते. अर्थातच ते माफ देखील करतात. त्यांना खूप आनंद होतो की आता आपला पूर्ण परिवार आपल्या सोबत आहे. यासर्व गोष्टींमधे अनु विसरून जाते की आज कॉलेज मधे काय झालं आहे ते..

रात्री शालू चा मेसेज येतो,
शालू (मेसेज वर)- हॅलो मंद, काय झालं तुला? तू मला घरी पोहोचून मेसेज पण नाही केला. काय झालं तुझं आणि मयंक च भांडण झालं आहे का?

हे पाहताच तिला सगळं आठवतं. ती तिला काही नाही कॉलेज मधे येऊन बोलते असा रिप्लाय देत झोपून जाते.

दुसऱ्या दिवशी,

अनु - आई आज डबा नको देऊ. तू कालसुधा डबा दिला होता.

आई - अगं पण तुला भूक नाही का लागणार.. ?

अनु - नाही.. मी जेवायच्या वेळेपर्यंत घरी सुध्दा येईन. पेपर आहेत ना आता?

अंजू - दी, exam झाल्यावर आपण कुठेतरी फिरायला जाऊ मस्त.😃
अनु - अरे हो सांगायचं विसरले exam नंतर लगेच आमची ट्रीप जाणार आहे. (बाबांकडे पाहून) बाबा मी जाऊ का?

बाबा - हो. बट शालू येणार आहे ना, आणि तो कोण तुझा नवीन फ्रेंड मयंक?

अनु - हो शालू तर येईलच. मयंक च माहित नाही. ( हे बोलत तिचा चेहरा उतरतो)😶

बाबा - ठीक आहे. पण जाणार कोठे आहात?

अनु - बाबा आम्ही कोकणात जायचं ठरवलं आणि टीचर देखील मान्य झाले बट 2 डेज ची आहे. May I go?

बाबा - offcourse you can. बट तुला स्वतः ची नीट काळजी घ्यायला हवी आहे.😊

अनु अंजू कडे पाहून - अंजू आपण मी ट्रीप वरून आल्यावर जाऊया लोणावळ्याला. ओके?😁
अंजू देखील खुश होऊन होकार देते आणि अनु कॉलेज मधे जाते. शालुला तिने डायरेक्ट यायला सांगितले असल्यामुळे ते कॉलेज मधे भेटतात.

इथे मयंक देखील काल बद्दल विचार करतो तेव्हा त्याला कळतं की अनु ला तर सचिन बद्दल काही माहिती नव्हती म्हणून तर ती बोलली. तो मनात विचार करतो " मी काल खूप ओवर रिॲक्ट केलं. आता मला अनु ची माफी मागायला हवी आहे.

एकीकडे अनु शालू ला घरी झालेल्या गोष्टीची कल्पना देते. शालू त्या इंद्रजीत ला खूप शिव्या घालते. तेवढ्यात मयंक येतो. त्याला समोर पाहून ती विचारते.

काय रे काल एवढ्या घाईत कुठे गेला होता? किती आवाज दिले मी तुला.🧐

मयंक - सॉरी.. ॲक्च्युली मला आधी सॉरी अनु ला बोलायला हवं. मी काल जे react केलं त्याबद्दल सॉरी. 😐
शालू ला याबद्दल माहिती नसल्यामुळे ती फक्त पाहत बसते. पण अनु चा राग शांत झाला नव्हता.
अनु - बस मला काही एक ऐकायचं नाही. तुम्ही सगळी मुलं एकसारखी असतात. आता हे सॉरी च नाटक नको.. I hate sorries.😡
अर्थात अनु कालच्या इंद्रजीत च्या प्रकरणाला आणि मयंक च्या बिहेवियर ला एकाच तराजूत तोलत होती.
मयंक - प्लिज मला सांगू दे मी तसं का बोललो. 🥲( आणि तो सचिन बद्दल सर्व काही तिला सांगतो. हे ऐकून शालू ल सुध्दा कळतं काय झालं होतं.)

अनु - मला कसं माहित असेल कोन मुलगा कसा आहे. मी येऊन 4 महिने सुध्दा झाले नाहीत. तुझ्या ऐवजी मी कोणत्या ही मुलाला ओळखत नाही. सॉरी... कालच्या तुझ्या reaction वरून वाटत आहे की तुला सुध्दा ओळखत नाही.😏

मयंक - I know तुला माहित नाही. बट मी त्यावेळी रागात होतो त्यामुळेच मी माफी मागतो आहे प्लिज माफ कर. 🥺

बोलता बोलता त्याच्या डोळ्यात पाणी येते.
अनु ला देखील कळतं की हा फक्त एक छोटासा गैरसमज होता.
अनु - हे बघ यार. मला एवढंच वाटतं तुला जे काही बोलायचं आहे ते तू डायरेक्ट बोलत जा. मग असे गैसमज होणार नाही. आणि आता जर तू माझ्याशी अस रागात बोलला ना बघ मग...☺️

शालू - इतने जल्दी मान गई। मला तर किती मनवाव लागतं यार हिला. पण ठीक आहे स्पेशल लोकांसाठी नवीन स्कीम असेल. 😜
आणि ती हसायला लागते. अनु गालातल्या गालात लाजते. आणि मयंक विषय बदलण्या साठी ट्रीप बद्दल बोलू लागतो.

मयंक - अरे पोरीनो येणार ना तुम्ही ट्रीप ला

शालू - हो मी तर एक पायावर तयार आहे.. अनु तुझं काय?

अनु - ॲक्च्युली मला ना...🙂

मयंक - काय .. नाही बोलले बाबा..🥴

शालू - अगं बोल ना.. मी समजावू का काकांना.?

अनु - हो म्हणाले.😜

शालू- मंद पटकन बोल ना मग हे.😠

शालू आणि मयंक दोघेही खुश होतात. आणि तेवढ्यात पेपर ची वेळ होते.


सगळे जण ट्रीप ला जायला खूप excited असतात. शेवटच्या पेपर ला क्लास मधल्या सर्वांना टीचर जायची यायची प्लॅनिंग सांगतात. आवश्यक वस्तूची यादी देतात. असा तर कोणी क्लास अटेंड करत नाही बट ट्रीप मुळे अखा क्लास प्रेसेन्ट.

दुसऱ्या दिवशी सकाळीच ट्रीप जाणार होती.


क्रमशः



इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED