तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 5 Sadiya Mulla द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 5

भाग -5
मागच्या भागा पर्यंत आपण वाचले की अनु आज खूप दिवसांनी कॉलेज ला जाणार होती. अपघातातून सावरून यायला तिला बराच काळ लागला. पण ती ऑफलाईन लेक्चर अटेंड करत होती. तिचं B A च शेवटचं वर्ष चालू होतं. पहिल्या दिवशी तिला खूप आनंद झाला पण तो ही काही वेळा साठीचं. कारण त्या कॉलेज मधल्या सिनियर मुलांच्या ग्रुप ने तिची व शालू ची fresher समजून खिल्ली उडविली. त्यांच्या म्होरक्या ( म्हणजेच लीडर) मयंक बिराजदार वरती तर अनु भयंकर नाराज होते. पण अनु ला crutches शिवाय चालता येत नाही हे पाहिल्या वर मयंक ला केल्याचा पश्चात्ताप होतो व तो तिची माफी मागून फ्रेंडशिप साठी हात पुढे करतो. आता पुढे पाहूया अनु त्याला फ्रेन्ड बनवते की नाही. आणि अनु ल फ्रेन्ड बनवण्या साठी मयंक काय करतो ते...

(नोट - वाचकांसाठी एक विनंती आहे. स्टोरी वाचल्यानंतर प्लिज review द्या. चांगला वाईट दोन्ही चे मी स्वागत करते.
तुमच्या review मुळे पुढे लिहिण्यासाठी मी प्रोत्साहित होते. आवडली नसेल तर हे देखील सांगू शकता. 😊)

आता पुढे -

क्लास मधून बाहेर आल्यावर अनु भलतीच रागात होती. शालू तिला पाहून समजावण्याचा प्रयत्न करते.

अनु - त्याची हिम्मत कशी झाली माझ्या शी मैत्री चा विचार करायची. पहिले मस्करी करायची आणि नंतर सॉरी बोलायचं . आला मोठा फ्रेंडशिप करणारा....

शालू - अग तू जस समजत आहेस तो तसा नाही आहे. मी 3 महिन्यांपासून पाहत आहे त्याला. भले तो मस्करी करतो freshers ना त्रास देतो. बट तो त्यांची मदत सुद्धा तेवढीच करतो. कारण मी पाहिलं आहे त्याला हे सर्व करताना.

अनु - शालू तू खूप भोळी आहेस. आत्ता तो मैत्री करायचं बोलत आहे. उद्या मला किंवा तुला प्रपोज करेल. नंतर प्रेमाचं नाटक करेल आणि जेव्हा आपण त्याच्या जाळ्यात अडकु तेव्हा निघून जाईल अचानक....😒

शालू - पहिली गोष्ट त्याने मैत्री च विचारलं आहे आत्ता.. पुढच्या गोष्टी तू का इमॅजिन करत आहेस, तो पुढे हे बोलेल ते बोलेल. आणि दुसरी गोष्ट सगळी मुलं इंद्रजीत सारखी नसतात. 😒

अनु - ( इंद्रजीत च नाव ऐकून अनु च चेहरा उतरतो) शालू तू प्रॉमिस केलं होत ना त्याच नाव पुन्हा नाही घेणार माझ्यासमोर.

शालू - सॉरी सॉरी अनु.. 😔 पण मला नाही वाटत तो तसा मुलगा असेल. मला वाटतं त्याला त्याची चूक कळाली असेल. बस..
इट्स ओके. लिव्ह इट. नाराज नको होऊस.
चल कॅन्टीन मध्ये आपला समोसा आणि चहा वाट पहात आहे.😀
आणि अनु शालू दोघेही कॅन्टीन मधे जातात.
एकी कडे मयंक च्या डोळ्यासमोर हातामधे crutches घेऊन चालणारी अनु दिसत असते. त्याला कळलं होत की अनु ने अजुन ही त्याला माफ केलं नव्हत. म्हणूनच त्याने मैत्रीचा हात पुढे केला होता ज्यावर अनु ने कोणती ही प्रतिक्रया दिली नाही. पण इथे कॉलेज मधे एकच विषय चालला होता. मयंक सारखा हँडसम आणि श्रीमंत मुलगा असा तर स्वतः कोणाशी कधीच मैत्री करत नाही आणि त्याने अनन्या ला स्वतः विचारले. ते ही अनन्या सारख्या handicapped मुलीला. ज्या मुली 3 महिन्या पासून त्याच्या मागे होत्या त्या तर अनु वरती जळायला लागतात.

दुसरा दिवस उजाडतो. नेहमी प्रमाणे अनु आणि शालू कॉलेज ल जायची घाई करतात. पण आई ने आज अनु साठी टिफीन केला होता. कारण काल रात्री तिने काहीच खाल्ल नव्हत. जेवण न करण्याची खूपशी कारण होती एकीकडे ती स्वतः ला खूप inferior समजत होती कारण मयंक ने मैत्री साठी विचारल्यानंतर कॉलेज मधे हीच चर्चा चालू होती की अनु handicapped आहे म्हणुन दया दाखवण्यासाठी मयंक तिच्याशी मैत्री करत आहे. हे अनु ला आवडल नव्हत. तिला कोणाकडून ही दया आणि सहानुभूती ची गरज नव्हती. आणि दुसरीकडे अंजु तिचे कॉल उचलत नव्हती. या सगळ्या मधे ती जेवण न करताच झोपून गेली. म्हणुन अनु ही आईशी हुज्जत न घालता टिफीन घेऊन जाते. कॉलेज मधे पोहचल्या वर देखील ती खूप शांत असते.

शालू - काय झालं अनु तू गप्प गप्प का आहेस.? घरापासून कॉलेज पर्यंत एक शब्द ही बोलली नाहीस. All ok na?

अनु - हो ग. सगळं ओके.

शालू - कॉलेज मधल्या चर्चानमुळे तू sad आहे ना?

अनु - हो पण चर्चा काय चालू आहे मला काहीच problem नाही. प्रॉब्लेम आहे जेव्हा लोक मला सहानुभूती दाखवून मैत्री करण्याचा प्रयत्न करतात.

हा सर्व संवाद जवळच बसलेला मयंक ऐकत असतो. हे ऐकताच तो त्यांच्या समोर येतो.

मयंक - अनन्या तू हे चुकीचं समजत आहे मी तुला दया दाखवण्यासाठी मैत्री च हात पुढे नाही केला. Actually तुला आठवत नाही बट .( आणि तो तिला फोन मधे एक फोटो दाखवतो)

अनु - हे तर....

मयंक - हे तू काढलेले पेंटिंग आहे ना. काही महिन्यांपूर्वी हे मीच ऑनलाइन खरेदी केलं होत. आपलं बोलण देखील झालं होतं.

अनु - ओह तो तू आहेस.

मयंक - जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा वाटलं की कुठेतरी पाहिलं आहे पण आठवत नव्हत त्या website वर तुझा फोटो होता तो मी पाहिला होता.अचानक तुला पाहून आठवलं नाही. पण तुझे crutches पाहून वेबसाईट वर तुझ्या पेंटिंग चे रिव्ह्यू आठवले ज्यामधे लोकांनी तुझ्या पेंटिंग ची स्तुती करताना अपघाता नंतर देखील तू तुझ्यातला skill जपुन ठेवलं हे देखील लिहिलं होत. मग लगेच क्लिक झालं आणि वेबसाईट चेक केली तर ती तूच होतीस.

हे सगळं ऐकत अनु आणि शालू आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच होत्या.
मयंक पुढे बोलतो,
आणि एका आर्टिस्ट ची मी मस्करी केली ज्याला मी एक आदर्श मानतो मला स्वतः चीच लाज वाटली. म्हणून मी माफी मागितली आणि मैत्रीचा हात पुढे केला सहानुभूती दाखवण्या साठी नाही. आता जर तू मला माफ केलं असशील तर प्लिज accept my फ्रेंडशिप.

हे ऐकून अनु थोडी शांत होते आणि मयंक कडे पाहून स्माइल करते आणि हात पुढे करून.
फ्रेंड्स??

अनु ने मैत्री स्वीकारली हे पाहून मयंक देखील खूप खुश होतो.

शालू - चला आता मैत्री झाली आहे तर आम्ही या टेबल वरती बसू शकतो ना? ( कॅन्टीन च्या त्या टेबलाकडे बोट करून बोलते)
हे ऐकून मयंक , अनु आणि शालू तिघेही हसायला लागतात.


क्रमशः


Precap - अनु - अंजु तू .... ( तिला मिठी मारून) तुला माहित नाही मी किती मिस केलं तुला...( आणि तिच्या डोळ्या तून आसवे टपकतात). अंजु - दी, मला माफ कर मी तुझ्या सोबत खूप वाईट केलं आहे. Please forgive me..😔😔