तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 3 Sadiya Mulla द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 3

भाग -३
मागच्या भागात आपण वाचले की पाहायला आलेल्या मुलाच्या आई वडिलांना अनन्या पसंत पडते. पण मुलगा म्हणजे च अमेय ला हे स्थळ अमान्य होते व तो अनन्या ला हे स्थळ नाकारायला सांगतो.

आता तो हे का करतो त्यामागे काय कारण आहे. अनन्या चे निकामी पाय की आणखी काही. आणि अमेय च्या आई वडिलांनी त्याच्यावर एवढी जबरदस्ती का केली असावी. आणि यावर अनन्या ची काय प्रतिक्रिया असेल हे आपण याभागात पाहणार आहोत.

आता पुढे -

अमेय - अनन्या प्लिज तुम्ही मला चुकीचे समजू नका. पण माझी काही कारण आहेत.

अनन्या - ठीक आहे मी समजू शकते. माझ्या सारख्या मुलीशी लग्न करन हे कोणाचाच स्वप्न नसेल..

आणि ती मिश्किल पणे हसते.
अमेय - नाही नाही. असं नाही आहे. मी तुमचा खूप आदर करतो. तुमच्या सारख्या मुलीशी लग्न करणारा मुलगा खरच भाग्यवान असेल. पण मी एका मुलीला प्रॉमिस केलं आहे मी ते तोडू शकत नाही. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. पण ती आमच्या धर्माची नसल्या मुळे आई बाबा मान्य करत नाहीत. आणि त्यांनी मला तुमच्या सोबत लग्न करण्याचा आग्रह केला आहे. पण तुम्ही च सांगा मी त्या मुलीला केलेले प्रॉमिस कसे तोडू शकतो. मी तिच्याशिवाय आणि ती माझ्याशिवाय नाही राहू शकत...

आणि तो स्वतः चे डोळे पुसतो. एवढं मोठं रामायण पाहून अनन्या ला काय बोलायचं ते कळलं नाही. पण तिला त्याच्या प्रती आदर वाटतो. कारण त्याने त्या मुलीला केलेले प्रॉमिस जपले. आणि फक्त याच गोष्टीसाठी अनन्या त्याची मदत करायला तयार होते.


अनन्या - ओके. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तस ही मी या स्थळा ला नकार च देणार होते. पण आता मला एक कारण भेटलं. आणि हो मी हे कोणाला नाही सांगणार. पण फक्त तुम्ही जे प्रॉमिस केलं आहे तिला, शेवट पर्यंत तिचा साथ द्या.

अमेय - thank you so much. मी जितका विचार केला होता तुम्ही त्यापेक्षा ही समंजस आहात.


अनन्या - (स्मितहास्य करत) चला आता खाली जाऊया.

आणि ते दोघेही खाली जातात. इथे शालू त्यांना खाली येताना पाहून खुश होते अर्थात त्यांच्या लेक्चर मधून सुटका मिळणार होती.

अमेय ची आई - अरे आले दोघे. बोलून झालं बाळा अमेय.
अमेय फक्त मान हलवुन होकार देतो. अनन्या बाबा शेजारी येऊन नसते.

अमेय चे बाबा - सायली ( अनन्या ची मावशी) म्हणाली होती की तुम्हाला दोन मुली आहेत. तुमची लहान मुलगी कोठे आहे ?

हे ऐकून अनन्या, आनंद आणि निर्मला तिघेही एकमेकांकडे पाहतात. पण पुढाकार घेऊन निर्मला बोलते,

" हो अंजु सध्या तिच्या आजीसोबत राहते. तिचं तिकडे कॉलेज आहे ना. तिचं खूप मन होत आज यायचं.. पण तिचे exam चालू होते म्हणून अनु नेच तिला अभ्यासा वर लक्ष द्यायला सांगितलं."
आनंद देखील त्यावर होकार देतात. पण अनु थोडी नाराज होते.
फ्लॅशबॅक ( सहा महिन्यापूर्वी)
अंजु - जेव्हापासून अनु दी चा अपघात झाला आहे तुम्हाला माझी काही पर्वा च नाही.. अनु ने खाल्ल का अनु झोपली का? कोणी विचारत आहे की मी काय करते आहे.. माझी कोण च काळजी करत नाही.

निर्मला - (हळू आवाजात)अंजु काय बोलतेस हे तू. तुला माहित आहे ना तुझी दी ची अवस्था.. 3 महिने झाले आहेत तिच्या अपघाताला अजून एक शब्द ती कोणाशी बोलत नाही आहे. तुला तरी तिची काही काळजी वाटत नाही. आधीच ती किती मोठ्या दुःखात आहे तू अस बोलून तिला आणखी दुःखी नको करुस बाळा.. आणि आम्ही तुझी देखील तेवढीच काळजी करतो.. आम्हाला तुझी देखील तेवढीच पर्वा आहे अंजु.

आनंद - उलट तू तिला समजावून सांगायला पाहिजे. तुझी मोठी बहीण आहे. तू तिची सगळ्यात जवळची आहे ना. तूच अस करशील तर कसं ती स्वतः ला सांभाळेल.
मला तुझ्या कडून ही अपेक्षा नव्हती. खरच तू मला खूप निराश केलं आहेस अंजु.

हे बोलून आई बाबा रूम मधे निघून जातात. अंजु खूप नाराज होते आणि दुसऱ्या दिवशीच कोणाला ही न सांगता आजी कडे निघून जाते. तो दिवस आणि आजचा दिवस या सहा महिन्यांत ना तिने इथे कोणाला फोन केला ना इथून कोणी तिला फोन केला. आजी कडून निर्मला स्वतः च्या मुलीची विचारपूस करत. आईचं हृदय..किती ही राग आला तरी प्रेम कमी होणार नाही.. पण बाबा तिच्या वर भयंकर नाराज होते. अनु चे कॉल मेसेज चा अंजु देखील काही रिप्लाय देत नव्हती.अच्छा ठीक आहे तुमचा होकार नकार काही ही असो आम्हाला कळवा.. आम्ही वाट पाहू...
अमेय चया आई बाबांचा आवाजाने अनन्या फ्लॅशबॅक मधून बाहेर येते. अमेय अन त्याचे आई बाबा जातात. जाताना अमेय अनन्या पुन्हा एकदा इशाऱयाने thank u म्हणतो.

ते गेल्यानंतर

निर्मला - चांगली होती ना ती लोकं. मुलगा सुद्धा फोटो पेक्षा आत्ता जास्त चांगला वाटला. दिसण्या बोलण्या वरून तर मला समंजस वाटला.. तुम्हाला काय वाटतं आहे.

आनंद - मुलगा तर छान च होता. पण त्याचे आई बाबा देखील मान देणारे होते. छान वाटल मला हे स्थळ. आता पाहू या अनु काय बोलते ते.

अनु आणि शालू रूम मधे येतात तेव्हा शालू विचारते
शालू - काय मग अनु मॅडम कसा वाटला मुलगा.. दिसायला हँडसम होता नाही का?

अनु - हो छान होता. आणि मला तो खरच आवडला..

शालू - काय म्हणजे ... समझो हो ही गया 🤭😂

अनु - नाही ग मंद. मला मुलगा चांगला वाटला पण मी या स्थळा ला नकार देते. तुम्ही लोकांनी मुलगा पाहायला लावला मी पहिला.. आता हो किंवा नाही म्हणायचं हे माझ्यावर आहे ना... मी नाही म्हणाले आता या विषया वर discussion नको.

शालू - अग पण... का?
अनु - शालू leave ना प्लिज. मला जास्त स्ट्रेस नको देऊ.
शालू - बर बाई.. आता नको सांगू पण मला कारण माहित करून घ्यायचं आहे..
अनु - अच्छा बट आत्ता नको.
शालू - ठीक आहे चल आता मला निघायला हवं.. मम्मी च खूप वेळा कॉल आला होता.. आजतर माझी वाट आहे..😮

अनु - 😂 अच्छा ठीक आहे. मग भेटू उद्या कॉलेज मधे.

अनु ल बाय बोलून शालू तिच्या घरी निघून जाते. अनु तिच्या रूम मधे बसून फोन हातात घेते आणि पुन्हा एक नंबर डायल करते.

पण
'ज्या व्यक्ती ला आपण कॉल केला आहे तो सध्या व्यस्त आहे '
हे ऐकून अनु च्या डोळ्यातून न कळत आसवे येतात.

क्रमशः

रेट करा आणि टिप्पणी द्या

शारदा जाधव

शारदा जाधव 4 महिना पूर्वी

Arati

Arati 4 महिना पूर्वी