"आई झोपू दे ना ग थोडा वेळ... आज तर रविवार आहे ना..." खिडीकीतून येणाऱ्या उन्हाच्या तिरीपिने त्रासलेल्या अनन्या ने थोड चिडून च आई ला खिडकी चा पडदा लावण्यास सांगितले.
आई - अग उठ बाळा, आज रविवार आहे मान्य आहे पण माहित आहे ना आज पाहूणे येणार आहेत तुला पाहायला... पटकन् उठून रेडी हो बर. बाबा येतच असेल मिठाई घेऊन... चल चल उठ उठ ...
अनन्या - आई यार मला नाही करायचं हे लग्न वग्न... म्हणजे मी माझी झोप मोडून त्याच्या साठी 7 वाजल्या पासून तयार होऊन बसू ..आत्ता पर्यंत तर तो मुलगा उठला पण नसेल...😒
आई - अग अनु अस नको बोलू.. हे स्थळ खूप चांगल आहे.. तुझ्या मावशी च्या दिराच्या ऑफिस मधे मॅनेजर च्य पोस्ट वर आहे मुलगा.. दिसायला देखील देखणा आहे... आणी आता लगेच कुठ तुझ लग्न लावून देत आहोत आम्ही... तुझ कॉलेज होईपर्यंत नाही करणार तुझ लग्न .. डोन्ट वरी बेटू...
अनन्या - आई पण...🥺
इतक्यात बाबा मिठाई घेऊन आले...
बाबा - काय झालं माझ्या अनु ला..कोण काय बोलल माझ्या परीला...??
अनन्या - बाबा तुम्हाला मी नकोशी आहे म्हणून तुम्ही माझं लग्न करताय ना माहित आहे मला😭😭
बाबा -( तिला कुशीत घेऊन) नाही ग रडूबाई.. माझी परी तर मला खूप लाडकी आहे. आणि तू स्वतः निर्णय घे बाळा.. तुला जेव्हा लग्न करायचं आहे तेव्हा कर..पण आज फक्त पाहून तर घे कसा मुलगा आहे..नाही आवडला तर नाही म्हणायचं सोनू... आम्ही प्रत्येक निर्णयात तुझ्या सोबत आहोत. You know na how much we love you..❤️😘
अनन्या - ओके बाबा आता तू सेंटी नको टाकू.. होते मी तयार पण कपडे मी माझ्या आवडीचे घालणार..त्यांना दाखवण्या साठी मला साडी घालायचा हट्ट करू नका हां..
आई - ठीक आहे जा आता लवकर तयार हो बघ आठ वाजत आले.. आत्ता येतील ते इतक्यात...
बाबा - माझी अनु खूप हुषार आहे.. जा बाळा आणि छान रेडी हो.. (निर्मला कडे म्हणजेच आई कडे पाहून ) चला आता आपल्याला जेवणाच पाहायला हवं..मी तुम्ही सांगितलेली मिठाई आणली आहे.. अजून काय हुकूम सांगा बरं...
अनन्या -😂😂😂
आई - पुरे पुरे चला सांगते... 😒
आणि दोघे बेडरूम मधून स्वयंपाक घरात शिरतात.
किचन मधे येऊन मि.आनंद म्हणजेच अनु चे बाबा निर्मला कडे पाहत म्हणतात, " आपण घाई तर नाही करत आहे ना? कि थोड थांबून पाहू या. आत्ताच ती एवढ्या मोठ्या दुःखा तून बाहेर आली आहे तुम्हाला वाटत का हीच वेळ आहे ती?"
निर्मला - तुम्ही टेन्शन घेऊ नका हो.. कधी न कधी तर हे करायचं च आहे आपल्याला.. आणि सायली ने त्या लोकांना सुद्धा आपल्या अनुची कल्पना दिली आहे. त्यांना यावर काहीच आक्षेप नाही आहे. अस स्थळ पुन्हा नाही मिळणार. आणि आपण सुद्धा कुठे लगेच आत्ता लग्न करणार आहोत. तोपर्यंत अनु सुद्धा सावरेल.
आनंद - ठीक आहे तुम्ही म्हणता आहत तर पाहूया.
अनन्या मनातल्या मनात...
"आता काय हे नवीन यार,मला त्याच्या साठी रेडी व्हायचं आहे... 😒 कोण कुठला तो.. पण फक्त आई बाबा साठी मी तयार होत आहे.. नाहीतर मला काही एक इंटरेस्ट नाही या सगळ्या गोष्टींमध्ये...😏"
अनन्या स्वतः च आवरून रेडी होत च असते तेवढ्यात तिला शालिनी चा कॉल येतो.
शालिनी म्हणजे अनन्या ची सर्वात जवळची मैत्रीण. त्या दोघी लहानपानासूनच सोबत होत्या. एकमेकांच्या सुखा दुःख च्या साथी. शालू आणि अनु ला तर सगळे ट्वींस म्हणायचे. त्या सारख्या दिसायच्या म्हणून नव्हे कूठे ही जायचं असेल तरी सोबत दिसायच्या म्हणून.. त्या स्वतः एकमेकांना "sister from another mother" म्हणायच्या.
अनन्या - शालू कुठे आहेस तू..... तुला माहित आहे ना आज काय आहे.. तरी अजून तू घरी नाही आलीस. 5 मिनिटा च्या आत नाही आली ना बघ मी येईन तुझ्या घरी..😟
शालिनी- अग ए माझी आई.. मला बोलू तरी दे. माहित आहे आज madam ला पाहायला येणार आहेत. आणि मी निघत आहे तुझ्या घरी यायला. आणि हो मी येई पर्यंत काही मेकप करू नको उगिच चेहऱ्याचे हाल... आणि पाहणाऱ्यांचे सुद्धा 🤣🤣
अनन्या- हो जस की मला नाही जमत.😒
शालिनी- 😂😂येते मी चल भेटू..
अनन्या - ओके..😁
(फोन ठेवून... )
अनन्या - आई... आई...
निर्मला - काय झालं अनु.. अग हे काय तू अजून आवरल देखील नाही.. बाळा पटकन आवर.. 9 वाजत आले..
अनन्या - माझा black कुर्ता कुठे आहे.. तो जो बाबाने माझ्या बर्थ डेला दिला होता. मला सापडत नाही आहे तो..
निर्मला - अग तो तर तूच नाही का शालू ला दिलास तिला कुठे जायचं होत मग...लकी चार्म म्हणून.
अनन्या - अरे हो.. थांब मी तिला आणायला सांगते येता येता.
निर्मला - अग ती तर बाहेर आली आहे कधीची. बाबा सोबत हॉल साफ करत बसली आहे.
आणि थांब तुझ्या साठी बाबाने बघ मस्त तुझ्या पसंती चे कपडे आणले आहेत.. हे घाल..
अनन्या - ही शालू पण ना मला सांगत होती आत्ता निघाले म्हणून.... (कपडे पाहता पाहता) wow आई किती सुंदर आहे हा ड्रेस.. ❤️
निर्मला - hmmm.. चल आता पटकन घाल कपडे मी शालू ला आत पाठवते ती करेल तुला मदत..😊
हे बोलून मिसेस निर्मला बाहेर जातात. आणि शालिनी अनन्या च्य रूम मधे येते.
शालिनी- अनु काय भारी ड्रेस आहे ग हा.. तुला तर मेकप ची गरज च नाही..😘
(आणि ती अनु ल मिठी मारते)
अनन्या- (तिच्या crutches कडे पाहत) हो पण याची गरज आहे ना.. 🥲
शालिनी - अनु काय तू...हे फक्त काही दिवसा साठी आहेत तू बरी झाली की तुला या वॉकिंग स्टिक ची काहीच गरज नाही वाटणार..
(आणि ती तिला पुन्हा मिठी मारते आणि डोळे पुसते)
मंद माझा मेकप खराब केलास तू..
अनन्या - बट जर मी बरी नाही झाले तर....
मी आई बाबा समोर हे नाही सांगू शकत पण तूच बोल डॉक्टर सुद्धा बोलले होते ना चांस खूप कमी आहेत की मी पुन्हा स्वतः च्या पाया वर उभी राहू शकेन. कोणाला हवी असेल अशी बायको जी स्वतचे काम स्वतः करू नाही शकत.?. तुला खर च वाटत आहे की मी लग्न केलं पाहिजे.
शालिनी - अनु हे बघ पहिले तर तू मनातून ठरवलं पाहिजे की तुला नीट व्हायचं आहे..positively घे ना की चान्स आहे.. भले कमी आहे.. मला माहित आहे.. पूर्ण विश्वास आहे तू काही दिवसात बरी होशील.. आणि जरी लग्न केलं तरी तू कोणावरती ओझं नाही बनणार. तू आत्ता ही स्वतः चे काम स्वतः करते. एवढंच नाही तर तू स्वतः ची कॉलेज फी स्वतः भरतेस. एवढं मोठं accident झाला तरी तू हार मानली नाही आणि तू तुझं पॅशन फॉलो केलं. आणि आज तू एक अप्रतिम चित्रकार आहे. तू तुझ्या मधले गुण का नाही पाहत?. तू स्वतः ला कमी लेखल की समोर चा देखील माणूस तुला कमी समजेल.
अनन्या- 🥲🥲🥲
शालिनी - मूड ऑफ करू नकोस.. बी ब्रेव्ह.. 🫂🫂
(बाहेरून हळूच आईचा आवाज येतो)
"शालू झाली ना अनु रेडी..घेऊन ये तिला बाहेर.. आली आहेत ती लोकं.... "
क्रमशः