तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 2 Sadiya Mulla द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 2

भाग -२
तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... या स्टोरी मधे आत्तापर्यंत आपण वाचलं की अनन्या ला पाहायला मुलगा येणार होता पण यावर अनन्या नाराजी दाखवते कारण तिचा लग्ना मधे काही ही इंटरेस्ट नसतो. त्याच कारण होत तिचा एका वर्षा पूर्वी झालेला अपघात ज्यामुळे तिचे पाय निकामी झाले होते. ती पुन्हा स्वतच्या पायावर चालू शकेल याची ग्यारंटी खूप कमी होती. त्यात तिला दुसऱ्या कोणावर ओझ नाही व्हायचं होत वा तिला कोणाकडून ही सहानुभुती ची आशा नव्हती. पण फक्त आईवडिलांच्या ईच्छेस मान देण्यासाठी ती मुलगा पाहायला तयार होते. पण आपल्या मनातील भावना ती तिच्या बेस्ट फ्रेन्ड शालू समोर व्यक्त करते. ज्यावर शालू तिची समजूत काढते. आणि आता पुढे -


निर्मला - (हळू आवाजात) शालू अनु रेडी झाली असेल तर बाहेर घेऊन ये. आली आहेत ती लोकं.

शालिनी - हो काकू
आणि शालिनी अनु ला समजावते.
अनु आत्ता फक्त तुला मुलाला पहायचं आहे. कोणी तुझ्यावर जबरदस्ती नाही करत आहे तू याच मुलाशी लग्न कर म्हणून.. या मुला ला माहित आहे तुझ्या बद्दल तरी ही तो पाहायला तयार झाला म्हणून तुझे आई बाबा तुला पाहायला सांगत आहे. Let's see काय करायचं काय नाही.

अनन्या - hmmm. बरोबर बोलत आहेस तू. आत्ता कुठे माझं लग्न होणार आहे. मी नाही म्हंटले तर आई बाबा force नाही करणार..

शालिनी - Thank God. आता चल पाहूया कसा आहे मुलगा.
आणि ती अनु ल घेऊन बाहेर हॉल मधे येते
हॉल मधे गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. Typical मूवी मधे दाखवतात तशाच बघण्या च्या कार्यक्रमात कांदेपोहे ची हजेरी होती. दोन्ही पक्ष आपापल्या उमेदवाराचे गुणगान गात होते. एकीकडे मुलाचे आईबाबा आमच्या मुलाला इतक्या मोठ्या कंपनी मधे वशिला न लावता स्वतच्या मेहनती वर नोकरी कशी मिळाली हे सांगत होते तर.. एकीकडे अनन्या चे आई बाबा तिला आंतरराषट्रीय चित्रकला स्पर्धत पहिला नंबर मिळवण्यासाठी अनु ने किती मेहनत घेतली होती याचे स्पष्टीकरण देत होते. हे सगळं बोलण चालूच होत तेवढ्यात.

टक टक टक... ( अनु च्या वॉकिंग स्टिक च आवाज)
हा आवाज ऐकताच सगळे शांत होतात. अनु स्टिक च्य मदतीने चालत येत होती. मागे शालू सुद्धा होती.

आनंद - ही पाहा आमची अनु.. ये बाळा इथे बस.
( म्हणत ते अनु ला सोफ्या वर बसायला सांगतात.)

समोर मुलगा आणि त्याचे आई वडील बसले होते अनु दिसायला खूप सुंदर होती. तिचे मोठे काळे केस तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत होते. आणि आज तर तिने घातलेल्या ड्रेस मधे ती छान दिसत होती.

तिला Typical प्रश्न देखील विचारले जातात. काय येत काय नाही इत्यादी. पण अनु ला स्वयंपाक देखील येतो हे ऐकून मुलाची आई खूप जास्त खुश होते. भले ती तिला स्वयंपाक करायला नाही लावणार हे देखील ती clear करते. पण एकंदरीत मुलाच्या आई ला अनु आवडली होती.

मुलाची आई - तुमची मुलगी खूप गुणी आहे. मला तर तिला आमच्या घराची सून बनवण्यात काहीच आपत्य नाही.
मुलाचे बाबा देखील त्यावर होकार देतात. आणि ते त्यांच्या मुलाला विचारतात.

अमेय बाळा तुला आणि अनु ल काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता.

अमेय म्हणजेच तो मुलगा मान हलवून फक्त होकार देतो.
अमेय दिसायला सुंदर होता. उंच, दाडी मिशी, रंग थोडा सावळा. Presentable look.

आनंद - हो हो.. बाळ अनु अमेय ला आपल घर दाखवून आण.

अनन्या - ओके बाबा.
म्हणत ती तिचे वॉकिंग स्टिक घेऊन उठते आणि अमेय देखील तिच्या मागे जायला निघतो. ते दोघे गच्ची वर जातात. घराच्या गच्ची वर बसायला असलेल्या बेंच वर ती अमेय ला बसायला सांगते. आणि ती सुद्धा समोरच्या बेंच वर बसते.

इथे खाली दोघांचे आई बाबा त्यांच्या जमान्यात पाहायला गेल्या वर मुलींना किती बंधन असायचं यावर चर्चा करत होते. साहजिकच शालू त्यांचं हे लेक्चर कान बंद करून ऐकत होती.

वरती गच्चीवर, त्याच्या उलट पिन ड्रॉप silence.
दोघा पेकी कोणीच बोलायला तयार नव्हते. न राहून अमेय बोलतो.

मला नाही माहित तुम्ही माझ्याबद्दल काय विचार कराल. पण प्लिज या स्थळा ला नकार द्या. मला तुमच्या शी लग्न नाही करायचं. मी हे फक्त माझ्या आई वडिलांच्या जबरदस्ती मुले इथपर्यंत आलो आहे. पण मी लग्न नाही करू शकत. 😔



क्रमशः