तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2 Swati द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पाहुण्यांना अणि मिडीयाला रुढरच्या पत्नीच चेहरा पहायचा होता... अवंतिका श्रेया कडे येते अणि तिचा पदर उचलू लागते..... श्रेयाची चिंता खुप वाढली होती.... ती मुठीने कपडे घट्ट पकडते..... तीच हृदय खुप वेगवान धडधडत होत..... तिला काहीच कळत नव्हत की काय होतय तिच्यासोबत... तिने कधीच याचा विचार केला नव्हता....


अवंतिकणे श्रेयाचा उचलला श्रेयचा चेहरा पाहून तिला धक्का बसला... तोच रूद्रला बसला... तोच रूद्र सुद्धा श्रेया कडे अचार्याने बघत होता.... तिथे उपस्थित असलेले सर्व व्हिआयपी पाहुणे अणि मीडिया पहिल्यांदाच श्रेयाला पाहत होते .... मीडियाचें लोक श्रेयाचें फोटो काढू लागले.... श्रेया डोळे वटारून शांतपणे उभी होती तिला खुप चिंता वाटत होती......

रुद्र ने मग श्रेया चा घट्ट धरून तो दाबला त्यामुळे श्रेयला हलक दुखू लागं ल.... ती डोळे बंद करते... ती खुप घाबरली... होती... आतून अणि त्यात रूद्र ची जास्तच भीती वाटत होती.....

रुद्र होठवर स्मित घेवुन सर्व मीडिया लोकांकडे पाहतो अणि म्हणतो " ही माझी पत्नी मिसेस रुद्रप्रताप सिंह आहे...." 

हे ऐकून सर्व मिडीयावाले तिचे अणि त्याचे फोटोस घ्यायला लागतात... रूद्र तिला पकडुन जवळ उभा राहून पोस्मध्ये फोटो काढतो.... खर तर मनात खुप राग होता पण चेहऱ्यावर स्माईल ठेवायची होती कारण त्याला अजून कोणता गोंधळ नको होता...


मग त्यानंतर हळूहळू पाहुणे अणि मिडियावाले मेशन मधून निघून जातात... ते गेल्यावर रुद्रणे श्रेया चा हात धरला.. तिला त्याने त्याच्या जवळ ओढंल... तिला घेवुन जपाजप पाऊल टाकत रूम मध्ये नेल... बेडरूम मध्ये घेवून जाऊन श्रेयाला त्याने जोरात बेडवर ढकलल... अवंतिका पण त्याच्या मागे मागे येतात.....


रुद्र रागाने तिच्यावर ओरडतो अणि म्हणतो "तु कोण आहेस अणि तूझी लग्नाचं लेहेगा घालून माझ्याशी लग्न करण्याची हिम्मत कशी झाली.... नव्या कुठे आहे....? तू काय तिच्यासोबत..?"


श्रेयाच्या तोंडातून आवाज निघत नव्हता... तिच्या डोळ्यातून अश्रू सतत होते...

हे बघून रूद्र तिचा हात धरुन दात घासतो अणि म्हणतो " तुला ऐकू येत आहे ना की मी पोलिसांना बोलून? इथे पोलीस आले तर तुझ काय होईल याची कल्पनाही करू शकत नाहीं तु... लवकर साग नव्या कुठे आहे नाहीं तर..?"


रुद्र च बोलणं ऐकून श्रेया खुप घाबरली.. ती रडत रडत म्हणली" नाहीं प्लीज पोलिसांना फोन करू नका... मझ... नाव श्रेया आहे मी नव्या ची बेस्ट फ्रेंड आहे... आम्ही दोघी एकाच  कॉलजमध्ये आहोत......"

हे ऐकून अवंतिका आचाऱ्याने म्हणतात" पण तु इथे कशी आलीस अणि नव्या कुठे आहे? तु काय केलं तिच्यासोबत...?" 

त्यावर श्रेया सगते" नव्याच एका मुलावर प्रेम आहे... तो आमच्या कॉलेज मध्ये शिकतो त्याच नाव विक्की आहे.. कही दिवसापासून नव्याने मला सागितलं की तिचं लग्न तिच्या घरच्यांनी तिच्या समती शिवाय ठरवलं आहे... तिला तुमच्या शी लग्न करायचं नव्हत रूद्र... म्हणून मी अणि विक्की तिला घेवुन पळून गेला.. अणि मी तिच्या जागी बसले.." 

हे ऐकून रूद्ररागाने फ्लॉवर पॉट उचलतो आणि भिंतीकडे फेकतो... ते बघून श्रेयाने घाबरून डोळे मिटले......

रुद्र अवंतिकला म्हणतो "बघ आई म्हणूनच मला लग्न करायचं नव्हतं पण तु मझ ऐकल नाहीं गेली ना ती मुलगी पळून.." 

त्यावर अवंतिका म्हणतात"रूद्र मला हे माहीत नव्हत नाहीं तर मी तिच्याशी तुझ्या लग्नाबद्दल कधीच बोलले नसते... पण आता काहीही झालं तरी ही मुलगी तूझी बायको आहे आता तुला तिच्याशी तुझ नात जपावं लागेल.. तुमच्या दोघांची रेशिम गाठ देवाने बांधली आहे आता तिला कोणीच तोडू शकत नाहीं..."


रुद्र अवंतिकाच म्हणन ऐकतो आणि श्रेया कडे रागाने पाहतो...

हे ऐकून श्रेया त्याला म्हणते " हे बघा प्लीज मला जावू दया.. जे कही झालं ते चुकून झालं आहे मला माफ करा पण मला हे लग्न मान्य नाहीये.. हे लग्न एक चूक आहे.. मला तुमच्यासोबत लग्न करायचं नव्हतं..."

तीच ऐकून रूद्र तिचा हात धरुन दात घासतो अणि म्हणतो" तुला आता हे मान्य असो वा नसो आता तु माझी पत्नी आहेस अणि संपूर्ण शहरात कळून चुकल आहे की तु मिसेस रूद्र प्रताप सिंह आहेस... आता तुला आयुष्यभर माझ्यासोबत या मेनशनमध्ये ऐकत्र राहावं लागेल... तु इथून जावू शकत नाहीं... कळल..."


हे ऐकून श्रेया घाबरली ती मग अवंतिकाला तिचा हात काढून म्हणते" हे बघ हे सर्व करून काहीही होणार नाहीं आहे अणि मी तुला यात काहीही मदत करू शकत नाहीं.... तु आता सिग् कुटुबाची सून आहेस अणि हे सत्य जितक्या लवकर तु स्विकरशिल तितकाच चागल असेल तुझ्यासाठी...."

त्या मग मग रूद्र कडे बघून त्याला म्हणतात"रूद्र मी एअर्पोरतट जायला निघते आहे... माझी फ्लाइत आहे मला लेट व्हायचं नाहीं आहे..."

 तेव्हा रूद्र त्यानं म्हणतो" ठीक आहे आई तु जा मी सर्व सांभाळून घेईल..."

अवंतिका श्रेया कडे एक नजर टाकते अणि तिथून निघून जाते....

अवंतिका निघून गेल्यावर श्रेया रूद्र कडे बघते.. रूद्र तिला म्हणतो " आता आपल दोघांचं लग्न झालं आहे अणि तु माझी बायको आहेस.. मी आता बाहेर जातोय अणि थोड्या वेळाने परत येईल..... तोपर्यंत तु छान रेडी हो कारण आज् आपली फास्ट नाईट आहे., समजल..."

त्याचं हे ऐकून श्रेया खुप घाबरली.. रूद्र मग खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करतो आणि निघून जातो.. तो मग बाहेर येवून त्याच काम करायला लागतो.. सर्व सर्वण्ट ला कामाला लावतो ..,...

खोलीत चक्कर मारत श्रेया मनात म्हणली "नाहीं नाहीं मी इथे राहू शकत नाहीं... मला हे लग्न मान्य नाहीं... मला इथून पळून जावं लागेल... मझ्या घरच्यांना कळेल तर त्यानं किती मोठा धक्का बसेल... त्यानी मला इथे स्टडी साठी पाठवल होत अणि जेव्हा त्यना कळेल की मी इथे येवून काय केलंतर ते कसे रीयक्ट करतील... नाहीं नाहीं मला कही तरी करावं च लागेल..."

श्रेया पटकन बाल्कनीत येवून खाली पाहते... बाल्कनीच्या बाहेर खाली बागेत गर्ड्स पाळत ठेवत होते... हे पाहून श्रेया म्हणते " इथे तर गार्ड आहेत आता मी इथून कशी जावू....?"

मग श्रेया पटकन खोलीत येते.. काहीतरी विचार करते आणि जोरजोरात दरवाजा ठोठवायला लागते... कही वेळाने एक नोकर दर उघडतो अणि डोकं खाली करून विचारतो "मॅम तुम्हाला कही हवं आहे का..?"

तर श्रेया सागते " हो मला ते पाणी हवं आहे तुम्ही जाऊन घेवुन याल का..?"

तीच म्हणणं ऐकून नोकर मान हलवून तिथून निघून जातो.. श्रेया पटकन तिच्या खोलीतून बाहेर पडते आणि इकडे तिकडे बघून शांतपणे नोकरांची नजर टाळून मेशन च्या बाहेर जायला निघते... मग ती बाहेर येते आणि गार्ड्स ची नजर चुकून गेटकडे जाते.. गेटच्या बाहेर एकामेकाशी बोलत होते.. त्यना चाकमा देवून श्रेया तिथून पळून जाण्यास यशस्वी होते.............

............__------_--------------

हेय गाईस 

काय होईल जेव्हा रूद्र ला माहीत पडेल की श्रेया पळून गेली आहे..?  शोधू शकेल का तो श्रेया ला ..? बघुया रुद्र्चा रूद्र अवतार नेक्स्ट पार्ट मध्ये.. स्टोरी कशी वाटते ये नक्की सागा.. अणि हो वाचत रहा.....

माझी तूझी रेशीमगाठ ❤️❤️❤️❤️

"माझी तूझी रेशीम गाठ.. भगं 2 साठी कमेंट लिहा प्लीज