कोंदण पर्व एक - भाग 41 Shabdbhramar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोंदण पर्व एक - भाग 41

आणखी एक मन 


माऊलाईच्या टेकडीच्या आधी लागणारा माळ. पावसाळ्यापासून ते सुरुवातीच्या सौम्य उन्हाळ्यापर्यंत हिरवागार होऊन जायचा. एरवी सुद्धा होतीच पण त्या काळात तो माळ म्हणजे माझी सगळ्यात जास्त आवडतीची जागा होऊन जात. 


एकदा श्वेता मला संध्याकाळी म्हणाली. 
"तुझ्यासोबत येते सकाळी पळायला."

मी तीला बोललो "चल. पण व्यायामात disturb नाही करायचा."

"नाही करत disturb बाबा येऊ तर देत." असं म्हणत ती आली तर खरं.

पण त्यादिवशी तिने सुरुवातीपासूनच माझ्या व्यायामाची वात काही पेटू दिली नाही. तीला ते वातावरणच इतकं आवडलं कि ती एखाद्या कोकरागत त्या उघड्या माळावर उगवलेल्या गुढगाभर गवतात हुंदडत होती. मला तीला सावध करत न्याव लागतं होतं. थंड हवा आणि हलके हलके दवांच्या राशींचे विखूरलेले सडे. यांना मनभरून बघत श्वेता त्यांचा आनंद घेत होती. तिचा तो आनंद बघून त्यादिवशी मी पण व्यायामाला फाटा दिला.

"यार.. तू रोज इथे येऊन अशा फ्रेश वातावरणात भरभरून श्वास घेतोस, म्हणून तूला दिवसभर energy मिळत असते. " ती म्हणाली.

"खरंय. गेले दोन वर्ष न चुकता मी येतोच. ती टेकडी आणि हा माळ काही सुटत नाही माझा. " मी म्हणालो.

श्वेताने माझ्या सकाळच्या रुटीन मध्यें यायचा interest दाखवला मला याचं नवल वाटलं. कदाचित ती माझ्या मनोराज्याशी कनेक्ट होऊ पहात असेल.किंवा एक कुतूहल म्हणून यायचं असेल. पण बघुयात तरी, जे मी अनुभवलंय ते ती अनुभवू शकते का?  असा एक विचार मनात चमकला.

"चल तूला एक गम्मत दाखवतो. पण कपडे भिजण्याची फारशी काळजी नसेल तरच हा? " मी तीला म्हणालो.

"तू आज काहीही सांग कशाचीच फिकीर नाही मला. " श्वेता म्हणाली.

मी तीला एका ठिकाणी आणलं. मी गवतात आडवा झालो. असंख्य पात्यांनी टोचून आणि दवानी भिजवून माझं स्वागत केलं. 

"हम.. तू पण पड. " मी म्हणालो.

"sure?!!" ती म्हणाली.

"हो तर. जस्ट एक अनुभव घ्यायला सांगतोय. Dont worry." मी म्हणालो.

श्वेतापण शेजारी आडवी झाली. "गार आहे.. खूप.." ती म्हणाली.

"आता काही सेकंद डोळे बंद कर. मी सांगतोय तिकडेच लक्ष दे. See आपण खरंतर अधांतरी जगतो. जमीन आपल्याला धरते म्हणून आपण स्थिर आहोत. तीचा आधार नसेल तर मग अधांतरीच." मी श्वेताला सांगत होतो. 

"तीच्याकडे gravity आहे ना silly " ती म्हणाली.

"हो gravity.. पण सध्या तू ह्या वैज्ञानिक terms बाजूला ठेव. जमीन आपल्याला graviti ने चिटकवून ठेवते. तेच तिने नाही केलं आणि सोडलं आपल्याला, तर आपण विना आधार भरकटत जाऊ. तर त्या भरकटत जाण्याची एक भीती मनात तयार कर. " मी म्हणालो.

"ए भीती कशी बनवता येईल? काहीपण. " श्वेता म्हणाली.

"येते.. माझ्या बोलन्याला नीट समजून घे. हे बघ मनं शांत कर." मी सौम्य आवाजात बोलू लागलो.

"डोळे मीट. शांतपणे ऐक.. आकाश आपल्या डोक्यावर आहे असं आपल्याला दिसतं. पण आपण सरळ आहोत कि उलटे खरंतर आपल्यालाच माहित नाही. कदाचित जे डोक्यावर आहे तो एक खोल डोह पण असू शकतो. त्या डोहात पडू नये म्हणून आपण जमिनीला चिटकलेले असू, तर मग आपण उलटे असणार नं. आणि जमिनीने आपल्याला चिकटून न घेता सोडलं तर..? तर काय होईल..? असं इमॅजिन कर. मोठा श्वास घे श्वेता." 

मी उठून बसलो. तिने डोळे मिटले होते. ती शांत झाली होती. हळूहळू तिच्या हालचाली थांबल्या. काही सेकंद गेले आणि अचानक तिच्या पायांची बोटे अस्वस्पणे हलू लागली. हातांच्या बोटानी मुठी आवळल्या. तिने गवत पकडले. घट्ट. आणखी घट्ट. 

" आ sssss!" मोठी किंकाळीच तिच्या तोंडातून बाहेर पडली. आणि ती ताडकन उठून बसली.

" Ohh my god!!" ती उठून बसत उदगारली. तिचा श्वास फुलला होता. डोळे मोठे करुन माझ्याकडे अविश्वासाने बघत होती. 

"That was so real...! मला वाटलं मी जमिनीला लोम्बकळलीये.. नंतर एक सेकंद वाटलं कि खोल कशात तरी पडेन." श्वेता बसत म्हणाली.

मी बारीक हसलो. 
" तूला practically कळलं मला काय म्हणायचं होतं ते."

"That was so crazy!! किती विचित्र अनुभव होता तो." असं म्हणत तिने उठून घपकन मला मिठी मारली.

श्वेता असं काही करेल असं मला वाटलंच नव्हतं. सुनीने याआधी कितीदा असं केलं असेल. पण ती सुनी होती. त्यात मला वेगळं काही नव्हतं. पण श्वेता?... ते सिमोल्लंघन तिच्या 
लक्षात आल्यावर ती चपापली आणि पटकन उठून उभी राहिली.

" so sorry.. I dosent mean it.. मी.. मी.. " तीला काय बोलावं कळतं नव्हतं.

"Its ok गं.. आत्ता तुझ्यासाठी मी इथे आहे म्हणून तरी ठीके. पण पहिल्यावेळी मी हा experiance घेतला तेव्हा तर मी एकटाच होतो. कितीवेळ लागला मला ती भीती घालवायला. " मी तीला तिच्या "awkward" परिस्थिती मधून बाहेर काढण्यासाठी म्हणालो.
तरी पण ती भयानक लाजत होती.

"Anyways.. चल टेकडी पर्यंत चालून येऊ." मी तीला बोललो.
थोड्यावेळ आम्ही शांतपणे चालत राहिलो. ती नजर टाळत होती आणि मी देत नव्हतो.

"तू एकट्याने हा अनुभव घेतलास म्हणजे? सुनी नव्हती आली कधी सकाळी इथे? तीला नाही माहित हे? " शांतता भन्ग करत तिने विचारले.

"सुनी आणि मी आमच्या आयांसोबत घटात यायचो देवीला सकाळी नैवेद्य दाखवायला. पण सकाळी मात्र तूच आलीयेस माझ्यासोबत. हा अनुभव सकाळच्या शांत वातावरणातच घेता येतो. मी केलेला एकमेव experiment आहे यां माळाशी.
माझ्या खूप साऱ्या गोष्टी सुनीला माहित आहेत. पण सगळ्याच  गोष्टी माहित नाहीत. " मी हसून तीला म्हणालो.

"तू खूप वेगळा आहेस. माझ्या, सुनीच्या किंवा इतर कोणाच्याही समजण्यापालिकडचा." श्वेता दूर पसरलेल्या माळाकडे नजर फेकत म्हणाली.

"असं काही नाही. सुनीला माझी सवय आहे तीला मला समजून घ्यायची गरजच नाही.. पण तूला मी बोललो तर समजतं बरंच काही. म्हणून तर तू माझ्या म्हणण्याशी कनेक्ट करू शकलीस. मला खरंतर तूला thanks म्हणायचं होतं. त्यादिवशी तू मला इतकं छान समजवलं नसतंस तर मी सुनीसोबत झालेल्या भांडणाने आलेल्या त्राग्यातून बाहेर पडलो नसतो. Thanks श्वेता. 
मी सुनीला इतरांच्या फाटक्यात पाय घालू नको म्हणून सांगत होतो. पण तू ते कसं चुकीचं आहे हे आमच्या फाटक्यात पाय घालून मला समजवलंस." मी म्हणालो.

"शी sss फाटक्यात पाय!! काय रे?! ती हसायला लागली. आमचा आसमंत परत मोकळा झाला.

"बरं मला एक सांग." ती  म्हणाली.

"काय?"

"त्या पल्लीला तु कॉम्प्युटर क्लास च्या वेळी कसा irritate झाला होतास ते सुनीने मला ऐकवलं होतं. पण मला बरा ये म्हणालास इथे. सुनी म्हणाली होती विचार त्याला. हो बोलला तर जा. शक्यतो त्याला दिवसातला हा वेळ एकट्याला हवा असतो." श्वेता म्हणाली.

"सुनी पण ना.. काहीही सांगत बसते. " मी म्हणालो.

"मला यायला का ok म्हणालास?" तिने माझ्याकडे आता रोखून बघत विचारले.

श्वेता एक प्रखर व्यक्तिमत्व असलेली मुलगी होती. तिचं दिसणं, वागणं बोलणं खूप छाप पडणारं होतं. तिने काही विचारलं तर उत्तरं काय द्यायचं याचा विचार करावा लागायचा. पण सगळ्यांशी असं व्यक्त होणं तीला शक्य नव्हतं. ती खूप राखून वागायची. शाळेत सुनी आणि मीच तिचे अपवाद होतो. मघाचा तो प्रकार आमच्यात एक भलतंच नातं निर्माण करणारा कर्षण युक्त आसमंत बनवून गेला होता. मी संभ्रमित होत होतो. कदाचित तिचीही तीच अवस्था असावी. मला कळतं नव्हतं मी काय सांगावं. 

" कारण..!! तसं मला नाही सांगता यायचं... पण सुनीचे हट्ट जसे मला नाही म्हणायला जड जातात. तसंच तुझं म्हणणं पण मी हल्ली टाळू शकत नाहीये." मी इतकंच बोललो.

"सुनिसारखे हट्ट मी नाही करू शकत. तितका माझा हक्क पण मी समजत नाही. पण माझं कधी काही म्हणणं असेल तर प्लिज नं झिडकारता ऐकशील." ती म्हणाली.

"असं का बोलतीयेस? तू आमच्या दोघांनाही खूप attach झालीयेस. माझ्याकडून असं नाही होणार कधी." मी म्हणालो.

"माहित नाही का? पण मला सांगावं वाटलं तूला असं." श्वेता म्हणाली.

नको फार विचार करुस. Take it easy." मी म्हणालो. 

नंतर मग आम्ही विषय शाळा आणि अभ्यासाकडे वळवला.  गप्पा मारत मारत घरी गेलो.

आज पहिल्यांदा सुनी सोडून कोणीतरी इतकं जवळून माझ्या विचारांना स्पर्शून गेलं होतं. ते दार त्यावेळी तिने उघडलं कि मीच उघडून दिलं. त्याचा निवाडा अजूनही माझं मनं करू शकलं नाहीये.

🍁🍁🍁🍁

तू रहाते तिथे दुसरे कोंणीही नाही.
तू फुलते तिथे दुसरे गन्धच नाही.
ती कवाडे बंदच आहेत जिथे तू वसलीयेस.
पण सौम्य वारे हळूच ती उघडून पाही. 🍁🍁

- क्रमशः

शब्दभ्रमर 🍁🍁