अनुबंध बंधनाचे. - भाग 56 prem द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुबंध बंधनाचे. - भाग 56

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ५६ )
पुढे काही दिवस असेच निघुन जातात.
 प्रेमच्या घरी आनंदाची बातमी समजते. काही महिन्यातच त्याच्या घरी लहान बाळाची हालचाल होणार होती. त्यामुळे घरचे वातावरण अगदी आनंदी झाले होते.
काही दिवस आधीच वैष्णवी तिच्या माहेरी गेली होती. त्यादरम्यान एक दिवस प्रेम अंजलीला भेटायचे ठरवतो. 
तिला मॅसेज करून तो भेटायचे ठिकाण आणि वेळ सांगतो. तो मॅसेज पाहून अंजली तर खुश होते. 
ठरलेल्या दिवशी ते दोघे भेटतात. नेहमीप्रमाणे अंजली वेळेआधीच येऊन त्याची वाट पहात होती. प्रेम तिथे पोचतो. ते दोघे एका ठिकाणी बोलत बसतात. 
अंजली : प्रेम...! काय झालं...! असं अचानक भेटायला बोलावलं...! सगळं ठिक आहे ना...?
प्रेम : हो...! ठिक आहे.
अंजली : बरं मग...! तु कसा आहेस...? 
प्रेम : मी...? कसा दिसतोय मस्त ना...! 
अंजली : हो...! ते तर आहेच... ! तु एकदम मस्तच दिसतोस....!
प्रेम : मग...! बाकी....! तुझं काय चाललंय...?
अंजली : तसं वेगळं असं काही नाही...! अभ्यास आणि योगा....! 
प्रेम : छान....! 
अंजली : घरी सर्व कसे आहेत...? आई, वैष्णवी, भाऊ वैगेरे...?
प्रेम : सगळे मजेत आहेत...! मॉम डॅड कसे आहेत आणि स्विटी....?
अंजली : ते पण सर्व मस्त आहेत. 
प्रेम : गुड....!
अंजली : आता सांगशील का बोलवलं आहेस भेटायला...?
प्रेम : काही नाही...! असच बोलवलं...!
अंजली : प्रेम....! तेवढं तर मी तुला ओळखते ना....! मग बोल....
प्रेम : अच्छा...!
अंजली : नाही का मग...! बोलशील आता तरी....
प्रेम : बरं....! मग मला एक गोष्ट खरी खरी सांगशील....!
अंजली : कोणती बरं....!
प्रेम : आत्ता सध्या मी तुझ्यासाठी कोण आहे...? मित्र की अजुन काही...?
* त्याच्या अशा प्रश्नाने अंजली गप्पच बसते. तिला काय बोलावं ते सुचत नव्हते. म्हणून ती इकडे तिकडे पहात त्याला बोलते. 
अंजली : असं का विचारतोय तु....? आपलं ठरलं आहे ना, आता आपण मित्र आहोत म्हणून....!
प्रेम : हो...! ठरलं तर होतं...! पण मला का वेगळं वाटत आहे.
अंजली : काय बोलायचं आहे तुला नक्की...!
प्रेम : अंजु....! तु खरच मला तुझा मित्र मानतेस...!
अंजली : हो...! अगदी मनापासून...!
प्रेम : आणि त्यापलीकडे काही नाही तुझ्या मनात...?
अंजली : प्रेम...! अरे... असं का बोलतोय तेच मला कळेना. काय झालं आहे तुला...?
प्रेम : अंजु....! मला पण हेच विचारायचे आहे तुला...! काय झालं आहे तुला...?
अंजली : मला....! मला कुठे काय झालंय...!
प्रेम : अच्छा...! मग तुझ्या मनात माझ्याविषयी मैत्री सोडुन काही नाही. बरोबर....!
अंजली : प्रेम...! खरं तर... मला यातुन बाहेर पडायला थोडा वेळ हवा आहे. 
प्रेम : म्हणजे...?
अंजली : मी प्रयत्न करतेय प्रेम...! पण काही गोष्टी अशा आहेत की, मी त्यातून बाहेर पडूच शकत नाही. जाऊ दे...! ते तुला नाही कळणार. 
प्रेम : का नाही कळणार...! बोल ना माझ्याशी मग...! त्यासाठीच मी आलोय.
अंजली : प्रेम...! काही गोष्टी नाही बोलुन सांगता येत नाहीत.
प्रेम : का बरं....! मित्र तर आहोतच ना आपण...! मग एक मित्र म्हणुन सांग...!
अंजली : असं नाही होत प्रेम...! आणि हो... मी मान्य करते की, तु जरी मला मैत्रीण मानत असलास तरी माझ्यासाठी तु अजुन तोच प्रेम आहेस जो फक्त माझा आहे. आणि हे खरं आहे की, मी अजुन पुर्णपणे याचा स्वीकार केलेला नाही, किंवा माझ्याकडून ते होत नाही. मी काय करू....! 
पण असेही नाही की, मी प्रयत्न करत नाही. मला या गोष्टीचा त्रास तुला द्यायचा नाही. फक्त मला थोडा अजुन वेळ लागेल....
प्रेम : म्हणजे हे असं अजुन किती दिवस चालणार आहे....?
अंजली : मला नाही माहित....?
प्रेम : अंजू....! असा विचार करून कसं चालेल. तुला हे ॲक्सेप्ट करायलाच हवं. आपले मार्ग आता वेगळे आहेत. आत्ता जेवढ्या लवकर हि गोष्ट तु समजुन घेशील तेवढा पुढे होणारा त्रास कमी होईल.
अंजली : मला नाही त्रास होत याचा, आणि मला हे ही माहितीये की, तु कधीच कायमचा माझा होऊ शकणार नाहीस. आणि हे मी ॲक्सेप्ट केलं आहे ना...! मग काय प्रॉब्लेम आहे. तु बोलतोय ना की, आपण मित्र म्हणून राहू. मला चालेल ते...! 
प्रेम : पण हे असं किती दिवस रहाणार...! कधीतरी तुला तुझ्या आयुष्याबद्दल विचार करावा लागेलच ना...! 
अंजली : मग मी करतेय ना त्याचा विचार, त्यासाठी मेहनत पण करतेय. अजुन काय हवंय तुम्हाला....?
प्रेम : अंजु...! तुला का नाही समजत, मला काय बोलायचे आहे ते...!
अंजली : मला नाही समजुन घ्यायचं ते, जे काही चालू आहे ते ठिक आहे माझ्यासाठी. तुला काही प्रॉब्लेम आहे का आपल्या मैत्रीचा...? असेल तर तसं सांग...! तुला मैत्रीण म्हणुन पण मी तुझ्या आयुष्यात नको आहे का...? एवढी नकोशी झाली आहे का मी तुला...?
प्रेम : अंजु...! काय बोलतेय तु...? मी असं बोललो का काही....?
अंजली : जर तुला काही प्रॉब्लेम नाही तर मग असु दे ना असच सर्व...! 
प्रेम : अरे पण....! 
अंजली : प्रेम...! मला कळतंय तु का असं बोलतोय ते. पण थोडासा माझा पण विचार कर ना...! एक मैत्रीण म्हणून तरी...!
प्रेम : अंजु...! तुझा विचार करूनच मी बोलतोय ना...!
अंजली : प्रेम...! ऐक ना.....! नको ना तु जास्त विचार करू याचा...! जे आहे ते आहे...! पुढचं पुढे बघू....! आणि पुन्हा एकदा सांगतेय मी...! माझ्यामुळे तुझी फॅमिली लाईफ डिस्टर्ब होणार नाही याची काळजी मी नक्की घेईन. विश्वास ठेव माझ्यावर...! आणि रिलॅक्स हो जरा...! आणि खरच बोलतेय मी हे...! हवं तर तु ठरव आपण कधी बोलायचं, कधी भेटायचं. तु बोलशील तसं वागेन मी , तु मॅसेज केल्याशिवाय मी स्वतःहून तुला मॅसेज पण करणार नाही...! मग तर झालं. आता तरी हे सर्व डोक्यातून काढून टाक...! प्लीज...,🙏🏻
प्रेम : बरं ठिक आहे, यापुढे तु तुझ्या स्टडी वर फोकस करायचा आहेस. ओके...! आणि आत्ताच सांगतोय यापुढे आपण कधी भेटू हे सांगता येत नाही. त्यामुळे सतत असे विचार डोक्यात आणू नको कळलं. 
अंजली : हो...! कळलं....! पण कधीतरी भेटशील ना....! महिन्यातून, दोन महिन्यातून, का सहा महिन्यातून, का वर्षातुन एकदा...! माझ्या बर्थ डे ला तरी....!😊
प्रेम : ते बघु पुढचं पुढे...! आत्ता निघूया आपण, आणि जे काही बोललोय ते लक्षात ठेव म्हणजे झालं.
अंजली : बस्...! एवढच बोलायचं होतं...! अजुन काही सांगायचं आहे का तुला....!
 * प्रेम मनात विचार करतो तिला सांगाव का...? अखेरीस निघता निघता तिला बोलतो...
प्रेम : हो...! अजुन एक सांगायचं राहिलं. 
अंजली : काय राहिलं आता...?
प्रेम : माहित नाही तुला काय वाटेल ते... पण काही दिवसात माझ्या घरी बाळ येणार आहे.
* अंजली काही वेळासाठी स्तब्ध होते. आणि काही वेळातच त्याला बोलते...
अंजली : अरे व्वा...! हि तर खुप आनंदाची बातमी आहे. हे आधी सांगायचं सोडुन तु बाकी सर्व बोलत होतास...! बाय द वे...! खुप खुप अभिनंदन...! तुम्हा दोघांचेही....! आणि मी सांगु तुम्हाला एक छान गोड परीसारखी मुलगी होईल बघ...! आणि थोडीशी माझ्यासारखी दिसायला असेल....! म्हणजे तिला पाहिल्यावर तरी तुला माझी आठवण येईल...!😊 सॉरी...! मस्करी करतेय....! पण खरच खुप छान न्युज आहे. मस्त एंजॉय करा ही मोमेंट दोघेही....! आणि काळजी घे आता जास्त लक्ष दे घरी. मी नाही डिस्टर्ब करणार....!😊 बेस्ट ऑफ लक....👍🏻
प्रेम : झालं तुझं....!
अंजली : हो...! पण मला दाखवशील ना बाळ...?
प्रेम : चला आता निघुया, उशीर होतोय.
अंजली : बरं ओके...! पण एवढी आनंदाची बातमी आहे मग कॉफीची तरी ट्रिट देशील की नाही....!
प्रेम : ठिक आहे चल....!
 * दोघे त्याच्या बाईकवरून तिथुन निघतात. वाटेत एका ठिकाणी थांबुन कॉफी घेतात. मग प्रेम तिला तिच्या घराजवळ सोडुन घरी येतो. 
पुढच्या काही दिवसांत अंजलीचे मॅसेज येणे बंदच होते. प्रेम पण हि गोष्ट कुठेतरी मिस करत होता. पण घरी आता खुशीचे वातावरण होते. काही दिवसातच प्रेम आणि वैष्णवीला गोड गोरी पान अशी मुलगी झाली. खरं तर त्याचीही मनोमन इच्छा होती की, मुलगीच व्हावी. त्यामुळे तो खुप खुश होता. ग्रुप मधील सर्वजण हॉस्पीटल मधे येऊन दोघांना भेटुन त्यांचे अभिनंदन करत होते. सर्वजण खुप आनंदी होते. 
त्याने हॉस्पीटल मधे पहिल्या वेळी जेव्हा बाळाला हातात घेतले होते. तेव्हा त्याला अंजली जे बोलली होती ती गोष्ट आठवली. तिला पाहून मनातच तो हसू लागला. त्याने तिला मॅसेज करून हि बातमी दिली. तिने मॅसेज वाचल्यावर त्याला रिप्लाय देत दोघांचेही अभिनंदन केले.
पुढचे काही दिवस वैष्णवी तिच्या माहेरी राहिली होती. तिथेच बाळाचे बारसे पण झाले. प्रेम ने स्वतःच तिचे एक छान नाव ठेवले "शर्वरी"
काही दिवसांनी वैष्णवी आता बाळाला घेऊन प्रेमच्या घरी आली होती. त्या बाळाच्या येण्याने घरातील वातावरणच बदलून गेले होते. 
प्रेम आता घरी जास्त वेळ थांबू लागला होता. आपल्या मुलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत होता. 
एक दिवस त्याला अंजलीचा एक मेसेज येतो...
" हाय...! कशी आहे प्रिन्सेस... आणि आम्हाला कधी पाहता येईल...?"
 प्रेम तो मॅसेज पाहून त्याला रिप्लाय न करता फक्त मनातच हसतो. 
काही दिवसांनी पुन्हा तोच मॅसेज....
पुन्हा काही दिवसांनी तोच मॅसेज....
यावेळी प्रेम रिप्लाय देतो...
" गुरुवारी संध्याकाळी सात वाजता आम्ही शर्वरीला घेऊन साईबाबा मंदिरात जाणार आहोत. पॉसिबल असेल तर ये..."
तिच्याकडून लगेच त्याला रिप्लाय येतो...
" शर्वरी.... खुपच सुंदर नाव ठेवलं आहे. आणि मी नक्की येईन. "
 त्या दिवशी प्रेम आणि वैष्णवी ऑफिसमधून घरी आल्यावर फ्रेश होऊन शर्वरीला घेऊन मंदिरात जायला निघतात. तिथे पोचल्यावर मंदिराबाहेर गाडी पार्क करताना त्याच्या लक्षात येते की अंजली आलेली आहे कारण तिची स्कुटी पार्किंग मधे उभी होती. 
ते दोघे मेन गेट मधुन आत जातात. वाटेत एका फुलांच्या दुकानातून एक छान असा फुलांचा हार घेऊन ते आत जाऊन दर्शनाच्या लाईन मधे उभे राहतात. प्रेमने शर्वरीला घेतले होते. तो त्या लाइन मधे अंजली कुठे दिसतेय का ते पहात होता. पण त्याला ती कुठे दिसत नव्हती. दर्शनाची लाइन पुढे पुढे जात होती. काही वेळाने त्याच्या लक्षात आले की शर्वरी सोबत मागुन कोणीतरी खेळत होते. तो मागे वळून पाहतो तर तिथे अंजली होती. ती हळूच त्याला बोलते...
अंजली : हाय....! खूपच गोड आहे शरू...! 
* प्रेमला टेन्शन आले होते, कारण समोर वैष्णवी उभी होती. मागे अंजली उभी होती. तो तिला काहीच बोलू शकत नव्हता. 
दर्शनाची लाइन मधून ती तशीच पुढे मंदिरातील गाभाऱ्यापर्यंत त्यांच्यासोबत आली होती. तिथे आल्यावर प्रेम शर्वरीला तिथल्या पुजाऱ्यांकडे देतो. ते पुजारी काका तिला साईबाबांच्या पायावर टेकवून तिला पुन्हा प्रेमकडे देतात. वैष्णवी सोबत आणलेला तो हार त्यांना देते. पुजारी तो हार बाबांना घालतात. दोघेही समोर असलेल्या पादुकांचे दर्शन घेऊन बाबांना हात जोडून नमस्कार करतात. आणि काही वेळ मंदिरात बसतात. त्यांच्या मागोमाग अंजली आपल्या हातातील गुलाबाचे फूल पुजाऱ्यांकडे देऊन बाबांना नमस्कार करून तिथे येते. ती पण थोड्या अंतरावर बसलेली होती. प्रेम तिच्याकडे लक्ष देत नव्हता. 
शर्वरीला तिथेच खाली ठेवलेले होते.
काही वेळ थांबुन ते घरी जायला निघतात. अंजली पण त्यांच्या मागोमाग तिथून निघते. 
दुसऱ्या दिवशी दुपारी त्याला तिचा मॅसेज येतो...
" प्रेम.... थॅन्क्स...! पण एक गोष्ट सांगु, शर्वरी खुपच गोड आहे रे...! असं वाटत होतं तिला घरीच घेऊन जावं. पण काय करणार...! पण खुप छान वाटलं तिला पाहून. पुन्हा एकदा थॅन्क्स. 😊
पुढे काही दिवस असेच निघुन जातात. त्या दोघांमध्ये आता बोलणे तर होत नव्हते. पण त्याला डिस्टर्ब नको म्हणुन अंजली मॅसेज पण करत नव्हती. 
नंतर काही महिन्यांनी तिने त्याला मॅसेज केला. तो दिवस होता प्रेम आणि वैष्णवी यांच्या लग्नाचा...
" प्रेम...! तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. 💐
प्रेम ने तो मॅसेज वाचुन त्याला रिप्लाय केला. ' थॅन्क्स ' 😊
त्याच्या पुढच्याच महिन्यात प्रेमचा वाढदिवस होता. 
अंजलीला त्याला विश तर करायचं होतं, पण रात्रीचा त्याला मॅसेज करू शकत नव्हती. त्याच्या ग्रुप मधील बाकी सर्वांनी त्याला मॅसेज करून विश केले होते. त्याला वाटलं अंजलीचा पण मॅसेज येईल... पण तो नव्हता आला.
त्या दिवशी तो आवरून ऑफिसला जायला वैष्णवीला घेऊनच निघतो. एरियातून बाहेर पडत असतानाच त्याची नजर अंजलीच्या स्कुटी कडे जाते. ती मेन रोड वर स्कुटी साइड ला लाऊन उभी होती. सोबत वैष्णवी असल्यामुळे तो तिथे थांबुही शकत नव्हता. त्याने तिच्याकडे पाहुन न पाहिल्यासारखे केले आणि तसाच सरळ तो वैष्णवीच्या ऑफिसकडे निघुन गेला. 
अंजलीला मात्र मुड थोडा ऑफ झाला होता. तिला वाटलं होतं, कदाचित प्रेम एकटाच असेल पण....
आत्ता नाही भेट झाली, ठिक आहे... संध्याकाळी तरी भेटेल...अशी स्वतःचीच समजुत काढून तिथून ती घरी जायला निघते. 
तेवढ्यात तिला प्रेमचा कॉल येतो. ती स्कुटी साइड ला घेऊन त्याचा कॉल रिसिव्ह करते.
अंजली : हाय.....! हॅप्पी बर्थ डे प्रेम...😊
प्रेम : कुठे आहेस तु...?
अंजली : मी इथेच...घरी चाललेय, वाटेत आहे. तु पोचला का ऑफीस ला...?
प्रेम : नाही....! पण तु का आली होतीस इकडे...?
अंजली : म्हणजे तु पाहीलस मला...?
प्रेम : होय...!
अंजली : सॉरी... पण, मला वाटलं, तु एकटाच असशील, म्हणुन तुला विश करायला आले होते. 
प्रेम : छान...! 
अंजली : सॉरी....! पण मला काही सुचत नव्हते. मला तुला विश करायचं होतं. 
प्रेम : कर मग...! 
अंजली : कसं... म्हणजे...?
प्रेम : जरा मागे बघा....!
 * प्रेम तिच्या स्कुटीच्या मागेच बाईक थांबवुन तिच्याशी बोलत होता. त्याला पाहून पटकन ती स्कुटी साइड स्टँड ला लाऊन त्याच्याजवळ येते आणि त्याला मिठी मारत बोलते...
अंजली : हॅप्पी बर्थ डे... प्रेम. 
प्रेम : थॅन्क्स.... ! आणि आपण रोडवर आहोत मॅडम.
अंजली : हो....! मला माहित आहे, मग मित्राला विश पण करू शकत नाही का...?
प्रेम : हे असं....!
अंजली : मग काय झालं... नॉर्मल आहे हे. 
प्रेम : तुमच्यासाठी असेल पण इतर लोकांसाठी हे नॉर्मल नाही ना, बघ जरा कसे आपल्याकडेच बघत आहेत.
अंजली : बघू देत....!
* प्रेम तिला थोडं बाजुला करत बोलतो.
प्रेम : बरं झालं तुझं...! आता मी निघु...! खुप उशीर झालाय, ऑफिसला जायला. किती वाजलेत बघ.
अंजली : राहू दे ना आज नको जाऊ, एक दिवस सुट्टी घेतली तर काय होणार आहे.
प्रेम : नाही घेऊ शकत, खुप काम आहे ऑफिस मधे. 
अंजली : बरं ओके...! पण एक मिनिट थांब...!
 * असं बोलुन ती तिच्या स्कुटी कडे जाते. डिकी मधुन एक छोटीशी प्लास्टिक बॅग घेऊन त्याच्याजवळ येते. ती बॅग त्याला देत बोलते...
अंजली : हे तुझं गिफ्ट....!
प्रेम : काय आहे हे...?
अंजली : बर्थ डे आहे ना तुझा...!
प्रेम : काय आहे यामधे....?
अंजली : एवढं काही नाही, नॉर्मल आहे. आणि प्लीज आता त्यावरून लेक्चर नकोय, तु घरी गेल्यावर बघ. ओके...
प्रेम : ठिक आहे...! आता जा तु घरी, मी पण निघतोय.
अंजली : बरं...! निघते. पुन्हा एकदा हॅप्पी बर्थ डे. बाय... सांभाळून जा.
 * प्रेम तिला बाय बोलून तिने दिलेली गिफ्ट ची बॅग आपल्या सॅक मधे ठेऊन तिथून ऑफिसला जायला निघतो.
लंच झाल्यावर दुपारच्या वेळेत तो तिने दिलेलं गिफ्ट ओपन करून बघतो. 
त्या बॅग मधे एक छोट्याशा बॉक्स मधे एक छान असं छोटंसं पैंजण होतं. ते पाहून तो थोडा विचार करतो, बर्थ डे माझा आणि गिफ्ट मात्र शर्वरी साठी...
आता याबद्दल घरी काय सांगायचं याचं टेन्शन त्याला आलं होतं. जास्त विचार न करता तो ते गिफ्ट परत त्या बॅग मधे ठेऊन देतो.
संध्याकाळी घरी गेल्यावर त्या गिफ्ट बद्दल घरी सांगतो की, ते त्याच्या बॉस ने दिलं आहे. आणि घरातील सर्वांना ते पटतं त्यामुळे तो निर्धास्त होतो.
पुढे काही दिवस असेच निघुन जातात. 
प्रेम शर्वरी मुळे पुर्णपने व्यस्त झालेला असतो. त्यामुळे त्याला अंजलीचा सुद्धा विसर पडला होता. 
बघता बघता ऑगस्ट महिना आलेला होता. १५ ऑगस्ट ला अंजलीचा वाढदिवस होता. प्रेम ने तिला मॅसेज करून विश केले होते. त्याला रिप्लाय देत अंजलीने मॅसेज केला...
अंजली : थॅन्क्स प्रेम...! एक रिक्वेस्ट करतेय....! आज भेटशील का संध्याकाळी फक्त थोड्या वेळासाठी. प्लीज....! फक्त आजचा दिवस.....!
प्रेम तिचा मॅसेज वाचुन त्याला रिप्लाय न देता शर्वरी सोबत खेळायला लागतो.
आज सुट्टी असल्यामुळे सर्वजण घरी होते. घरातील सर्वजण तो वेळ शर्वरी सोबत छान एंजॉय करतात.
संध्याकाळी प्रेम थोडा वेळ मॅच खेळायला जातो. अंधार पडेपर्यंत तो मैदानातच होता. 
घरी आल्यावर फ्रेश होऊन चहा वैगेरे घेऊन तो बाहेर पडतो. अंजलीला भेटायला जायचं की नाही या विचारात तो असतो. शेवटी त्याला राहवत नाही. तो तिला मॅसेज करून सांगतो...
' मी थोड्या वेळात तिकडे येतोय. चर्च जवळ ये.'
तिच्याकडून त्याला लगेच रिप्लाय येतो...
' ओके... मी वाट बघते...'😊
प्रेम तिथून बाईक घेऊन निघतो आणि अंजलीला भेटायला निघतो. जाताना त्याच्या लक्षात येतं की, तिला बर्थ डे गिफ्ट काही घेतले नाही. तिथे जवळपास तसे शॉप पण नव्हते. शेवटी एका मेडिकल शॉप मधून एक कॅडबरी घेतो आणि तिथून चर्च जवळ पोचतो.
अंजली छान नवीन ड्रेस घालून त्याची वाट पहात तिथे उभी होती. प्रेम समोर दिसताच ती खुश होते. प्रेम तिच्या जवळ जाऊन बाईक थांबवतो.
बाईक बंद करून एकटक तिच्याकडे पहात राहतो. त्याला असं पाहून अंजली त्याच्या चेहऱ्यासमोर एक चुटकी वाजवत बोलते....
अंजली : ओय....! काय झालं...! कुठे हरवलात...
प्रेम : सॉरी....! पण खुप गोड दिसतेय तु...! 
* त्याच्या अशा बोलण्याने ती थोडी लाजते आणि त्याला बोलते...
अंजली : थॅन्क्स...! 
प्रेम : आणि हो...! वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. खुप मोठी हो...!
* तिला कॅडबरी देत तो बोलतो...
ती कॅडबरी घेत बोलते.
अंजली : थॅन्क्स फॉर धिस... आणि आत्ता कुठे मी जरा बारीक झालीय, पुन्हा मोठी होऊ का....?😊
प्रेम : अरे म्हणजे... तशी मोठी नाही बोललो, कर्तृत्वाने मोठी हो... असं बोललो. 😊
अंजली : अच्छा...!
प्रेम : बरं जा आता घरी वाट बघत असतील मी निघतो आता...!
अंजली : एवढ्या लगेच....! मला वाटलं मला कुठेतरी छान ट्रीट मिळेल, आणि तु तर असाच निघाला....! थांब ना थोडा वेळ.
प्रेम : ट्रीट नंतर कधीतरी, आत्ता नको, तु जा घरी....!
अंजली : बरं ओके...! हि ट्रीट मला हवीय पण नंतर... आणि थॅन्क्स अगेन, खुप छान वाटलं.
* प्रेम तिला बाय करून तिथून घरी यायला निघतो. अंजली तिथेच उभी राहून त्याला पहात होती. थोड्या वेळाने मग ती घरी निघुन जाते.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️