विलक्षण - 2 Balkrishna Rane द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विलक्षण - 2

विलक्षण २येताना माझं विचार चक्र चालू होतं.त्या गुराख्याने त्या जागेच्या मूळ मालकाचे नाव "कोटणीस" सांगितले होते.मला जे कागद पुजारेंनी दिले होते त्यात सुध्दा " कोटणीस नावाचा उल्लेख होता.या नावाभोवती गूढ वलय तयार झाले होते. आता पुन्हा एकदा ते कागद चाळले पाहिजेत असं मी ठरवले.मी बंगल्यावर आलो.पोलीस स्टेशनमधून घेतलेल्या नंबरवर मी फोन केले.अपेक्षेप्रमाणे मला सुरुवातीला माहिती मिळवताना अडचण आली.पण मी इतिहास संशोधक आहे व सरदार कोटणीस यांच्याशी निगडित असलेल्या कोटणीसांची माहिती गोळा करतोय असं सांगितल्यावर मला काही माहिती मिळाली.ही माहिती खूपच महत्त्वाची होती. अपघात झालेले तिन्ही  कोटणीस या ना त्या प्रकारे सरदार कोटणीस यांच्या खानदानाशी संबंधित होते. पण ते एकदोन पिढ्यांपूर्वी काही वादांमुळे वेगवेगळे झाले होते.त्यातल्या दोन शाखा पुण्यात तर एक शाखा मुंबईत राहत होती.     याचा अर्थ कुणीतरी या कोटणीस कुटुंबाच्या मागे लागला होता.पण का? आणि नेमका कोण ? याच थोडं फार उत्तर मला त्या कागदात सापडलं होतं.--------****-----*****------*****-----***-----( पेटीत सापडलेल्या कागदावरून कळलेली हकिकत )

विश्वंभर रामचंद्र कोटणीस ही त्या काळच्या कुडाळ प्रांतातील बडी आसामी. पूर्वीचे सरदार घराणे असल्याने त्यांचा परीसरात दबदबा होता. सावळा रंग ,उंच व धिप्पाड शरीर,...गोल गरगरीत चेहरा....उग्र डोळे,भरदार दाढी आणि मिश्या , डोक्यावर बारीक केस असं एकूण व्यक्तिमत्त्व. सकाळ - संध्याकाळ एक - एक तास ते तालिमीत घालवायाचे. त्यांचं खाणही जबरदस्त होत. त्यांना शिकारीचा नाद होता.घरात असताना धोतर आणि वर बंडी असा पेहराव.पण बाहेर पडले की घडीचे धोतर,वर पूर्ण हाताचा सदरा...खांद्यावर शाल ... डोक्यावर पगडी... हातात नक्षीदार काठी.त्यांच्या पुढे एक व मागे एक नोकर चालत असायचा.ते समोर दिसले की लोक एकतर आपली वाट बदलायचे किंवा मान खाली घालून सलाम ठोकत एका बाजूने निघून जायचे. बायका तर त्यांच्या समोर यायला तयार नसायच्या. त्यांची नजर अत्यंत विखारी होती.बायकांच्या बाबतीत बर्याच वदंता त्यांच्या संदर्भात परीसरात पसरल्या होत्या. बरेच ब्रिटिश अधिकारी त्यांच्या वाड्यावर मेजवानीसाठी येत.कधी कधी नाच गाणी्ही होत.      त्या काळात स्वातंत्र्याची चळवळ फोफावली होती.नुकताच देशभर मिठाचा सत्याग्रह झाला होता.त्याचेपडसाद कोकणातही दिसत होते.विश्वभंर कोटणीसांनासत्याग्रहींबद्दल घ्रृणा होती.ते ब्रिटिशांना त्यांची माहिती कळवत.मग कुणाला गोळी घालून मारलं जाईल तर कुणाला तुरुंगात डांबले जाई.त्यामुळे क्रांतिकारकांचाही त्यांच्यावर रोष होता.असच एकदा कोणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.एक गोळी त्यांच्या खांद्यालाघासून गेली होती.बरोबरच्या नोकरांनी त्यांना वाचवले होते.       विश्वंभरांची पत्नी दुर्गा ही कधी वाड्या बाहेर फारसी पडली नाही.नोकर चाकरांच खाण पिणं बघणे. वाड्यांच्या झाडलोटीकडे लक्ष देणं हे तिचं काम.बाकी कुठच्याही निर्णयात तिचा सहभाग नसायचा. विश्वंभरच्या लेखी बायकांना किंमत नसायची ते ब-याचदा तिचा नोकरांसमोरच पाणउतारा करत.विश्वंभरांना दोन मुलगे होते.एकाच नाव सूर्यकांत तर दुसरा चंद्रकांत.सूर्यकांत तिस वर्षांचा होता...त्यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती पण त्याला मुलबाळ नव्हते.सूर्यकांत थोडा मनोरूग्ण होता.मध्येच तो बेभान व्हायचा...विचित्र वागायचा.त्याची बायको भामिनी ही खूप कमी बोलायची व नेहमी एकाअंधार्या खोलीत राहायची. दुसरा मुलगा चंद्रकांत हा मवाळ स्वभावाचा ...बापासमोर एक शब्दही बोलायची त्याची हिंमत नव्हती. चौवीस वर्षांचा होता.त्याची बायकोगौरी ही धाडसी... स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली होती.सातवी पर्यंत शिकलेली होती.पंधराव्या वर्षी तिचंलग्न चंद्रकांत बरोबर झालं होतं. तिने घरात येताच बंडखोरी केली.विश्वंभरच चुकीचं म्हणणं ती ऐकून घ्यायची नाही. लग्नानंतर वर्षभरातच तिला मुलगी झाली.विश्वंभराला घराण्याला वारस म्हणून मुलगा हवा होता.मुलगी झाल्यामुळे तो संतापला.पण गौरीने स्पष्ट सांगितले की मुलगा- मुलगी असा फरक तिला मान्य नाही.मुलीच नाव तिने नम्रता ठेवले.पण विश्वंभर जाणून बुजून तिचा आणि चंद्रकांताचा अपमान करू लागला.पण गौरीने दाद दिली नाही. दोन वर्षांनंतर ती दुसर्यांदा गरोदर राहिली. शेवटच्या  दोन महिन्यांत तिचं नम्रताकडे दुर्लक्ष झाले.अशीच एकदा खेळता खेळता नम्रता शेत विहीरकडे गेली.सायंकाळी एका नोकराणीला ती विहिरीत तरंगताना दिसली. अर्थात गावात मात्र वेगळीच चर्चा होती.गौरीला प्रचंड मानसिक धक्का बसला.त्यातच तिच वेळे आधी बाळंतपण झालं.पुन्हाही मुलगीच झाली.सगळ्या घरात एक भिषण शांतता पसरली. घरातल्या बायका...नोकर चाकर सगळेच मनातून चरकले .एक अनामिक भयसगळ्यांच्या चेह-यावर दिसत होतं.बाळंतपणाच्या दहाव्या दिवशी चंद्रकांतला विश्वंभरांनी रत्नागिरीलाजमीनीच्या कामासाठी पाठवलं.त्या दिवशी  होती सूर्यकांत सकाळपासूनच अस्वस्थ होता.विश्वंभर मात्र सगळ्यांशी सहज हसत बोलत होते.त्यांनी नोकरांना खास जेवणही त्या दिवशी दिल. पण आज काही तरी वेगळे आणि भितीदायक घडेल असं सगळ्यांना वाटतं होतं......

          कागदावर एवढंच लिहिलं होतं ते सुध्दा एक नवी लिपी तयार करून. हे नेमकं कोणी लिहिलं ते समजत नव्हतं.कदाचित ह्याच्या पुढची हकिकत...दुसर्या एखाद्या कागदावर लिहिली गेली असेल. पण त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? कोटणीसांच्या कुटुंबाच पुढे काय झाले होते. ज्या कोटणीस कुटुंबाच्या गाड्यांना अपघात झाला होता ते याच कुटुंबातील की त्यांचे जवळचे वारसदार?प्रश्न अनेक होते पण उत्तरे सापडत नव्हती. खरंतर ही हकीकत गेले पाच दिवसांत अनेक वेळा मी वाचली होती.हे लिखाण एकाच वेळी झालेल नव्हते...तर वेगवेगळ्या दिवशी लिहिल गेल होत.हस्ताक्षरावरूनव लिखाणावरून हे लिखाण एखाद्या स्त्रीने केलं असे वाटत होतं. दुर्गा...गौरी... भामिनी की आणखी कोणीते लिखाण केले होते ते कळत नव्हते.त्या लिखाणात मला मला चार पाच कन्नड शब्दही आढळले होते.म्हणजे लिहिणारी व्यक्ती कन्नड जाणत होती. कागदावर तारीख नसली तरी १९३० घ्या आसपासची माहिती होती कारण त्यात मिठाच्या सत्याग्रहाचा उल्लेख होता.-----*****-------******-------*****------विचार करता करता मला झोप येऊ लागली.कालच्या प्रमाणेच मी सोफ्यावर ताणून दिली.दिड - दोन वाजता मला जाग आली.कोणी तरी बेडरूम कडून किचनच्या दिशेने चालला होता.एक धूसर आकृती...पावलांचा हलका आवाज..मग काही काळ शांतता पसरली.मी श्वास रोखून पाहत होतो.माझ्या ह्रदयाची धडधड जोरात होत होती.काही क्षणांची पुन्हा किचन कडून पावलांचा आवाज ऐकू येवू लागला.मघाचीच घूसर आकृती.... हळूहळू सरकत आली पण ती बेडरूम कडे न जाता सरळ जिन्याकडे वळली.पाय-या चढत बहुधा ती गच्चीवर गेली असावी.खरतर गच्चीच दार बंद होतं.नंतर ह्रदय पिळवटून टाकणारा करूण असा रडण्याचा आवाज....मग भेसूर हसणे.काही वेळ हे असंच चालू होतं व मग अचानक बंदही झाले. कदाचित ते भामिनी किंवा गौरीच्या आत्म्याचे विरल रुप असावं. पण या नव्या घरात तो आत्मा का फिरत होता.पुजारेंनी तर जुना वाडा पूर्णपणे पाडून टाकला होता. पुजारेंंनी जर सगळा वाडा  पाडला होता तर मग घराचं तोडफोड केली ते सामान कुठे टाकले असेल? हा विचार मनात येताच मला गूढ घटनेचा उकल करण्यासाठी एक मार्ग दिसला.कदाचित ते जुने सामान त्यांनी मागच्या टेकडीवर टाकले असेल.उद्या पहिल्यांदा कागद सापडलेली जागा उरकून पाहावे व नंतरं वाड्यांच्या जुन्या सामानाचा शोध घ्यावा असं मी ठरवलं.

भाग २ समाप्त बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026