विलक्षण - 6 Balkrishna Rane द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विलक्षण - 6

विलक्षण भाग ६

(कोणातरी नोकराला जाग आली.वर उठणार्या ज्वाळा आणि धूर बघून त्याची बोबडी वळली.नेमक्या कुठच्या खोलीत आग लागली हेच कळेना.त्याने तोंडावर हात ठेवून बोंब ठोकली.तसा सगळा वाडा जागा झाला.नोकर -चाकर, घरातली माणसं ओरडत धावली.आरडाओरड ऐकून शेजारच्या माणसांनी मदतीसाठी धाव घेतली.)     अगदी त्याच वेळी पूर्णपणे जळलेल्या गौरीचा आत्मा देह सोडून बाहेर पडला.अतीशय तरल अश्या वायुरुप अवस्थेत ती हवेत तरंगत होती.समोरची धावपळ तिला दिसत होती.पण देहमुक्त झालेल्या गौरीची तडफड चालली होती ती स्वतःची मुलगी कुठे आहे ते पाहण्याची.पण त्या खोलीत फक्त राख आणि तिच्या स्वतःच्या देहाची तुटलेली हाडे...जळून खाली पडलेल्या छप्पराचे भाग दिसत होते.ती हताश झाली.साळसूदपणाचा आव आणून धावपळ करणारे विश्वंभर व सूर्यकांतला बघून तिच्या आत्म्याचा संताप झाला.आताच दोघांच्या नरडीचा घोट घ्यावा असं तिला वाटलं. धावपळ करणार्या माणसांना ओरडून सांगावस वाटल की या...या.. दोघांनी आम्हा मायलेकींचा घात केलाय.तिने तसा प्रयत्नही करून पाहिला.पण काहीच घडले नाही.तिच्या त्या निष्पाप व शुध्द आत्म्यालाअजून कसलंच सामार्थ्य मिळालं नव्हतं.ती इकडं तिकडे फक्त भिरभिरत राहिली.       दुसर्या दिवशी चंद्रकांत घरी आला.तो पर्यंत सगळं संपलं होते.आधिच अबोल असलेला तो पार कोसळला.रिती रिवाजाप्रमाणे त्याने गौरीच दहाव व बाराव केलं.गौरीचा अतृप्त आत्मा हे सगळं न्याहाळत होता.नक्षत्र शांती करण्यासाठी तो नरसोबाच्या वाडीला गेला तो परत आलाच नाही.पण मृत्यूच्या पंधराव्या दिवशी गौरीच्या आत्म्याला जाणवलं की काही शक्ती तिच्यात आल्यात.मानव असताना ती जे करू शकत नव्हती.ते तीसहजपणे करू शकत होती.आता खेळ सुरू होणार होता सूडाचा.ती सूर्यकांत व विश्वंभरला जगणं नकोसं करून मारणार होती. --------*****-----****------****----***------***    त्या सकाळी सूर्यकांत खळ्यातल्या मंडपात बसला होता. समोर टेबलावर त्याची न्याहारी,पाण्याचा तांब्या,पेला व गरम दुधाच्या गडू ठेवला होता.गौरीचा बंदोबस्त केल्यावर आजचा विसावा दिवस होता.दोन वेळा ब्रिटिश पोलीस येवून गेले होते.कंदिल भडकल्याने आग लागली व त्यात आई व दहा दिवसांची मुलगी जळून मेली असा निष्कर्ष त्यांनी काढला. सगळं व्यवस्थित निभावल्या मुळे सूर्यकांत खूष होता.फक्त डॉ.लता पुजारे कुठे गेल्या हे कळत नव्हते. कदाचित त्या घाबरून  तिथून पळाल्या असतील.पण डॉ.पुजारेंचा विषय किंवा उल्लेख कोणीच केला नाही. खरंतर त्या इथे नाहित हे उलट बरंच झालं होत.बागेतून नारळाची पोती घेऊन येणा-या कामगारांवर तो ओरडत होता." सरळ ठेवा ते. एकमेकांवर रचून ठेवा. कामचुकारपणा केलात तर याद राखा.चाबकाने फोडून काढेन."या पूर्वी सुध्दा त्याने कित्येक मजूरांना चाबकाने मारले होते.बर्याचदा तो चाबूक समोर ठेवूनच बसायचा.खर तर ते त्याच नेहमीच वाक्य होते. सहज त्याच लक्ष समोरच्या टेबलावर गेलं.तो दचकला.तिथे त्याचा कातडी चाबूक होता.त्याला पक्कं आठवत होतं.त्यान आपल्या खोलीतून चाबूक मंडपात आणला नव्हता.काही लोक भेटण्यासाठी येत किंवा कुणी अधिकारी अचानक आलातर  चाबूक दिसल्यास गोंधळ होईल म्हणून त्यानेआज चाबूक आणला नव्हता. मग इथं चाबूक कसा? अनवधानाने...सवयीने त्याने तो आणला होता काय?त्यांचा गोंधळ उडाला.डोक झटकत त्याने चाबकावरच लक्ष बाजूला केलं. त्याने दुधाचा गडू उचलून तोंडाला लावला.गटागटा दूध पिऊन त्याने तो खाली ठेवला.पुन्हा तो दचकला मघाशी टेबलाच्या पलीकडच्या बाजूला असलेला चाबूक आता अगदी त्याच्या समोरच होता.चाबूक हलला कसा? कोणी तो हलवला?तो झटकन उठला आणि  झटपट आपल्या खोलीत गेला. समोर भिंतीवर चाबूक टांगलेल्या अवस्थेत तसाच होता.मग टेबलावर असलेला चाबूक कुठचा? तोपुन्हा घाईघाईत मंडपात आला.टेबलावर नजर जाताच त्याच्या घश्याला कोरड पडली.टेबलावर चाबूक नव्हताच. मग इथला चाबूक कुठे गेला? तो डोकं गच्च पकडून खुर्चीत बसला.हे काय होतंय माझ्या सोबत?तो बडबडला.समोर पोती रचणा-या दोन मजूरांना त्यानेजवळ बोलावले." इथला चाबूक कुठे गेला?"दोघेही प्रचंड घाबरले होते." नाय बा, आमका कायच म्हायती नाय?"" मालक, हयसर चाबूक नायच होतो." दुसरा थरथरत म्हणाला." काय? टेबलावर चाबूक नव्हता?"" हो..हो." दोघंही एकाच वेळी म्हणाले." ठिक आहे.चला....कामला लागा."दोघेही त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत कामाला गेले.सूर्यकांताच्या डोक्यात दिवसभर तोच विचार चालू होता.---****----****-----*****-------*****------***दुसर्या दिवशी रात्री नऊ वाजता सूर्यकांत  ब्रिटिश  बनावटीची टॉर्च घेऊन बाहेर पडला.पाठीमागच्या बागेत तो जात होता.हा त्याचा रोजचा कार्यक्रम होता.बागेत माड, पोफळी, रातांबे यांची झाडे होती तर टेकडीच्या उतारावर आंबे व काजूची झाडे लावली होती.या सगळ्या झाडांवर तो नजर टाकायचा.मग टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या शेतघरात तो जायचा.तिथे काही वेळ थांबून तो उंची ब्रिटिश मद्य घ्यायचा व अकरा वाजता पुन्हा वाड्यावर यायचा.आताही तो माडांच्या शेंड्यावर बॅटरीचा प्रकाश झोत टाकत चालला होता.एक गार हवेचा झोत त्यांच्या अंगाला स्पर्शून गेला.कोणीतरी आपल्याला ओलांडून गेलय असं त्याला वाटलं.तेवड्यात बॅटरीचा प्रकाश आपोआप बंद झाला.सगळीकडे अंधार पसरला. ओळखीची पायवाट असूनही तो अडखळू लागला.त्यात कोणाच्यातरी पावलांचे आवाज ऐकू येवू लागले.कधी आवाज पुढूनतर कधी पाठिमागून येत होता.तसा सूर्यकांत धाडसी होता. कोणीतरी आपल्याला घाबरवतोय.... कुणीतरी आपल्याला खेळवतोय असा त्याचा समज झाला.एका जागी थांबून त्याने बॅटरी हाताने ठोकली...हलवली.पुन्हा बॅटरी सुरू झाली.त्याने सगळीकडे बॅटरी फिरवली.पण आजूबाजूला कुठलीही संशयास्पद हालचाल त्याला जाणवली नाही.इकडे तिकडे फिरून तो शेत घरात आला.तिथला कंदिल आधीच पेटलेला होता.कदाचित बाबा ( विश्वंभर) आपल्या आधी इथे येऊन गेले असतील असं त्याला वाटल.तिथल्या फडताळातून त्याने रमची बाटली काढली.माठातल गार पाणी जग भरून घेतले.काचेचे ग्लास व एका बशीत खारवलेले काजूगर घेतले.तो बैठकीवर बसला.एक ग्लास भरून घेऊन तो हळूहळू रम पिऊ लागला.सोबत एक एक काजूगर तोंडांत टाकू लागला.        शांतपणे त्यांचे हे काम चालू होते.ग्लास संपला तसा पुन्हा ग्लास भरण्यासाठी त्याने बाटली उचलली.पण बाटली रिकामी होती आणि समोरचा ग्लास काठोकाठ भरलेला होता. अरे देवा...हे काय आहे? नशेतही त्याचअंग थरथरल. मी ग्लास रिकामा केला होता. तो भरला कसा? त्याला काहीच कळेना.आयुष्यात पहिल्यांदाच त्याला भिती जाणवली... आणि देवाची आठवणही झाली. तो भरलेला ग्लास न उचलताच तो उठला.दरवाजा बंद करून तो वाड्याकडे परतला.वाटेत त्याला तो पावलांचा आवाज ऐकू येत होता.कसाबसा तो आपल्या खोलीत शिरला.             त्यावेळी एक पांढरी आकृती हवेत तरंगत गौरीच्या खोलीच्या दिशेने गेली. 'तुला वेडा करून मारेनजे मी भोगले ते सगळं तुला या दोन तीन दिवसात भोगावे लागेल. ' गौरीचा आत्मा कुजबुजला.दोन दिवस असेच गेले पण सूर्यकांत सतत तणावात असायचा.काम करता करता अचानक तो काही काळ उभाच रहायचा. त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळेआली होती.सगळे लोक आपल्याकडे बघताहेत अस त्याला सतत वाटू लागले.मनाने तो खचला होता.त्यातच त्या दिवशी काही मंडळी विश्वंभरला भेटायला आली.तिथे सूर्यकांत सुध्दा होता.सगळे दिवाणखान्यात बसले होते. गप्पा चालू होत्या.आजूबाजूला नोकर मंडळी हात बांधून हुकमाची वाट पाहत होते. चहा -पाणी समोर ठेवले होते.अचानक दिवाणखान्याच्या मधोमधअसलेलं काचेचं भलंमोठं झुंबर तुटलं आणि हेलकावे खात सरळ सूर्यकांतच्या पायाजवळ पडलं.अगदी वितभर अंतराने सूर्यकांत वाचला. काचेचे असंख्य तुकडे सगळीकडे पसरले. बसलेले सगळे उठून पळाले.दोन वर्षांपूर्वी हे झुंबर विश्वंभरांनी मुंबईवरून मागवून बसवलेहोते.बाकिच्यांसाठी हा अपघात होता .पण सूर्यकांतला समजलं होतं की हे त्याच्यासाठी होत.तो अक्षरशः थरथर कापत होता.ते झुंबर आपल्या डोक्यावर पडले असते तर!या विचाराने तो खूप घाबरला होता.तो तिथून निघून आपल्या खोलीत गेला.-----*****------*****-----****------***---बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026