विलक्षण भाग ९ माझ्या मनातले प्रश्न मी गौरीला विचारले.गौरी काही क्षण गप्प राहिली.मी थोडा अस्वस्थ झालो.काही वेळाने गौरी म्हणाली..." मी मुक्त का नाही झाले हे मला नाही सांगता येणार.पण आता मला कुणाचा सूड घ्यायचा नाही किंवा माझी कोणतीही इच्छा अपूर्ण नाही.विश्वंभरच्या मृत्यू नंतर दुर्गा आणि भामिनी ने सगळा कारभार आपल्या हाती घेतला.लोकांच्या ज्या जमिनी विश्वंभरने बळकावल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी परत केल्या.गावातले देऊळ नव्याने बांधून घेतले.शेतक-यांसाठी एक तलाव बांधला.जी मामींनी नवरा असताना अबोल झाली होती ती आता प्रमेय होऊन नोकरां-चाकरांची लेकरांप्रमाणे काळजी घेत होती.ज्या कोटणीसांच्या घराण्याबद्दल पंचक्रोशीत दहशत होतीत्या ऐवजी आता आदराची भावना निर्माण झाली होती.घराण्याला वारस नव्हता.त्यामुळे विश्वंभर ची कागल येथील बहिण व तिचा मुलगा आपला हक्क सांगू लागली.पण दुर्गा व भामिनीने खंबीरपणे त्यांच्या कारवायांना उत्तरे दिली.भामिनीने कायदेशीर रित्या एका चांगल्या कुळातला सात वर्षांचा मुलगा दत्तक घेतला.नशिबानेतो मुलगा चांगला निघाला.त्याने शेती वाडी उत्तम रितीने सांभाळली.पण त्यांची मुले इथे राहिली नाहीत."" म्हणजे आज पुणे -मुंबईत असलेले कोटणीस हे दत्तकमुलांचे वंशज असणार." मी म्हणालो." हो. त्या दत्तक मुलांचे नाव निरंजन कोटणीस होत.शेवटी त्याने नाईलाजाने इथली जमीन विकली ."" त्या पलिकडच्या रस्त्यावर जे अपघात होतात.ते का घडवतेस?"" नाही.मी आत्ताच सांगितलं की विश्वंभरच्या मृत्यूनंतर मला कोणावरही सूड उगवायचा नाही म्हणून.शिवाय मीह्या जागेतून कुठेही बाहेर गेले नाही व जावू शकत नाही."" ज्यांना अपघात झाला ते सगळे कोटणीस होते.कोटणीसांवर आणखी कुणाचा राग होता? भामिनी की दुर्गा?"" दोघांचा आपल्या नवर्यांवर राग होता.पण त्या माझ्या सारख्या अतृप्त राहिल्या नाहीत."" मग कोण असेल ती स्त्री."" कदाचित त्या शेतकर्यांची सती गेलेली बायको असेल."मला वाटतं माझी निघण्याची वेळ झालीय मला जावं लागेल." गौरी म्हणाली.तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज ऐकू आला. रघुनाथ पुजारे पोहचले होते." थांब थोडा वेळ. तूला लता पुजारेच काय झाले तेजाणून घ्यायला आवडेल ना?"उठलेली गौरी जागीच थबकली.काही क्षण माझ्याकडे बघत राहिली.मी उठून दरवाजा उघडला.समोर तिन व्यक्ती उभ्या होत्या. रघुनाथ व उज्वला पुजारे आणि सोबत एक वृद्ध स्त्री जी गौरीची प्रतीकृती वाटत होती.अनवधानाने मी उद्गारलो..." गौरी..!"खरच ती वृध्द स्त्री आत्ता माझ्यासमोर बसलेल्या गौरी सारखीच दिसत होती." अहो कोण गौरी? ही गौराई आहे." रघुनाथ म्हणाले." कळेल सगळं,जरा फ्रेश होऊन या.""नको आत्ता कसाल मध्ये फ्रेश होवून व नाष्टा करून आलोय. आम्हाला ऐकायचय. एवढ्या तातडीने तुम्ही का बोलावलं ते."मी गौरी कडे पाहिलं.तिचे डोळे विस्फारले होते.ती उठून गौराईकडे गेली. तिने तिच्या भोवती एक फेरी मारली." रत्नकांत, कोणाकडे बघताय? कोण आहे तिथे"मी मंद हसलो.त्यांच्यासाठी गौरीच अस्तित्व नव्हतं." बसा, सगळं सांगतो."मी रघुनाथ व त्याच्या कुटुंबाला सगळी हकीकत सांगितली.ते वाळे...ती बाळंत विड्याची पितळी पेटी.... कोटणीस कुटुंब...गौरी... दुर्गा आणि भामिनी... आणि लता पुजारेंच बलिदान हे सगळं थोडक्यात सांगितले. सगळे अवाक झाले.हा कसला विलक्षण योगायोग?असा भाव तिघांच्या चेहर्यावर होता. गौरीचा आत्मा हे सगळं ऐकत होता.आत्मा हा भावनाविहीन असतो पणगौरीचा चेहरा ममतेने भरुन आला होता.दहा दिवसांची मुलगी जिचे नावही कुणी ठेवलं नव्हते.ती तिची पोटचीमुलगी तिच्या समोर बसली होती.गौरी हलकेच उठली आणि गौराई जवळ आली. तिच्या डोक्यावरून तिने अलगद आपला हात फिरवला.तिच्या गावाला स्पर्श केला.मला वाटत गौराईला ते जाणवलं असावं." माझ्या चेहऱ्याला व केसांना कोणीतरी स्पर्श केला असमला वाटलं.इथे आणखी कुणी आहे का?"गौराई ने मला विचारले.गौरीने गौराईला आपल्या कुशीत घेतलं.तो वात्सल्याचा अद्भुत सोहळा मी बघत होतो.माझ्याशिवाय दुसरं कुणी बघूनही शकत नव्हता.गौराईला काहीतरी वेगळे जाणवत होतं.मी मंद हसलो." गौराई ती तुमची आई...गौरी कोटणीस आहे.तिचा आत्मा आजवर घुटमळत होता.त्याला मुक्ती मिळतनव्हती.आज ती मुक्त होईल."" खरच , गौरी इथं आहे? " तिघही एकाच वेळी ओरडले.मी मान हलवली." मला तिला बघायचे आहे." गौराई म्हणाली." ते माझ्या हाती नाही..."मी गौराई कडे पाहिलं." माझी मुक्त व्हायची वेळ जवळ आलिया.मला तसे संकेत मिळताहेत.फक्त काही क्षणच उरेलेत."मी तिला हात जोडले.क्षणभर हवा थरारली जणू कोणीतरी एखादा अदृश्य पडदा दूर केला होता.समोर गौरी उभी होती जशी ती मला दिसली होती तशीच पण त्यापेक्षा अधिक सुंदर आणि आनंदी.ते दर्शन क्षणभरासाठी होती.पण गौराईचे डोळे पाण्याने भरून गेले होते.रघुनाथनी आपल्या आजीचे ते सुंदर रूप पाहून हात जोडले.उज्वाला पुजारेंनी खाली वाकून नमस्कार केला. क्षणभरानतंर गौरी हळूहळू विरत गेली.अनंतात सामावली. -----*****------*****-------******------**""--- मी त्याच दिवशी दुपारी जेवण घेऊन बाहेर पडलो.पुजारेंच्या परवानगीने ती पितळी पेटी ,वाळे व लता पुजारेंनी लिहिलेले मूळ कागद व वही माझ्या सोबत घेतली.आता त्या वस्तू माझ्या वस्तू संग्रहालयात राहणार होत्या." पुजारे...या ठिकाणाचा शाप संपलाय. तुम्ही याचे खरेखुरे वारसदार आहात.फक्त एक काम करा ..त्या गुलमोहराच्या झाडाजवळ एक छोटी सतीची घुमटी बांधा."रघुनाथ अक्षरशः भावनाविवश झाले होते.त्यांनी माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. गौराईच्या डोळ्यात कृतज्ञता होती.-------******------******-------*****-----(सदर दिर्घ कथा पूर्णतः काल्पनिक आहे.चुकून एखाद्या घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.) बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026