नाते जन्मापलिकडचे - भाग 2 lekhani द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • ते घर अजूनही जागं आहे

    पावसाळ्याची ती रात्र होती.रात्रीचे साडेअकरा वाजले होते. अमोल...

  • मन मस्त मलंग

    भूतकाळातील गडद सावल्या त्यांच्या  आयुष्यावर किती खोल परिणाम...

  • The Anti-Hype Books (Part-1)

    **अस्वीकरण (Disclaimer):**  ही समीक्षा केवळ माहितीपूर्ण आणि...

  • नाते जन्मापलिकडचे - भाग 2

    ती पुन्हा त्याला शोधू लागली. तिची इच्छा होती एकदातरी त्याचे...

  • 50 minutes

    Prologueकाही लोक आयुष्यात येतात सगळं बदलायला आणि मग निघून जा...

श्रेणी
शेयर करा

नाते जन्मापलिकडचे - भाग 2

ती पुन्हा त्याला शोधू लागली. तिची इच्छा होती एकदातरी त्याचे दर्शन घडावे. त्याचं नाव होतं शिव..
यांच्या भूतकाळ्यातल्या कहानीची एक झलक पाहूया..... ~

वैदेही अगदी लहान असताना.
"अगं सुखदा..पटापट लंगडी घाल,नाहीतर आर्य कधीच पकडला जाणार नाही."ती ओरडून सांगत होती. आर्य तिचा बालपणीचा मित्र बरं का. ती दोघे जेव्हा ते या सोसायटीत राहायला आले तेव्हा पासून मित्र आहेत. म्हणू शकता कि सोसायटी जेव्हा सुरु झाली तेव्हा पासून आहेत हे. वैदेही तेव्हा सिनियर केजी मध्ये असावी,आणि सुखदा तिला चौथी-पाचवीत असताना भेटली.खरेतर आर्य मुळे या दोघांची ओळख झाली. आर्य आणि सुखदा दोघे एकाच शाळेत होते.

त्यांच्या सोबत अजून तीन चार जन खेळत होते.त्यांचे नाव म्हटले तर दिशा, सिद्धी, सृष्टी आणि मनाली.आर्य एकतर धावपटू होता. त्याला पकडनं खूप कठीण जायचं. पण कसं बसं त्याला पकडलं.

"ए!!!!आऊट झाला!!!"त्याच्यावर सगळे हसत म्हणाले. तो खोटं खोटं तोंड फुगवून बसला.
वैदेही त्याला चिडवण्यासाठी म्हणली,"ए चल रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसू नको होऊ लगेच. मान्य कर हरलास तू आणि आम्ही जिंकलो. आता तू आम्हाला पेप्सी ची पार्टी द्यायचीस ठरल्याप्रमाणे."मान ताट करत ती म्हणाली.

"मी कुठे असं म्हणालो होता? 🤔"खोटं खोटं विचार करत म्हणाला.
"एsss पलटी!!कसला पलटी खातोय 😮🫨"
"मी कुठे बोललो होतो 🥱🤔. जा जा तुमच्या कानाचा चेकअप करून घ्या. भैऱ्या व्हायच्या नाहीतर.🙂‍↕️"
"ए सिंगल पसली, तू गप बस.. आहे एकतर बुटक्या आणि वरतून सिंगल पसली एक फाईट मारली तर ढगात उडून जाशील."
"ए डबल बॅटरी, नो पॉवर 😁पाहिले सांग हे किती आहेत?"तिला हाताने चार बोटं वर करत तो मोजायला लावतो.
"चार आहेत "
"चल, दोन आहेत.. काय गा तू दिसायचं कमी झालं वाटतं,भिंगाचा चस्मा लागला कि काय 😮😮😂😂"दोन बोटं पटकन बंद केले आणि तिला जीभ काढून चिडवायला लागला.ती गाल फुगवून आर्य कढे बघू लागली.
"बघ,कशी बेडका सारखी फुगली लगेच... डराव डराव 🐸🐸😝" तिला जीभ दाखवत पळ काढत लांब जाऊ लागला. 
"बरं झालं पळालो😮‍💨पण पायाखालची जमीन कुठे गेली?" डोळे उघडून बघतो तर काय, त्याला एका हाताने वैदेहीने उचललं होतं. त्याने मागे वळून बघितलं.

वैदेहीचा चेहरा त्याला तोफाचा गोळा दिसत होता.. पेटलेला... काही अजून एक तो बोलला तर डायरेक्ट त्याच्यावर येऊन धडकेल आणि त्याला घायाळ करेल.
"होशियारssss...कुमार.आर्य सकपाळ, कुमारी वैदेही पाडेकर यांच्या विरुद्ध अपशब्द वापरल्याबद्धल यांना तोफेच्या तोंडी देण्यात येत आहे होsss"
निवाडा कोण करत असेल? वैदेही करत होती. राणी कोण असेल? वैदेहीच होती.. तोफ आणि त्यातला गोळा पण कोण असेल? अरे ती पण वैदेही!
माहिष्मती साम्राज्य सारखं तिचं साम्राज्य होतं..
"वैदेहीचा पोपट "साम्राज्य जिथे तिच्या विरुद्ध काही घडले कि मग खैर नाही.. तो त्या भासातून बाहेर आला.

"बोल बालक, कोई अंतिम इच्छा?"
"नही महाराणीसाब, हमरा प्राण बक्ष दो. आभारी हो जायेंगे 😭😭🙏"
"उसके बदलेमे हमे और हमारे सहेलीयों को क्या मिलेगा?"
" जो आप मागे वो 🙏😭"
"Hmm.."त्याला सोडलं, हिंदी सुटली "पाहिले मला मुजरा कर 🙂‍↕️.."त्याने केले 
"आता वैदेही इस ग्रेट पन्नास वेळा बोल, उठक-बैठक करत आणि शेवटी बोलल्या प्रमाणे पेप्सी ची पार्टी दे " त्याने तसे केले. सगळ्या मुली खुलून हसत होत्या.

हसता हसता वैदेहीचे लक्ष बाजूने येणाऱ्या आवाजाकडे गेले.तिथे एक तिच्याच वयाचा मुलगा, मोठ्या दीदींसोबत खेळत होता. त्यांचा लाडका होता तो. त्याची मस्ती करत होते, त्याला चिडवत होते,त्याचे लाड करत होते.

वैदेही ला काहीतरी आगळे वेगळे वाटले.. "हा शिव आहे ना?"तिने आर्य ला विचारले.
"हो शिव आहे तो.. ए मी त्याला भेटून आलो"आपले छोटे पाय घेऊन तो त्याला भेटायला गेला. आर्यची बहीण देखील तिथे होती.

"मला नाही आवडत ह्यो " ती पुन्हा आपल्या मैत्रिणीसोबत व्यस्त झाली.
This was her first impression about him. Ridiculous girl.
झालं! 'First impression' हे असं होतं त्याच्या बाबतीत.कल्पनेच्या बाहेर.

पण हिच्या आयुष्यात हे वालं 'first impression' मुळीच 'last impression' नव्हतं.. खरा खेळ आता ही जेव्हा आठवीत असते तेव्हा सुरु होईल...

"कोरोनाच्या patients चे प्रमाण भारतात देखील वाढत चालले आहे.... ह्या मुळे भारत सरकारने लॉकडाउन जाहीर केले आहे..
सर्व भारतीयांनी सतर्क राहावे, स्वतःची काळजी घ्यावी, गरज लागल्यासच बाहेर पडावे."सातवीच्या शेवट मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या वैदेहीने टीव्ही बंद केला.

"लॉकडाउन लागलं..!! म्हणजे परीक्षेला देखील सुट्टी 🎊" फेफड्याच्या शेवटच्या कनाचा श्वास तिने या किंचाळीत वापरला होता... भाऊ तिच्या ओरडण्याला डचकला होता.. त्याने तिला शांत राहायला सांगितले.. पण तिच्या अंगात मस्ती चे गांडूळ वळवळत होते ना, ती कसली शांत बसतेय.. ती त्याच्या कानाजवळ येऊन किंचाळू लागली...
त्याने एकाचं तिच्या पाठीत बुक्का घातला... ठसका लागल्याने ती जरा शांत झाली.

"बच गया बेटे -(ठसका लागत )-नाहीतर तूझ्या कानाचे पडदे फाडायला मी मागे पुढे बघणार नाही "😑🫵
"Hm, जा जा पाहिले तुझा फेफडा सांभाळ,नाहीतर खोकून खोकून बाहेर पडायचा.मग माझ्या कानाविषयी विचार करू.."

"You-"ती पुढे काही बोलण्याच्या आतच आईने तिच्या चेहऱ्यावर पुसनीचा कपडा फेकून मारला..

बिचारी चा मूड खराब झाला. एकतर तो कपडा पुसनीचा होता, दुसरा तोच कपडा चेहऱ्यावर मारला, म्हणजे किती सारे जंतू!!
"Mummy.. अगं हा कपडा का फेकला तोंडावर 😭.. मला कोरोना झाला तर 😭"

"नाटकी आहेस एक नंबरची.. चल जा ह्या कपड्याने टीव्ही आणि कॉम्पुटर पुसून घे..नाहीतरी रिकामटेकडी आहेस "
"ठीके 🫡"तिने कामे उरकली.. कोणाला माहित होते कि ह्या लॉकडाउन मध्ये वैदेहीच्या नव्या, कोऱ्या भावनांना बहर येणार आहे!

शिव च्या आधी तिला दोन मुलांवर क्रश आले होते. पण ते हळू हळू जाऊ लागले. एकाने तर त्या लोकांशी बोलनच बंद केलं होतं. त्यावेळेस तिला वाईट वाटले होते पण तिने स्वतःला सावरले.

लॉकडाउन चांगलाच लांबला.. पण तरी काही महिन्यांनी वैदेही, आर्य, सिद्धी हे तिघे आपल्या भावांसोबत बिल्डिंग च्या मागच्या passage मध्ये क्रिकेट खेळायचे. अख्खा भारत जिथे घरी बसलाय तिथे ही लोकं बाहेर खेळत होती. तसंही ते सगळे नियम पाळत होते, म्हणून काही काळजी नाही.

हळू हळू सोसायटी च्या backside वरून ते गार्डन मध्ये पून्हा खेळायला लागले.. तो पर्यंत जरा नियम उठले होते थोडेसे.वैदेही च्या आणखी दोन मैत्रिणी झाल्या यधण्या आणि पायल.. त्या तिच्या जिवलग मैत्रिणी झाल्या होत्या.. ते सगळे मिळून लगोरी खेळायचे..
त्यांला बघून सोसायटी मधले वैदेहीच्या वयाची मुले येऊ लागली.

सगळे खेळू लागले.
एके दिवशी खेळाताना..
"लगोरी फुटली " वैदेही ची टीम पळाली... आता आर्य च्या टीम ला आऊट करायचे होते.
त्याने बॉल ने आऊट करायला सुरवात केली.मारताना नेम चुकला म्हणून बॉल लांब गेला. वैदेही पटकन पळत आली. लगोरी लावायला घेतली.

वैदेहीचा खेळ असं होता कि ती लगोरी लावताना आऊट झाली तरी चालेल पण जेवढ्या जास्त होईल तेवढ्या चिप्प्या ती लावून टाकायची. आणि तेच झालं.. ती आऊट झाली पण तिने जवळ जवळ सगळ्या चिप्प्या लावल्या.

ती तिच्या टीम ला cheer करत होती.
"ए जरा लावायचा प्रयत्न करा.. पळू नका सारखे". तिची नजर हळूच तिच्या डाव्या बाजूला वळली. तिचे डोळे तिथे खिळले.कोमल नजरेने तिकडे बघत होती... शिव होता तो. आर्य शी काहीतरी बोलत होता.
"बऱ्याच वर्षांनी खाली आला " स्वतःशीच पुटपुटली. आर्य ने तिझ्याकडे वळून पाहिले. शिव ची देखील नजर तिच्यावर गेली. त्याने तिच्याकडे बघून smile केले. तिने देखील त्याला smile दिली.
"अगं शिव आपल्यासोबत खेळायचे म्हणत होता."
"हो चालेल कि, नक्की खेळू शकतो "
ही प्रेमाची सुरवात होती.. हे वैदेही ला कळले नाही.. पण हळूच ते प्रेम नवे बहर घेणार होते.
ही होती त्या प्रेम अध्यायाची सुरवात.

कधी कधी सुरवात या अगदी सोप्या असतात.गरज नाही कि ओढणी उडावी आणि त्याच्या चेहऱ्यावर पडावी.. किंवा तिची ओढणी त्याच्या घड्याळात अडकावी..

पुढे काय होईल ह्यासाठी नक्की वाचा