"Bestfriend"चे वजन एवढे हलके असते का?? कि कधी ते नातेच फुलले नव्हते??"
या एका प्रश्नाने वैदेहीच्या हृदयात अनामिक भीती जागृत झाली..
"माझा फक्त वापर करण्यात आलाय का?ज्या वयक्तीवर मनापासून विश्वास ठेवला तिच व्यक्ती माझा वापर तर करत नाही आहे ना.."डोळ्याशी अश्रू तरळले."सगळे माझा वापरच का करतात?? मी एवढी मूर्ख आहे का कि कोणाच्याही जाळ्यात लगेच अडकते."तिचा आवाज कातरला.मोबाईल वर शिवचा मेसेज आला..
"सिद्धिशी बोलत होतास का?"भलेही तो मेसेज होता पण तिच्या मनाने मात्र कोरडा प्रश्न विचारला होता.
"हो. तिच्याशी बोलत होतो. तुला कसं कळलं?"त्याने गमतीत विचारलं.
"जेव्हा चॅट ला फुल इग्नोर करून गायब झालास ना, तेव्हाच कळलं 🙂" स्वतःची वेदना सांगण्याचा प्रयत्न तिने केला.
"ओह अच्छा, मला वाटलं magic ने ओळखलस कि काय 😂"तो हसू लागला. वैदेही मात्र इथे भावनाहीन डोळ्यांनी चॅट कढे बघत होती. हलकेसे वेदनात्मक स्मित तिच्या ओठांवर उमटले.तिने तो मेसेज सीन वर सोडून मोबाईल बाजूला ठेवला.खिडकीतून आकाशाकडे बघत होती.आकाशात काळे ढग दाटून आले होते. त्याचा काळोख मात्र तिच्या मनात पडत होता.
घरी आई बाबा दोघे होते, म्हणून रडून चालणार मुळीच नव्हते. तिने आपले विचार झटकले. आणि आई बाबांपाशी निघून गेली.तिच्या मनात मात्र एक विचार होता,
"एके दिवशी तो नक्की माझ्यावर प्रेम करेल "हे किती खरे असावे भविष्यायत कळेल.तिने डोळे बंद केले. शिव आणि सिद्धी या दोघांची आकृती सोबत रेखाटायचा प्रयत्न तिने केला.. तेव्हा तिचे मन तिला सांगून गेले." होणार नाही" तिला हे काही उमगले नाही.
तिने तेव्हाच निश्चित केले होते. आपल्या अभ्यासाआड काही येऊ द्यायचे नाही, पहिले कर्तव्य हे!दहावी चांगल्या टक्क्यांनी पास करून वैदेहीने दादर इथं रुपारेल कॉलेजात ऍडमिशन घेतले.१० विच्या वर्षात देखील मात्र ते प्रेम संपले नव्हते. ती तरीदेखील चातक पक्ष्यासारखी वाट बघत राहायची. तिचे गे गुपित कोणाला माहित नव्हते.
वैदेहीचा आता स्वतःचा फोन आला होता. एके दिवशी स्वतः शिव तिला मेसेज करतो.
"हेय, कशी आहेस?"
"मी बरी आहे. तू काय म्हणतोस?"
"मी पण मस्त.
मला एक गोष्ट सांगायची होती तुला..."हे वाचताच तिच्या मनातील धडधड वाढली..
"हा मला प्रोपोस करतोय का? खरंच हा माझ्या प्रेमात पडतोय का?? माझ्या प्रेमी मनाला आनंद होतोय, पण अंतर मन मात्र घाबरतय.. ते नको नको म्हणतंय, असं का?"मनातच तिने प्रश्न केला.स्वतःला स्थिर करत तिने टाईप करायला सुरवात केली.
"बोल "
"U know राठोड काकांची वेदिका... ती मला आवडू लागली आहे "हे वाचताच प्रेमी मनाला पुनः दुःख झाला पण अंतर मन मात्र खुश होतं.. तिच्या मनाचे खेळ तिला स्वतःलाच कळत नव्हते. असे तिचे मन का वागते आहे.
तिने चटकन रिप्लाय केला."ओह.. हे कधी झालं?"
"जेव्हा पासून ती आपल्यासोबत खेळायला येऊ लागली ना.. तेव्हा पासून माहित नाही पण मी नकळत तिच्याकडे आकर्षित व्हायचो."
"पण तुला सिद्धी आवडत होती ना? त्याचं काय झालं?"
"Oh हे तुला माहितीए?"
"Well, समोरासमोर सगळे दृश्य दिसत होते.. वागणं कळत होते, का कोणाला कळणार नाही"हलकेच स्मित तिच्या चेहऱ्यावर उमटले. थोडीशी वेदना जाणवली.
"Oh अच्छा, बाय द वे तो फक्त एक timepass होता... दोघांसाठी "हे वाचून ती थक्क झाली.
"What do you mean? "
"हो खरंच.. तिला पण timepass साठी मुलगा हवा होता.. मला तर फक्त आकर्षण होतं. तिला चॅट वर प्रोपोस केलं, ती हो म्हणाली, एक दोन महिने आमचे चालले, नंतर मीच ब्रेकअप केलं.तरी तिला विचारलं 'did i hurt you?'ती म्हणाली नाही, मी तर तसंही सिरीयस नव्हते, timepass साठी आले होते रिलशनमध्ये.. मला माहित होतं कि आपलं काही होणार नाही "हे वाचून जो धक्का वैदेहीला बसला तो काही खरं नव्हता.
तिला चटकन आठवून गेले. काही महिन्यांपूर्वी तीच्या मनाने स्वतः तिला सांगितले होते "होणार नाही "करून. तिला आता उमजले हे या साठीच होते..
जी गोष्ट नंतर घडणार होती ती गोष्ट तिच्या मनाने अगोदरच तिला बजावून सांगितले होते.
तिने रिप्लाय केला,"well i already knew about it "शिवचे डोळे चमकले.त्याने वैदेहीच्या अंतरमनात झाकण्याचा प्रयत्न केला.. ती खोटं बोलत नव्हती हे त्याला दिसले...
पुढे काय होईल या साठी वाचत राहा ✨