"वैदेही, एवढी साधी राहू नकोस!कोणाला तुझा फायदा घेऊन देऊ नकोस"खोल आवाजात तो मनातच बोलला
"Hmm.."तिने रिप्लाय केलं. तिला तेव्हा हे वाक्य का..,असे उमगले नव्हते.
"मला जेवायला बोलावलंय, मी जाते "असं बोलून ती जेवायला निघून गेली. शिव मात्र इथे विचारात होता.
"खूपच भोळा स्वभाव आहे हिचा.. निर्मळ आहे खूप.मला फील होतय हे आतून.ह्या जगाला इतकं निर्मळ मन अजिबात deserve नाही करत..पण --असो, मी तिला तयार करेलच;आणि ह्या निर्मळ मनाला सांभाळणारा देखील आहेच तिच्या आयुष्यात." मंद हसत तो आपल्या कामात व्यस्त झाला.
आता ह्या लोकांनी सकाळी वॉल्क ला जायचे ठरवले होते. सगळ्या कोण? तर फक्त वैदेही, पायल, यधण्या आणि कधी कधी असली तर दिशा आणि सिद्धी.
सगळे दररोज सकाळी ६. ३० ला जायचे, आणि त्यांची एक खास मस्तीची आठवण होती..सकाळी वॉल्क वरून आल्या नंतर असच ती लोकं दुकानात जायची आणि चिप्स, कुरकुरे चे पॅकेट घेऊन गार्डन मध्ये खात बसायच्या (ब्रश करून यायचे ते ).तसंही लोकडाउन मध्ये कोण लवकर उठायचं नाही, ह्यांला कोण बघणारं पण नव्हतं..
"किती मस्त आयडिया आहे ना!सकाळ सकाळी चिप्स खाण्यात वेगळीच मज्जा आहे."घश्यात एकदम पाच सहा चिप कोंबत वैदेही म्हणाली. त्या मुळे तिला ठसका लागला.
"ए भाय, हळू हळू. कोणी घेऊन नाही चाललंय तुझे चिप्स. बकासुर सारखी खाऊ नकोस."तिची पाठ थोपाटत यधण्या म्हणाली.
"अरे तिने जर खाल्ला नाही तर मग दुसरा बकासुर येऊन तिच्यापुढे लाळ गाळत बसायचा "पायल ने याधण्याकडे बघितले. याधण्याला भनक लागली ती तिच्याबद्दल बोलत आहे. तिने लगेच पायल कडे नजर फिरवली, पण पायल ने पटकन नजर वैदेहीकडे फिरवली आणि म्हणाली "हो कि नाही वैदेही?"
"हो -(खोकत )-मग काय "
"यार तुम्हा लोकांना नेहमी मीच का दिसते 😭😭."
"अरे पण तुला थोडी बोललो गं आम्ही. बघ वैदेही हिनेच स्वतःला तो बकासुर घोषित केला. आता आपली काय चूक...,नाही का? "गालातल्या गालात हसत पायल म्हणाली.वैदेही पण हसत होती. नंतर यधण्या पण स्वतःवर हसू लागली. त्यांचे खाऊन उरकले. तेवढ्यात वैदेहीच्या घरातून बोलावणं आलं.
"बघा.. मातोश्रींच खास बोलावणं आहे. मी येते. बाय द वे मी उद्यापासून सायकलिंग करायचा विचार करतेय. जॉईन कराल?"
"चालेल ना!पण उद्या जमेल कि नाही माहित नाही.. पण नंतर जॉईन करेल "वैदेही 👍 दाखवत निघून गेली.
सायकलिंग ला तिने सुरु केले.शिवच्या घरासमोरून ती जात होती. खरंतर तिची ती सवय झाली होती, शिवच्या घराच्या खिडकीत बघून जाणं. ती अपेक्षा करत होती कि शिव दिसेल, पण मन मात्र सांगत होतं कि एवढं लवकर तो कश्याला उठेल.ती थोड्याश्या नैराश्याने निघाली, पण!!!
"वैदेहीssss!"तिने लगेच मागे वळून बघितले.
"थांब मी पण येतोय "हे ऐकताच तिचे कान तृप्त झाले.. आनंद गगनात मावत नवता..
"आज काय नशीब आहे माझं 🥰🎊मज्जा!!"
थोड्या वेळात शिव आपल्या सायकल सोबत आला.
"Yoo!!✌️🫡" त्याने हँडशेक साठी हात पुढे केला. तिने देखील लाजत तो स्वीकारला.
"जाऊया?"कोमल स्वरात ती म्हणाली.
"हो 😉"त्याने डोळा मारल्यावर पोटात असंख्य फुलपाखरं उडू लागली.. दोघे निघाले.
पहिले शांतता होती. काय बोलावे सुचेना. ही पहिली वेळ होती जेव्हा ते दोघं एकत्र होते आणि एकटे होते.
शेवटी शिव बोलला.
"तुला माहित आहे, तू पुढे जेव्हा केव्हा two व्हिलर चालवशील तेव्हा खूप सांभाळून चालवशील."
"....???, कसं?"भुवयी आक्रसत ती म्हणाली..
"कारण तू सायकलिंग खूप हळू करतेस. घाई नसते कसली. ह्यावरून कळते कि तू सावधगिरी बाळगून चालवशील "
"असेल, माहित नाही "
"चल एक काम करू फास्ट सायकलिंग कोण करतं बघू "त्याने त्याच्या सायकल ची स्पीड वाढवली. तो पुढे गेला. वैदेही मंद हसली. तिनेही स्पीड वाढवली, पण जास्त नाही ठेवली.
ती शिवपेक्षा ३-४ metre लांब होती. अखेरीस शिवने सायकल स्लोव केली. वैदेहीच्या बरोबरीला तो आला.
"बघितलं, या मुळे मी म्हणलो होतो. कि तू सावधान असशील गाडी चालवताना. तुला घाई नाही आहे इतर लोकांसारखी.हेच आवडतं मला तुझ्यात." त्याने एक smile दिली.
हे ऐकताच वैदेहीचे मन उतू जाणाऱ्या प्रेमाने न्हाऊ लागले. तिने त्याच्या डोळ्यात पाहिले.
मग एक गोड smile त्याला दिली.
तिच्या डोळ्यात एक वेगळंच तेज शिव ला दिसले. तो समाधानी हसला.
नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा ते मारत होते.. वैदेही सगळं लक्ष देऊन ऐकत होती.
त्याच्याकडे प्रेमाने बघत होती.त्याची सगळी बडबड तिच्या कानाला तृप्त करत होती.
असं वाटतं होतं कि हा काळ कधीच संपू नये.. असेच आम्ही दोघे एका मेकांसोबत वेळ घालवू.
फक्त तो आणि मी..
पण जायची वेळ आली. दोघे सोसायटी मध्ये येऊन थांबले.
"उद्या येशील मग?"
"हो येईन ना. नक्की येईन. चल मी येतो "असं बोलून तो निघून गेला.
घालवलेला वेळ आठवत ती लाजू लागली. शेवटी ती देखील आपल्या वाटेला निघून गेली..
पुढे काय होईल या साठी वाचत राहा
आवडली तर नक्की रेट करा आणि follow करा.. प्रतिक्रिया नक्की द्या.
मी सतत आपल्या लेखनात प्रगती करायचा प्रयत्न करेल.