"हो चालेल कि, नक्की खेळू शकतो ☺️"
ती लोकं खेळू लागली. शिव ला वैदेही ने तिच्या टीम मध्ये घेतले. त्या दरम्यान त्यांचे छान जमू लागले.
"छान खेळतेस गं तू "
"थँक्स 🙂↕️"पहिल्यांदा ते एका-मेकाशी बोलले होते. वैदेही उत्साहित झाली होती. सुरवातीला तिला वाटायचं कि का बोलू मी ह्याच्याशी, मी नाही बोलणार.
पण आता जेव्हा प्रत्यक्षात त्यांच बोलणं झालं तेव्हा तिला ते बोलणं हवंहवं सं वाटत होता.
काही सुरवाती अनपेक्षित पेक्षा देखील अनपेक्षित असतात.असेच ते लोकं खेळू लागले.
या अगोदर तिला एका मुलावर क्रश होता. पण तो ही सोसायटी सोडून गेला होता. जे काही थोडंफार बोलणं व्हायचं ते देखील आता बंद झालं होतं.
असच एक दिवशी खेळताना..
या वेळेस शिव आणि वैदेही दोघेही वेगळ्या टीम मध्ये होते.खेळता खेळता चेंडू हा लगोरी ला लागून हवेत उडाला,शिव त्या चेंडूला पकडायला गेला, तेवढ्यात त्याची धडक एका मुलीला बसली (सृष्टी नाव होते तिचे )आणि दोघेही खाली पडले. ते बरं कि एकमेकांवर पडले नव्हते.
सगळे हसू लागले त्यांच्यावर पण वैदेही ला मात्र आवडलं नव्हतं..पण तिची ही jealousy लपवण्यासाठी ती "माझ्या आणि त्याच्यासोबत (क्रश )व्हायला हवं होतं "नाक मुरडत तिने दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला..
हीच पहिली ठिणगी पडली होती प्रेमात.हळू हळू तिला कळले होते कि तिला शिव आवडायला लागला आहे.
जेव्हा केव्हा तिचा विचार यायचा तेव्हा तेव्हा ती लाजायची.
त्यांच्यात काही छोटे मोमेन्ट्स देखील घडले होते.
लगोरी खेळताना एके दिवशी एकाचं टीम मध्ये ते होते. लगोरी फुटली. त्यांची टीम पळू लागली.
पळताना वैदेही मुद्दाम शिवच्या मागे मागे जायची.
तर चेंडू वैदेही ला मारण्याचा बेत आखला, कारण ती मुख्य प्यादा होती या खेळात.
चेंडू कुठे लांब गेला कि हे अस्सं चिप्पीचा ढिगारा उचलून कधी लावून टाकायची कळायचंच नाही.
आर्य ने तिला नेमून धरलं. तिच्या दिशेने जोरात तो चेंडू फेकला. वैदेहीने लगेच तो चेंडू हुकला.
खरंतर थोडासा पाय घसरला, ती पडायच्या आताच शिवने तिला खांद्यावरून पकडले.
मुळीच तिचे डोळे विस्फारले. पहिला स्पर्श होता तो प्रियकरासोबत!ती आतूनच लाजत होती.तिने हळूच शिव कडे पाहिले..त्याने देखील तिच्याकडे पाहिले. दोघांचे नयन एकमेकांला भिडले.
वैदेहीला त्या डोळ्यात काहीतरी हवंहवंसं दिसलं. ती हरवलीच होती पूर्ण, पण शिवने तिला हाक मारली "वैदेही!!"
"हं -ह -हो, सॉरी "ती मागे हटली.
"कुठे हरवतेस गं?"तो हसत विचारत होता.समोरून आलेला चेंडू त्याने हुकला.
"तुझ्या-"
"काय!?"
"बघत होते काय आहे तुझ्यात कि कसं तू लक्ष वेधून घेतोस लोकांच, काही दिसलं नाही तसं एवढ्या जवळून देखील "
"What do you mean, i m handsome, talented😎that's enough🙂↕️"
"डोमल्याचा handsome🙄"डोळे फिरवत ती म्हणाली.
"Handsome नसतो तर उगाच का बघत बसली असती तू माझ्याकडे "तिला त्याने बरोबर तावडीत पकडले.चेहरा लपवण्यासाठी ती वळली..ती लगेच तिथून पळाली.जाता जाता मात्र म्हणाली,"भ्रमात जगू नकोस...i would never like you" आणि तशीच पटकन लगोरी लावायला गेली
"🤷♂️, काळ ठरवेल तसं आपण चालणार. बघू काय होते पुढे "स्वतःशीच तो पुटपुटला.
वैदेही घरी गेली. आत बेडरूम मध्ये जाऊन बिन आवाजाचे किंचाळत."हे काय चालू होतं माझं?? मी का वेड्यासारखी त्याच्याकडे बघत होती!??. वैदेही, वैदेही थाऱ्यावर ये "स्वतःचच डोकं एका रॉक गिटारिस्ट सारखं जोर जोरात वर खाली करत स्वतःला भानावर आणत होती..
ती सगळं आठवत होती.
कसं त्याने तिला धरलं.कसे त्यांचे डोळे भिडले.
त्याच्या डोळ्यातील तेज, त्याचे लाल रसरशीत ओठ,टोकदार नाक, सुबक शिल्पाकृतीच जणू!
तिचे डोळे ते आठवून चमकत होते..
पुढे त्यात आणखी बुडण्याच्या आत, मागून आईचा जोरात धपाटा पाठीवर पडला.
तिने ते प्रोसेस करायला दहा सेकंड घेतले,आणि मग तिच्या मेंदूला सिग्नल पोहोचला, कि हा मला धपाटा घातलाय.. लागलं देखील आहे, पण मी अजून ओरडली कशी नाही!? ओरडायचा सिग्नल delay झाला वाटतं. मग काय ती गतिशील वेगेपूरकर (महाराष्ट्राची हास्यजत्रा चाहत्यांना माहित असेल, नसेल तरी जाऊन बघा म्हणजे कळेल,तुमचंही मनोरंजन 🫰)सारखी ओरडली..
पूर्ण ओरडायच्या आताच आईने थोबाडात बटाटा भज्जी कोंबली.. ती ठसकू लागली.
"खाऊन सांग कसं आहे?"
"Mmhhh"भज्जी खात ती विचार करतेय असे एक्स्प्रेशन देत होती.असा विचार करत होती कि जशी ती masterchef आहे.
"Hm. छान झालंय पण एक कमी आहे."
"काय?"
"थोडंसं प्रेम, प्रेमाने भरवायचं ना 🙂↕️अजून छान लागली असती --aaahhh, मम्मी 😭"तिच्या पाठीत अजून एक धपाटा पडला. मागून तिचे बाबा हसत आले..
"अगं ती ब्रुसलीची बहीण चुसली आहे. तिला प्रेमाने भरवायला काही सांगू नकोस. तिने प्रेमाने भरवलं तर कहर होईल 😂"तिची आई त्यावर हसू लागली.. सगळे हसत होते.
"जा आवरून घे जेवायला बसुयात "
वैदेहीला आवरण्यासाठी त्यांनी रूम मोकळे केले.
तिला पुन्हा शिवचा विचार आला. ती हळूच हसली.पण तिला तेवढ्यात विचार येऊन गेला
"मला काय होतय. हेच तर...-"
पुढे काय होईल ह्यासाठी नक्की वाचत राहा ✌️.
आवडली तर नक्की rate करा.. ज्याने आपण आणखी वाचकांपर्यंत पोहोचू शकतो ✌️