"प्रेम हेच असतं का? कि काही वेगळं दडलं आहे या एका शब्दामागे.. जे मला अजून उमजलं नाही आहे?" असंख्य प्रश्न मनाशी कल्लोळ माजवत होते. जेवण्यासाठी पुन्हा बोलावणी आली म्हणून ती निघून गेली.
हळू हळू वैदेही आणि शिव चं भेटणं कमी व्हायला लागलं होतं.. तो फक्त कधीतरी खेळायला यायचा. शिव आणि सिद्धी मधील जवळीक वाढली होती हे तिला स्पष्ट दिसून येत होतं..त्याचा तिला हळू हळू हेवा वाटायला लागला होता.सिद्धीचा नाही तर त्या जवळीकचा. कारण त्या जवळीक मुळे शिव सतत सिद्धी मागे फिरत असे, सगळीकडे त्याला त्याच्या आजूबाजूला सिद्धी हवी असे.वैदेहीपासून लांब होतं चालला होता. तिच्याशी खूप निवडकच बोलायचा.चॅट वर देखील वैदेही मेसेज करेल तेव्हाच तो बोलायचा, इतर वेळेस अजिबात बघायचा नाही..
एके दिवशी चोर पोलीस चा डाव रंगला होता. शिव आणि आर्य दोघं टीम पाडत होते. वैदेहीला माहित होते कि शिव पहिले सिद्धिला घेणार जर तो 'स्टोन, पेपर, सीझर 'जिंकला तर.. पण यावेळेस आर्य जिंकला. वैदेही त्याच्या मागेच होती. पहिले त्या लोकांनी मुलांला आपल्या टीम मध्ये घेतले. मग बारी आली मुलींची...
आता टीम मध्ये जाण्यासाठी मुली बोलत होत्या घ्या मला.. वैदेही आर्यला ओरडून सांगू लागली "सिद्धीला घे!!"हे सतत त्याला सांगू लागली..
शिवची या मुळे घुसमट झाली.. आणि तो रागात बाजूला झाला आणि म्हणला" मी नाही पाडणार टीम!"..
त्याच्या त्या वागण्याला बघून वैदेही तिथेच स्तब्ध उभी राहिली..तिला ते वागणं पाहून मनाला लागलं होतं.
"हा असा का वागत आहे??? सिद्धी नसली त्याच्यासोबत तर तो काहीच करणार नाही??त्याला सिद्धी तर आवडत नाही ना??? छे sss, असं नसू शकतं ना.. असं का होईल... माझ्या मनाचा खेळ असेल "खांदे झटकट ती म्हणाली. पण होणाऱ्या गोष्टीला कोण अडवू शकतं..
काही दिवसांनी तिला तिच्या 'आर्या'नावाच्या मैत्रिणीकडून कळले कि सिद्धी आणि शिव रिलशनशिप मध्ये दिसतायेत.वैदेही हे टाळू पाहत होती.
"असतं तर मग सिद्धीने आपल्याला सांगितलं नसतं का 😅, छे sss असं काही नाही. मी नाही मनात हे "असे स्वतःला ती खोटे सांत्वन देत होती.
एके दिवशी वैदेही ने शिव ला मेसेज केला. ते दोघं normally बोलत होते, गप्पा मारत होते.. पण अचानक शिव तिच्या चॅट चा रिप्लाय करत नवता.. ती त्याला सतत मेसेज वर मेसेज टाकत होती. पण त्याने ते अजिबात सीन केले नव्हते. तिने विचार केला. आपण सिद्धीला मेसेज करून बघू.जर ती ऑनलाईन असेल आणि आपल्याला मेसेज करत असेल तर शिव नक्कीच सिद्धी शी बोलतोय.
ठरल्याप्रमाणे तिने केले. सिद्धीचा रिप्लाय तिला आला.. तरी देखील तिला पुष्टी करायची होती. न राहवून तिने सिद्धीला मेसेज केला,
"अगं शिव तुझ्याशी बोलत आहे का?"
"हो.. मागापासून बोलतोय "हे ऐकताच छाताडात भाला घुसल्यासारखं तिला वाटलं.. हळूच तिचे डोळे देखील भरून आले.तिच्या चॅट ला पूर्णपणे इग्नोर केले जात आहे.
शिव असं उगाच करणार नाही, पुरुष ओव्हरपोस्सेसिव तेव्हाच होतो जेव्हा त्याला एखादी स्त्री आवडत असते.. सतत त्या स्त्रीच्या जवळ असणे तेव्हाच वाटतं असते जेव्हा त्याला ती स्त्री आवडत असते.. जे तिने काही दिवसांपूर्वीच अनुभवले.
तिला हळू हळू उमगू लागले होते कि शिव आणि सिद्धिमध्ये रिलेशनशिप मध्ये आहेत.हेवा वाटू लागला होता.सिद्धीचा तो मुळीच नवता, ना त्यांच्यातल्या नात्याचा...
पण एवढे दिवस ती त्याला तिचे प्रेम व्यक्त करून दाखवत आहे तिच्या कृत्यातून, त्याची काळजी घेत आहे... प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द अबोल होते पण कृत्य तर नव्हते!
तिला प्रश्न पडू लागले "मी एवढं त्याच्यासाठी केलं,आणि त्या बदल्यात मला हे मिळावं का??? मी प्रेमाची पण अपेक्षा नाही करत.. पण 'bestfriend'या शब्दाला त्याने परिपूर्ण नको का ठरायला???"त्या डोळ्यातून अश्रू शेवटी बाहेर आलेच..
प्रेमाची अपेक्षा तिने कधीच केली नव्हती. पण मात्र त्यांच्यातल्या मैत्रीला तरी त्याने जपावं नाही का?? ती इथून त्याच्या मैत्रीसाठी एवढे efforts देतेय तर त्याने देखील द्यायला नको का??
"बेस्टफ्रेंड "चे वजन एवढे हलके असते का???
कि कधी ते बेस्टफ्रेंड सारखे नाते नव्हतेच???
तुम्हाला काय वाटतं, नक्की सांगा..
आपण माझी कथा आवडीने वाचत आहात याचा मला खूप आनंद होतोय. खूप खूप आभार 🙏✨
अँप glitch मुळे मला कोणाच्या रेटिंग वर रिप्लाय करता येत नाही आणि सर्वे reviews मला दिसत देखील नाही.
पण मी इथेच आभार व्यक्त करते 🙏🥰 खूप खूप ऋणी आहे मी तुम्हा सर्वांची ✨