नाते जन्मापलिकडचे - भाग 14 lekhani द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नाते जन्मापलिकडचे - भाग 14

"वैदेहीकडून ही गोष्ट काढून घेतली पाहिजे..  सध्या जमणार नाही पण लवकरच मी तिला विचारेल."शिव विचारत हरवला."पण मी काढू कसं?"पण क्षणातच मिश्किल हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटले.

"अपने पास सारे प्रश्नो का उत्तर होता है. Hehehe".आपल्या कामात तो व्यस्त झाला.
भूतकाळ समाप्त.

पण त्या गुपितासोबत त्याला तिच्या मनातील त्या गोष्टीचं ओझं देखील जाणवलं."काळजी नको करुस वैदेही 😊तुझं ओझं मी हलकं करेल."


पुन्हा वर्तमानात........
"कसं सांगू यार... 😩कळत नाहीये 😭"अत्यंत त्रासलेल्या स्वरात वैदेही म्हणते.
" होईल ते होईल, या एका गुपितामुळे मला आमचं नातं बिघडलेलं नकोय "काळजीपूर्वक ती म्हणते.

अखेर तो दिवस उजाडतो.
"मी तुला सांगतेय.. Type करायला वेळ लागेल म्हणून थोडी वाट बघ कारण बरंच काही सांगायचं आहे "
"👍"ती सुरु करते.
"हे बघ शिव, खरंतर माझ्या हातात काहीच नव्हतं.. सगळं अचानक झालं. मला स्वतःला अपेक्षा नव्हती कि हे होईल.. तू जेव्हा पासून खेळायला यायला लागलास तेव्हापासून कदाचित तूझ्या बाबतीत माझ्या मनाची तार छेडली गेली असावी.
हे कदाचित खरं असावं कि जो माणूस एखाद्या गोष्टीला दूर लोटण्याचा जितका प्रयत्न करतो तितकी ती गोष्ट जवळ येत जाते, किंवा एखाद्या गोष्टीवर आपण जर विश्वास ठेवत नसू किंवा या या गोष्टीत मला अजिबात पडायचं नाहीये असा आपण विचार करू लागतो तेव्हा नियती असा डावपेच खेळते कि नकळत आपण त्या गोष्टीत पडून जातो. तसंच माझं झालंय.. ज्या गोष्टीला मी 'फालतू, टाईमपास... वेळ वाया घालवणारा'असे मी समजत होते त्याचं पूर्ण चित्र आज बदललं आहे, जणू त्या गोष्टीने माझ्या मनात एक नवीन सकारात्मक जन्म घेतला आहे..
सख्या हे सांगताना खरंतर मनाची धास्ती होतेय... पोटात गोळा येतोय..पण सांगावं लागेल,
सख्या... माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे..
मला भीती वाटतं होती कि तू या मुळे दुरावणार तर नाहीस ना? माझ्या मनाला ते सहन झालं नसतं. म्हणून मी सांगितलं नाही " सुस्कारा सोडत तिने तो मेसेज सेंड केला.

मनाशी धास्ती अजून होती.. हात थरथरत होते. काही क्षण मोबाईल तिने बाजूला ठेवला.तिचे डोळे तिने मिटले. समोर शिवची आकृती स्पष्ट तिच्या समोर दिसत होती.. पण तो तिला पाठमोरा होता.

मनाशी विचार थैमान घालत होते.
"खरंच तो दुरावणार तर नाही ना?जेवढं बळ मी एकजूट करून माझ्या मनातील भावना त्याला सांगितल्या तेवढं बळ 'विरह झाला तर' पुन्हा एकजूट होईल? तेवढी ताकद उरेल का माझ्यात?कि फक्त दुःखातचं माझं जीवन मी काढेल?"

इथे शिवने जे त्याला हवं ते काढून घेतलं. हलकसं स्मित त्याच्या ओठांवर होतं. त्याने तिला मेसेज केला.
"Ohhh.. चांगले केलेस कि तू हे माझ्याकडे व्यक्त केलं.तुला काय वाटलं कि मी या गोष्टीमुळे स्वतःला तुझ्यापासून लांब करेल.. या एका गोष्टीमुळे? वेडी आहेस तू खरंच.
या भावना आपण कधीच रोखू नाही शकत. शेवटी ते त्या दोन्ही व्यक्तींच्या हातात नसते. आणि हा तर जगण्याचा एक भाग आहे ना?
शेवटी माणूस त्याच्यातूनच शिकतो आणि सवरतो.
तो माणूस वेडा असेल-- नाही तो वेडा नाही जगातील महामूर्ख माणूस असेल जो फक्त या एका गोष्टीमुळे मैत्री तोडेल.
काळजी नको करुस 😉मी त्यातला नाहीये. आपलं नातं आहे तसंच राहील 😊"

हाच आधार वैदेहीला हवा होता. तिचे मन भरून आले होते. इतका समजूतदारपणा या वयात असणं खूप कठीण आहे. तो मेसेज मनाशी घट्ट तिने धरला..
प्रेम नाही, पण कैक मोलाची मैत्री तिथे जपली गेली होती ह्याचा तिला आनंद होता.

शिवने तिला मेसेज केला.
"अगं तो मोबाईल बघ तरी.. एवढा उराशी घट्ट धरून त्याचा श्वास गुदमरणार नाही का 😄"वैदेही ते वाचून हलकीच हसली. तिला मनाशी प्रश्न आला, त्याला कसं कळलं कि मी मोबाईल उराशी धरून ठेवलय. पण तो विचार तिने लगेच झटकला.

"तुला काय वाटतं.. मला माहित नसेल कि तूझ्या मनात माझ्याविषयी काहीतरी आहे? खरंतर ते मला तूझ्या तोंडून ऐकायचं होतं आणि तुझं मनावरचं ओझं हलकं करायचं होतं. म्हणून मग मी हा असा डाव तुझ्यासोबत खेळला."
"बरं आहे बाबा.."
"तुला एक सांगतो. माझी ही खरंतर ताकद आहे.. मला जे हवं असेल ते मी कसही करून इतरांकडून काढून घेऊ शकतो ते देखील जास्त कष्ट न घेता.आता बघ कसं तुला फक्त एक वाक्य बोलून मी तूझ्या मनातलं काढलं. अगोदर तुला सरळ विचारायचा प्रयत्न देखील केला.. कि तूझ्या मनात काही असेल तर सांग मला.. पण तू काही सांगत नव्हतीस.म्हणून मग हे मला करावं लागलं तुला बोलतं करायला "

"बरं आहे बाबा.. पाहिजे ते काढून घेऊ शकतोस "
"हो मग 🙂‍↕️जलवा है हमरा.बरं अगं मला आणखी एक गोष्ट तिच्याविषयी सांगायची होती...मी ते नुकतच तिच्या बाबतीत अनुवभवलं "
"बोल...."

पुढे काय होईल या साठी वाचत राहा ✨