अबोला मनातले सारे काही - भाग 11 Amol Meshram द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अबोला मनातले सारे काही - भाग 11

पण हे सत्य नव्हतं वहिनीला अमोल ला आणि श्रीकांत आधीपासूनच माहित होतं की त्यांचं प्रेम प्रकार गेल्या तीन वर्षापासून सुरू होतं मात्र गावकऱ्यांना आणि बाहेरच्या लोकांना असं वाटत होतं की वहिनीने आणि अमलनेच या दोघांना बिघडवला आहे वहिनी बिचारी अतिशय साधी भोळी असल्यामुळे त्या बाईच्या बोलण्यावरती काहीच बोलू शकली नाही शांतपणे सगळं ऐकून घेत राहील 

नंतर पंधरा दिवसांनी सचिन श्रीकांत आणि अमोल बाहेरगावाहून कामावरून परत आल्यावर वहिनीने घडलेला सारा प्रकार अमोलला सांगितला त्यावर अमोल मनाला जाऊ दे ग काय करायचं आहे लोक काहीही बडबड तं असतात आपण आपल्या कामाशी काम ठेवायचं 

काही दिवसांनी सायली परत गावाकडे आली तेव्हा ती प्रेग्नेंट होती आणि तिने गावच्या अंगणवाडीमध्ये नोंदणी केली हळूहळू तिला चौथा पाचवा महिना चालू झाला यानंतर सायली पुन्हा सचिनच्या संपर्कात आली 

तिचा पाचवा महिना चालू असताना एक दिवस सायली वहिनीच्या घरी आली 

वहिनीच्या घरी येताना सचिनला दिसली ते पाहून सचिनच्या मनात विचार आला की जर आपण वहिनीकडे सिम कार्ड दिले तर ती नक्कीच सायलीला देऊ शकेल कारण आधीपासूनच वहिनी त्यांची मदत करत होती आणि आताही तीच मदत करू शकेल असा विचार करून सचिनने घराबाहेर विहिरीकडे बसल्यास वहिनीकडे सिम कार्ड दिले आणि सांगितले वहिनी हे सिमकर्ड सायलीला द्या जेव्हा ती तुमच्या घरी येईल तेव्हा वहिनीने हो म्हटले आणि जशी सायली वहिनीच्या घरी आली तसे तिने ते सिम कार्ड तिला देऊन टाकले आता सायली आणि सचिनचे  फोनवर बोलणे चालणे पुन्हा सुरू झाले सायली प्रेग्नेंट असली तरी सचिन तिला आपल्या सोबत ठेवायला तयार होता पुढे एक दिवस जेव्हा वहिनी गावाला आपल्या माहेरी गेली त्या वेळामध्ये सचिन आणि सायली फिरायला गेले प्रेग्नेंट असताना सुद्धा ती सचिनच्या गाडीवर बसून फिरायला गेली पण दुर्दैवाने ती तिच्या काकाच्या मुलाला दिसली आणि त्याने तिला पकडून घरी आणले हे सगळं घरच्यांना माहित झालं 

नंतर हैदराबाद वरून सायलीच्या पतीला गावाला बोलवण्यात आले होते सायलीचे पती गावाला आल्यावर सायलीचे पती सचिन आणि सायली यांना एकाच ठिकाणी बसवण्यात आले आणि त्यांची विचारपूस करण्यात आली त्या परिस्थितीमध्ये सुद्धा सायली सचिन सोबतच जायला तयार होती पुढे तिला सातवा महिना लागला तरी सायली सचिन सोबत फोनवर लपून छापून बोलतच होती एक दिवस सचिन आणि सायली दोघेजण वहिनी कडे आले आणि त्यांनी विचारले की बाळ गर्भपातासाठी आता जमू शकते का त्यावर वहिनी म्हणाली नाही आता तर सातवा महिना चालू आहे आता जमणार नाही आता माहेला पण धोका राहते आणि लेकराला पण तुम्हाला बाळ ठेवायचं नव्हतं तर जेव्हा तीन महिने झाले होते तेव्हा पाडायला पाहिजे होते आता जमणार नाही 

मग सायलीने वहिनीला म्हणाले वहिनी जेव्हा मला माहित झालं मी प्रेग्नेंट आहे तेव्हा मी खूप प्रयत्न केला गरम चाय पीत होती गुडाची चाय मसाले खात होती पण हा बाळ काही पडला नाही 

त्यानंतर एक दिवस सचिनची मम्मी वहिनीच्या घरी आली आणि तिने येऊन चर्चा केली तेव्हा वहिनीने काहीही न लपवता तिला सगळं सांगितलं की सचिन आणि सायली आता दोघेजण लपून-छपून बोलतात हे ऐकून सचिनची मम्मी म्हणाली आता मी तिला ठेवू शकत नाही तिला माझ्या मुलासोबत लग्नच करायचं होतं तर जेव्हा तिला माहित झालं होतं की ती प्रेग्नेंट आहे तेव्हा तिने बाळ पाडलं का नाही बाळ पाडाला पाहिजे होतं 

नंतर दोन महिन्यानंतर सायलीला एक मुलगी झाली तिचा बारशाचा कार्यक्रम झाला आणि तिचं नाव कनिका ठेवण्यात आलं त्यानंतर सायली आपल्या नवऱ्यासोबत हैदराबादला परत गेली आणि एक वर्ष ती तिथेच राहिली