हरेश Vrishali Gotkhindikar द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हरेश

हरेश .. YES
हरेश आमच्या अगदी जवळच्या ओळखीतला म्हणावा लागेल
तसा तो आमचा नातेवाईक नाह
ी ..असाच भावाचा मित्र .म्हणुन त्याची ओळख झाली होती
बरीच वर्षे आमच्या कोल्हापुरात तो आणी त्याचा छोटा भाऊ एक हॉटेल चालवतात
मध्य प्रदेशातील एका गावातुन आलेले हे कुटुंब आता इथलेच झाले आहे
शेजारच्या गावात पण त्यांचे एक हॉटेल आणी घर आहे ..
हरेश गाडी खुप सुंदर चालवतो
अनेक वेळा अत्यंत विचित्र परिस्थिती त्याचे ड्रायविंग कौशल्य त्याने दाखवले आहे
त्यामुळे आमचे कुटुंब कुठे सहलीला निघाले की गाडी चालवायला म्हणुन हरेश हजर
एक जास्तीचा माणुस गाडी चालवायला हवाच म्हणुन आम्ही त्याला बरोबर घ्यायचो
त्याला ही आम्ही बोलावले की खुप आनंद व्हायचा
मला “दीदी “म्हणायचा ..त्याच्या सहा बहिणी पैकी एक धाकटी लाडकी बहिण
हुबेहुब “माझ्यासाखी “..होती म्हणे ...
.म्हणुन त्याला माझ्या विषयी एक खास “आपुलकी “
अनेकदा गाडी चालवताना प्रश्नोत्तरातुन त्याचे आयुष्य माझ्या समोर उलगडत असते
कधी हिंदी तर कधी मराठी असा आमचा संवाद चालतो
त्याचे वडील त्यांना तो पापाजी म्हणे.
कायम गल्ल्यावर बसलेले असत ..
..पापाजी क्या करते थे तुम्हारे हरेश ?
जी दीदी पापाजी तो बहोत बडे बिजिनेसमन थे
पेहेले हम बंबई मे रहा करते थे ना .वहा वो क्लब चलाते थे
उनका कारोबार इतना बडा था ना दीदी की हमारी बहोत बडी हवेलीया थी ..
त्याच्या पापा चा काळात” फ्ल्याट” संस्कृती नव्हती ..
मुंबईत तेव्हा सर्वांची घरे असत
त्यात “हवेली “असणे म्हणजे खुपच “मोठा “ माणूस ..
और दीदी पता है उन दिनो उनके दोनो पावमे इत्ते बडे सोनेके कडे थे ..
आता सध्या काय करतात ते .?माझा प्रश्न ..
और क्या करना है उन्होने ?.
खाली गल्लेपर बैठना और नोट गींनना ..
वैसे भी उनकी तबियत भी ठीक नही रेहेती आजकल ..
और हम् है ना ...तो उनको कुछ करनेकी जरुरत नही है

.मनात वडीला विषयी प्रचंड “आदर “
पंचवीसएक वर्षे वय असेल हरेश चे पण स्वताला घरातला “कर्ता”मानतो
आणी घरची जबाबदारी पण अशीच उचलतो
घरचे आणी हॉटेल चे कोणतेही काम करायला सदैव तत्पर ..
वेळ प्रसंगी किचन मध्ये जाउन भाजी करण्या पासुन भांडी घासण्या पर्यंत साऱ्याची कायम तयारी
मग एकदा मध्येच मी त्याला सहज म्हणुन विचारले
पापाजीनी मुंबईचा इतका चांगला धंदा का रें सोडला ?
“ दीदी वहाके बिजिनेस पैसा तो बहोत मिलता था
मगर वो तो बस काला “धंदा “था .समझो पापा वहाके डॉन थे ..!!
बादमे वही बात पापाके मनमे खायी जा रही
सोचने लगे अगर यही धंदा मै करता रहा तो मेरे बच्चो पर उसका क्या असर होगा ?
उस टाईम हम् दोनो भाई छोटे थे
उन्हे लगा कही आगे चलके मेरेही बच्चोकी नजर मे मै गीर ना जाऊ
इसलिये उन्होने वहाका सब छोड दिया और हम् लोग यहा आके बस गये ..
एका पित्याचा हा विचार मला चकित करून गेला
वडिलांची श्रीमंती मुलांनी लहानपणी अनुभवली होती त्याविषयी कधीतरी
बोलताना हरेश सांगत असे ..
दीदी ते इतके श्रीमंत होते की त्या काळी फक्त माझ्या बुटांचे बंद बांधण्या साठी एक स्वतंत्र गडी होता
आणी हा आमचा आकाश आहे ना (त्याचा धाकटा भाऊ ) त्याचे नाव आकाश ठेवले होते
कारण आकाशा इतकी अमाप संपत्ती त्यावेळी त्यांच्या जवळ होती ..
आकाश च्या जन्माच्या वेळी मध्य प्रदेश मध्ये आमच्या जवळील पाच गावांना त्यांनी जेवण घातले होते
आणी या पताका असतात ना तशा नोटांच्या “पताका “साऱ्या गाव भर लावल्या होत्या ..
मी तर हे सारे ऐकुन थक्क ...!!
इतक्या मोठ्या संपत्ती वर मुलांच्या चांगल्या भविष्या साठी लाथ मारून येणे ..
आता पापाजी विषयी माझा “आदर “..आणखीनच वाढला ..
हरेश चा धाकटा भाऊ आकाश ..
तो खुप मौज मजा करणारा ..थोडा “हूड “च म्हणा ना
पण हरेश ला प्रचंड कौतुक त्याचे ..खरे तर फक्त दोन वर्षांनी लहान आहे तो
पण हरेश म्हणणार ..दीदी अभी बहोत छोटा है
थोडा सिखेगा तो समझ आयेगी न..
वैसे भी उसकी अभी खेलनेकी कुदनेकी उमर है .
करने दो उसको एन्जोय ..बादमे अपने आप सम्भालेगा सारे

खुप मजेशीर वाटायचे घरची जबाबदारी सांभाळणारा हरेश ..आणी दोन वर्षांनी लहान असलेल्या भावाची .मात्र
“खेलने कुदनेकी उमर ..!!
घरी तिघी बहिणी होत्या ..लांब च्या त्यांच्या गावात लग्न करून दिलेल्या
याला मात्र इथे त्याची काळजी असायची ..
त्यांची कोणती पण पैशाची गरज असु दे ...लागलीच तयार
पैसे पाठवायला तर लगेच तयार असायचा ..
तिकडे कायम कोणाला तरी पैशाची अडचण असायचीच ..
दीदी उनको कोई चिंता करनेकी जरुरत नही है
हम् भाई किसलिये है ...हम् करेंगे न कुछ् भी उनके लिये ..
मला त्या बहिणींच्या भाग्याचा हेवा वाटे ..इतका प्रेमळ आणी कायम
त्यांची काळजी करणारा भाऊ कायम पाठीशी होता ..!
मध्यंतरी भावाच्या लग्नाची बोलणी सुरु होती त्याच्या
मी विचारले हरेश काय मुलगी पसंत आहे ना ..आकाश ला ...
दीदी वैसे तो उसे ज्यादा पैसोका शौक है ..
ससुर पैसे वाला चाहिये उसको ..हाहाहा छोटा है समझ नही है
मगर पापा जो लडकी पसंद करेंगे उसीसे वो जरूर शादी करेगा
और हम् भी उसके लिये हमारे गाव की लडकी खोज रहे ..
पता है क्यो .,.?
हरेश ची एक खासियत होती प्रत्येक गोष्ट त्याला मला सांगायचीच असे ..
आता सुद्धा त्याला ..ते सांगायचेच होते
मी म्हणाले इतनी दुरकी लडकी क्यो ..
सोचते है अगर हमारे नये समधी जी हमारे गावके हो
तो हमारी बेहेनोके यहा अगर कोई मुसिबत हो या प्रोब्लेम हो तो
वो वहासे उसको हल कर सकेंगे न ..
आपले कुटुंब आपल्या बहिणी याचा विचार बारा महिने चोवीस तास याच्या डोक्यात असे
एका बहिणीचा थोडा संसारिक गुंता आहे
त्यामुळे सध्या ती तीचे घर सोडून इकडे राहिली आहे
तीच्या विषयी बोलताना त्याच्या मनात इतके प्रेम असते
दीदी उसका क्या है ना उसका जो पती है ना
उसकी कदर ही नही करता
मेरी बेहेन को अच्छे कपडे मेक अप का बहोत शौक है
“वो बात तो दुर रही वो खाली उससे झगडा करता रेहेता है ..

उसके सास ससुर भी बहोत सताते है उसको तो मै जाकर उसको यही लेकर आया
अगले महिने मे जाकर बात करूंगा उसके .पतीसे अगर अच्छे से बर्ताव करे तो ठीक
वरना हमारी बहन हमारे घरमे ही खुष रहेगी
घटस्फोट किंवा दुसरे लग्न हा प्रकार या लोकांच्यामध्ये खुप कमी असतो
त्यामुळे मी विचारले ..तुम्हारे यहा उसकी दुसरी शादी होगी क्या ?
क्यो नही होगी मै करवा दुंगा ..
उसको चिंता की जरुरत नही है ..हम है ना ..
आज ही उसको पाच छ हजार का कपडे मेक अप सामान लाके दिया है ..
खुप अपूर्वाई वाटत असे भावाचे प्रेम पाहून ..
आणखी एक छोटी बहिण आहे त्याची मुंबईत ..नोकरी करते
तीने तिकडेच मराठी माणसाशी लग्न ठरवले आहे ..
मी म्हणले तुम्हारे गाव के लोग अब क्या केहेंगे .?
और पापा को पसंद है क्या .,.,.
जी पापाकी तो कोई बात नही वो तो बेटी की खुशिमे खुष ..है
रही बात गाव वालोकी ..वो सब तो हम देख लेंगे ..
घरच्या प्रत्येक प्रोब्लेम ला त्याच्या कडे हमखास सोल्युशन होतेच
इतक्या लहान वयात त्याची समज आणी विचार करायची ताकत पाहुन विस्मय वाटे !
मध्यंतरी पापाजी ची तब्येत खुप बिघडली होती
त्यांना ऑपरेशन साठी पुण्याला न्यावे लागले खुप दिवस तिकडेच होते
परत आल्या वर मी जाऊन भेटून आले
पापाजी खरेच खुप कृश झाले होते ..त्यांना पण खुप आनंद झाला मी गेल्या वर
बेटी बडा अच्छा लगां तु आ गयी ..अब मै और जल्दी ठीक हो जाउंगा
पापाजींच्या बोलण्यात आपुलकी आणी एक मिठास कायम असे ..
बाहेर आल्या वर मी हरेश ला म्हणले .”अरे काळजी घ्यायला हवी पापाजींची ..
दीदी चिंता मत करो हम है ना पापाको कुछः कमी नही आयेगी
पण मला वाटत होते अशा वेळी पुरुष बायको सोबत जास्त आनंदी राहु शकतो
आजारी असताना अथवा म्हातारपणी बायकोच पुरुषाला जास्त समजु शकते
मी असे बोलुन दाखवले ..म्हणले अरे आता पापा ना ममी कडे पाठवून द्या ना
तेव्हा हरेश म्हणाला
दीदी तुम भी ठीक बोल रही
लेकिन देखो आजकल पापाका दवाई का खर्चा कमसे कम हर महिने दस हजार तक है
अगर मैने उन्हे वहा भेज दिया तो मुझे वहा पैसे भेजने पडेंगे

सोचो तब उनको कितना बुरा लगेगा ना सोचेंगे इन दिनो मुझे बेटेकी मेहेरबानी पर जीना पड रहा है ..
मन ही मन कितना दुख होगा न उन्हे
मै उन्हे दुखी नही देखना चाहता .
इधर वो गल्ले पर बैठे रेहेते है तो ये सवाल ही नही आता ..
और मै चाहता हु वो अब कुछ न करे ..खाली पैसे गीने ..बस !
बहोत किया है उन्होने जिंदगी मे हमारे लिये ..
बराबर ना दीदी .?
हे ऐकल्या वर मी थक्क झाले नाही तर नवलच ..
विचाराची अशी दिशा ..म्हणजे मला काय बोलावे समजेना ..
हा वो भी सही है ..असे म्हणले मी ..
माझ्या आता पर्यंत च्या आयुष्यात परेश सारखा लहान वयात इतकी समज बाळगणारा
आणी कुटुंबाची बांधिलकी जपणारा मुलगा मी पहिला नाही
त्याचा वागण्याचा प्रत्येक पेहेलु मला चकित करून जातो दर वेळी ..
अजुन खुप भेटी घडतील आमच्या ..अजुन त्याला ही खुप सांगायचे आहे मला
पण हात जोडते आणी परेश चा विचार मनात येतो तेव्हा ..
त्याचे हे कुटुंब आणी तो या सर्वाना कायम सुखी ठेव इतकेच सांगते बाप्पाला ..