मित्र Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मित्र

मित्र !
आयुष्य हे माणसांनी भरलेले असते
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटत असतात .अनेक प्रसंगी अनेक कारणांनी माणसांचे आपले संबंध येत असतात .अनेक भावनांनी आपण त्यात गुंतत असतो
खरेतर आयुष्य हा भावभावनांचा आणी नात्यांचा खेळ आहे
या भावना मुळे आपण अनेक प्रकारची नाती जोडत असतो
किंबहुना नाती म्हणजेच आयुष्य असते असे म्हणले तरी चालेलं
अगदी खोलात गेले तर असे म्हणता येईल की नात्यावर प्रेम करणे हेच आयुष्य आहे आणी आपल्या जिव्हाळ्याची जी नाती आपल्याला आवडतात त्यामुळेच आपली प्रगती होत असते .आपण आनंदाने जगात असतो प्रत्येक नात्यामुळे आपल्याला आयुष्याचा एक नवीन अर्थ मिळत असतो .जीवनाचा अर्थ नव्याने समजत असतो
आणी यातुनच आपले एक व्यक्तिमत्व घडत असते
यातील काही नाती मात्र खरोखरच “विशेष “असतात

या नात्यात “मैत्रीला “सर्वात उच्च स्थान आहे आणी काही स्पेशल तीन प्रकारची नाती आपल्याला आयुष्यात हवीच असतात .या विषयीच आज काही सांगते आहे
यातील पहिले महत्वाचे नाते म्हणजे मैत्रीतील आत्मिक बंधनाचे नाते म्हणजे आत्मीय मित्र

ज्या व्यक्तीशी आत्मिक बंधन असते ते तुम्हाला प्रत्येक वेळेस जाणवत असते आणी त्या व्यक्तीच्या सहवासात असताना तुम्हाला कुठेही संकोच वाटत नसतो कीती तरी वेळा कदाचित तुमची त्याची भांडणे पण होत असतात .पण प्रत्येक भांडण सोडवताना तुमचे नाते अधिक घट्ट होते असे तुम्हाला जाणवत असते .तुम्ही त्या व्यक्ती पासुन तीन वर्षे दुर राहिला तरी पुन्हा भेटल्या वर जणु काही कधी दुर झालोच नाही असे वाटेल .तुमच्या अगदी जणु जन्मापासुन त्या व्यक्तीचे तुमचे नाते आहे असेच कायम तुम्हाला वाटत राहते . तुम्ही तुमचा भुतकाळ त्या व्यक्ती बरोबर शेअर करू शकता आणी असे वाटते की तुम्ही दोघे मिळून एकाच सफरी वर निघाला आहात .तुम्ही पुरुष असाल तर हा आत्मीय मित्र स्त्री असेल अथवा तो तुमचा जीवन साथी असेल असे अजिबात नाही .तो कदाचित तुमचा भाऊ तुमची बहिण अथवा तुमच्या आई वडिलांच्या स्वरुपात पण असु शकेल .तो तुम्हाला आयुष्याच्या मध्यावर अथवा कोणत्याही टप्प्यावर भेटू शकेल .आता पर्यंत जर तुम्हाला असा तुमचा आत्मीय मित्र भेटला नसेल .तर भविष्यात तरी त्याला हुडकण्याचा तुम्ही जरुर
प्रयत्न करा .
तुमचा दुसरा मित्र हा तुमचा “आरसा “असेल असे आपण म्हणुया..
.तो कायम तुमच्याशी स्पष्टवक्ता आणी प्रामाणिक असेल तुमच्याशी स्पष्ट बोलताना कदाचित तुमचे मन दुखावले जाईल
.. असा विचार तो अजिबात करणार नाही .पण कदाचित म्हणूनच तुमच्यावर त्याचा जीवन बदलुन टाकणारा असा .. प्रभाव पडत असेल.जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात अडचणीचे प्रसंग येतील त्या वेळी तो तुम्हाला स्वतचे स्वत्व कसे सांभाळायचे हे शिकवेल .तुमच्या जीवनाचा असा आदर्श दाखवेल ज्याचा पुढे तुमच्या आजूबाजूच्या माणसांना पण उपयोग होईल .तुम्ही त्याच्याशी कितीही आणी कसाही वाद घालु शकता पण त्या वादातुन सुध्धा तुम्हाला त्याची काळजी जाणवत राहील .आपल्या पैकी प्रत्येकाला असा सच्चा आणीआरशा सारखा निर्मळ मित्र हवा असतो .
जो आपल्या आयुष्याच्या अत्यंत कठीण प्रसंगी पण स्वताचा प्रामाणीकपणा जपायला शिकवेल .हा आरसा कायम तुमचे मन आणी जीवन पण साफ स्वच्छ ठेवेल .
तुमचा तिसरा मित्र हा तुमचा पालक अथवा रक्षणकर्ता असेल .तो तुमच्या साठी स्फूर्ती असतो जो तुम्हाला धैर्य आणी ताकद देतो .तो तुमचा शिक्षक असेल मार्गदर्शक पण असेल .वेळोवेळी तुमच्या क्षमतेची तो जाणीव करून देईल .जीवनाच्या प्रत्येक कठीण काळात तो तुम्हाला घडवेल .काहीसाठी तो घरच्याच एखाद्या व्यक्तीच्या स्वरूपात येईल तर इतर काहींच्या बाबतीत तो शिक्षक या स्वरूपात भेटू शकेल .काही वेळा तो मृत व्यक्तीच्या स्वरुपात पण असु शकेल जसे की गौतम बुद्ध ,अथवा गांधी अथवा इतर ख्रिस्त वगैरे .पण तो कायम तुमच्या साठी स्फूर्ती दायक असेल .महत्वाची गोष्ट अशी की तो तुमच्या जीवन प्रवासात कायम एक शिकवण बनुन राहील .तुमच्या जीवनप्रवासात तुम्ही जितके स्वताला झोकून द्याल तितका तो तुमच्या पासुन दुर राहील म्हणजे जेवढी जरूर असेल तेवढाच तो तुम्हाला उपयोगी होऊ शकेल . तुम्हाला तुमचे निर्णय स्वतः घ्यायची शक्ती तो देईल
तुमचा आत्मविश्वास वाढवेल
हा निसर्गातल्या एखाद्या घटका च्या पण स्वरुपात असु शकेल जसे की आकाश ,,अथवा तारे चंद्र पृथ्वी .असे
``…..ज्यांच्या कडे पाहुन तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी सांगु शकाल .
आणी ज्याच्याकडे बोलल्या मुळे तुम्हाला मनोधैर्य प्राप्त होऊ शकेल
तुमच्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरे तुम्हाला तिथल्या तिथेच मिळतील
तर हे अशा प्रकारचे तीन मित्र
जे तुमचे जीवन समृद्ध करतात .असे जर तुम्हाला भेटले असतील तर त्यांना टिकवुन ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहा
आणी जर अद्याप तुम्हाला ते भेटले नसतील तर त्यांना हुडका
ते आहेतच तुमच्या अवतीभवती..

फक्त तुम्हाला त्याची जाणीव होत नाही आहे .ही जाणीव करून घेण्या साठी तुम्ही स्वतः झटा
सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर हे तुम्हाला नक्की भेटतीलच .
हे तीन मित्र कदाचित तुम्हाला तीन स्वरुपात भेटतील
पण ज्याला हे तीन मित्र एकाच व्यक्तीच्या स्वरुपात भेटतील त्याच्या सारखा भाग्यवान माणुस तोच असु शकेल !!
तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता हे आता तुम्हालच ठरवायचे आहे .