Anjana books and stories free download online pdf in Marathi

अंजना


अंजना ...
अंजना ला प्रथम भेटले
ते बँकेच्या एका शैक्षणिक कोर्समध्ये
मला भेटल्या क्षणी आवडली ती आणी ती तर माझ्या प्रेमातच पडली जणु
एका क्षणात भरपूर बडबड करू लागली अंजना ..जणू काही आमची जुनी ओळख आहे .असे
वय पंचवीस् च्या आसपास ..
साधारण उंची मध्यम बांधा ..सावळा रंग
चेहेर्या वर एक आत्मविश्वास
आणी सगळ्यात विशेष डोळ्यात भरणारे तीचे मोठ्ठे मोठ्ठे काजळ भरले डोळे
उत्तराखंड ची असणारी अंजना हिंदी भाषिक होती
आम्ही ट्रेनिंग सेंटर च्या होस्टेल ला एकत्र एका खोलीत रहाणार होतो
एक आठवडा भर मुक्काम असणार होता आमचा
उत्तराखंड ची असणारी अंजना काम मात्र मध्य प्रदेश च्या बँकेत करीत होती
पहिल्या भेटीत आम्ही दोघी इतक्या गप्पा मारीत बसलो की जेवणाची वेळ कधी झाली समजलेच नाही आम्हाला
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाग आली
पाहते तो काय अंजना सकाळीच उठली होती
जी हम् तो जल्दी ही जाग जाते है
आदत है हमे जल्दी जागनेकी .प्रकृती भी जल्दी ही जाग जाती है ना
?मला आवडले तीचे बोलणे
मी रोज सकाळी नियमित फिरणारी ..मग तीला विचारले
जायेंगे क्या घुमने ..?
क्यो नही अभी तय्यार होती हु ..
मग आम्ही रोज सकाळी आठवणीने फिरायला जाऊ लागलो
त्या गप्पातून उलगडत होते तीचे आता पर्यंत चे आयुष्य
उत्तराखंड सारख्या डोंगराळ भागात बालपण गेल्या मुळे निसर्गाच्या अनेक संकटांशी सामना करण्याची तयारी !!
शिक्षण दुर्गम भागातुन चालत जाऊन करावे लागले
पण सुंदर हिरव्या गार आणी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या प्रदेशाचा चा सार्थ अभिमान होता तीला
..हिमालयाच्या मागील टेकडी वर होते तीचे घर
मागून गंगा मैय्या झुळू झुळु वाहात असे
हमने तो यहा जब मध्य प्रदेश मे आये ना तो देखा ये पानीका फिल्टर
वर्ना हम् तो मैय्याजी का पवित्र पानी ही पिते आये है जी ..
अंजना चे सांगणे ..
तीचे नोकरीचे ठिकाण व घर यामध्ये इतके अंतर होते की सहा सहा महिने
तीला घरच्या लोकांचे दर्शन होत नसे
त्यात मध्य प्रेदेश मध्ये मुलींच्या दृष्टीने थोडे सुरक्षित वातावरण नाही असे तीचे म्हणणे त्यामुळे घरची आठवण खुप येत असे तीला
स्वयपाक पाणी सगळ्यात पारंगत होती अंजना
नोकरीच्या अथवा शिक्षणाच्या गावी रहात असताना स्वतः च रोटी सब्जी करून खात असे
महाराष्ट्रात मात्र आजकाल मुलीना घरचा स्वयपाक नको झाला आहे असे आपण पहातो .


घरची मोठी माणसे आई वडील काका काकू बहिणीचे पती या साऱ्या विषयी तिच्या मनात प्रचंड आदर होता त्यांच्या घरचे रीत रिवाज याचे तीला खुप कौतुक होते
घरच्या लोकांचे फोटो दाखवताना आणी त्यांच्या विषयी बोलताना
तीला खुप भरून येत असे
काय सांगु आणी काय नको असे होत असे तीला .
पता है मै जब घर जाती हु ना
तब रोज सुबह नहाके मा बाबुजीके पैर छु लेती हु
इतना सुकून मिलता है ना मनको !
आणी आमच्या कडे पहा मोठ्यांना नमस्कार करणे हा शिष्टाचार च लोप पाऊ लागलाय ..
त्यांच्या कडे लग्ना पुर्वी कपाळांवर कुंकू लावायची पध्धत नाही “
मी रोज वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या लावत असे
तीला भारी गंमत वाटत असे
जी जब हमारी शादी होंगी ना तब मै भी बडी वाली बिंदी लगावूंगी
और माथेपे सिंदूर भी लगाया करूंगी रोज .
मला उगाचच आमच्या कडच्या नव्या मुली कुंकू मंगळसुत्र याचा कसा कंटाळा करतात ते आठवले ..
और सुनो मेरी शादी मे तुम दोनो को आना है
मुझे कोई बहाना नही चाहिये समझे ना ...अंजना मला दटावत असे
लग्नानंतर घरी सर्व माणसे असावीत असे अंजना ला वाटे
हमे तो शादी के बाद घरमे बडे बुजुर्ग चाहिये ही .,
जिनके आशीर्वाद के बिना हमारी जिंदगी अधुरी है
घरमे सास ससुर नही हो तो हमे सलाह कौन देगा ..
जब हम् कुछ.गलत करेंगे तो हमे रोकेगा कौन ..?
खरे तर ती घरच्या माणसा पासुन शिक्षणाच्या निमित्ताने व नंतर ही खुप दुर राहायची तशात शेंडेफळ त्यामुळे खुप लाडकी
तीला कुणी काही कधी सांगितले नव्हते पण ती स्वताच्या मनाने रीत, रिवाज, मोठ्याचा मान सन्मान ..हे शिकली होती याचे मला खुप नवल वाटायचे !
कारण तिच्याच वयाची माझ्या मैत्रिणीची मुलगी म्हणत असे
“आई मला सासू सासरे नसलेले स्थळ पाहून दे
शिवाय लग्नाच्या वेळी माझ्या नवऱ्यासाठी काही अटी आहेत बर का
त्या म्हणजे मी नाव बदलणार नाही
मी स्वयपाक करणार नाही तसेच मी त्याच्या घरी ही राहायला जाणार नाही
त्यानेच आपल्या घरी येवून राहायला हवे “..वगैरे वगैरे
या पार्श्वभूमी वर आणी एकंदर महाराष्ट्रा तली लग्नानंतर वेगळे राहायची परंपरा .पाहता .मला अंजना चे कौतुक वाटले
घरी सर्व भावंडांची लग्ने झाली आहेत त्यामुळे अंजना साठी आता मुलगा
पहायचे काम चालू आहे
मी सहज विचारले अंजना तुम्हारी शादीमे दहेज के लिये कितने गेहेने बनवाये है तुम्हारे घर् वालोने ?
नही जी हमारे यहा दहेज नही होता
लडकी दे दी ये ही लडके वाले अच्छा समजते है
मला आठवल्या “हुंडा बळी” गेलेल्या”निष्पाप नाजूक “मुली
रोज रात्री झोपताना ती हनुमान कांड नावाचे पुस्तक थोडेसे वाचत असे
मी विचारले अंजना ये तुम रोज क्या पढती हो ?
जी ये किताब ना मुझे हमारे एक कस्टमर चाचा ने दी है
और रोज पढने को बोला है
सच मे जब मै ये पढती हु मनको एक सुकून स मिल जाता है

घरच्या लोकांच्या आठवणीने नेहेमीच अंजना होमसिक होत असे
रोज भैय्या आणी भाबिला फोन असेच तीच
कधी चुकला नाही ..
माझे कवितांचे पुस्तक पाहून तीला माझा अभिमान वाटला
ती म्हणाली
अगर मुझे पढना आता मराठी तो मै पढ सकती ये किताब
मग मी तिच्या वरच एक कविता केली .
ती खुप च खुष होऊन गेली
क्लास मधल्या साऱ्या लोकांना कौतुकाने ती हे सांगत होती
दिवसे दिवस अंजना ला मी अधिक अधिक समजून घेत होते
आणी ती पण मला खुप जवळची समजू लागली होती .
पुण्यातील आठ दिवस आम्ही खुप मजा केली वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढले रात्र रात्र जागून गप्पा केल्या …वेगवेगळी ठिकाणे मी तीला संध्याकाळी फिरून दाखवली .एकमेकींच्या पसंतीने कपडे दागिने याची खरेदी पण केली
एक दिवस तर पुण्यात तुफान पाऊस पडत होता
तरी पण आम्ही अगदी हट्टाने रात्रीचा पिक्चर पहायचे ठरवले
खुप अडचणी आल्या त्या दिवशी पण जिद्दीने आम्ही आमची इच्छा पुर्ण केलीच तेव्हा तर तीला खुपच मजा वाटली ..
आता यानंतर आमचा एकच दिवस राहिला ट्रेनिंग चा
मी तीला चतुरश्रुंगी चे देऊळ दाखवायला घेऊन गेले
डोंगरावर असणारी ती देवी पाहून साहजिकच अंजना ला तिच्या भागातील देऊळ आठवले ..खुप भाऊक झाली अंजना तेव्हा
सचमे इधर आके मुझे बहोत अच्छा लगा ..
मला पण बरे वाटले .त्या दिवशी पण खुप फोटो काढले आम्ही
परत जाताना एका फुल वाल्या जवळ रिक्षा थांबवून अंजना खाली उतरली
आणी एक पुष्प गुच्छः घेऊन आली ..
मला वाटले क्लास मध्ये कोणाचा तरी वाढदिवस असेल म्हणुन आणला असेल
होस्टेल वर गेल्या वर तीने तो गुच्छ मलाच दिला आणी माझ्या पाया पडली
मी म्हणाले ये किसलिये ..अंजना ?
त्यावर ती म्हणाली ..
तुमने मुझे बहोत प्यार दिया .
मै तुम्हे कुछ् देना चाहती थी मगर क्या दे दु ये समज नही सकी
फिर सोचा फुल ही दे दु इससे बडा ..तोहफा और कौनसा ही सकता है .
हे बोलताना डोळ्यातले पाणी लपवायला अंजना ने नजर फिरवली .,.
मला पण अगदी भरून आले खरे तर मी तिच्या साठी खास असे काहीच केले नव्हते .फक्त माझ्या स्वभावा नुसार तिच्या शी मिळून मिसळून वागले इतकेच .
मी तीला म्हणाले
सच मे अंजना ये फुल ही बहोत सारी बाते कह रहे है ..
मुझे खूब पसंद आये ये फुल ..
अखेर शेवटचा दिवस आला आणी शेवटच्या क्षणी आमच्या ताटातुटी ची घडी आलीच ..
तिची रेल्वे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी होती
मला मात्र त्याच संध्याकाळी बसला बसायचे होते .
होस्टेल मध्ये फक्त दोघीच राहिल्या होत्या
मी अंजना ला म्हणले|
आज अकेली मत सोना दोनो साथमे सोना ..
अंजना म्हणाली ..
नही हम् अकेले कहा है मेरे साथवाले बेड पर तुम्हारी यादे है
मै यही सो जावूंगी ..
या वाक्या पुढे मी निरुत्तर होते ..
अंजना ने मला घट्ट मिठी मारली आणी शेवटचे रडून घेतले
यानंतर ती मला हसत हसत रिक्षा पर्यंत सोडायला आली
आता ट्रेनिंग संपून पंधरा दिवस झाले
रोज अंजना चे.... मिस यू ..असे दोन तरी मेसेज असतातच ..
आता तिच्या लग्नाला मला तिकडे जायचे आहे
पाहू कधी योग येतो ते .,.!!
मी अंजना वर केलेली हीच ती कविता

अंजना ..
एक लडकी बडे शहरमे बसनेवाली

छोटे छोटे सपने आखोमे रखनेवाली
बहोत बरसो से दुर है अपनी शिक्षा और नोकरी के लिये
लेकिन मनमे तरसती है घरवालोके प्यारके लिये
लोग मिलते है तो बहोत बाते करती है
मगर मनमे शायद ..अकेली ही रहती है
नये नये खयालात लिये नयी नयी चीजे सिखती है
सिम्पल ..सी है मगर कभी कभी” मॉड.”भी दिखती है
बडोका आदर, मान, सम्मान, अंजना ने खुद ही सिखा है
सब कुछः स्वीकार करती है जो उसकी अच्छा दिखा है
अंजना के बारे मे मै जब सोचती हु
अपना “अतीत “ मै उसी मे देखती हु
घुल मिल के रेहेती है सबसे “हसमुख “ अंजना
जो भी मिलता है लगता है उसे चाहना

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED