Sadabahar film sangeet - 1 books and stories free download online pdf in Marathi

सदाबहार फिल्म -संगीत - भाग -१

मराठी ई-बुक

“सदाबहार फिल्म-संगीत “

(भाग – १ )

रसिक मित्र हो.नमस्कार ..सदाबहार फिल्म-संगीत "" या नव्या लेखन-उपक्रमातून आपण जुन्या गाण्यांच्या आठवणीत हरवून जाणार आहोत .हिंदी फिल्मी गाण्यांनी अनेक पिढ्यांना भावगीतांचा आनंद दिला आहे. आपल्या भावनिक जीवनात या गाण्यांना फार मोठे असे भावनिक स्थान आहे. आपल्या मनातील भावनांचे जणू प्रतिबिंबच या गीतातून आपल्याला दिसून येते,सहाजिकच ही गाणी आपल्या जिवलग सोबत्यांसारखी साथसंगत करीत आलेली आहेत,हिंदी फिल्मी-संगीत या विषयावर अगदी मनातून-मनापासून भरभरून बोलणारे अनेक रसिक आपल्या सभोवताली आहेत असे जाणवते . या फिल्मी-संगीताच्या " १९५० ते १९६० -या दशकास "फिल्म-संगीताचेसुवर्ण- युग असे म्हटले जाते..या काळाची मोहिनी रसिकांच्या मनामनावर अजून ही "स्वरांचे गारुड : करून आहे. या काळातील गीतांना - सदाबहार नगमे,गाणे-सुहाने, मेरी-पसंद, हमेशा जवा गीत " अशा किती तरीलाडक्या पदव्यांनी गौरविले जाते .माझ्या मते- फिल्मी गीतांचे -हे "सुर्वण-युग -१९५० ते १९६५ .अशा पंधरा वर्षाच्या कालावधीचे आहे .याचे एक कारण असे ही आहे की-या अवधीतील - फिल्मी-गीतांचा आस्वाद घेतल्यास फिल्म- संगीत -हे या दीड -दशकातच खऱ्या अर्थाने "लोकप्रिय होते.हिंदी -चित्रपटांची वर्गवारी -भले ही - ए-ग्रेड, बी-ग्रेड, सी-ग्रेड .अशी केली जात असली तरी .या सर्व ग्रेड मधल्या हिंदी-चित्रपटातील गीतांनी ..आपला स्वतंत्र असा ठसा,एक स्थान रसिकांच्या मनात निर्माण केले आहे या विषयी काही दुमत असण्याचे कारण नाही.रसिक हो- या काळातील संगीतकार -आपापल्या परीने उत्तम ते देण्याचा प्रयत्न करीत .त्यांच्यात स्पर्धा असेलही, पण- त्यात "तुझ्या पेक्षा माझेच संगीत श्रेष्ठ हा भाव त्यात नव्हता ". मेलोडियस - म्युझिक ", हाया संगीताचा विशेष -गुण होता,असे मला नेहमीच वाटत आले आहे.-अनिल बिस्वास,एस.डी. बर्मन, शंकर -जयकिशन, सी.रामचंद्र, खय्याम, मदनमोहन, रोशन, हेमंतकुमार, नौशाद,रवी,राहुल देव बर्मन,गुलाम महमंद, इक्बाल कुरेशी,चित्रगुप्त, वसंत देसाई, ओ.पी.नय्यर, कल्याणजी -आनंदजी, लक्ष्मीकांत -प्यारेलाल,,उषा खन्ना,सरदार मलिक, हंसराज बहेल, एस.एन.त्रिपाठी ..आणि अनेक गुणी संगीतकार . या सर्वांचा अमीट आणि अवीट असा प्रभाव ..१९५० ते १९६५ - या काळातील फिल्मी-संगीतावर आहे.संगीतकार कितीही मधुर धून करीत असले तरी .गीत प्रभावी होण्यासाठी ते गीत ही तेव्हढेच - अर्थपूर्ण,भावपूर्ण असावे लागते .ही गीत लिहिणारी कवी मंडळी - फक्त फिल्मी -गीतकार नव्हते, तर "नामांकित शायर होते ", सभा-संमेलने गाजवणारे कवी-आणि शायर -फिल्मी -दुनियेत आले, आणि त्यांनी आपल्या एक्से एक -रचना पेश केल्या .आणि मग ही "अजरामर -अशी फिल्मी -गीतं झाली.राजेंद्रकृष्ण, साहीर, शकील बदायुनी, कैफी आजमी, जान निसार अख्तर,राजा मेहदीआली खान,हसरत जयपुरी, मजरूह सुलतानपुरी, शैलेंद्र, इंदिवर, कमर जलालाबादी, आनंद बक्षी, फारुख कैसर, असद भोपाली, अंजान, .आणि इतर अनेक कवी- शायर या काळात फिल्मी-गाणी करीत होती.मित्रांनो - हिंदी-चित्रपट संगीत "हा माझ्याजिव्हाळ्याचा विषय आहे. तितकाच तो तुमच्या आवडीचा आहे.

मित्र हो - ही सदाबहार गीत .सतत आपल्या मनात रुंजी घालीत असतात इतकेच कशाला - जसा आपला "मूड" असेल त्याप्रमाणे -आपण गाणी गुणगुणत असतो..इतका अगदी खोलवर असा प्रभाव या फिल्मी -संगीताचा आपल्या मनावरती झालेला आहे. मी तर या सर्व जादुई -"प्रकाराला - स्वर-संस्कार, संगीत-संस्कार, श्रवण -संस्कार " असे म्हणेन.आणि.या सर्व संस्कारांचा एकएकत्रित असा "भाव-संस्कार " गेल्या अनेक पिढ्यांच्या मनावर झालेला आहे.१९५० च्या अगोदरच्या काळातील हिंदी -फिल्म संगीत देखील खूपच लोकप्रिय झालेले होते . ४० च्या दशकातील - अनेक दिग्गज संगीतकारांनी केलेली अनेक गाणी देशभरातील रसिकांना डोलायला लावीत होती.संगीतकार -हुस्नलाल -भगतराम, विनोद, खेमचंद प्रकाश,राम गांगुली, नौशाद, सी.रामचंद्र, अनिल विस्वास ..सज्जाद, श्यामसुंदर,गुलाम महमद,एस.मोहिंदर, एस.मदन, एस.डी.बर्मन,मदनमोहनअसे अनेक संगीतकार- सदाबहार गाण्यांची निर्मिती करीत होते.. -१९५० ते १९६५ या दीड-दशकातील हिंदी -फिल्म संगीत ...चिरतरुण करून ठेवले आहे.

हे संगीतकार ---

सलील चौधरी, एन.दत्ता, दत्ताराम, जयदेव,पं.रविशंकर, सी.अर्जुन, बाबुल, रामलाल, बुलो सी.रानी, रॉबिन बनर्जी, पं.शिवराम, जयदेव, स्नेहल भाटकर आणि इतर अनेक..गुणी संगीतकार - ज्यांनी ..स्वरसाज चढवलेल्या गीतांची सुरमोहिनी -रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवते आहे.

गीतकार आणि संगीतकार या स्वरूपात अनेकांनी अनमोल असे योगदान देऊनहिंदी-फिल्मी संगीत श्रवणीय आणि चिरतरुण असे बनवले आहे.पं.भरत व्यास, पं.नरेंद्र शर्मा, कवी प्रदीप, खुमार बाराबंकवी, अंजुम जयपुरी, नक्ष लायल्पुरी,नूर देवासी, एहसान रझवी, गुलझार, मिर्झा गालिब, गुलशन बावरा, प्रेम धवन, नीरज, आनंद बक्षी, न्याय शर्मा, केदार शर्मा, नूर लखनवी, पी.एल.संतोषी, ,अशा अनेक गीतकार आणि शायर यांनी आपल्या रचनांनी रसिकांचे भावविश्वसंपन्न केले आहे.फिल्मी-गाणी म्हणजे केवळ उडत्या चालीची गाणी नव्हेत ", तर जीवनाचे सार्थ आणि यथातथ्य असे प्रतिबिंबफिल्मी गाण्यात उमटलेले आहे असे दिसून येते, आणि गीत, गझल,भक्ती गीत, देशप्रेम, अध्यात्मिक,वैचारिक,सामाजिक जाणीवा ..हे सगळे भाव आणि विविध भावना या चित्रपट गीतातून व्यक्त झालेले आहे,या अशा अनेकविध रचनाना -तितकेच भावानुकुल असे संगीत देणार्या संगीतकारांच्या सृजनशीलतेचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच पडावे .असे हे फिल्मी-गीतांचे संगीत विश्व आहे रसिक हो,आपण फिल्मी-संगीत आणि फिल्मी गीतांच्या संदर्भातल्या आठवणी जागवत आहोत. हे करीत असतांना आपले मन नकळत त्या मखमली आठवणीत अलगद गुरफटून जाते आहे,किती छान वाटते ते, शब्दात सांगण्यापेक्षा,मनाने अनुभवणे जास्त चांगले आहे.असे तुम्ही नक्कीच म्हणाल.फिल्मी गीत आणि त्याचे संगीत -हे एका व्यक्तीचे वा एकट्याचे कार्य आहे आणि नाही ..!हे असे या साठी म्हणतोय की,संगीतकार कितीही छान संगीतरचना करो किंवा गीतकार कितीही चांगले गीतलेखन करो,ते प्रभावी तेव्न्हाच होते.ज्यावेळी ते तितक्याच ताकदीच्या आवजात गायिले जाऊन.आपल्या पर्यंत येते, मनात शिरते आणि तिथेच राहून वर्षा -नु -वर्षे हृदयात झिरपत राहते.संगीतकार-गीतकार आणि गायक /गायिका, सहगायक -सहगायिका आणि स्वर-सोबत करणारे कोरसमधले साथीदार.या सर्वांच्या कामगिरीतून,कारागिरीतून ..गीत जन्मास येते,आकारास येते .मग सुरेल असा स्वर-संयोग होतो त्यावेळी अवीट गोडीचे गीत होते.यासाठी गीतकार -संगीतकार आणि गायक-कलाकार या सर्वांचे सारखेच आणि महत्वाचे योगदान असते असे मला वाटत आले आहे.फिल्म-संगीत हे जास्त केव्न्हां पासून लोकप्रिय झाले ? याचे उत्तर ..ज्या वेळे पासून गायक-गायिकांचा उसना आवाज घेऊन.स्क्रीनवरील कलाकार गाण्यावर अभिनय करू लागले.तेव्न्हा पासून गाण्याची खुमारी वाढली, रंगत वाढली,गाणी श्रवणीय होती ती अधिक "बघणीय "झाली.सुरेंद्र, नूरजहाँ,करण दिवाण, सुरैय्या, उमादेवी,के.एल सैगल, हे सगळे गायक-अभिनेते आणि अभिनेत्री होते.जुन्या जमान्यातील -खुर्शीद,,,राजकुमारी, अमिरीबाई कर्नाटकी, जोहराबाई अम्बालावाली, सुलोचना कदम (चव्हाण ), शमशाद बेगम याचे आवाज कसे विसरता येतील ?आणि -लता मंगेशकर,आशा भोसले, सुमन कल्याणपूर, उषा मंगेशकर,गीता दत्त,मुबारक बेगम, कमल बारोट सुधा मल्होत्रा,,कृष्णा कल्ले, यांनी गायिलेली गीत नेहमीसाठी तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात हमेशा जवान गीत "बनून राहिली आहेत. ज्यांनी गाण्याची गोडी लावली ते. -कुंदनलाल सैगल, पंकज मलिक,के.सी.डे,आणि नंतरचे,महमद रफी,मुकेश,किशोर कुमार,तलत मेहमूद, मन्ना डे, हेमंत कुमार,महेंद्र कपूर, चितळकर, सुबीर सेन सी.एच .आत्मा,, आणि अनेक ..कलाकार या सर्वांच्या आवाजातील गाण्यांनी रसिकांना तृप्त केले आहे.फिल्मी संगीत म्हटले की - ते पडद्यावर पाहण्या पेक्षा -ते ऐकण्यात आनंद घेणारे रसिक जास्त आहेत,कारण ही भाव-गीत आहेत, आपल्या मनाला, भावनाना स्पर्श करणारी ही सारी गाणी आहेत.आपला .जसा मूड- तसे गाणे.लावायचे-ऐकायचे त्यात स्वतःला विसरून जायचे ..हे गेले कित्येक वर्षे चालू आहे..या पुढे ही तसेच चालू राहणार यात शंकाच नाही.- फिल्मी -संगीत लोकप्रिय होणे -यात अनेकांचा सहभाग आहे. त्यापैकी एक महत्वाचा घटक म्हणजे ..गीतकार .गीत आणि संगीत .हे दोन्ही, हिंदी-चित्रपटांचा अविभाज्य असा भाग बनून राहिला आहे. जुन्या काळातील चित्रपट पाहतांना सहज जाणवते की. या कथानकातून गाणी वजा केली तर ? ही कल्पना करणे सुद्धा कठीण आहे ना...!म्हणून तर शेकडो पिक्चर आज ही केवळ त्यातील गाण्यांसाठी आठवणीत कायम राहिलेले आहेत.हिंदी-पिक्चर किती प्रकारचे असावेत ? आठवून तर पाहू या - कसे आहेत हे पिक्चर ..?स्टंट-पिक्चर -म्हणजेच -हाणामारीचे,आणि जादुई पिक्चर, पौराणिक, ऐतिहासिक, रहस्यमय आणि सस्पेन्स -थ्रिलर, करमणूक -प्रधान -यालाच "पलायनवादी चित्रपट" असे म्हटले जाते, समाजिक जाणीव आणि समस्या घेऊन त्यावर प्रबोधन करणारे,भाष्य करणारे, असे सामजिक चित्रपट . ढोबळमनाने अशी हीवर्गवारी करता येते.

आपल्या हिंदी -चित्रपटांना - "हिंदुस्थानी " असेही म्हटले जाते . यात उर्दू आणि हिंदी -या दोन्ही भाषांचा वापार केला जातो .त्यामुळे निखळ हिंदी आणि नफीस -उर्दू .या दोन्हीचा अप्रतिम असा संयोग आपल्या फिल्मी गाण्यात झालेला आहे असे म्हणू शकतो.वर्गवारी कोणतीही असो.. या सगळ्या पिक्चर मधली गाणी ..त्यात असणे हीच या चित्रपटांची आठवण आहे.कथानकातील प्रसंगानुसार गाणी -सिच्युएश्नल -सॉंग" असे या गाण्यांबद्दल म्हणता येईल. त्या प्रमाणे या गाण्यावर मोठी जबाबदारी असे -ती म्हणजे "ही फिल्म -गाण्यांच्या जोरावर पुढे पुढे नेणे ", आणि आपल्या फिल्मी -गीतकारांनी ही कठीण अशी जबाबदारी लीलया पार पाडलेली आहे.साहित्य -काव्य रसाचा परिपोष " या गीतांमधून आपल्याला अनुभवता आलेला आहे. कारण ही गीत लिहिणारे गीतकार -, कवी -आणि शायर होते ..त्यामुळे तरल काव्यानुभूती आणि शेरो -शायरीची खुमारी,या गाण्यातून आपण रसिक अनुभवत आलेलो आहोत.आघाडीचे गीतकार म्हणून- राजेंद्र कृष्ण, शैलेंद्र -हसरत, मजरूह, शकील बदायुनी, साहीर लुधियानवी यांचा उल्लेख करतांना, यांच्या सोबतीने तितक्याच ताकदीच्या रचना करणाऱ्या गीतकार आणि शायर यांच्या फिल्मी-दुनियेतील गौरवपूर्ण कामगिरीचा आपण मागोवा घेणार आहोत .. रसिकांनी आणि ही सफर कशी वाटली ?,हे जरूर सांगावे.आपले अभिप्राय जरूर द्यावेत, म्हणजे ही सुरेल सफर पुढे चालू राहण्यास मदत होईल.आपला अरुण वि.देशपांडे -पुणे.मो- ९८५०१७७३४२

email - arunvdeshpande@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED