हरी......हरी...... आवाज ऐकताच हरी त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला, त्याला अचानक आलेल्या आवाजाची शहानिशा करायचीच होती, रोजच्या आवाजाने तोही त्रासलेला पण मनात असून सुद्धा तो बाहेर जाऊ शकत नव्हता. रात्रीचे ११ वाजून गेले होते, हा झोपेतून उठून त्या आवाजाच्या दिशेने चालू लागला,आकाशात चांदणं टिमटिमत होत त्या टिमटिमत्या चांदण्यामध्ये चंद्राचा लक्ख प्रकाशात हरी एकटाच चालत होता. त्याला बाजूने मोठमोठ्याने आवाज येत होत, नको जाऊ, नको जाऊ पण ते आवाज त्याच्या कानाजवळ पोहचत नव्हते. तो भेटेल त्या वाटेने चंद्रा

Full Novel

1

अपूर्ण बदला ( भाग १ )

हरी......हरी...... आवाज ऐकताच हरी त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला, त्याला अचानक आलेल्या आवाजाची शहानिशा करायचीच होती, रोजच्या आवाजाने तोही पण मनात असून सुद्धा तो बाहेर जाऊ शकत नव्हता. रात्रीचे ११ वाजून गेले होते, हा झोपेतून उठून त्या आवाजाच्या दिशेने चालू लागला,आकाशात चांदणं टिमटिमत होत त्या टिमटिमत्या चांदण्यामध्ये चंद्राचा लक्ख प्रकाशात हरी एकटाच चालत होता. त्याला बाजूने मोठमोठ्याने आवाज येत होत, नको जाऊ, नको जाऊ पण ते आवाज त्याच्या कानाजवळ पोहचत नव्हते. तो भेटेल त्या वाटेने चंद्रा ...अजून वाचा

2

अपूर्ण बदला ( भाग २ )

संध्याकाळच्या वेळेला सगळे मित्र क्रिकेट खेळण्यासाठी जायला निघाले. रम्या आणि श्याम ब्याट आणि बॉल घेऊन हरीच्या घरी आले. थोड्या गोट्या सुद्धा फ्रेश होऊन हरीच्या घरी आला. पण हरी घरी झोपला होता. त्याला प्रत्येकवेळी डोळ्यासमोर ती हिडूसवानी भयानक आकृती दिसत होती. त्यामुळे तो अंथरुणातही थरथर कापत होता.त्याचे ते सडके तोंड जागो-जागी फाटलेल त्याचबरोबर वरून कापलेली मान,त्याचे बाहेर आलेले पांढरे शुभ्र बिबुल आणि लाल रक्तासारखे तीक्ष्ण डोळे त्याला डोळ्यासमोर दिसत होते. हरी विचारांतच होता कि, त्याला को ...अजून वाचा

3

अपूर्ण बदला (भाग ३)

शुभ प्रभात! हरीला खालच्या अलीकडून श्याम आणि रम्याने येताना आवाज दिला. तब्बेत कशी आहे ? मस्त.आणि शुभ त्यांना चाय आणि नाश्ताचा फर्मान सोडला. आणि घरात बोलावून घेतलं. बोलता बोलता हरी विचारनारचं होता कि गोट्या नाही आला अजून? तेवढ्यात दारातून आवाज आला, शुभ प्रभात! तो गोट्या होता. त्याला पाहताच श्याम हसत त्याला म्हणाला तुला शंभर वर्ष आयुष्य आहे, आत्ताच तुझ्या बद्दल हरीने विचारलेलं माणसाच काही खर सांगता येत नाही, आज आहे तर तर उद्या नाही. आणि तू म्हणतोस मला शंभर वर्ष आयुष्य लाभेल म्हणून. इथे पन ...अजून वाचा

4

अपूर्ण बदला ( भाग ४ )

दुपार झालेली, आत्ता मात्र त्यांना कंटाळा आलेला. त्यांच बरेचस खेळूनही झाल होत. भूक लागली म्हणून सगळे दुपारचे जेवण करून रव्याच्या घरी परतले. काय करायचे कुणालाच काय सुचत नव्हते? खेळायचं म्हटलं तर भर दुपारच बाहेर कोण खेळेल, ते म्हणजे चुलीत हात घातल्यासारख होतं.कारण बाहेर सूर्यदेव एवढे तापले होते कि जस ते कोणावर त्यांचा राग बाहेर काढत आहेत. जस शंकराने तिसरा डोळा उघडला कि पुढे जे काही आहे ते जळून खाक होई तसे उन्हात गेल्यावर त्वचा जळत होती. तेवढ्यात रव्याच्या मनात एक कल्पना झळकली. आणि तो स्वतः ह ...अजून वाचा

5

अपूर्ण बदला ( भाग ५ )

रव्याला काही ठीक वाटत नव्हते, बाकी सगळ्यांनी आंबे खाल्यानंतर घरची वाट पकडली, हरी रव्यासोबत तिथेच थांबला तसही त्याला कुठे जायचं होतं .रव्या तू आंबे का नाही खाल्ले रे? हरीने रव्याला त्याच्या मनामध्ये आलेला प्रश्न विचारला .पण रव्याचा काहीच उत्तर आले नाही. तो स्वतःच्या विचारात मग्न झालेला. त्याला सारखे तेच विचार मनामध्ये फिरत होते. त्या विचारात त्याला कुणीतरी आपल्याला स्पर्श करतय अस जाणवल आणि तो एकदम अचंबित होऊन ओरडणार तेवढ्यात हरीने विचारलं काय झालं? तु एवढा का घामाघुंम झाला आहेस . आईला न सांगता गेलो त्यांबद्दल घाबरलायस का? त्यामुळे हरी त्याला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागला . अरे मी ...अजून वाचा

6

अपूर्ण बदला ( भाग ६ )

काळ्या अंधाऱ्या रात्री कोणीतरी भयाण वाटेने धापा टाकत पळत होतं . आपल्या मागे कोणी लागलय आणि त्याच्यापासून बचावासाठी जीव घेऊन दिसेल त्या वाटेने धावत पळत होता. काटेरी झाडाझुडपातून दिसेल त्या वाटेने. शरीरातून रक्तस्त्राव सुरु झालेला,डोळे रक्तासारखे लाल माखलेले ,श्वास फुलत होता, पाऊलवाटेवर सांडलेले रक्ताच्या वासावर ती शक्ती आजून चकलात होती. कोण होती माहित नाही? तो पळू लागला, पळता पळता मागे बघू लागला, किंचित त्याला कोणती तरी सावली दिसली, मागे एका जागेवरून दुसर्या जागेवर अशी उघडझाप दिसत होती. चंद्राच्या लक्ख प्रकाशामध्ये तो एकटाच कुठल्यातरी भयाण वाटेवरून पळत होता.कुठेतरी दूर पण थोडं जवळपास कसलातरी उजेड दिसला. आणि त्याला कुठेतरी जगण्याची उमेद ...अजून वाचा

7

अपूर्ण बदला ( भाग ७ )

स....टा ....क ... दोन चार कानाखाल्यांचा आवाज घरामध्ये घुमला आणि अजून पाठीवर धपके पडणार तेवढ्यात बाबांनी आईचा हात पकडला. काय मारूनच टाकणार आहेस का? होते चूक प्रत्येकाकडून त्यांना कुठे माहित होत कि असं काही होणार आहे. हरी तू बाहेर जा रे हातानेच इशारा करून बाबांनी हरीला बाहेर धाडले. अहो पण ह्यांच्या चुकीमुले त्या निष्पाप जीवाचा काय बरं वाईट झालं तर. तू नको असा नकारात्मक विचार करू. आणि मनात जागाहि करू नको. तसाही त्यांना जर माहिती असत तर ते तिकडे फिरकले असते का? त्यांना अगोदरच ह्याची कल्पना देऊन ठेवायला पाहिजे होती. हरीचे बाबा मनातच कुजबुजले. काळ वेळ काही ...अजून वाचा

8

अपूर्ण बदला ( भाग ८ )

आपली कर्म आपल्यालाच भोगायला लागतात ह्या जन्मात नाहीतर भविष्यात का फुकट त्या देवाला कोसताय. आत्ता भोगा म्हणावं केलेली कर्म. पुटपुटु लागली. रम्या तू आतमध्ये झोप जा. आईच्या एका आवाजात रम्या बाबाच्या पुढ्यात जावून आडवा झाला.आपलीच कर्म म्हणजे काय हो आई? रम्याच्या आईने आश्चर्याच्या भावात आजीला म्हणजे तिच्या सासुला विचारले.आपलीच कर्म नाहीतर काय बोलू आजीचा आता पारा सुटला, रम्याच्या पंजोबाच्या वेळेचं हे गूढ आता बाहेर येतंय. आणि त्यावेळच गुन्हा! ह्या बारीक मुलांना त्यांची काहीही चूक नसताना भोगाव लागतंय. आई काय बोलताय तुम्ही? कसल गूढ? आणि काय प्रकरण आहे हे ? काय केलय त्यांनी ? मंगेशचे (रव्याचे वडील) आजोबा आणि ...अजून वाचा

9

अपूर्ण बदला ( भाग ९ )

गुरुजीना पोहचायला अजून वेळ लागणार होता, दुसऱ्या गावात असल्यामुळे त्यांना चांगलाच वेळ लागणार होता, त्यांनी भल्या भल्या भूताना आपल्या लहान पेटी) मध्ये भरून त्यांना नाहीसे केले होते. त्यांची चांगलीच महती होती. बारा गावाच्या भूतांना पाणी पाजलं होत. रव्याची अवस्था बिकट होत होती तो जोर जोरात ओरडत होता. हरीला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे काय होतंय त्याच्या मित्राबरोबर? त्याला रडू आवरेनासे झालेलं. आपल्या भावासारख्या मित्राची अशी अवस्था कुणाला बघवेल .आणि तो जोरजोरात हुंदके देऊन रडू लागला हरीला असं रडताना पाहून हरीची आई जरा जास्तच काळजीत दिसत होती .तिला चांगलाच माहिती होत रव्या हरीला सख्या भावासारखा होता. म्हणून ती त्याला ...अजून वाचा

10

अपूर्ण बदला ( भाग १० )

तू मला नाही थांबू शकत. मी ह्याला घेऊन जाणार, तूच काय वरून परमेश्वर जरी आला तरी मला काही करू नाही. चक्क देवाला आव्हान केलं. घोगऱ्या आवाजात आणि ह्यावेळी आवाजात सामर्थ्य आणि क्रूरतेची भावना दिसत होती. गुरुजींनी मंत्र चालू ठेवले. प्रत्येक लांडग्याला वाटत आपण श्रेष्ठ पण त्याला कुठे माहिती होत कि पाठीमागे वाघ पण आहे.गुरुजींच्या मंत्राबरोबर घरामध्ये जोर जोरात विचित्र रडण्यासारखे, गहिवरण्याचे आवाज येऊ लागले. गुरुजींच्या मंत्राचा आणि त्या भुगुतीचा चांगलाच परिणाम त्या वाईट शक्तीवर होऊ लागला. जस जसे गुरुजीनी मंत्रांचा आवाज वाढवला तसतसा रव्याच्या म्हणजेच त्याच्या आतमध्ये प्रवेश केलेल्या त्या वाईट शक्तीवर तीव्र वेगाने वार झाल्यासारखे झाले. आणि त्यांनी ...अजून वाचा

11

अपूर्ण बदला ( भाग ११ )

बघता बघता रात्रसुद्धा संपून गेली. दिनचर्या आपला दिनक्रम तिच्या वेळेनुसार निभावत होती. सकाळ झाली आणि कोंबड्याने त्याचे नित्यनियमाचे म्हणजेच काम केले. म्हणतात ना मुकी प्राणी, पशु आपला दिनक्रम किंवा काम वेळेअभावीच पार पाडतात. त्यांना रोज रोज सांगायला किंवा आठवण करून द्यावी लागत नाही. माणसाला सकाळी लवकर उठायलाही दुसऱ्या माणसाचा आधार लागतो. तो जेव्हा उठेल तेव्हा आपण राजा माणूस उठणार, नाहीतर मनसोक्त वेळेत बांधतंत्री करून किंवा अजून थांब करून, करून पूर्ण एक दोन दास झोप घेतो. शिवाय आत्ता सायन्स आणि टेकनॉलॉजिही पुढे गेले. एक अलार्म लावला कि सकाळी वेळेवर तो वाजतो. ह्या अशा गोष्टीवर माणूस अवलंबून राहिला आहे. तो विसरत ...अजून वाचा

12

अपूर्ण बदला ( भाग १२)

रव्याच्या घरी जमलेले पाहुणे मंडळी जे त्याचा आई वडलांना सांत्वना द्यायला जमा झालेले, ते आत्ता हळू हळू जाऊ लागले. आजी सुद्धा होती तिथे त्यामुळे रम्या आपल्या आजी आणि आईबरोबर तिथेच थांबला. हरीसुद्धा तिथेच होता.त्याचे सगळे मित्र अजूनही तिथेच होते. त्यामुळे ते सगळे हरीच्या घरी रव्याच्या आठवणीमध्ये आसवे गाळत होती. जरी त्याने त्याचा बदला घेतला नसेल तरी तो वापस येणार आजी मध्ये बोलल्या. म्हणजे ? प्रश्नार्थक चेहऱ्याने सगळेच आजीजवळ पाहत होते. जरी रव्याचा आकलनीय मृत्यू झाला असला. तरी तो त्याच्यामुळेच झालाय. हे काही आपल्याला टाळायला नकॊ काय मंगेश ? म्हजेच रव्याचे बाबा. रव्याची आई ,हरीची आई आणि रम्याची आई ...अजून वाचा

13

अपूर्ण बदला ( भाग १३)

वैद्यबुवांनी हरीला तपासले आणि हरीच्या बाबांकडे बघून त्यांना विचारले ह्याने कसली धास्ती घेतली होती का? म्हणजे असं काही तरी तो घाबरलेला आहे नाहीतर कुठे मारामारी केली का? ह्याच शरीर पूर्णतः थरथर कापतंय. घाबरला असल्या कारणानेच त्याने ताप घेतला आहे. मी तुम्हाला काढा बनवून देतो तो त्याला पाजा मग ठीक होईल तो. असे सांगून वैद्यबुवा निघाले जाताना ते कोणालातरी धडकले असे चेहऱ्यावर हावभाव आणून मागे पुढे बघितलं. काय झालं वैद्यबुवा? बाबानी विचारलं. पण वैद्यबुवा काहीही न बोलता तेथून निघून गेले. हरीच्या आईला चांगलाच धक्का बसला होता. आणि तो साहजिकच होता तिने अगोदरही असच प्रकरण आपल्या डोळ्यांनी बघितले होते. सोबत त्याचा ...अजून वाचा

14

अपूर्ण बदला ( भाग १४ )

बाबानी कधीच ओळखलेले, तो आलाय! त्यामुळे तिला शु करून मुलांना एकसाथ जमवले. आणि आणि तो आवाज आला. मी सरली इतकी वरीस, आला तो दिवस नजदिक, करुनि अंत तुझ्या मुलाचा जसे घेतले वचन मरताना तेच पूर्ण करावाया आलो मी परतून.." हिईईई हिहीई......हा ............हा...आसा हसण्याचा आवाज सुरु झाला आणि क्षणातच बंद झाला. बाहेरील वातावरण शांत झालेलं. कदाचित तो तिथे त्याची आलेली चाहूल सांगायलाच आलेला. सगळे भीतीने गार झालेले. कुणाची हिम्मत होत नव्हती पुढे व्हायची. आहो कोण आहे हा ? आणि हे काय प्रकरण आहे? आणि त्याचा माझ्या मुलाशी काय संबंध ? ती ढसाढसा रडायला लागलेली. तिच्या प्रमाणे तिथे ...अजून वाचा

15

अपूर्ण बदला ( भाग १५ )

आई आई तो वापस आला. त तो तो हरीला घेऊन जायला आलाय. कोण तो? आणि काय स्वप्न बघितलंस ? आईने प्रश्नार्थक नजरेने विचारलं. तोच जो काळ हरीच्या घराच्या वरून जोर जोरात काहीतरी बडबडत होता. किहळत होता. काय? म्हणजे! आईला तो काय बोलतोय काय समजलं नाही. आई काल हरीच्या घरी शाळा सुटल्यानंतर गेलो होतो. आणि काही तासानंतर संध्याकाळी कोणी तरी त्यांच्या घरावर येऊन जोर जोरात ओरडत होता बाहेर जोरात वारा सुटलेला, त्यामुळे आम्ही सगळेच घरामध्ये गेलेलो , तो जे काही बोलत होता ते त्याच्या राहिलेल्या बदल्याबद्दल बोलत होता. रम्याच्या आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलेले. तिने लगेच त्याला विचारले म्हणजे तू पण ...अजून वाचा

16

अपूर्ण बदला ( भाग १६)

गाडीच्या बाहेर पाऊल टाकताच एक छोटीशी गार वाऱ्याची झुळूक त्या महिलेच्या मानेवरून गेली. तिला मनात धस्स झाले ती गांगरून तिकडे पाहू लागली. नकळत तिच्या डोळ्यातू असावे गळू लागली. तिचा त्रास त्यालाही समजत होता पण त्याचीही तीच अवस्था होती. मनावर दगड ठेऊन सगळं विसरण्याचा त्याचा अनिश्क्रिय प्रयत्न तो करत होता. त्याने तिला आपल्या बाहूंमध्ये जखडून चालू लागला. आणि सुरेशच्या घराच्या दिशेनं म्हणजेच हरीच्या घरी येऊन ते दांपत्य उभे राहिले. रव्याच्या आईबाबांना अचानक आणि एवढ्या तातडीने आलेले पाहून हरीच्या बाबांचा आनंद गगनात मावणारा नव्हता. पण त्यांचंही दुःख होतच म्हणून वेळेचे अनुमान ठेऊन ते त्याच्याकडे पाहत होते. आणि आल्याबद्द्ल कडकडून आलिंगन दिले. ...अजून वाचा

17

अपूर्ण बदला ( भाग १७ )

दुसऱ्याच दिवशी गावावर संकट येणार असे संकेत दिसत होत.नव्याचा दिवस उजाडलेला पण दिवस मात्र वाटत नव्हता.सकाळ झालेली ती पण जिथे उन डोक्यावर यायला पाहिजे तिथे सगळ्यांच्या छतावर काळे ढग राक्षशी अवतारात अवतरलेले. देवालाही त्यांनी आव्हान केलेलं आज काहीही झालं तरी जीत हि विनाशाची सैतानाची होणार. संपूर्ण गावामध्ये अविराम शांतता पसरलेली सगळ्यांचंच अवसान पडलेले, कोणालाच धर्य नव्हते. सगळयांचाच कपाळावर आठी आलेल्या आपल्या गावावर कोप झालाय म्हणून हे भोगायला येतंय.कोणी घराच्या बाहेर पडायला मागत नव्हतं.आकाशात कावळे काव काव करून इकडे तिकडे येरझारा घालत होत. आज त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळच दिसत होते ते साधारण कावळे वाटत नव्हते. त्याचे डोळे भकास लाल झालेले आणि ...अजून वाचा

18

अपूर्ण बदला ( भाग १८ )

काही लोक मशाली घेऊन नदीच्या दिशेने आले. सगळ्यांनाच पुढच्या संकटाची जाणीव झालेली त्यातच त्या सैतानाच्या कैदेत असलेल्या कावळ्यांनी त्यांच्या नख्याने गावकऱ्यांवर हल्ला चढवला. खुपजण घायल झाले. सर्वानी एकमेकांच्या हातातल्या मशालीनी कावळ्यांना जागीच पाडले. सगळ्या कावळ्यांना पडलेले पाहून सैतान चवताला. आणि एकदाच जोरात ओरडला त्याच्या ओरडल्याने सगळीकडे एक भीषण वादळच तयार झाले. आणि त्या वादळात तयार झाली ती त्या सैतानाची भयानक आकृती. आंब्याच्या झाडासमोरच एक काळभोर उंच भयानक खोलवर गेलेले डोळे बाहेर पडलेली बिभूले अर्धी मान तुटलेली लोंबकत जळलेल मांस भयानक दिसणारी आकृती तो सैतान आता स्पष्ट दिसू लागला. त्या भयानक सैतानाला बघून सगळेच भेदरली, त्यांचं अवसान सांडल. भीतीमुळे हात ...अजून वाचा

19

अपूर्ण बदला ( भाग १९ )

संध्याकालची वेळ होती गावात मांत्रिक बोलवला होता. सुरेशच्या घराबाहेर मांत्रिकाने आपले तंत्रमंत्राचे आखाडा सुरु केला सगळीकडे लिंबू मिरची, भुबुत्ती आणि बरोबर आगीचा तांडव आणि सुरु झाला तो मांत्रिकाच्या मंत्रांचा बोलबाला. हरी आणि त्याचे सगळे मित्र हे पारखून बघत होते. समोर काटीला बांधून ठेवलेली कवटी समोर अग्निकुंड आणि बाजूने नुसतीच लिंब आणि त्यांना टोचलेल्या टाचण्या. आजची संध्याकाळ खूप भयंकर होणार आहे हे सर्वानाच जाणून होत. म्हणूंन सगळेच आपापल्या घरात होते, हरीला थोडी भीती जाणवत होती आज तो सैतान पुन्हा येणार आणि तांडव करणार तेवढ्या तिथले वातावरण बदलू लागले. आंब्याच्या झाडाच्या दिशेनं वादळ येऊ लागले आभाळ काळभोर झालं.सगळीकडे जळण्याचा दर्प येऊ ...अजून वाचा

20

अपूर्ण बदला ( भाग २० ) - Last Part

इकडे सुरेश आणि मंगेश घायाळ झालेले त्यांना काही सुचत नव्हते. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता, तोच मंगेशची बायको म्हणाली गुरुजींनी सांगितलेले याचा सामना फक्त आणि फक्त एक चांगली आत्मा करेल यासाठी आपल्याला त्या गुरुजींना वापस आणावे लागले. पण तेवढा वेळ नव्हता ह्यांच्याकडे. त्यांनी देवाला गाराने घातले सगळ्यांनी हात जोडून देवाचा धावा करत होते. हरी आणि त्याचे मित्र डोळ्यातील आसवे पुसत देवाचा धावा करू लागले. रम्याची आजीने तर सगळं देवावरच कुरबाण केलं. देवा सांभाळ रे ह्या पोरांना. आता तूच काय करशील ते. असं बोलत सगळ्यांनी देवाला डोळे मिटून हाका मारू लागले. सगळीकडे वारे सुरु झालेले हवामानात बदल झालेला घरांमधून भांडी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय