मंगला खर तर सगळं आठवलं की अंगावर शहारे येतात. आणि मन सुन्न होऊन जातं! आता चांगले सहा महिने झाले त्या सगळ्याला, तरीही झोप चाळवतेच! आज ते पत्र येऊन पडले आणि जीव भांड्यात पडला. बेबीचं लग्न आहे म्हणे. मुलगा नागपूरकडचा. पुण्यात आई-वडील आहेत. नोकरीला नागपुरात आहे म्हणे. पण ही पसंत पडली पाहिजे ना. हं जाऊ देत. उद्या हेच ठरवतील पुढं काय करायचं ते. आता इतकं त्यांच्यामुळं निस्तरलयं! साहजिकच काका-काकूला, ह्यांना बोलावल्याशिवाय लग्नाचं पुढचं ठरवणं कसं प्रशस्त वाटणार? जाऊ दे. उद्या पाहू.
Full Novel
अंधारछाया - 1
अंधारछाया एक मंगला खर तर सगळं आठवलं की अंगावर शहारे येतात. आणि मन सुन्न होऊन जातं! आता चांगले सहा झाले त्या सगळ्याला, तरीही झोप चाळवतेच! आज ते पत्र येऊन पडले आणि जीव भांड्यात पडला. बेबीचं लग्न आहे म्हणे. मुलगा नागपूरकडचा. पुण्यात आई-वडील आहेत. नोकरीला नागपुरात आहे म्हणे. पण ही पसंत पडली पाहिजे ना. हं जाऊ देत. उद्या हेच ठरवतील पुढं काय करायचं ते. आता इतकं त्यांच्यामुळं निस्तरलयं! साहजिकच काका-काकूला, ह्यांना बोलावल्याशिवाय लग्नाचं पुढचं ठरवणं कसं प्रशस्त वाटणार? जाऊ दे. उद्या पाहू. मी हळूच लताला मधून ह्यांच्या पलिकडे सरकवली. सरळ ह्याच्या कुशीत गेले. ह्यांचा हात अंगावर घेतला. इतकं निर्धास्त वाटलं! ...अजून वाचा
अंधारछाया - 2
अंधार छाया दोन दादा स्वामींची मात्र कमाल आहे. माझ्यासाठी स्वामींनी नातू शेठना शब्द टाकला! म्हणाले, ‘ शेठ, या जनार्दनला धंदा द्या बरं. सचोटीचा व चार पैसे मिळवणारा हवा. इथे इस्लामपुरात आल्यापासून माझ्या माहितीचा आहे हा. विश्वासू आणि सरळ मनाचा आहे. सध्या त्याला काही धंदा हवा आहे. मी त्याला ओळखतो. माझी दीक्षा घेतलीयाय त्याने. त्याला धंदा देणे तुमचे काम.’ शेठ काही बोलले नाहीत. पण नाही ही म्हणाले नाहीत. नंतर खाली डॉक्टरांच्याकडे चौकशी केली. दुसऱ्या दिवशी मला भेटायला सांगितले. पुढे मी भेटलो. त्यांच्या सोबत माधवनगरला आलो. महिन्याभरातच लक्ष्मी टॉकीजची मिलच्या मालकीची जागा मला भाड्याने देऊन एका हुंडीतून पैसे देऊन, त्यांनी माझ्या ...अजून वाचा
अंधारछाया - 3
अंधारछाया तीन बेबी स्वारगेटवर सुभाष, श्रीकांता आले होते पोहोचवायला. सुभाषच्या ऑफिसातले होते कोणी. त्यांच्या सोबतीने बसले मी सातच्या मिरज सुभाषला काळजी फार, ‘बेबी, पुस्तक घेतलीस का? काल आणलेली साडी ब्लाऊझ घेतलास का? दुपारच्या जेवणाचा डबा घेतलास ना? श्रीकांताला गाडी सुटायला निघता निघता केळी आणायला पिटाळलंन! ऑफिसच्या माणसाला सारखं सांगत होता, ‘प्रथमच जातेय एकटी. नीट लक्ष असू दे.’ मला तर हसूच येत होतं त्याच्या काळजीचं. जरा घाबरट आहे आमचा सुभा. एसटी चालता चालता केळी हातात पडली. हात हालवत दोघे दिसेनासे झाले. गाडी मेन रोडवर आली. दहा-बारा मिनटात कात्रजच्या वाटेवर लागली. ओसाड डोंगर, लांबवर सिंहगड पाहून मला एकाकी वाटलं. वाटलं, आपण ...अजून वाचा
अंधारछाया - 4
अंधारछाया चार मंगला गेले चार रात्री काही माझा डोळ्याला डोळा नाही. ह्यांनी सांगितलं, ही बेबी अशी कड्याकाढून बाहेर जाते मी हबकलेच. हे रात्री जागे झाले म्हणून बरं. गेली असती पुढे चालत एकटी तर शोधायची कुठे तिला ? आधीच ही नवीन गावात. रस्ते माहित नाहीत. काही म्हणता काही होऊन बसलं असतं बरं. मी यांना सांगितलं, ‘आधी सगळ्या दारांना कुलुपं घाला रात्रीची. मगच मला झोप येईल.’ हे म्हणाले मला, ‘विचार तिला काय होतय झोपल्यावर म्हणून. पण ती म्हणते, ’काही नाही मी झोपते छान. इथे आल्यापासून झोप छान लागतेय ’. मला पुढे काही सुचेना विचाराव कसं ते. आता हे अंघोळ करून येतील ...अजून वाचा
अंधारछाया - 5
अंधारछाया पाच मंगला सदासुखला तीनचा शो पाहिला. तिथेच कॅफे रॉयलमधे आंबोळ्या, टॉमॅटो आम्लेट खाल्ले. परत टांग्यातून येता येता साडे झाले. काकू वाट पहातच होत्या आमची. अंथरुणे घालून पडलो. मुलं झोपल्यावर हे दारांना कड्या कुलुपं लावून आले. उशी खाली किल्ल्या ठेवून झोपलो. पण कालचा प्रकार आठवून झोप थोडीच येत्येय? रात्र अस्वस्थेतच गेली. हे ऑफिसातून संध्याकाळीच एकदम येणार असा निरोप तातोबा घेऊन आला. मग आम्ही तिघींनी जेवणं उरकून घेतली. पडलो मधल्या खोलीत मासिकं वाचत. इतक्यात दारावरची बेल वाजली. जरा त्रासातच दार उघडले, तर दोन अनोळखी बायका दारात. म्हणाल्या, ‘आम्ही सांगलीहून आलोय. आपण महिला मंडळाच्या अध्यक्ष आहात, म्हणून भेटायला आलोय.’ दारातून कटवणार ...अजून वाचा
अंधारछाया - 6
अंधार छाया सहा बेबी गुरूजींनी जे सांगितलं त्याच्यावर माझा विश्वासच बसेना! काय मला कोणी झपाटलय? कस शक्य आहे? मी माझी मीच आहे. खातेय पितेय, आणखी कोण असणार माझ्या शरीरात? गुरूजी म्हणाले, ‘हिचा पत्रिका जरा विचित्र आहे. अनिष्ट ग्रहयोग मान आहे. शिवाय सध्या साडेसातीही चालू आहे. तिच्या राशीला. तेंव्हा त्रास हा होणारच.’ ते ठीकच होत. माझी तब्बेत ही अशी लुकडी सुकडी. शिक्षणाचे असे तीन तेरा वाजलेले. तेंव्हा कुंडलीच्या भविष्यावर माझा विश्वास बसला. पण पुढे लागिराबद्दल म्हणताना मला काही खरंच वाटेना. अक्का म्हणाली त्यांना, ‘गुरूजी आम्हाला नक्की काय ते सांगा बरी होण्यासारखी आहे का तुमच्या उपायांनी? का नाहीतर आम्ही तिला परत ...अजून वाचा
अंधारछाया - 7
अंधार छाया सात शशी आज शुक्रवार म्हणजे एच व्ही सर दाढी करून येणार आणि चिडणार! मग स्पेलिंग चुकलं की पट्ट्या हातावर! विचार करत मी एकनॉलेजमेंट म्हणजे पोच असे पाठ करत होतो. मनात येई दाढी करणं आणि रागावणं याचा काही संबंध असेल तर मी दाढी करणार नाही मोठेपणी! आत आई बेबी बोलत होत्या. लती काहीतरी दौत पेनाशी चाळे करत होती. आजी दुर्वा तोडायला फिरत होत्या बाहेर फुलझाडांपाशी. दादा सायकलवरून गेलेले पाहिले ऑफिसला, मग मी सकाळ घेतला हातात. ‘क्रीडा विषयक बातम्या हे पुढच्या पानावर का देत नाहीत? आहाला काय करायचय ते मंत्री काय म्हणताय ते वाचून.’ जरा सिनेमाच्या जाहिराती वाचेपर्यंत आईची ...अजून वाचा
अंधारछाया - 8
अंधारछाया आठ मंगला कॅलेंडरचा नोव्हेंबर महिना फाडला. बेबीला येऊन आता दोन आठवडे झाले. डिसेंबरचे एकतीस दिवस. डिसेबर महिन्याचे पान नवे कॅलेंडर लावीन तेंव्हा काय झाले असेल? करायला घेतलंय हे आपण, पण निभेल ना असे मनात सारखे वाटे! मग ह्यांनी सांगितल्याचे आठवे. ‘मंगला, एक लक्षांत ठेव आपण तिच्या चांगल्यासाठीच करायला जातोय ना मग होऊ दे काहीही. तू सर्व भार स्वामींच्यावर सोपव. जपावर विश्वास ठेव. तूच म्हणालीस ना त्या दिवशी, स्वामींच्या फोटो, समोर तू प्रार्थना केलीस आणि बेबीच्या वागण्यात फरक पडला म्हणून?’ ‘हो बाई’ मी म्हणाले होते. डॉ फडणीसांनी पुन्हा चेक अपला बोलावले होते. एक दोन टॉनिक्स दिली म्हणाले, ‘दर आठवड्याला ...अजून वाचा
अंधारछाया - 9
अंधारछाया नऊ दादा मंगला आत बेबीकडून जप करून घेत होती. पडल्या पडल्या मी विचार करत होतो. आता यापुढे काय या संबंधी. भूत-पिशाच निकट नहीं आवै । महाबीर जब नाम सुनावै ।। हनुमान चालिसातील चरण आठवला! वाटले की ही भूत पिश्शाच योनी आपण मानतो! एखाद्याचा आत्मा अतृप्त राहिला की त्याची वासनापूर्ती होईतो आत्मा फिरत राहातो अंतरिक्षात. आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. या जन्माची फळे पुढच्या जन्मात भोगायची असे आपले शास्त्र सांगते. पुर्वीचे बारा जन्म आपण कोण कोण होतो याची स्मृती बहिणाबाई सारखी अडाणी संतबाई ही सांगते! इंग्लंड-अमेरिकेतही लोक आहेत बरेच ते ही आठवतात आपला पुर्वजन्म! म्हणजे आधीचा जन्म आणि आत्ताचा जन्म ...अजून वाचा
अंधारछाया - 10
अंधारछाया दहा मंगला गुरूजींना आलो भेटून सांगलीहून. अजून सत्तेचाळीस माळा व्हायच्या होत्या. गुरूजी म्हणाले, ‘आता तीच करेल जप स्वतः. काय होतय ते. ही मंतरलेली विभूती देतोय ती फक्त सकाळी लावा. फरक दिसेल. नंतर हे आणि गुरूजी बसले होते बराच वेळ गप्पा मारत. मी बेबीला घेऊन, ब्रेड थोडी भाजीबीजी घेऊन स्टँडवर गेले. हे ‘लॉर्ड्समधे कटींग वगैरे करून येतो’ म्हणाले, ‘सावकाश.’ बेबी हात पाय धुवून बसली देवासमोर. माळ हातात घेऊन. म्हणाली, ‘करू सुरू माळा? तू आणि मी दोघीही म्हणूया बरोबरच! ‘चला, आज हात धरून म्हणावे लागले नाही म्हणायचे.’ असे म्हणत मी भाकरीचे पीठ मळायला घेतले आणि बेबी बरोबर जपाला लागले. बेबी ...अजून वाचा
अंधारछाया - 11
अंधारछाया अकरा दादा शेठचा फोन आला म्ह्णून ऑफिसमधून गेस्ट हाऊसवर गेलो. परत येता येता आठ वाजले रात्रीचे. मंगलाला म्हणालो, हरिपाठाच्या अभंगाचे पारायण करणार आहेत. वासुदेवराव जोश्यांना बोलावलय प्रवचन करायला. विठोबाच्या देवळात पुढच्या महिन्यात सुरवात करणार आहेत.’ जेवणं झाली तशी मंगला म्हणाली, ‘आम्ही जाऊन आलो गुरूजींकडे. त्यांना सांगितले हे स्वप्नांचे.’ तसे म्हणाले, ‘ही चांगली गोष्ट आहे. आपल्या जपाने बरीच प्रगती झाली आहे असे समजा. कारण ह्या अवस्थेत जी स्वप्ने, जे विचार, बेबीला येत होते, याचे भान तिला आधी नसे. आता तिला तिच्या स्वप्नांची कल्पना आलीय. आता ती स्वप्ने ही कमी होतील तशी तिची बरीच सुटवणूक होईल.’ मला खूपसं हायसं वाटलं. ...अजून वाचा
अंधारछाया - 12
अंधारछाया बारा मंगला संक्रांतीचे तिळगूळ, गुळाच्या पोळ्या, सगळं यथास्थित झाले. आपले दहा पंधरा दिवस बरे गेले म्हणायचे असे मनात त्या दिवशी ती विहिरीकडे गेली. यानंतर दरवाजाकरून घेतला रहाटाच्या खालच्या जागी. त्याला कुलुपाची व्यवस्था केली. तेंव्हा हायसे वाटले. पण तेंव्हा पासून बराच फरक पडलाय तिच्यात. एक प्रकारचा अल्लडपणा आलाय असे वाटले. गुरूजींना भेटून सांगितले. तसे ते म्हणाले, ‘आता महत्वाची पायरी आली आहे. हीच तिची मानसिक स्थिती तिला सोडवणार आहे आपल्या जंजाळातून. पण चुकून पुन्हा निराशा वाटली तर मात्र खंड पडेल बरे व्हायला.’ परवा म्हणाली, ‘मी माझ्या मैत्रिणीला पत्र पाठवणार आहे.’ पण मग बराच वेळ थांबून लिहिलेन ते आईला पत्र. मला ...अजून वाचा
अंधारछाया - 13
अंधारछाया तेरा मंगला बेबीला कॉफी दिली. पुन्हा झोपवली कॉटवर. अंगावरची लाली कमी झाली. पण तिच्या हाताला हात लाववेनात! हातपाय तापले होते. कपाळावर हात ठेवून पाहिला. तर कपाळ थंड होते! ताप पाहिला तर साडे अठ्ठ्याणण्णव काय करावे कळेना. झोपल्या झोपल्या कॉफी पिते म्हणाली, म्हणून दिली कढत कढत. डोळा लागला असे वाटून मी गेले स्वैंपाकघरात. आज जपाच्या माळा झाल्या नाहीत हिच्या. रात्री मग जागावे लागते, एकशेआठ माळा पुऱ्या करायला! दुपारी हे आले. जेवले. तरी ही झोपलेलीच होती. मुले दुपारच्या सुट्टीत खायला आली. तेंव्हा म्हटले, ‘चार घास खाऊन घेतेस का बेबी? तर म्हणाली, ‘नको पडू दे.’ मुले शाळेत गेली परत. आजी म्हणाल्या, ...अजून वाचा
अंधारछाया - 14
अंधारछाया चौदा मंगला अशी बोलली ही गधडी तडा तडा. मला सुचेना काय करावं! एरव्ही एक थप्पडच ठेऊन दिली असती. अद्वा तद्वा बोलली असती ती तर. पण शारीरिक त्रासानं आधीच बेजार त्यात अमावास्याची रात्र! मी ही आवरलं मनाला. बराच वेळ पुटपुटत होती काही काही. मग आम्ही गाद्या टाकल्या. पडलो. तरी मनातून काही केल्या जाईना तिचे बोलणं. काकांनी पाठवली तिला अभ्यास करायला. तब्बेत सुधारायला. पण हिचं हे लचांड निस्तरता निस्तरता आलेत नाकी नऊ. बरं काकांना कळल तर म्हणतील तुला कोणी सांगितलं होते हे नसते धंदे. त्यांचा आधीच भुता-खेतांवर विश्वास कमी. शिवाय जप-जाप्य म्हणजे संतापाने त्यांना तिडीक येते. त्यांना जर हे कळलं ...अजून वाचा
अंधारछाया - 15 - अंतिम भाग
अंधार छाया पंधरा शशी लाकडं जमवायला पोर येत होती. सकाळपासून मी माझी बॅट, स्टंपा आत टाकल्या कोठीच्या खोलीत. बागेतल्या फळ्या घरात टाकल्या आणि फाटकाशी होतो लक्ष ठेऊन. कुणी पोरं येत नाहीत ना पहायला! मन आत होते. मावशीपाशी. गेल्या अमावास्येपासून पंधरा दिवसात बोलत नव्हते कुणी फार. दादा रामायणाचे वाचन करीत, ऑफिसमधून आले की. आई मावशीकडून जपाच्या माळा करून घेई. कुणीच कुणाशी गप्पा मारत नव्हते. ना हसून खेळून होते. त्यात आज पौर्णिमा. दादा आईला सांगत होते, ‘आज पुन्हा जपले पाहिजे तिला म्हणून.’ परवा माझ्याच्याने राहाववले गेले नाही. मावशीची गोष्ट मी मित्रांना सांगायला लागलो, स्टेशनवरून फिरून येताना. सुभ्या म्हणाला, ‘भिती वाटतेय, पण ...अजून वाचा