हि कथा आहे .. अभय ची ..आणि त्याच्या ..वेड्या प्रेमाची...अभय ...तसा दिसायला .. फिल्मी हिरो सारखा ..अजिबात नव्हता. साधा सरळ..काळा सावळा.. उंच,केस मात्र इतरानि हेवा करावेत इतके सुंदर. दिसायला जरी हिरो नसला तरी...मनाचा राजा होता..सुख असो वा दुःख अभय नेहमी इतरांच्या मदतीला धावायचा... शेजारी पाजारी कोणाचं काही हि काम असो .. सर्वांच्या तोंडी एकच नाव...आपला अभय...आई वडीलांचा लाडका .. एकुलता एक मुलगा..पण लहानपणापासूनच त्यांच्या मनावर झालेले संस्कार म्हणजे ...हे विश्वची माझे घर.. त्यामुळे तो प्रत्येकाला आपलं मानायचा आणि आपल्या स्वभावाने सर्वांना आपलसं करायचा..

Full Novel

1

जानू - 1

हि कथा आहे .. अभय ची ..आणि त्याच्या ..वेड्या प्रेमाची...अभय ...तसा दिसायला .. फिल्मी हिरो सारखा ..अजिबात नव्हता. साधा सावळा.. उंच,केस मात्र इतरानि हेवा करावेत इतके सुंदर. दिसायला जरी हिरो नसला तरी...मनाचा राजा होता..सुख असो वा दुःख अभय नेहमी इतरांच्या मदतीला धावायचा... शेजारी पाजारी कोणाचं काही हि काम असो .. सर्वांच्या तोंडी एकच नाव...आपला अभय...आई वडीलांचा लाडका .. एकुलता एक मुलगा..पण लहानपणापासूनच त्यांच्या मनावर झालेले संस्कार म्हणजे ...हे विश्वची माझे घर.. त्यामुळे तो प्रत्येकाला आपलं मानायचा आणि आपल्या स्वभावाने सर्वांना आपलसं करायचा..अभय अभ्यासात हुशार होता..एकदम शांत स्वभावाचा...आई वडीलांची काम तो कधीच टाळत नसे.. कधी कोणिशी भांडण नाही.. ...अजून वाचा

2

जानू - 2

अभय ला जानू च नाव समजलं होत ..तिला पाहिल्या पासूनच तो तिला माझी जानू समजून बसला होता ..आपली कधी होईल ..कधी तिच्याशी बोलू अस झालं होत त्याला ..उन्हाळी सुट्टी मध्येच तर जानू तिथे राहायला आली होती ..सुट्टी संपून आता शाळा सुरू झाली होती..९वी ला तर होते ते आताशी ...दोघे ही एकच शाळेत ..पण ..शाळेला ..अ,ब,क अशा तुकड्या असल्यामुळे ते एकाच वर्गात नव्हते ..याच भलतच दुःख अभयला झालं होत ...पण जानू मात्र अजून ही या सर्व गोष्टी पासून अनभिज्ञ होती..तिला अभय च्या भावना ..त्याची ओढ याबद्दल जराशीही कल्पना नव्हती.... जानू आताशी सर्वांना ओळखू लागली होती ... मिहुं आणि तिचं ...अजून वाचा

3

जानू - 3

कधी कधी भोसले सर ..वर्गाला खेळायला सोडत ..आज ही ४ ला भोसले सर वर्गात आले ..शाळा सुटायला अजून एक वेळ होता ....जानू अ तुकडित तर अभय ब मध्ये होता ..त्यामुळे ते एकाच शाळेत असले तरी ..एका वर्गात मात्र नव्हते ...अभय नेहमी चोरून चोरून जानू ला पाहत असे पण जानू ला मात्र याचा पत्ताच नव्हता...भोसले सर नी जानू च्या वर्गाला मैदानावर नेले ...सर्वांना वाटलं बर झाल ..निदान सरांचा लेक्चर तर ऐकावा लागणार नाही ..पण ..भोसले सरांना आज कोणती लहर आली होती कोण जाणे ? त्यांनी सर्वांना कवायत प्रकार घेणार असल्याचं सांगितलं..सर्वजण ओळीत उभे राहिले ..पाहिले ..खडे प्रकार झाले ..एक .. ...अजून वाचा

4

जानू - 4

जानू वर्गात येते ..सखी तर तिची वाटच पाहत असते ..जानू दिसताच ती तिच्या कडे जाते आणि ..खूप खुशीत तिला ..की ..जानू ला जो प्रोजेक्ट हवा होता तो ब तुकडीतील अभय कडे आहे ...तोच अभय जो तिच्या शेजारी राहतो..हे ऐकुन जानू च्या जीवात जीव येतो . जानू :पण सखी तुला कोणी सांगितलं ग ? सखी : अग तो अप्रीचा भाऊ आहे ना त्याच्या वर्गात ..अप्रिन भावाला सांगितलं ..तर त्यानेच सांगितलं ..की ..अभय कडे आहे म्हणून..अप्रीन मला रात्री सांगितलं.. ग..म्हटलं चला बर झाल ..एकदाचा जानू चा प्रोजेक्ट तरी मिळाला. जानू:thank you.. ग सखी ... मला तर खूप टेनशन आल होत .. ...अजून वाचा

5

जानू - 5

जानू प्रोजेक्ट घेऊन घरी आली .बाबा अजून आले नव्हते..जानू ला बर वाटल..आई ने विचारलं मिळाला का प्रोजेक्ट ?..जानू नी म्हणून सांगितलं..आणि ती आपल्या खोलीत गेली.तिने प्रोजेक्ट पेपर काढले ..अभय चा प्रोजेक्ट तिने उघडून पहिला...," अरे वा..." सहज तिच्या तोंडातून निघाल," ..किती छान..? " अभय च अक्षर खूपच सुंदर होत ..त्यात त्याने प्रोजेक्ट ची मांडणी ही एकदम उत्तम केली होती ...पेपर वरती पहिलं.. फळाच नाव त्यानंतर त्या खाली चौकट आकुन त्यात त्या फळाच् चित्र त्या खाली त्याची माहिती ..त्याचे प्रकार..ते फळं कुठे प्रसिद्ध आहे ते ठिकाण..जानू ला प्रोजेक्ट खूप छान वाटला..हा अभय तर फारच हुशार आहे ..अस ती मनाशीच म्हणाली..दोघांचे ...अजून वाचा

6

जानू - 6

नवरात्र जवळ आली होती ..चाळीत सर्व गडबड चालू होती..अभय तर फार उत्साहाने सर्व करत होता.चाळीच्या मधोमध असणाऱ्या काट्यावर सुंदर सुरू होती ..दुर्गा मातेची मूर्ती तिथेच बसवणार होते..चाळीत लायटिंग लावण्याचे काम चालू होते ..अभय शिडी वर उभा राहून ..लाईट लावण्याचे काम करत होता..पण त्याच सर्व लक्ष जानू कडे होत ..जानू अंगणात येऊन काही तरी करत होती..अभय च् सर्व लक्ष आता फक्त जानू कडे लागलं ..आणि त्याला कळलच नाही ..आणि तो धाडकन शिडीवरून जमिनीवर कोसळला..त्याला शॉक लागला होता..आवाज ऐकुन जानू ने समोर पहिलं तर अभय खाली पडला होता..त्याला लागलं का पहावं म्हणून ती जायला निघाली च होती की ..सर्वजण जमा झालेले ...अजून वाचा

7

जानू - 7

चाळीच्या मधोमध कट्ट्यावर दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना झाली..सर्वांनी मिळून आरती केली.अभय खूप श्रध्देने सर्व कामे करायचा..नवरात्रीला दररोज नव नवीन घेतले जायचे .एकदम छान वातावरण असायचं. मस्त दिवस जात होते ..रोज जानू ला पाहणं दिवसातून किमान एकदा का होईना तिच्या सोबत बोलणं ..खूप खुश होता अभय . नवीन वर्ष सुरू झाल. मकसंक्रांती दिवशी तर जानू काही बाहेर येईना म्हणून अभय ,संजू,बिट्टू तिच्या घरी गेले ..दारातून आत जाणार तोच समोर जानू चे बाबा दिसले ..संजू आणि बिट्टू ने तर तिथून पळ काढला ..अभय ही आत न जाताच मागे वळून जावू लागला की इतक्यात जानू च्या बाबांनी त्याला पाहिलं .. बाबा: काय ...अजून वाचा

8

जानू - 8

अभय च जानू वरच प्रेम दिवसेंदिवस वाढू लागलं होत व जानू चा अभय वरचा राग वाढत होता .चाळीत बरेच आता तिला चिडवत होते.अभय च्या अशा एकटक पाहण्याने तिला खूप अवघडून गेल्या सारखं होत होत..बाबा ना कोणी काही बोललं तर उगाच परत घरात टेन्शन आणि जर बाबा नी आपल कॉलेज च बंद केलं तर ?या विचारांनी ती खूप गोंधळून गेली होती..पण अभय त्याच तर वेगळच विश्व कोण काय म्हणत कोण काय बोलत याच्या कडे लक्ष तो देत कुठे होता ? आणि याचाच राग जाणूच्या मनात भरत होता. आज जानू चा वाढदिवस होता ..अभय खूप खुश होता ..जानू ला काय द्यावं ...अजून वाचा

9

जानू - 9

अभय जानू पासून लांब राहायचं ठरवतो..आणि जानू ही आता परत त्याच्या वर रागवायच नाही असं ठरवते. अभय जरी आता समोर येत नसला तरी त्याचं सर्व लक्ष जानू वर असत .तो तिला दुरून पाहूनच खुश होत असतो .जानू ला ही आपण उगाच इतका राग केला अभय चा याच वाईट वाटत पणं ती त्याला काहीच बोलत नाही. अभय च्या आते भाऊ च लग्न असत ..त्यासाठी अभय ८ दिवसा साठी गावी जाणार असतो पणं त्याला जाण्याची अजिबात इच्छा नसते ..८ दिवस जास्तच होतात ..इथ एक दिवस जानू नाही दिसली तर आपण बेचैन होतो ..आणि आता ८ दिवस तिला न पाहता कसं राहायचं ...अजून वाचा

10

जानू - 10

अभय ची अवस्था पाहून आकाश ला खूप वाईट वाटत..तो त्याला समजावतो की आपण जानू ला शोधू..मी तुला मदत करेन. थोडा शांत होतो ..परत दोघे घरी जातात.. अभय आता पहिल्यासारखा राहत नसतो ..खूप शांत आणि उदास होऊन गेलेला असतो ..एक दिवस तो आणि मिहिर कट्ट्यावर बसले असतात..की अभय ला आठवते की मिहिर आणि जानू चे बाबा आधीच एकमेकांस ओळखत होते ..त्यामुळे मिहिर च्या बाबा न कडे जानू च्या बाबांचा नंबर असेल..तो खूप खुश होतो..अभय चा असा एकदम बदललेला चेहरा पाहून मिहिर ही खुश होतो ..तो अभय ला विचारतो काय झालं ? अभय : मिहिर माझं एक काम करशील ? मिहिर ...अजून वाचा

11

जानू - 11

जानू आज पुन्हा चाळीतल्या आठवणीत हरवलेली असते ..अभय ची आज पुन्हा तिला खूप आठवण येते ..त्याचं पाहणं ,बोलणं ,सर्वांना करन सर्व तिला आठवत असत..आणि स्वतःवर राग येत असतो की का आपण इतका राग केला त्यांचा?नकळत तिला अभय वर एक कविता सुचते निखळ मैत्री तुझी समजू शकले नाही मी परी तू नेहमीच समजून घेतले मला साथ दिलीस तू दूर राहुनी हसणं माझं तुला आवडे पण तुला पाह ताच मी नाक मुर्गळे आज माझ्या नजरेत मीच अपराधी ठरले निखळ मैत्री तुझी समजू शकले नाही मी फसव्या या जगापासूनी तू नेहमीच मला सावध केले बोल तेव्हा तुझे मज कटू वाटले हसून बोलण्याला ...अजून वाचा

12

जानू - 12

समीर आता जानू सोबत थोड थोड बोलू लागला होता..कधी कधी .. हाय ..हॅलो चालायचं.. ब्बास पणं गाडी काही पुढे नव्हती...तिथेच थांबल्या सारखी झाली होती . जानू आता सर्वांच्या ओळखीची झाली होती ..कोणाला काही अडचण आली की ती त्याला help करत असे..कोणी बोललं की त्याच्या शी बोलत असे . भास्कर तिचा क्लास मेट ..तिच्या सोबत नेहमी बोलायला पाहायचा ..गप्पा मारायच्या ..जानू ला त्याचं काही वाटत नसे..पणं समीर ला हे खूप खटकत होत ..तो रागाने लालबुंद होत असे ..जानू भास्कर सोबत बोलत असली की...२.३ वेळा असच झालं ..समीर बोलत होता जानू सोबत की भास्कर तिथे आला आणि त्याने मध्येच बोलायला सुरुवात ...अजून वाचा

13

जानू - 13

समता समीर ची क्लासमेट समीर सोबत खूपच प्रेमाने बोलत होती ..हे पाहून जानू ला तिचा राग आला.का आला हे ही कळत नव्हते? पण राग तर आला होता..त्यामुळे समीर ला ती त्याचा डान्स छान झाला हे ही बोलली नव्हती..शेवटी रात्री समीर ने च जानू ला मॅसेज केला. समीर : हॅलो. जानू : हाय. समीर : काय मॅडम आज बोलला नाही काहीच ? डान्स आवडला नाही का ? जानू: छान होता . समीर : आता मी विचारल्या वरच सांगणार होतीस का ? जानू : का ? मी नाही सांगितलं तर काय होत ? ती समता आहे ना सांगायला. आता समीर ला ...अजून वाचा

14

जानू - 14

जानू कॉफी शॉप मध्ये पोहचली व समीर ला शोधू लागली तिचं हृदय खूप जोर जोराने धडकत होत जस काही बाहेरच येईल..पाय ही थरथरत होते..समीर ने ही जानू आल्याचं पाहिलं व तो तिच्या कडे गेला .. व.. चल तिकडे बसू म्हणून तिला एका टेबलाच्या दिशेने ईशारा केला..जानू ही त्याचा पाठीमागे चालू लागली व ते एका टेबलावर बसले ..समीर ने कॉफी ची ऑर्डर दिली .काय बोलावं ते दोघांना ही सुचत नव्हते ..दोघे ही गप्पच बसून होते ..थोड्या वेळाने समीर नेच बोलायला सुरवात केली. समीर :उशीर केलास यायला. जानू: हो,कॉलेज सुटल्यावर आले ना . पुन्हा दोघे शांत ..समीर जानू कडे पाहत होता ...अजून वाचा

15

जानू - 15

जानू आणि समीर ची चांगली मैत्री झाली होती..समीर जानू ची खूप काळजी घेई ..एकदा जानू आजारी होती ..तरी कॉलेज आली होती .पणं क्लास रूम बाहेर आली नाही ..समीर च आज तिच्या क्लास रूम मध्ये जातो ..पाहतो तर लेक्चर नसतो ..आणि जानू डेस्क वर झोपलेली असते ..तिचा चेहरा खूप कोमेजून गेलेला असतो.समीर समिधा ला विचारतो तिला काय झालं आहे ? समिधा सांगते आजारी आहे .मग ही कॉलेज ला का आली ? तो समिधा सोबत बोलत च असतो की जानू त्याला पहाते आणि कोमेजलेल्या चेहऱ्याने एक हलकीशी smile करते .समीर मात्र काळजी घे अस म्हणून निघून जातो.कॉलेज मध्ये जास्त बोलणार तरी ...अजून वाचा

16

जानू - 16

जानू लायब्ररी मध्ये असते ..सेमीस्टर जवळ आलेले असतात..त्यामुळे ती स्टडी साठी बुक शोधत असते .. बुक शेल्फच्या दुसरी कडे उभा असतो ..तो अचानक जानू समोर येतो आणि जानू अचानक समीर ला पाहून दचकते. समीर : ये घाबरायला काय झालं पागल पोरी ? जानू : तूच भुता सारखा समोर येतोस आणि मलाच पागल बोलतोस ? समीर : हे धर स्टडी साठी बुक ..खूप महत्त्वाचं आहे हे . इतकं बोलून तो तिथून निघून ही जातो . जानू विचार करते याला सर्वच कसं कळत ..मी जे बोलत नाही ते सुध्दा हा समजून जातो . पावसाळ्याचे दिवस असतात ..कॉलेज सुटत आणि अचानक पाऊस ...अजून वाचा

17

जानू - 17

जानू त्याचं कॉफी शॉप मध्ये समीर ची वाट पाहत असते जिथे ते पहिले भेटलेले असतात..समीर येतो ..दोघे ही एकमेकांना स्माईल करतात...जानू समीर ला स्वीटू म्हणजेच त्याने तिच्यासाठी घेतलेली डॉल कुठे आहे अस विचारते . समीर : अग तुझी स्वीटू आज जाळली होती..पणं वाचली. जानू : काय ? समीर : बॅग मध्ये घालून बॅग बाईक ला अडकवली होती आणि बघ बॅग बाईक तापून थोडी जाळली आहे .बघ डॉल ला कुठे लागलं आहे का ? अस म्हणून तो ती डॉल जानू ला देतो ..जानू ती पटकन घेते आणि तिला पहाते ..खूप मऊ मऊ असते डॉल ..जानू तिला आपल्या गाला जवळ नेऊन ...अजून वाचा

18

जानू - 18

समीरच्या प्रेमाचं भूत पुन्हा जानू च्या डोक्यावर बसत. आज विचारू समीर ला आपण आवडतो का ..मगच पुढे ठरवू म्हणून त्याला मॅसेज करते. जानू:हॅलो. समीर: अरे वा आज लवकर आठवण आली माझी.. जानू : हो आली..का येऊ नये का? समीर : तस कुठे बोललो मी ? बर बोल काय म्हणते? जानू : समीर मला तू खूप आवडतो. समीर : हो का? मला ही तू खूप आवडतेस माझी गुडीया. जानू : खरंच ? समीर: हो ग .पणं अचानक अस का विचारलं स? जानू : बर सांग ना काय काय आवडत तुला माझ्यात ? समीर : काही पणं काय विचारते ..ये पागल ...अजून वाचा

19

जानू - 19

दुसऱ्या दिवशी जानू कॉलेज मध्ये जाते ..समीर कुठे दिसतो का ते पाहत असते..बराच वेळ समीर दिसत नाही..मग ती क्लास मध्ये जाऊन बसते...अजून लेक्चर सुरू होणारच असतो की क्लास रूम बाहेरून समीर जाताना दिसतो..ती पळतच क्लास रूम बाहेर जाते.. जानू : समीर.. जानू समीर ला आवाज देते त्याला वाटत ती परत बोलण्या साठी च थांबवत असेल..त्याच्या चेहऱ्यावर हलकस smile येत...तो थांबतो. जानू त्याने दिलेलं फ्रेन्डशिप ब्यान्ड त्याच्या हातात देते आणि याची गरज नाही आता..तुला कोणाच्या भावना कळत नाहीत मैत्री तर काय करशील अस बोलून जाते..समीर ते घेतो पुढे जाऊन जोरात आपल्या हाताची मुठ भिंतीवर आदळतो ..जानू ला ते पाहून खूप ...अजून वाचा

20

जानू - 20

जानू आज खूप खुश होती..इतकी सुंदर पहाट ..तिला सर्वच छान आणि सुंदर वाटत होत ..वाटणारच ..प्रेमात पडलं की असंच ना..कधी कॉलेज ला जाईन आणि कधी समीर ला पाहू अस झालं होत तिला..चेहऱ्यावरचं हसू तर एक मिनिट ही थांबत नव्हते..आज ची जानू जरा जास्तच वेगळी आणि सुंदर दिसत होती..प्रेमाची लाली जी चढली होती गालावर तिच्या..ती कॉलेज मध्ये पोहचली ..समिधा ला तिला पाहून आश्चर्य वाटत होते काल पर्यंत तर किती शांत आणि आपल्याच विचारात दंग होती ..किती वेळा विचारल तरी काही सांगितलं नाही तिने ..आणि आज मॅडम एकदम इतक्या खुश ..या मुलीचं काही कळतच नाही.. मला तर समिधा विचार करत होती ...अजून वाचा

21

जानू - 21

जानू आणि समीर ची प्रेम कहाणी आता बहरू लागली होती..आता बराच वेळ ते गप्पा मारायचे ..किती बोलायचे हे त्यांचं ठाऊक नसेल..पणं सकाळी उठल्या पासून रात्री हातात तून फोन खाली पडू पर्यंत यांचं बोलणं चालूच राहायचं..समीर ला झोप खूपच प्रिय ..त्यामुळे तो बोलता बोलता कधी झोपी जात असे हे त्याला ही कळत नसे..पणं जानू मात्र बडबड करतच असायची ..आणि समीर झोपला कळलं की खूप राग यायचा तिला..हा साध सांगून ही झोपत नाही..मी एकटीच बडबडत बसते. आज कॉलेज ला जाताना फारच उशीर झाला होता त्यात तिने गडबडीने केसांची वेगळीच स्टाईल केली...तिला ती स्टाईल अजिबात आवडत नसे..पणं नाइलाज आज उशीर जो झाला ...अजून वाचा

22

जानू - 22

समीरच कॉलेज पूर्ण झालं होत..सुदैवाने त्याला लगेच नोकरी ही मिळाली होती.. पणं जानू च कॉलेज च शेवटचं वर्ष सुरू होत ..आणि तिचं फक्त समीर आणि समीर च चालु होत ..समीर च्या प्रेमात ती मीरा झाली होती....आणि या गोष्टीचा राग समीर ला यायला लागला होता..तिने थोडा अभ्यासात ही लक्ष द्यावं म्हणून तो तिला समजावत होता...कधी कधी ती ही समजून घ्यायची..समीर ला नोकरी मिळाल्याचा तिला खूप आनंद होता पणं त्या बरोबर आता समीर कॉलेज मध्ये आपल्याला रोज दिसणार नाही याचं दुःख ही झालं होत..रोज समीर ला पहायची सवय झाली होती ..कॉलेज मध्ये आल्या आल्या अजून ही तिचं लक्ष ..पार्किंग मध्ये जायचं ...अजून वाचा

23

जानू - 23

दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ही कुठे नसे जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे.. जानू च गाणं ..गाण्यात ती स्वतःला व समीर ला त्या हीरो हिरोइनच्या जागी समजून स्वतःशीच हसत होती..पणं तिला कुठे माहित होत ..तिच्या या स्वर्गा सारख्या वाटणाऱ्या आयुष्याला कधीच दृष्ट लागली होती. समीर च वागणं पूर्ण पने बदलून गेल होत..तो आता ना जानू सोबत नीट बोलत होता ना लवकर तिच्या मॅसेज ,फोनचा रिप्लाय देत होता...जानू काही विचारलं तर कामात होतो,वेळ नाही,खूप बिझी आहे म्हणून तो तिला टाळू लागला होता.. जानू : काल लवकर झोपलास ? बोलला नाहीस ? समीर : हो ..झोप लागली. ...अजून वाचा

24

जानू - 24

चार दिवस झाले समीर जानू सोबत बोलला नव्हता..किती तरी मॅसेज करून जानू थकली होती ..आणि त्याचा फोन ही लागत करावं हे तिलाच कळत नव्हत..ठीक आहे मी ही बोलत नाही म्हणून तिने त्याला एक रिप्लाय सेंड केला..आणि स्वतःच्या कामाला लागली ...सर्व आवरून ती कॉलेज ला गेली पणं तिचं लक्ष कशातच लागत नव्हत ..का करतोय अस समीर ? काय कमी आहे आपल्या प्रेमात ? काय चुकत आहे माझं ? सारे प्रश्न ती स्वतः ला च विचारत होती..कॉलेज संपून ती घरी गेली ..घरचं वातावरण पाहून तर तिला धक्काच बसला ..स्मशान शांतता होती घरात ..बाबा ही आज बँकेत गेले नव्हते.. आई हळू हळू ...अजून वाचा

25

जानू - 25

जानू ने समीर ला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.. जानू : समीर माझं काही चुकलं असेल तर खरंच माफ कर..मी कधीच रागावणार नाही तुझ्या वर ..कधीच रुसणार नाही..तू बोलशील त स..राहीन..सारखं प्रेम प्रेम करणार नाही..स्टडी करेन ..स्वतःच्या पायावर उभा राहीन..पणं plzz तू मला सोडून जावू नकोस ..मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय..plzzz समीर समीर : झालं का सुरू तुझं रडगाण .. हेच तर पटत नाही ..मला..मी नसलो म्हणजे काय संपल का सर्व ? अग स्वतःच्या करीयर कडे लक्ष दे..माझ्या सारखा भेटेल तुला कोणी ना कोणी..पणं माझ्या कडून अपेक्षा करू नकोस .. जानू : मला तुझ्या सारखा कोणी नको समीर ..तूच ...अजून वाचा

26

जानू - 26

समिधा समीर ला फोन लावते पणं तो काम आहे नंतर बोलतो म्हणून फोन ठेवून देतो... इकडे जानू समिधा ला करून समीर काय बोलला विचारते पणं त्याला काम होत म्हणून तो बोलला नाही म्हणून समिधा तिला सांगते ..जानू पुन्हा उदास होते..समिधा जानू ला मी पुन्हा त्याला फोन करून तुला सांगेन तू टेन्शन घेऊ नकोस म्हणून समजावते..समिधा पुन्हा संध्याकाळी समीर ला फोन करते. समिधा : हाय ,समीर मी समिधा जानू ची मैत्रीण,मी दुपारी फोन केला होता. समीर : हो ,माहित आहे मला..बोल नंबर कोणी दिला ? समिधा : जानू नी .. समीर : बर बोल काय काम होत ? समिधा : ...अजून वाचा

27

जानू - 27

समीर जानू ला बोलला की तो तिचं सर्व ऐकेल ..आणि ती प्रेम वेडी तेच खर धरून बसली..पणं तिचं तो एका दिवसा पुरताच होता..दुसऱ्या दिवशी जेव्हा ती समीर सोबत बोलली . जानू : हॅलो समीर : हा बोल .. आज कोणती धमकी देणार आहेस ?मला कधीच वाटलं नव्हतं तु अस करशील..काही ही करून तुला मी हवा आहे ना ? तुला फक्त मला मिळवायचा आहे ना ..?वागतो मी तुला हवा तसा पणं हे सगळं माझ्या मनाविरुद्ध घडतं आहे..माझ्या मनात थोडी जागा होती तुझ्या साठी पण ती ही तू आता घालवली स...सोडतो सगळं सोडतो मी माझं घर दार नोकरी .. माझा आनंद ...अजून वाचा

28

जानू - 28

प्रेम वेड्या जानू ची आता heartless जानू झाली होती..जानू चा स्वभाव आता पूर्ण पने बदलला होता..खूप चीड चीड..करत असे तर जणू नेहमी तिच्या सोबत फिरे..कधी खळखळून हसन नाही की कधी मनमोकळ्या गप्पा नाही..जे तिला नव्याने ओळखू लागले होते ते तिला heartless आणि गर्विष्ठ समजायचे पण जानू ला मात्र काहीच फरक पडत नसे..तिने स्वतः ला खूप बिझी करून घेतलं होतं..शेवटची सेमीस्टर जवळ आली होती..जानू ने अभ्यासा ला च सर्व काही बनवलं होतं आता...वाचन करता करता कधी कधी..समीर चा चेहरा त्या अक्षारांन मधून तिला दिसायचा ..नकळत डोळे ओले करून जायचा..पणं बस ..जानू लगेच...स्वतः ला सावरून पुन्हा अभ्यासाला लागायची..कॉलेज पूर्ण झालं ...जानू ...अजून वाचा

29

जानू - 29

अभय ला जयपूर ला येऊन दीड वर्ष होऊन गेल होत..अधून मधून तो आपल्या घरी जावून येत असे..ऑफिस मध्ये अभय सर्वांचाच बेस्ट फ्रेन्ड झालेला..फक्त मुलं च नाही तर ..मुली सुद्धा त्याच्या मैत्रिणी होत्या..त्याच्या ऑफिस मध्ये त्याच्या सोबत काम करणारी सानिका..सानिका दिसायला ही छान होती.. अभय ची चांगली मैत्रीण होती पणं ..सानिका ला मात्र अभय आवड त होता..हे अभय चा मित्र प्रीतम जाणून होता.. सानिका त्याची ही मैत्रीण होती..आणि सनिकानेच प्रीतम ला अभय आवडत असल्याचं सांगितलं ही होत..प्रीतम नी ठरवलं होतं अभय आणि सानिका ला मिळवायचं. आज अभय च्या ऑफिस मध्ये कार्यक्रम होता..आज आपण सानिका बद्दल अभय च्या मनात काय आहे ...अजून वाचा

30

जानू - 30

अपूर्वाच्या लग्ना दिवशी.. अभय सकाळ पासून तयारी करत होता..लग्न १ ला होते..पणं त्याने आकाश ला सकाळी लवकरच आपल्या घरी होत..आकाश तर कधीचा तयार होऊन येऊन बसला होता..पणं अभय ची तयारी काही केला संपत नव्हती..एव्हाना त्याचे ४ ड्रेस बदलून झाले होते..हा कसा आहे रे ? यात चांगला तर दिसतो ना मी ?आकाश मात्र वैतागला होता आणि हसत ही होता.. आकाश: अभ्या लग्न अपुर्वाच आहे रे? हे तर अस झालं आहे बेगानी शादी में अब्दुल्ला दि वाना... अभय: माहित आहे तिचं च आहे ..मी कुठे म्हटलो माझं आहे ? आकाश : पणं मला तर वाटतं आहे ..तुझं आहे की काय ? ...अजून वाचा

31

जानू - 31

अभय जयपूर ला निघून गेला पण जयपूर मध्ये त्याचं मन आता पहिल्या सारखं अजिबात रमत नव्हते..कसे बसे त्याने तिथे चार महिने काढले आणि जयपूर ला राम राम करून तो पुन्हा आपल्या शहरात आला..एव्हाना त्याला कळून चुकलं होत की कुठे ही गेलं तरी जानू आणि तिच्या आठवणी काही त्याची पाठ सोडणार नाहीत..जयपूर मधील त्याच काम पाहून ..त्याच्या कंपनी ने त्याला रिकमंडेशन देऊन त्याच्याच शहरात त्याला एका कंपनी मध्ये जॉब दिला होता तो तिथे जॉईन झाला होता..रोज ऑफिस , फ्रेण्ड्स..घरी गेला की पुन्हा जानू च घर पाहणं तिथे तिला बंद डोळ्यांनी अनुभव न..सुट्टी दिवशी फ्रेण्ड्स सोबत बाईक राईड करणं ..सर्वांना मदत ...अजून वाचा

32

जानू - 32

जानू तर अभय सोबत बोलायचा विचार टाळते.. पणं नशिबाने त्यांना भेटा व्हायचं ठरवलं होत..मग ते कसं टळू शकेल? नशीबा कोणाचं काही चालत का ? मग जानू च तरी कसं चालेल? आकाश ला कळत की उमा ला जान्हवी ला भेटली होती..तिने एक फ्रेण्ड्स सर्कल ग्रुप वर सांगितलं होतं..पणं अभय त्या ग्रुप मधून थोड्या दिवसा पूर्वी च लेफ्ट झाला होता त्यामुळे ते त्याला कळलच नाही..पणं आकाश असतो त्या ग्रुप मध्ये ..पाहिलं तर त्याला खर वाटत नाही..पणं नंतर तो उमा ला फोन लावून विचारतो तेव्हा त्याला पटत..आता अभ्या ची गाडी रुळावर येईल असा विचार करून खूप खुश होतो तो..रात्र झाली आहे आता ...अजून वाचा

33

जानू - 33

अभय आज इतका खुश होता ना की त्या नादात आपण आकाश ला फोन केला नाही हे ही तो विसरला..का ठाऊक आज ऑफिस मध्ये अभय ला खूप काम होत..तरी ही त्याने जानू चा पुन्हा मॅसेज आला आहे का हे पाहण्यासाठी किती तरी वेळा मोबाईल चेक केला होता..पणं नाही एक ही मॅसेज नव्हता..पणं सकाळी झालेलं बोलणंच त्याने पुन्हा पुन्हा वाचून काढलं होत..गडबडीत ही अभय नी आकाश ला फोन लावला.. अभय: आकु my jaan ..thanku very much... आकाश: सकाळी खून करतो म्हणत होतास आणि आता एकदम जान वा अभ्या भारी आहेस ?बोललेली दिसतेय जान्हवी .. अभय: सकाळ साठी सॉरी रे ..मला खर ...अजून वाचा

34

जानू - 34

जानू सकाळी उठून मोबाईल पहाते तर पहाटे पाच ला च अभय चा गूड मॉर्निंग चा मॅसेज आलेला असतो..ती विचार ..हा तर रात्री ही लेट झोपला आणि आता इतक्या लवकर उठला ही आहे ?काय विचित्र आहे ना अभय पणं ..मग ती त्याला गूड मॉर्निंग चा रिप्लाय देऊन आवरायला जाते..आवरून निघणार नाश्ता करत असते की पुन्हा अभय चा मॅसेज येतो.. अभय: झाला का नाश्ता? जानू : आता चालूच आहे... तुझा ? अभय: माझा सकाळी सहा ला च होतो.. जानू : इतक्या लवकर कसं खातोस रे ? मला तर इतक्या सकाळी काही खायची इच्छा च होत नाही.. अभय: म्हणून तर अशी लुकडी ...अजून वाचा

35

जानू - 35

अभय च मन तर कशात लागेना जानू बोलत नाही म्हणून त्याने सकाळी सकाळी तिला गूड मॉर्निंग चा मॅसेज केला... तिचा रिप्लाय ऐकुन तर त्याला काय करावं कळेना. अभय: गूड मॉर्निंग.. जानू:जा ना बोल जा ना ..तुझ्या भाऊ सोबत.. अभय:अग सॉरी बोललो ना ..आता परत नाही करणार अस..बोल ना.. पणं जानू मॅडम बोलतात कुठे ? तिला तर आज अभय ला थोडा त्रास देऊ वाटत होता..ती हसत होती.. अभय चा स्टेटस पाहिला तर साहेबाने मूड ऑफ म्हणून ठेवलेलं..अरे रे ..पणं तुला तसचं पाहिजे ..काल किती वाट पाहिली मी तुझी तर तू बिझी होतास ..अस स्वतः सोबत च म्हणून ती कामाला लागली ...अजून वाचा

36

जानू - 36

आज पुन्हा उशीर झाला जानू स्वतः वरच चिडत होती..आणि गडबडीत आवरत होती.. नाश्ता न करताच..ऑफिस ला जायला निघाली होती.. मागून ओरडत होती..अग हळू ..किती गडबड करत आहेस...पडशील..कुठे तरी?.काही खाल्ल ही नाहीस.. आई बोलली आणि देवाने वरून तथास्तु म्हटलं की काय ? देव जाणे..पणं जानू मॅडम घरा बाहेर पाय ठेवा त च ..होत्या की उंबरठ्यावर अडकून धाडकन पडल्या ..आधीच नाजूक त्यात पडल्या म्हणजे तर चांगलच लागलं..हाताला खरचटलं होत..गुढग्यावर थोडा ड्रेस फाटून तिथे ही खरचटलं होत..डोळ्यातून पाणी वाहू लागलं होत..वरून आई ओरडत होती..सांगितलं होतं ना इतकी गडबड नको..तरी तुझं चालूच होते..पडलीस ना ? आई ने तिला उठवलं बेड वर बसवून पाणी ...अजून वाचा

37

जानू - 37

आज रविवार सुट्टीचा दिवस..दर रविवारी जानू कामात असे व अभय तिच्या सोबत बोलण्याची वाट पाहत असे..या रविवारी मुद्दामच जानू सर्व काम लवकर आवरलं.. अभय ने सकाळी गूड मॉर्निंग तेवढ बोलला होता..पणं त्या नंतर काही त्याचा मॅसेज आला नव्हता..जानू ने काम आवरून त्याला रिप्लाय केला..पणं साहेब गायब ..मॅसेज चा रिप्लाय नाही की मॅसेज त्याने पाहिला ही नाही..शेवटी बराच वेळ वाट पाहून जानू दुपारी झोपी गेली ..ऑफिस मुळे दुपारी झोप मिळत न से..आज सुट्टी त्यामुळेच ती झोपली होती..संध्याकाळी उठून थोड काम आवरलं नंतर फोन पाहिलं पणं अभय अजून गायब च ..अरे हा कुठे गेला ? सुट्टी दिवशी हा इतका कसा काय ...अजून वाचा

38

जानू - 38

समीर जानू ला पाहून हसत असतो..आणि त्या हसण्याने जानू चे कान फटातात की काय असं तिला होत..ती आपल्या कानावर ठेवते..आणि घाबरून सप्नातून जागी होते..हो तिला समीर च स्वप्न पडलं होत..ती आजू बाजूला पाहते तर ऑफिस ..समीर काहीच नसत..मग तिच्या लक्षात येत स्वप्न होत ते..मोबाईल मध्ये वेळ पाहिलं तर पहाटे पाच..पहाटेच स्वप्न खरं होतात म्हणतात..खरंच जर समीर परत आला तर..स्वतःच्याच विचाराने तिचं अंग कापत ..घाम फुटतो..खरंच जर समीर परत आला तर..तर..माफ करू शकेन का मी त्याला ? काय चुकी होती माझी ? वेड्या सारख प्रेम च तर केलं होत मी त्याच्या वर पणं त्याची शिक्षा त्याने मला heartless जानू बनवून ...अजून वाचा

39

जानू - 39

जानू आता पहिल्या सारखी मन मोकळे पणाने अभय सोबत बोलत नव्हती ... अभय ला खूप वाईट वाटत होत तरी तिला समजून घेतलं..जानू चिडत असे भांडत असे त्याच्या सोबत पणं तो शांत पने सर्व सहन करी..तिचा कधी रागच येत नसे अभय ला आणि याच त्याच्या चांगुल पना मुळे , स्वभावा मुळे जानू परत पहिल्या सारखी अभय सोबत बोलू लागली..आज सुट्टी होती .. अभय नी सध्याकाळी जानू ला मॅसेज केला.. अभय: हॅलो,काय करत आहेस ? जानू : काही नाही .. बसलेय..आज काय सुट्टी होती त्यामुळे निवांत होते..बोल.. अभय: आज तुला खूप मिस केलं.. जानू : का? आज काय आहे ? अभय: ...अजून वाचा

40

जानू - 40

जानू आज सकाळी आवरत असते की अभय चा मॅसेज येतो.. अभय:गूड मॉर्निंग.. जानू : गूड मॉर्निंग..आज लेट ? अभय: आज सुट्टी घेतली आहे ..घरी आहे ना ..म्हणून ..तुझं आवरलं का ? जानू : का सुट्टी ? हो चाललं आहे आवरत आहे .. अभय: अग घरी थोड काम होत म्हणून घेतली सुट्टी..किती वेळ आवरतेस ग ? लेट नाही का होत ऑफिस ला ? जानू : अरे ऑफिस मध्ये एक कार्यक्रम आहे म्हणून जरा लेट चाललं आहे. अभय: एक सेल्फी तर पाठव बघू..कशी तयार झाली आहेस? जानू : झालं का तुझ सकाळी सकाळी चालू ..? अभय: पाठव ना बघू तर दे ...अजून वाचा

41

जानू - 41

अभय चा स्वभाव ,त्याचं बोलणं त्याचं प्रेम या सर्वांनी जानू च मन कधी व्याप्त झाल होत हे तिचं तिलाच नव्हत..पणं हे ती मान्य करायला तयार नव्हती..खरंच तर आहे ..दूध पोळल की माणूस ताक ही फुकून पितो..जगाची रीत च आहे..जानू च बाहेरी मन व आतला आवाज याच जोरदार भांडण चालू होत..आणि जानू या दोघांच्या मध्ये फसली होती..आतला आवाज म्हणायचा.. आवाज: अभय चांगला आहे..कशाला त्याच्या सोबत इतकं रागाने बोलतेस..का चिडते स त्याच्या वर.. आणि मन म्हणायचं.. बाहेरी मन : समीर ही चांगलाच होता.. माहिती आहे ना काय केलं त्यानं? आवाज: अभय अस कधीच करणार नाही.. मन : समीर करेल अस कधी ...अजून वाचा

42

जानू - 42

आज कामातून जानू ला वेळच मिळाला नव्हता की अभय शी थोडा बोलावं ..ती आज ऑफिस मध्ये खूपच बिझी होती अभय चा च फोन तिला आला..स्क्रीन वर अभय च नाव वाचून तिने वेळ नसताना फोन उचलला. जानू :हॅलो..कसा आहेस ? बर वाटत आहे का ? अभय: कधी येणार आहेस ? जानू : कुठे ? अभय: तू म्हणाली होतीस ..की मला डिस्चार्ज मिळाला की तू मला पाहायला घरी येशील. जानू : हो..पणं तुझी तब्येत तर ठीक होवू दे..आणि डिस्चार्ज तर मिळू दे. अभय: मी आलो आहे घरी.. जानू : डिस्चार्ज मिळाला? अभय: मी घेतला..सकाळीच आलो घरी. जानू आपल हातातलं काम सोडून ...अजून वाचा

43

जानू - 43

जानू सकाळी सकाळी तयार झाली होती दिवाळी ला घेतलेला अबोली रंगाचा ड्रेस तिने आज घातला होता..कारण अभय ला तो खूपच आवडला होता..ती आवरून नाश्ता करण्यासाठी बाहेर येतच होती की प्रधान काका बडबड करतच घरात आले..आईने विचारल की काय झालं ? प्रधान काका: ते नाडकर्णी भेटले होते..स्नेहा बद्दल विचारत होते..असू दे ..सोडा माफ करा पोरीला..तुम्हाला खूपच अभिमान होता जातीचा पणं पोरीन केलं ना स्वतः च्या मनाचं..म्हणत होते..खरंच आज वाटत मुली असण्यापेक्षा एखादा मुलगा असता तर बर झालं असतं.. जानू ने बाबा न चे शब्द ऐकले होते ..खूपच वाईट वाटलं होत तिला..तशीच आवरून तिने ऑफिस गाठलं ..काम आवरून..हाफ डे घेऊन अभय ...अजून वाचा

44

जानू - 44

जानू न बोलताच निघून गेली.. पहिले दोन दिवस तर आपण अभय सोबत जे वागलो ते चुकीचं आहे अस तिला वाटलच नाही..पणं नंतर मात्र ना राहून अभय ची सारखी आठवण येऊ लागली.. अभय कडून मात्र एक ही मॅसेज अथवा फोन तिला आला नव्हता..त्याचे स्टेटस ही दिसत नव्हते आता..आपण अभय ला काय काय बोललो त्या दिवशी असा विचार करत बसली असताना तिला पुन्हा सर्व आठवल....आणि जस आठवल त स..तिला घाम फुटू लागला .. अंग कापू लागलं...आयुष्याचा समीर होवू नये म्हणून आपण स्वतः ला जपत राहिलो पणं आपण स्वतः समीर होऊन बसलो ..हे कसं कळलं नाही आपल्याला याचं विचारांनी तिचं डोकं सुन्न होवू ...अजून वाचा

45

जानू - 45

जानू ने आकाश ला फोन लावला ..दोन चार रिंग नंतर आकाश नी फोन उचलला.. जानू: हॅलो..आकाश आकाश: हॅलो. जानू: जान्हवी प्रधान बोलतेय.. आकाश: व्हॉट अ सरप्राइज..बोल ना .. जानू: अभय कुठे आहे ? त्याचा फोन लागत नाही..म्हणून तुला लावला मला त्याच्या सोबत बोलायचं आहे. आकाश: जान्हवी रागावू नकोस पण मला तुझा खूप राग आला आहे.. अग अभय किती प्रेम करत होता तुझ्या वर ..तू नव्हतीस तरी तो फक्त तुझ्या आठवणीत जगत होता..मला माहित आहे तुझ्या साठी त्याने काय काय केलं..तुझ्या पप्पा चा नंबर घेऊन तुझ्या सोबत बोलण्याचा प्रयत्न केला..त्यांच्या शिव्या खाल्ल्या...कुठे कुठे शोधल तुला..आपूर्वाच्या लग्नाला ही तू येणार आहे ...अजून वाचा

46

जानू - 46

रात्र भर रडून जानू ची तब्येत खराब झाली होती..डोळे सुजले होते..अंगात ताप भरला होता..पणं विचार काही संपत नव्हते..आईने ऑफिस जात नाही का म्हणून विचारले तेव्हा आई ला कळलं की तिची तब्येत खराब आहे ..मग आई ने ही तिला आराम करायला सांगितला..जानू चे विचार अजून ही चालू च होते..माझ्या च सोबत अस का ? मी काय कोणाचं वाईट केलं आहे..देवा का असं माणसांच्या आयुष्या सोबत खेळ तोस..जर समीर आणि माझं कोणत च नात नव्हत निर्माण होणार तर मग का आणल स..माझ्या आयुष्यात त्याला? देवा खरच ज्याच्या सोबत आपलं आयुष्य जाणार असत अशीच मानस भेटव त जा...समीर ऐवजी अभय ला च ...अजून वाचा

47

जानू - 47 (अंतिम भाग)

जानू आज चार दिवसा नंतर ऑफिस ला आली होती...पणं आपण कशाला आलो असच तिला वाटत होत..ना कामात लक्ष लागत काही करण्यात ..शेजारचे सहकारी गप्पा मारण्यात ,हसण्यात बिझी होते ..इथे माझं हृदय जळते य..आणि बाकीचे किती खुश आहेत ..मग मीच काय त्या देवाचं वाकड केलं आहे काय माहित म्हणून ती चिडत होती..आज तिने जेवणं ही केलं नव्हत..दिवस ही जात नव्हता आणि काम ही होत नव्हते..पणं कसं बसं तिने तिचं मन कामात वळवळ.. आणि ऑफिस सुटायची वेळ झाली तशी ती बाहेर आली...समोर अभय ला बघून तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही..पळत जाऊन त्याला मिठी मारावी अस तिला वाटलं .. पणं नंतर ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय