आठवणींच्या वाटेवरती

(19)
  • 49k
  • 6
  • 22k

रिमझिम पाऊस, हवेतील गारवा, आणि नेहमीच सोबतीला असणार एकांत आताशा निशिकांतला या सर्वांची सवय झाली होती. जुईला भेटल्यानंतर खरतर एकांत काय असतो, हे निशिकांत विसरून गेला होता. पण आज पुनः तोच एकांत सोबतीला होता. अशा छान पावसाळी वातावरणात जुईला miss करण खर तर त्याच्यासाठी मोठी परीक्षा होती पण त्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. का असं व्हाव त्याच्यासोबत? नात टिकवण्यासाठी तो कुठेही कमी पडला नव्हता. मग जुईने अचानक त्याला सोडण्याचा निर्णय का घ्यावा? खरतर याच विचारांच्या तंद्रीत निशिकांत गुंतला होता. अचानक आईचा आवाज आला आणि तो दचकला.

नवीन एपिसोड्स : : Every Tuesday, Thursday & Saturday

1

आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - १

रिमझिम पाऊस, हवेतील गारवा, आणि नेहमीच सोबतीला असणार एकांत आताशा निशिकांतला या सर्वांची सवय झाली होती. जुईला खरतर एकांत काय असतो, हे निशिकांत विसरून गेला होता. पण आज पुनः तोच एकांत सोबतीला होता. अशा छान पावसाळी वातावरणात जुईला miss करण खर तर त्याच्यासाठी मोठी परीक्षा होती पण त्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. का असं व्हाव त्याच्यासोबत? नात टिकवण्यासाठी तो कुठेही कमी पडला नव्हता. मग जुईने अचानक त्याला सोडण्याचा निर्णय का घ्यावा? खरतर याच विचारांच्या तंद्रीत निशिकांत गुंतला होता. अचानक आईचा आवाज आला आणि तो दचकला. आईला प्रतिसाद देताना त्याचा आवाज अचानक रडवेला झाला. आईच्या लक्षात ही ...अजून वाचा

2

आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - २

रात्रीचे आठ वाजले होते. काळजीने आईने निशिकांतला फोन केला. तेंव्हा निशिकांत विचारांतून बाहेर आला,आणि घरी निघाला. पण जुईचा विचार केल्या त्याच्या मनातून जात नव्हता. घरी पोहोचल्यावर आईने काळजीने विचारले कुठे होतास? जेवायच नाही का? यावर तो इतकंच उत्तरला की इथेच होतो . भूक नाही. आणि त्याच्या रूम मध्ये गेला. पण खूप अस्वस्थ होता कारण त्याला कारणच माहीत नव्हत जुई च्या अचानक निघून जाण्याच. त्याने जुईला कॉल केला अगदी जसा रोज करतो तसाच, आणि घडलेही नेहेमीप्रमाणे कॉल रिसिव्ह नाही केला गेला. नाराज झालेला निशिकांत गादीवर निपचित पडून राहिला आणि डोळ्यातील आसवाना वाट करून देत भूतकाळात रमला. आजही त्याला ...अजून वाचा

3

आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - ३

या तिच्या छोट्याश्या कॉलेज विश्वात फक्त ऋचा तिची सर्वात जवळची मैत्रीण होती जिला जुई बद्दल सर्वकाही माहीत होत जुईला देखील ऋचाबद्दल. पण अर्ध वर्ष संपत आल होत तरी जुईला निशिकांतबद्दल ऋचाने कधी काही सांगितल नव्हत कारण तशी वेळच आली नव्हती कधी. पण दिवाळीला जुई आणि निशिकांतची अचानक भेट झाल्यावर मात्र ऋचाने निशिकांत बद्दल जुईशी बोलायला सुरुवात केली. कारण तिच्या प्रिय मित्राने म्हणजेच निशिकांतने तिला मैत्रीची गळ घालून विंनती केलेली की जुईशी ओळख करून देशील. ऋचा तेच प्रयत्न करत होती मात्र हळूहळू तिच्या लक्षात यायला लागल की जुईला यात काहीही रस नाहीये, त्यामुळे ऋचाने निशिकांतला तसं ...अजून वाचा

4

आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - ४

आईने जेंव्हा जुईबद्दल ऐकल तेंव्हा का कुणास ठाऊक तिला असं वाटल की हे नाव तिने आधी घरातच ऐकलय कुणाकडून तरी, पण कुणाकडून हे तिला आठवेना. आणि निशिकांतने इतका मोठा निर्णय घेतला आणि ती याबद्दल अनभिज्ञ होते, या विचारांमुळे जुई बद्दल तिने जास्त विचार केला नाही; पण कदाचित तिला असं वाटून गेलं की ऋचा जास्त माहिती देऊ शकेल या बद्दल. म्हणून तिने ऋचाला विचारावं असं मनाशी ठरवलं निशिकांतची समजूत घातली खरी पण जास्त काही न बोलता. निशिकांतचा एव्हाना थकल्यामुळे डोळा लागला आणि आई देखील त्याच्या अंगावर पांघरून घालून तिच्या रूम मध्ये निघून गेली. पण तिच्या डोक्यातील विचारांची शृंखला काही ...अजून वाचा

5

आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - ५

संध्याकाळी घरी आल्यावर निशिकांतने जयला कॉल केला पण त्याचा कॉल निशिकांतला आउटऑफ लागला. त्यामुळे त्याने आईला विचारल, "आई अगं फोन आउटऑफ का?" आईने उत्तर दिलं,"अरे चार दिवस तो नसेल कनेक्शन मध्ये कसली तरी कॉन्फिडेंशियल मीटिंग आहे म्हणाला." निशिकांत मग स्वत:च्या रूम मध्ये निघून गेला. पुस्तक घेण्यासाठी जेंव्हा तो टेबलकडे वळला तेंव्हा त्याला पुस्तकांखाली जुईचा फोटो दिसला. त्याच्या लक्षात आल की आईनेच हा फोटो इथे ठेवला असणार. त्याने सहज म्हणून जुईचं फेसबुक अकाऊंट शोधायचा विचार केला. आणि लॅपटॉप उघडला. तो जुई गेल्यापासून कुठेच socially active नव्हता. आज त्याने इतक्या दिवसानंतर फेसबुक उघडल्यामुळे त्याला खूप सारे मेसेजेस दिसले. ...अजून वाचा

6

आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - ६

निशिकांतने ऋषभसोबतच ऋचाकडे जाण्याचा निर्णय घेतला. घरी पोहोचताच त्याने ऋचाला ऋषभने जे काही सांगितल त्याबद्दल विचारल. ऋचाने जे घडलं सर्व सांगितलं निशीकांतला, पण ती हे नाही सांगू शकली की तिने आधी का नाही सांगितलं हे त्याला. ऋचा इतकंच म्हणाली की नको थांबूस तिच्यासाठी तिला जर तुझ्याबद्दल काही वाटत असतं तर तिने इतक्या वर्षात कमीतकमी एकदा तरी कॉनटॅक्ट केला असता. कदाचित ती तुला आणि मलाही म्हणजे आपल्याला विसरलीही असेल. निशिकांतच डोकं खरंतर खूप दुखायला लागल होतं. त्याला ऋचा जे सांगत होती ते पटत होतं, पण मन ऐकायलाच तयार नव्हतं. तिने असं सोडून जायला नको हवं होतं; हाच ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय