आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - १ PRATIBHA JADHAV द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - १

रिमझिम पाऊस, हवेतील गारवा, आणि नेहमीच सोबतीला असणार एकांत आताशा निशिकांतला या सर्वांची सवय झाली होती. जुईला भेटल्यानंतर खरतर एकांत काय असतो, हे निशिकांत विसरून गेला होता. पण आज पुनः तोच एकांत सोबतीला होता. अशा छान पावसाळी वातावरणात जुईला miss करण खर तर त्याच्यासाठी मोठी परीक्षा होती पण त्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. का असं व्हाव त्याच्यासोबत? नात टिकवण्यासाठी तो कुठेही कमी पडला नव्हता. मग जुईने अचानक त्याला सोडण्याचा निर्णय का घ्यावा? खरतर याच विचारांच्या तंद्रीत निशिकांत गुंतला होता. अचानक आईचा आवाज आला आणि तो दचकला. आईला प्रतिसाद देताना त्याचा आवाज अचानक रडवेला झाला. आईच्या लक्षात ही गोष्ट आल्याशिवाय राहिली नाही. तिने निशिकांतला याबद्दल विचारल पण निशिकांतने शिताफीने उत्तर देण टाळल. आणि एवढंच म्हणाला की मी जरा बाहेर जाऊन येतो. आणि तो रिमझिमणाऱ्या पाऊसात घराबाहेर पडला. आता मात्र त्याला पाऊसाची साथ होती डोळ्यातील पाऊसाला मोकळ करण्यासाठी.

त्याला आजही तो दिवस स्पष्ट आठवत होता ज्या दिवशी जुई त्याला अखेरची भेटली होती. त्यादिवशी त्याला पुसटशीही कल्पना नव्हती की ही तिची शेवटची भेट असेल. त्यादिवशी तिने निशिकांतला आवडणार ड्रेस घातला होता. नेहमीच्या ठिकाणी बागेत तो तिला भेटला होता. खूप गोड दिसत होती ती नेहेमी प्रमाणेच, तेच खळाळत हास्य तेच लाडिक बोलण, सर्व काही नेहेमी प्रमाणेच होत. तिचा तोच मंजुळ आवाज आजही त्याच्या कानात होता. तीची 'ए निशी' ही साद त्याचा मनाला एक वेगळी ओढ लावत असे. तशीच त्यादिवाशीही तिने ए निशी ही साद घातली आणि निशिकांतची कळी खुलली. त्याने तिला आनंदाने मिठी मारली. तिने नेहेमी प्रमाणे त्याला त्याच आवडती कॅडबरी दिली. त्याने जुईला कॅडबरी भरवत भावी आयुष्याबद्दल बोलायला सुरुवात केली तेंव्हा अचानक त्याला जाणवल की जुई अस्वस्थ आहे. त्याने तिला तसं विचालही पण तिने त्यासाठी काहीच प्रतिसाद न देता विषय टाळला.

निशिकांतही अस्वस्थ झाला कारण आज पर्यन्त जुई अशी कधीच वागली नव्हती. तिची प्रत्येक गोष्ट तिचे विचार ती याक्षणी कोणता निर्णय घेऊ शकेन इतक सगळ त्याला तिच्याबद्दल माहिती असताना आज समीकरण काही केल्या जुळत नव्हत. जुईच अस्वस्थ होण त्याला खरतर खूप टेंशन देत होत पण त्याने वेळ मारून नेली कारण त्याला वाटल की आज नाही पण जुई उद्या नक्की सांगेन. कारण त्याला विश्वास होता की ती शेअर केल्याशिवाय राहूच शकत नाही. म्हणजे निदान आज पर्यन्त तरी तास कधी झाल नव्हत. आणि त्यानंतर 'उद्या' कधी आलाच नाही.

कारण नंतर जुई त्याच्या आयुष्यातून त्याला न सांगता निघून गेली, पुनः न परतण्यासाठी, कायमची. पण हीच गोष्ट निशिकांतला समजायला एक पूर्ण दिवस जावा लागला. 24 तास जेंव्हा जुई कडून काहीच प्रतिसाद आला नाही त्याच्या कॉल्स ला तेंव्हा त्याच्या डोळ्यातून पुर वाहू लागला आणि त्याला तिच्या कालच्या अस्वस्थतेचा अर्थ आता त्याला काळात होता. त्याने स्वप्नात सुद्धा हा विचार केला नव्हता. कारण पण माहीत नव्हत तिच्या वागण्यामगच. खूप एकाकी झाला होता निशिकांत त्याच्या जुई शिवाय. कुठे तरी त्याला आशा होती की जुई कमीतकमी त्याला कॉल तरी करेन. पण गेल्या 3 वर्षांमध्ये असं घडलंच नाही. तो आजही तिची, तिच्या फोन ची वाट बघत होता. आणि याच आशेवर आजवर जगत होता. आज नेमकी तारीख ही तीच होती 14 फेब्रुवारी आणि या घटनेला होऊन आज बरोबर 3 वर्ष होऊन गेली होती. पाऊस बऱ्यापैकी ओसरला होता. धुंद कुंद हवा बेचैन करत होती. आणि जुईची आठवण जगू ही देत नव्हती आणि मरूही देत नव्हती.