आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - ५ PRATIBHA JADHAV द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - ५

संध्याकाळी घरी आल्यावर निशिकांतने जयला कॉल केला पण त्याचा कॉल निशिकांतला आउटऑफ लागला. त्यामुळे त्याने आईला विचारल, "आई अगं दादाचा फोन आउटऑफ का?" आईने उत्तर दिलं,"अरे चार दिवस तो नसेल कनेक्शन मध्ये कसली तरी कॉन्फिडेंशियल मीटिंग आहे म्हणाला." निशिकांत मग स्वत:च्या रूम मध्ये निघून गेला. पुस्तक घेण्यासाठी जेंव्हा तो टेबलकडे वळला तेंव्हा त्याला पुस्तकांखाली जुईचा फोटो दिसला. त्याच्या लक्षात आल की आईनेच हा फोटो इथे ठेवला असणार. त्याने सहज म्हणून जुईचं फेसबुक अकाऊंट शोधायचा विचार केला. आणि लॅपटॉप उघडला. तो जुई गेल्यापासून कुठेच socially active नव्हता. आज त्याने इतक्या दिवसानंतर फेसबुक उघडल्यामुळे त्याला खूप सारे मेसेजेस दिसले. त्यात एक जुईचा पण होता. पण बहुतेक ते त्याच्या लक्षात नाही आलं. कारण जुई त्याच्या फ्रेंडलिस्टमध्ये नव्हती. त्याने जुईच्या प्रोफाइल वर जाऊन चेक केल तर तिनेही लॉगिन नव्हतं केलं पाच महिन्यांपासून. पण त्याला इतकंच समजल की ती कुठेही डॉक्टर म्हणून काम करत नाहीये. मग जॉब काय करते जुई? आणि जेव्हढं मला माहीत आहे तिची कुणीच फॅमिली नाहीये मग ती गेली तरी कुठे?

या विचारांमध्ये त्याने मेसेंजर उघडला आणि मेसेजेस चेक करताना त्याला जुईचे मेसेजेस दिसले. तिने त्याला खूप मेसेजेस केले होते. पण त्याचा काहीच रिप्लाय नव्हता, म्हणून मग तिनेही मेसेजेस करणं बंद केलं. निशिकांतने ऋचाला फोन केला; आणि विचारल, "ऋचा तुला जुईचा काही मेसेज आलेला का?" यावर ऋचाने नकार दिला. मेसेजेस वाचल्यानंतर निशिकांतला समजल की जाण्यापूर्वी जुईने त्याला ती जाते हा मेसेज केलेला पण कुठे,कश्यासाठी,कधी परत येणार काहीच सांगितलं नव्हतं. खूप सारे मेसेजेस होते खरे मात्र त्यात "तू कसा आहेस?" याव्यतिरिक्त काहीच नव्हतं. आता निशिकांतच डोकं विचार करून खूप दुखायला लागल होतं. त्याला काही अंदाज बांधता येईना. एवढे मेसेज जर केलेच होते तर कुठे जाते? काय करते? हे पण सांगायचं ना. संताप झाला होता त्याचा. ती इतकी निष्काळजी असेल असं जराही वाटलं नव्हत त्याला. रागात असल्यामुळे न जेवताच तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी त्याच्या दोन सर्जरी प्लान होत्या.

सकाळी लवकरच उठून तो हॉस्पिटल मध्ये गेला. फ्री व्हायला त्याला संध्याकाळ झाली. तो आज ऋषभला भेटायला जायचं असं ठरवून हॉस्पिटल मधून फ्रेश होऊन निघाला. ऋषभ ऋचाचा मोठा भाऊ, तो ही सर्जन म्हणूनच काम करायचा पण तो सैन्यामध्ये कार्यरत होता. दोन दिवासापूर्वीच तो घरी आलेला. ठरल्याप्रमाणे निशिकांत ऋषभला भेटला. बोलता बोलता ऋषभने निशिकांतला जुईबद्दल विचारल. निशिकांत म्हणाला, "नाही अरे, काहीच कॉनटॅक्ट नाहीये तिचा. त्यामुळे ती कुठे आहे हेही माहिती नाहीये." तेंव्हा ऋषभ म्हणाला की "ऋचा एकदा बोलता बोलता म्हणाली की तुमच्या क्लास मधली कुणी मुलगी होती रे, नाव नक्की नाही आठवत आता पण ती जुईला तुमच्या मैत्रीमुळे टॉर्चर करत होती, कारण तिला तू आवडायचास. ही गोष्ट ऋचा तुला सांगणार होती;पण जुईने ही गोष्ट तुला सांगू नकोस असं सांगितलं म्हणून ऋचाने ही गोष्ट नाही सांगितली तुला, पण मग अचानक तुझ्यापासून लांब जाण्याचा निर्णय जुईने का घेतला, हे नाही समजलं ऋचाला आणि मला पण. मग तुझी अवस्था बघून ऋचाने जुईला मेसेज केला आणि खूप काही बोलली. अगदी स्वार्थी वैगेरे सुद्धा. कारण ऋचाने जुईला खूप कॉल्स केले होते पण तिने साधा एकही कॉल रिसीव नाही केला ऋचाचा. मी ऋचाला समजवल की जुईला तू असं बोलणं योग्य नव्हत. ऋचाने रागाने तिच्याशी मैत्रीच तोडून टाकली. कारण तुला दुखवलेल ऋचा नाही सहन करू शकत हे तुला माहिती आहे. मग पुढे जुई बद्दल मलाही नाही काही समजलं."

निशिकांतला इतक्या वर्षांनंतर हे समजत होतं. तो पूर्णपणे ब्लॅंक झाला. त्याला काय कराव सुचेना, काय बोलव समजेना, तो फक्त ऋषभकडे बघत राहिला. आता त्याचं टेंशन खूप वाढल. कालचा राग कुठच्याकुठे निघून केला आणि त्या रागाची जागा आता काळजीने घेतली. ऋषभने निशिकांतला सर्व सांगितलं. पण ऋचा आणि जुईने असं का केलं हा वेगळाच प्रश्न निशिकांतसमोर होता.