आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - ३ PRATIBHA JADHAV द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - ३

या तिच्या छोट्याश्या कॉलेज विश्वात फक्त ऋचा तिची सर्वात जवळची मैत्रीण होती जिला जुई बद्दल सर्वकाही माहीत होत आणि जुईला देखील ऋचाबद्दल. पण अर्ध वर्ष संपत आल होत तरी जुईला निशिकांतबद्दल ऋचाने कधी काही सांगितल नव्हत कारण तशी वेळच आली नव्हती कधी. पण दिवाळीला जुई आणि निशिकांतची अचानक भेट झाल्यावर मात्र ऋचाने निशिकांत बद्दल जुईशी बोलायला सुरुवात केली. कारण तिच्या प्रिय मित्राने म्हणजेच निशिकांतने तिला मैत्रीची गळ घालून विंनती केलेली की जुईशी ओळख करून देशील. ऋचा तेच प्रयत्न करत होती मात्र हळूहळू तिच्या लक्षात यायला लागल की जुईला यात काहीही रस नाहीये, त्यामुळे ऋचाने निशिकांतला तसं सांगितलं पण निशिकांत काही केल्या ऐकायला तयार नव्हता; त्यामुळे ऋचा त्याला म्हणाली "निशी, मी तुझी जुईशी ओळख तर करून दिली ना मग आता तू जाऊन स्वत: बोल तिच्याशी आणि ओळख वाढवून घे." यावर निशिकांत मनातून खरतर ऋचावर चिडला होता पण तिला तो काहीही जाणवू न देता तिथून निघून गेला. ऋचाला त्याचा राग समजायला वेळ नाही लागला. तीही थोडी हिरमुसली आणि तिने जुईशी निशिकांतबद्दल बोलण्याचा शेवटचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. जुई मात्र याबद्दल अनभिज्ञ होती. इकडे निशिकांत आता फक्त जुईचा विचार करत होता, तिच्याशी कसं बोलायच, ओळख कशी वाढवायची ; सध्यातरी ह्याच कल्पनाविश्वात तो रममाण होता. हे असं त्याच्याबाबतीत ह्या आधी कधी घडल नव्हत.

हे आठवून थोडं हसू फुलल त्याच्या ओठांवर आणि तेवढ्यात ऋचाचा कॉल आला त्याला आणि तो भानावर आला. ऋचाचा यावेळी कॉल म्हणजे पुन्हा जुईच्या आठवणीत भर. त्याने फोन रिसीव केला. ऋचाचा आवाज खूप दिवसांनी ऐकत होता निशिकांत कारण जुईच्या जाण्यानंतर त्याने सर्वच मित्र मैत्रिणींसोबत कॉनटॅक्ट जवळजवळ कमी केलेला आणि ऋचा सोबत तर पूर्णपणे कॉनटॅक्ट तोडून टाकला होता, कारण जेंव्हा जेंव्हा तो ऋचाला बघत असे त्याला जुईची आठवण कासावीस करत असे. त्याला एक आशा होती की जुई ऋचाची बेस्ट मैत्रीण असल्यामुळे ऋचा काहीही करून जुईशी कॉनटॅक्ट करेल; पण ऋचाने तसा साधा प्रयत्नही केला नव्हता ; मग आज अचानक ऋचाचा फोन का? तो थोडं गोंधळला खरा पण पलीकडून ऋचाने काळजीने विचारलं, "निशी , कसा आहेस? ; निशिकांतला काय उत्तर द्याव हेच सुचेना. तो फक्त इतकंच म्हणाला, "ठीक आहे रे. तू सांग कशी आहेस?" ऋचा गहिवरून म्हणाली. "तुझी काळजी वाटली रे म्हणून तुला फोन केला. तुझ्या आवाज ऐकून खरंच खूप बरं वाटलं; जॉब कसा चाललाय तुझा?" निशिकांत म्हणाला,"ठीक चाललाय" पण खरतर हे सांगणं वरवरच होतं. त्याला ऋचाशी पुढे काय बोलावं समजेना म्हणून तिला फक्त "चल बाय" एव्हढ म्हणून त्याने फोन ठेवला.

ऋचा त्याची अवस्था समजू शकत होती. तिने त्याला फक्त एवढाच मेसेज केला की "जुईचा जास्त विचार नको करुस अरे. कदाचित ती कधी तुझ्यात रमलीच नसेल; आणि माझ्याशी ही तिची असणारी मैत्री ही कदाचित स्वार्थ असेल तिचा किंवा फक्त तिची त्यावेळची गरज असेल. जमलंस तर तिला विसरून जा." निशिकांतने हा मेसेज वाचला पण त्याच मन हे मानायला तयारच नव्हता की जुई त्याच्यात कधी रमलीच नसेल. तिच्या इतक तर तोही स्वत:ला ओळखत नव्हता. त्याच्या शिवाय तीच विश्व कधी नव्हतच आणि तिच्या शिवाय त्याच अस्तित्व, मग का असा निर्णय घेतला जुईने? फक्त एकदा सांगितल असत तिने की निशी, मला तुझ्यासोबत नाही करायच continue relation, मी निघून गेलो असतो तिच्या आयुष्यातून फक्त एकदा बोलायला हव होत तिने, तिच्या या इच्छेसाठी मी स्वत:च निघून गेलो असतो. निशीकांतच्या डोळ्यातून अश्रूंचा पुर वाहत होता. त्याला खरतर तर काहीच सुचत नव्हत कारण त्याची जुई असं अर्ध्या वाटेवर त्याला न सांगता कुठे निघून जाईल याची त्याने स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती. निशिकांत एकांतात रडतोय असा भास झाल्यामुळे आई त्याच्या रूम मध्ये गेली आणि त्याला खरंच रडताना बघून विचारल "काय झाल निशी?" यावर मात्र निशीला स्वत:ला आवरता आल नाही आणि त्याने पहिल्यांदा आईसमोर जुईचा उल्लेख केला.