On the way to remembrance - Chapter - 2 books and stories free download online pdf in Marathi

आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - २

रात्रीचे आठ वाजले होते. काळजीने आईने निशिकांतला फोन केला. तेंव्हा निशिकांत विचारांतून बाहेर आला,आणि घरी निघाला. पण जुईचा विचार काही केल्या त्याच्या मनातून जात नव्हता. घरी पोहोचल्यावर आईने काळजीने विचारले कुठे होतास? जेवायच नाही का? यावर तो इतकंच उत्तरला की इथेच होतो . भूक नाही. आणि त्याच्या रूम मध्ये गेला. पण खूप अस्वस्थ होता कारण त्याला कारणच माहीत नव्हत जुई च्या अचानक निघून जाण्याच. त्याने जुईला कॉल केला अगदी जसा रोज करतो तसाच, आणि घडलेही नेहेमीप्रमाणे कॉल रिसिव्ह नाही केला गेला. नाराज झालेला निशिकांत गादीवर निपचित पडून राहिला आणि डोळ्यातील आसवाना वाट करून देत भूतकाळात रमला.

आजही त्याला कॉलेजचा तो दिवस स्पष्ट आठवत होता ज्यादिवशी त्याने जुईला पहिल्यांदा पाहिल. निशिकांत जुईला एक वर्ष सीनियर होता. पण त्याच कधी कुठल्याच मुलीकडे लक्ष वेधल्या गेलच नव्हत कारण स्पष्ट होत की त्याला फक्त स्वत:च्या भवितव्याचा विचार करायचा होता. चांगल शिक्षण घेऊन स्वत:ला एक चांगला डॉक्टर म्हणून काम करायचं होत. आणि तो खूप focused होता. कॉलेजच्या पहिल्या वर्षी त्याने कॉलेज मध्ये स्वत:च खूप छान नाव कामावल होत हुशार विद्यार्थी म्हणून. दिसायला ही खूपच हॅंडसम असलेल्या निशिकांतला कॉलेज मधली कुठलीच मुलगी दुर्लक्ष करेल असं कधीच होत नव्हत. खूप साऱ्या मुली त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायच्या पण त्याने कधीच त्याकडे लक्ष दिल नाही. त्याची फक्त एकच चांगली मैत्रीण होती. जीच नाव होत ऋचा. ऋचा त्याची लहानपणीपासूनची मैत्रीण होती. आणि दोघे ही एकमेकांशी सर्व काही शेअर करत असत. त्यांची मैत्री निखळ होती. निर्मळ,निखळ मैत्री शिवाय त्यांच्या नात्याला कोणताच गंध नव्हता. ऋचा देखील निशिकांतच्याच कॉलेज मध्ये पाहिल्या वर्षात शिकत होती. आणि जुई ऋचा ची मैत्रीण होती.

दोघीही एमबीबीएस च्या पहिल्या वर्षी एकमेकांच्या मैत्रिणी झाल्या होत्या आणि तेही खूप घट्ट मैत्रिणी. एकत्र अभ्यास, एकत्र दुपारच जेवण, एकत्र फिरायला जाण सर्व काही खूप मस्त चालल होत. दिवाळी पर्यन्त सर्व खूप छान होत. कॉलेज सुरू झाल्यापासून ऋचा निशिकांत शी फक्त आणि फक्त जुई बद्दल गप्पा मारायची. त्यांच्या गप्पांचा विषय जुई पासून सुरू व्हायचा आणि जुई वरच संपायचा. खरतर निशिकांतला खूप कंटाळा यायचा जुई बद्दल ऐकायचा. कधी कधी तर जुई बद्दल त्याला असूया वाटायची कारण ऋचा फक्त आणि फक्त जुईमय झाली होती. पण कुठेतरी त्यालाही जुई बद्दल उस्तुकता जाणवत होती. पण कधी त्याने स्वत:हून जुई कशी दिसते? काय करते? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. आजही जर ही गोष्ट त्याला आठवली तर त्याला हसायला येत कारण जिच्याबद्दल उस्तुकताही नव्हती तीच जुई त्याच आयुष्य बनली होती.

दिवाळीला सहज म्हणून जुई ऋचाच्या घरी आली आणि निशिकांतच लक्ष तिच्याकडे गेल. त्यावेळी त्याला समजलच नाही की त्याला काय होतय पण काहीतरी बदल तर नक्कीच जाणवत होता त्याला; आणि त्याने नकळत हे पण मान्य केल की ऋचाने जुई बद्दल सतत बोलत राहण हे खूप स्वाभाविक आहे कारण जुई खरंच खूप गोड मुलगी आहे. तिचा आवाज, तीच मधाळ बोलण, तिचा बोलका चेहरा, या सर्वांमध्ये निशिकांत एकदम हरवून गेला होता. पण त्याला जुई खूप मनापासून आवडली होती. आणि आता तर ऋचा नंतर तो ही जुईचा फॅन झाला होता. दिवाळी मध्ये निशिकांतच सर्वच आयुष्य फक्त जुई भोवती फिरत होत. पण त्याला वाटल होत तितक जुईशी मैत्री कारण सोप्प नव्हत. कारण जुई फारशी कुणाशी बोलत नसायची फक्त ऋचा आणि ती एवढंच तीच कॉलेज विश्व होत.

क्रमश:

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED