Aathvanichya Vaatevarni - 6 books and stories free download online pdf in Marathi

आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - ६

निशिकांतने ऋषभसोबतच ऋचाकडे जाण्याचा निर्णय घेतला. घरी पोहोचताच त्याने ऋचाला ऋषभने जे काही सांगितल त्याबद्दल विचारल. ऋचाने जे घडलं ते सर्व सांगितलं निशीकांतला, पण ती हे नाही सांगू शकली की तिने आधी का नाही सांगितलं हे त्याला. ऋचा इतकंच म्हणाली की नको थांबूस तिच्यासाठी तिला जर तुझ्याबद्दल काही वाटत असतं तर तिने इतक्या वर्षात कमीतकमी एकदा तरी कॉनटॅक्ट केला असता. कदाचित ती तुला आणि मलाही म्हणजे आपल्याला विसरलीही असेल. निशिकांतच डोकं खरंतर खूप दुखायला लागल होतं. त्याला ऋचा जे सांगत होती ते पटत होतं, पण मन ऐकायलाच तयार नव्हतं. तिने असं सोडून जायला नको हवं होतं; हाच विचार सतत त्याच्या मनात येत होता. तो ऋचाच्या घरून निघाला. कमीतकमी आजतरी दादाशी कॉनटॅक्ट व्हावा या अपेक्षेने त्याने जयला कॉल लावला. त्याच्यासाठी जेवढे आई बाबा महत्वाचे त्याहीपेक्षा त्याचा जय दादा महत्वाचा. जयने निशिकांतचा फोन पटकन उचलला. तो जस्ट फ्रि झाला होता मिशन मधून, आणि लगेच निशीचा आलेला फोन यामुळे त्याला खूप बरं वाटलं.

दादाशी बोलायच ठरवलं तर खरं निशिकांतने, पण जुईबद्दल तो नाही बोलू शकला जयशी; कारण काय बोलाव, कसं सांगावं हे त्याला समजत नव्हतं. त्यामुळे त्याने, "सहजच केला फोन तब्येत विचारायला" असं सांगितल. जास्त बोलायला तसाही वेळ नव्हता जयकडे त्यानेही मग सर्व खुशाली विचारली आणि काळजी घ्यायला सांगून फोन ठेवताना इतकंच म्हणाला की तो पुढच्या महिन्यात येणार आहे घरी. निशिकांतला आनंद झाला पण जुईच्या आठवणींमुळे तो नाराज होता. घरी पोहोचल्यावर त्याने जयचा निरोप आईला दिला. जेवताना बाबांशी गप्पा मारल्या पण मन रमल नाही त्याचं. झोपायला गेल्यावर पण त्याला झोप येत नव्हती. म्हणून तो सहजच फेसबुकवर लॉगिन झाला. आणि नोटिफिकेशन मध्ये त्याला त्याच्या जय दादाची पोस्ट दिसली. आणि पहिल्यांदाच जुईची पोस्ट सुद्धा दिसली. तो ती पोस्ट ओपन करणार तितक्यात त्याला त्याच्या एका गरोदर पेशंटचा फोन आला. आणि एमर्जन्सि म्हणून त्याला लगेच जाव लागलं. त्याने लॅपटॉप पटकन बंद केला. तयारी केली. त्याचा असिस्टेंट रुपेश याला कॉल केला, आणि आईला सांगून निघाला तेंव्हा साधारण रात्रीचे ११ वाजले होते. डिलिव्हरी केस असल्यामुळे कदाचित त्याला वेळ देखील लागू शकणार होता, तसं त्याने आईला सांगितल होतं. रुपेश गाडी घेऊन आला, आणि ते हॉस्पिटलला निघाले.

इकडे जुईने पहिलं की निशिकांत ऑनलाइन होता तरी तिने त्याला टाकलेला मेसेज त्याने पहिलाच नाही. तिला थोड वाईट वाटलं पण तिने ती गोष्ट दुर्लक्षित केली. हॉस्पिटलमध्ये निशिकांतला पहाटेचे ४ वाजले. त्याने विचार केला की आता सकाळची ओ.पी.डी करूनच घरी जाऊ; म्हणून त्याने आईला तसं फोन करून सांगितलं. रुपेशने दोघांसाठी चहा आणला. इतक्या सकाळी चहा घेताना अचानक त्याला जुईची आठवण आली. त्याला दिवसातून चार वेळा चहा प्यायची सवय होती कॉलेजमध्ये असताना; लायब्ररीत अभ्यास करताना त्याला चहाची सवय लागली होती. पण जेंव्हा पासून जुईने त्याला समजवल तेंव्हापासून त्याने चहा फक्त दिवसातून एकदा पिण्याचं वचन दिल होत तिला, आणि तेही फक्त सकाळीच. आज पर्यन्त तो ते वचन पाळत होता आणि आज सकाळच वातावरणदेखील त्या दिवसा सारखच होत त्यामुळे त्याला जुईची आठवण आली. आणि अचानक त्याला फेसबुक बद्दल आठवलं. त्याने फोन घेतला फेसबुक चेक करायला पण नेमकी त्याची चार्जिंग संपली होती. त्याने फोन चार्जिंगला लावला आणि तो राऊंडवर गेला. आणि त्यानंतर जयचा कॉल आला. रुपेशने तसा निरोप दिला निशिकांतला. फ्री झाल्यावर निशिकांतने जयला कॉलबॅक केला. आणि त्यावेळी नेमका फोन जुईने उचलला. तिने तिच्या मैत्रिणीशी बोलताना जयला आलेला कॉल उचलल्यामुळे तिच्या लक्षात नाही आल की तिने चुकून जयचा फोन उचलला नकळतपणे. कारण त्या दोघांच्याही फोनच्या रिंगची टोन सारखीच होती. जय त्याच्या फोन जवळ नव्हता त्याला सिनीयर्सने बोलवल्यामुळे तो तिकडे गेला होता. फोन उचलल्यावर निशिकांत आणि जुई दोघेही एकाच वेळी 'हॅलो' म्हणाले आणि एक क्षण निशब्द शांतता पसरली.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED