'एक प्रख्यात एन्काउंटर स्क्वाड हेड अर्जुन दीक्षित आणि त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीची म्हणजे डॉक्टर जुई यांची प्रेमकथा इथे वाचकांच्या भेटीला येत आहे. त्याबरोबरच क्राइम आणि सस्पेन्स थ्रिल यात आहे.अर्जून आणि जुई आता त्यांचे मार्ग वेगळे आहेत, त्यांच्या दिशा बदलल्या आहेत. आज अचानक ते आमने सामने येत आहेत. तर ओळखतील का एकमेकांना? काय आहे त्यांची आपबिती? जाणून घेण्यासाठी वाचत राहा, माझी नवीन कथा जी एक क्राइम स्टोरी आणि प्रेमाचा सस्पेन्स थ्रिलर आहे. रिमझिम धून... *************** रात्री १२ ची वेळ नैनिताल रेल्वे स्टेशन अगदी सुन्न होते. रिक्षाला पैसे देऊन ती खाली उतरली. फाटक क्रॉस करून तिने प्लॅटफॉर्मवर विचारपूस केली. ती प्लॅटफॉर्मवर फिरत असताना अनेकांच्या
नवीन एपिसोड्स : : Every Monday, Wednesday & Friday
रिमझिम धून - १
'एक प्रख्यात एन्काउंटर स्क्वाड हेड अर्जुन दीक्षित आणि त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीची म्हणजे डॉक्टर जुई यांची प्रेमकथा इथे वाचकांच्या भेटीला आहे. त्याबरोबरच क्राइम आणि सस्पेन्स थ्रिल यात आहे.अर्जून आणि जुई आता त्यांचे मार्ग वेगळे आहेत, त्यांच्या दिशा बदलल्या आहेत. आज अचानक ते आमने सामने येत आहेत. तर ओळखतील का एकमेकांना? काय आहे त्यांची आपबिती? जाणून घेण्यासाठी वाचत राहा, माझी नवीन कथा जी एक क्राइम स्टोरी आणि प्रेमाचासस्पेन्स थ्रिलर आहे. रिमझिम धून... *************** रात्री १२ ची वेळ नैनिताल रेल्वे स्टेशन अगदी सुन्न होते. रिक्षाला पैसे देऊन ती खाली उतरली. फाटक क्रॉस करून तिने प्लॅटफॉर्मवर विचारपूस केली. ती प्लॅटफॉर्मवर फिरत असताना अनेकांच्या ...अजून वाचा
रिमझिम धून - २
'ती तिथून पाळण्याचा प्रयत्न करू लागली. पण ट्रेनमध्ये चढलेल्या काही गुंडांपैकी एकाने तिचा हात खेचला आणि तिला वरती ओढू ती हळूहळू चालणाऱ्या ट्रेनबरोबर फरफटू लागली. आता ट्रेन कोणत्याही क्षणी भरधाव वेगाने सुटली असती. तिने आपला हात सोडवण्याचा खूप केला पण त्यातील अजून एकाने तिला पकडले. आता ती ट्रेनला लागून फरपटत होती. संपलं सगळं, असं वाटून तिने आपले डोळे झाकून घेतले. एवढ्यात तिला आतून कोणाचा तरी जोराचा धक्का लागला. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली, पुढे काय झाले हे तिला काहीच समजले नाही. आणि ती धावणाऱ्या ट्रेनमधून खाली प्लॅटफॉर्म वर आदळली होती.' ''आई ग.'' एक भयंकर किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली. आणि ...अजून वाचा
रिमझिम धून - ३
''ये मॅडम हमारे साथ मैं ही हैं, उनका बॅग ले लो.'' त्या जखमी व्यक्तीने त्या मुलीकडे बोट दाखवत सांगितले. तिच्या लक्षात आले की, या सगळ्या गडबडीत तिची ट्रेन निघून गेली आहे. सुटलेली ट्रेन बघून ती मटकन तीथेच श खाली बसली होती. ट्रेन तर निघून गेली होती. मागे काही अंतरावर बेशुद्ध होवून पडलेले ते चार गुंड केव्हाही शुद्धीवर आले असते. या विचाराने तिला अजून धडकी भरली. तिला मागे बघण्याचेही धाडस होईना. ती उठून त्या जखमी तरुणाच्या मागे चालू लागली. 'हॉटेल कोकोनला आल्यावर ती मुलगी थोडी रिलॅक्स झाली. ते दोन सफेद कपड्यातील इसम त्या जखमी तरुणाला तिथे सोडून गेले. आणि पाच ...अजून वाचा
रिमझिम धून - ४
''नाष्टा करून घ्या मॅडम. गुंड मागे लागले तर पाळण्याची ताकद हवी ना?'' तो तरुण अधिकारी पुन्हा म्हणाला. आणि उठून खायला बसली. गुंड शब्द उच्चारल्या बरोबर तिची भीतीने थरथर झालेली त्याने पहिले. पण साहजिक होत. एक मुलगी, त सुद्धा एकटी रात्रीचा प्रवास करणार, आणि त्यात अचानक ओढवलेला प्रसंग यामुळे घाबरली होती. हे त्याच्या लक्षात आल. मंगेश काही कामानिमित्त बाहेर गेला. ते पोलीस अधीकारी बेड्वर डोळे मिटून पडलेले होते. नाश्टा उरकून जुई पुन्हा सोफ्यावर बसली. तिचे कुठेही मन लागेना. एकाकी पानाची भावना मनाला पोखरत होती. कुठे फसलो आपण? आणि घरचे लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील? आपण फसवलं सगळ्यांना. या विचारात ...अजून वाचा
रिमझिम धून - ५
''नाही, नको, त्याची काही गरज नाही.'' ती म्हणाली. ''घरी कोणी नाही का?'' हळूहळू चालत जाऊन त्याने आपली बॅग बाहेर अर्जुन आपली बॅग उघडून काहीतरी शोधत जुईला विचारत होता. ''आहेत सगळे, पण फोन नको, डायरेक्ट जाऊन भेटेन.'' म्हणत उठून तिने ग्लासमध्ये पाणी घेतले आणि ती पिऊ लागली. ''हा घ्या मोबाइल, एक्सट्रा आहे. सेफ्टीसाठी असूदेत. माझा नंबर सेव्ह आहे, गरज लागली तर केव्हाही कॉल करू शकता.'' आपल्या बॅगमधील अतिरिक्त असलेला एक सेलफोन तिच्याकडे देत तो म्हणाला. ''नको, खरचं नको.'' तिने तो घेतला नाही, त्याने तिचा हात वरती करून त्यावर तो मोबाइल आणि चार्जर त्यावर ठेवला. आणि तो पुन्हा येऊन बेडवर बसला. ...अजून वाचा
रिमझिम धून - ६
'तिला ओरडून ओरडून त्याला सांगावं असं वाटत होत.'लहानपणी एवढ्या आठवणी, एवढे क्षण एकत्र घालवून, आता कसा काय विसरु शकतोस मला? मला शोधण्याचा प्रयत्नही केला नाहीस? का? कधी आयुष्यात भेटावसं पण वाटलं नाही, का? मी मात्र तुला शोधत असायचे. वेळ मिळेल, आठवण येईल तेव्हा तुझी माहिती काढत राहायचे. हा माझे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. पण तू ... तू अधिकारी होतास ना? तू कसेही मला शोधून काढू शकला असतास. मुळात इच्छा असायला पाहिजे ना. तुला तर मी आठवत पण नसेन, तू शोधणार काय म्हणा. असो आपण असे अनोळखीच बरे आहोत.' तो समोर झोपलेला होता, आणि जुई आपल्याच विचारांच्या धुंदीत बडबड करत ...अजून वाचा
रिमझिम धून - ७
'साहेब, इमर्जन्सीमध्ये एक फ्लाईटबुकिंग मिळतं आहे, मी तुम्हाला फोन करणार होतो, पण मोबाइल ची बॅटरी डाऊन झाली. काय करू? तिकीट मागवू?'' दाराबाहेर बाहेर मागेच उभा होता. तो अर्धवट भिजलेल्या अवस्थेत दिसत होता. आत येऊन त्याने अर्जुनला सांगितले ''केव्हाच फ्लाईट आहे?'' अर्जुन म्हणाला. ''आज पहाटे ४ चे, तुमच्या ओळखीवर या मॅडमला एक सीट नक्कीच मिळून जाईल. कालच त्यांचे कागदपत्र बनवून झाले आहेत. त्यानंतर केव्हा सोय होईल माहित नाही. आणि इथली पूरस्थितीपाहता तुम्ही मुंबईला परतणे योग्य आहे.'' मंगेश जुई आणि अर्जुनकडे बघत म्हणाला. ''दोन तिकिटे बुक कर, डिटेल्स मेसेज करतो. तिकिट्स एअरपोर्ट आल्यावर मला दे. आणि इथलं बिल सेटल कर.'' अर्जुनने ...अजून वाचा
रिमझिम धून - ८
'शेवटी डोळे मिटून ती निपचित पडून राहिली. आणि काही क्षणात झोपलीही. झोपेत तिच डोकं अर्जुनच्या खांद्यावर आलं होत. तिची पडलेली मान व्यवस्थित करून त्याने हाताचा आधार देऊन तिला सरळ केले. त्यावेळी तिने घातलेला डीप नेक टॉप किंचितसा खाली सरकला होता. आणि तिच्या मानेवरून थोडं खाली असे काहीतरी लागल्याचे किंवा एखाद्याचा नखांचे निशाण त्याला दिसले. तिला कळू न देता त्याने हळुवार तिच्या खांद्यावरून जॅकेट खाली केले आणि पहिले. मानेवर , खांद्यावर आणि मानेपासून थोडस खालच्या बाजूला असे थोडे फार ओरखडे, आणि लागल्याचे लालसर निशाण होते. जॅकेट पूर्ववत करून त्याने तिचे हात वेगैरे चेक केले. हाताच्या मनगटावर आणि उजव्या पायाच्या करंगळीला ...अजून वाचा
रिमझिम धून - ९
'लॉक उघडून जुई घरात शिरली. तिने आपली खांद्याची पर्स काढून टेबलवर ठेवली. थकली होती ती. थोडस पाणी पिऊन ती सोफ्यावर आडवी झाली नाही तोच एक हलकासा पर्फ्यूचा वास तिच्या नाकाशी रेंगाळत होता. हा ओळखीचा वाटणारा परफ्युम वासावरुन तिने ओळखला होता. पण हा वास इथे आपल्या जवळपास येणे निव्वळ अशक्य होते. आपण स्वप्नात तर नाही ना? असे तिला वाटले. आणि तिने चटकन डोळे उघडले. आपल्या घरी आपल्याशिवाय अजून कोण आहे का? हे पाहण्यासाठी ती आधी बेडरूममध्ये गेली, नंतर तिने किचन आणि हॉल चेक केला पण आजूबाजूला कोणीही नव्हते. हॉलच्या बाल्कनीतून तिला कसलातरी आवाज आला. आणि बाजुला करून ठेवलेल्या खिडकीच्या पडद्याकडे ...अजून वाचा
रिमझिम धून - १०
'फ्रीझ उघडूनजुईने कणिक आणि भाजी बाहेर काढून ठेवली. थोडं सलाड करून तिने टेबलवर ठेवल. पोळी लाटायला सुरुवात केली तेव्हा किचनमध्ये आला होता. तो उगाच तिच्या मागे पुढे करत होता. त्याला स्वयंपाकाचं काहीही येत नाही, हे जुईने ओळखलं. तरीही तो केसात काहीतरी करत जुईच्या मागेच उभा होता.'''अर्जुन पोळी भाजी चालेल ना? मी रात्रीचा राईस करत नाही. तुला पाहिजे तर करते.'' तिने पोळी भाजून घेतली आणि प्लेटमध्ये काढली. अर्जुन अजूनही तिच्या केसात मानेवर काहीतरी करत होता. काहीतरी चेक करावं असं तो तिला बघत होता. जुईला कळेना तो असं का वागतोय. तिने लाटण हातात घेतलं आणि ती मागे वळली. ''काय चेक करतोस, ...अजून वाचा
रिमझिम धून - ११
'खूप दिवसांनी आज दोघानांही मनसोक्त गप्पा मारल्या. एकमेकांच्या आयुष्यातील आठवणी आणि प्रसंग शेअर केले होते.जेवण आटोपून जुई पुस्तक वाचत तिच्या नेहेमीच्या सवाई प्रमाणे. अर्जुन फोनवर बोलत होता. त्याच्या केसच्या संदर्भात काहीतरी क्लूज सापडले होते. त्याविषयी तो बोलत होता. फोन ठेवून तो तिथेच बेडवर झोपून गेला. पुस्तक ड्रॉवरमध्ये ठेवून जुई आत आली. तिने पाहिले तर हातात फोन तसाच ठेवून अर्जुन गाढ झोपला होता. तिने त्याचा मोबाइल बाजूला ठेवून दिला. आणि चादर अंगावर घातली. निरागस मुलाप्रमाणे दिसत होता तो. काही वेळ जुई त्याला बघत राहिली होती.''जु झोपायचं नाही का? अशीच बघत राहणार आहेस?'' अर्जुन जागा झाला होता. ''तुला कस समजलं , ...अजून वाचा
रिमझिम धून - १२
'लोणावळा सोडून पोलिसांची गाडी काही अंतरावर पुढे जाऊन थांबली. इथे अचानक गाडी थांबवण्याचे काहीही कारण नव्हते. त्याच्या मागे अर्जुन मंगेश यांची गाडी पाच-दहा मिनिटाच्या अंतरावर होती. ते गप्पा मारत होते, तेव्हाच त्यांना ओव्हरटेक करून एक काळ्या रंगाची फॉर्च्युनर पुढे निघून गेली. ती अचानक त्या पुढे असणाऱ्या पोलिसांच्या गाडीच्या अगदी बाजूला चिकटून निघाली होती. थांबलेल्या पोलिसांच्या जीप मधून गोळीचा आवाज ऐकू आला. काहीतरी झटापटी सुरु झाली होती. अर्जुनला लक्षात आले आणि त्याने गाडीचा स्वीड वाढवला. गाडी चालवताना त्याने मोबाइल हातात घेऊन पुढे असलेल्या पोलीस गाडीचा फोटो काढून ठेवला होता. बाजूलाच असणाऱ्या काळ्या फॉर्चुनरचा फोटो सुद्धा त्या सोबत आला होता.पाहिजे असलेले ...अजून वाचा
रिमझिम धून - १३
'ऑपरेशन उरकून जुईने बॅग भरली. आजचे पेशन्ट्स संपले होते. संध्याकाळ झाली होती. त्यामुळे सिस्टरला बाय करून ती घरी जाण्यासाठी घरी आईची विचारपूस करण्यासाठी तिने फोन लावायला हातात घेतला, तोच अर्जुनाचा तिला फोन आला होता. तिने उचलला.'''हॅलो अर्जुन,गुड इव्हनिंग.'' जुई '''गुड इव्हिनिंग जु. ऐक ना, आय नीड युअर हेल्प.'' वेळ कमी होता. अर्जुन पटकन तिला बोलून गेला. ''काय झालं? आर यु ओके?'' जुई ''आय एम फाईन. एका मित्राचा अपघात झालाय. तो मुंबईला नाही येऊ शकत. तुला कर्जतमध्ये यावं लागेल. अर्थात तुझी यायची सोय मी करतो.'' अर्जुन ''कर्जत? एवढ्या लांब. अरे दुसरा जवळचा डॉक्टर बघ ना. मी बघू का?'' जुई ''नको, ...अजून वाचा
रिमझिम धून - १४
'जुई त्यांची चाललेली बडबड ऐकून घेत होती. शेवटी त्यांनी अर्जुनच्या खोलीत येऊन तिची बॅग आणि पर्स ठेवून दिली. ते जुईने त्यांना बाजूची खोली उघडायला सांगितली. तर त्या नाही म्हणाल्या.''साहेबानी तुमचं सामान इथे ठेवायला सांगितलं आहे. जर तुम्हाला बाजूची पाहिजे असेल तर साहेबांकडून चावी घ्या. मग मी ती खोली साफ करून देते.'' मावशी म्हणाल्या. आणि जुई 'ओके' बोलून अर्जुनच्या रूममध्ये शिरली. एव्हाना तो फ्रेश होवून कपडे चेंज करत होता. जुई सोफ्यावर बसून त्याच्याकडे बघत होती. शर्ट घालायला त्याने हात वरती केला आणि तो 'उफ' करून तसाच उभा राहिला.''अर्जुन स्वतःची जरा काळजी घेत जा. अजून तुझं ऑपरेशन पूर्णपणे बरं झालेलं नाहीये. ...अजून वाचा
रिमझिम धून - १५
'बाहेर पुन्हा गाडीचा हॉर्न वाजला होता. मंगेश बाहेर आला. हॉलमध्ये आल्यावर जुईने पहिले, फारुख भाई तिथे आले होते. अर्जुनचे बॉडीगार्ड.'''अरे मॅडम आप, कैसे है? और यहा कैसे ?'' तो हात दाखवत म्हणाला. ''मॅडम डॉक्टर आहेत. पेशण्टच्या उपचारासाठी बोलावून घेतलं.'' मंगेश त्याला सांगत होता. ''आपसे मिलने के बाद साहब बी खोंये खोंये रहेते हैं, कुछ दवा दुवा दे दो.'' म्हणत फारुख भाई बॅग ठेवून खाली सोफ्यावर बसला. मंगेश हसायला लागला. जुईला काय बोलावं कळेना. ती गालातच स्माईल देऊन वरती पळाली. ''फारुख सेठ क्या खबर हैं?'' एवढ्यात अर्जुन तिथे आला होता. त्याला बघून सगळे एकाएकी शांत झाले.आणि फारुख त्यांना केसच्या संबंधी ...अजून वाचा