'ऑपरेशन उरकून जुईने बॅग भरली. आजचे पेशन्ट्स संपले होते. संध्याकाळ झाली होती. त्यामुळे सिस्टरला बाय करून ती घरी जाण्यासाठी निघाली. घरी आईची विचारपूस करण्यासाठी तिने फोन लावायला हातात घेतला, तोच अर्जुनाचा तिला फोन आला होता. तिने उचलला.'
''हॅलो अर्जुन, गुड इव्हनिंग.'' जुई
'''गुड इव्हिनिंग जु. ऐक ना, आय नीड युअर हेल्प.'' वेळ कमी होता. अर्जुन पटकन तिला बोलून गेला.
''काय झालं? आर यु ओके?'' जुई
''आय एम फाईन. एका मित्राचा अपघात झालाय. तो मुंबईला नाही येऊ शकत. तुला कर्जतमध्ये यावं लागेल. अर्थात तुझी यायची सोय मी करतो.'' अर्जुन
''कर्जत? एवढ्या लांब. अरे दुसरा जवळचा डॉक्टर बघ ना. मी बघू का?'' जुई
''नको, दुसरा काहीही पर्याय नाही. मला रिस्क नकोय, एका प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. तू ये मग सविस्तर बोलू. २-३ तास लागले तरी चालेले. निघ लवकर.'' अर्जुन
''ओके, पण काय झालाय ते सांग. तसं साहित्य घेऊन यायला. तिथे परत सगळं मिळेल कि नाही माहित नाही.'' जुई
''गोळी लागले, उजव्या खांद्याला. आणि हो, बाकी माझी माणसं तुला इथे घेऊन येतील. ते कुठे? कस? हे मेसेज करतो.'' अर्जुन
''गोळी? काय?'' जुई मोठ्याने ओरडलीच.
''जु, रिलॅक्स. तो ठीक आहे. प्रथमोपचार केले गेले आहेत. जास्त प्रश्न विचारू नको. ट्रस्ट मी आणि निघ लवकर. हॉस्पिटल मधून डायरेक्ट निघ. पाहिजे ते सामान घे. तुझ्या फ्लॅट बाहेर सफेद वोल्वो उभी असेल. बसून ये. प्लिज.'' अर्जुन टेन्शनमध्ये म्हणाला. आणि जुई काहीही न विचारता होती तशीच तयारी करून पटापट निघाली.
*****
'रात्र झाली होती. अर्जुन बाहेर अंगणात बसून जुई येण्याची वाट बघत होता. मंगेश आतमध्ये थांबला होता. बाहेर रातकिड्यांची किरकिर सुरु होती. आजूबाजूला अगदी स्मशान शांतता पसरलेली होती. एवढ्या आतमध्ये हा तीन माजली प्रायव्हेट बंगला होता. अर्जुनअशा गुंतागुंतीच्या केसच्या वेळी थांबत असे. किंवा काही छुप्या गोष्टी करायच्या झाल्या तर तो इथे येत असे. इथे त्याचा प्रायव्हेट बंगलो आहे, हे त्याच्या व्यतिरिक्त फक्त मंगेशला माहित झाले होते. नाहीतर याची कोणालाही खबर नव्हती.
''साहेब तो आरोपी शुद्धीवर आलाय. त्याला खूप त्रास होतोय. इकडे या.'' मंगेश आतून ओरडत बाहेर आला आणि अर्जुन धावत आतमध्ये आला. पलंगावर तो व्यक्ती आरडा ओरड करत होती. अर्जुनाला बघून तो शांत झाला. त्याला पाणी पाजून अर्जुन त्याच्या बाजूला बसला.
''काका शांत व्हा. मी अर्जुन आहे. तुम्हाला सोडवलय त्या तुरुंगातून. पण इथे तुम्ही सावध राहा. आपण पळून आलोय.'' अर्जुन त्या व्यक्तीला म्हणाला. तसे शांत होवून ते काका आपला हात त्याला दाखवू लागले.
''हात दुखतोय. डॉक्टर बोलावं.''
''मंग्या यांना काहीतरी खायला आन रे.'' अर्जुन मंगेशला म्हणाला.
''लगेच आणतो साहेब.'' म्हणत मंग्या मागे किचनकडे गेला.
''काका डॉक्टर येत आहेत. तोपर्यंत तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. डॉक्टर नी तुम्हाला खायला द्यायला सांगितलं आहे.'' मंगेश ने आणलेली डिश त्यांच्या पुढे सरकवत तो म्हणाला. त्या संशयित आरोपीला म्हणजेच काकांना उठता येत नव्हते. मंगेश पुढे आला आणि त्याने त्या काकांना भरवायला सुरुवात केली.
''मंगेश हे कोणी आरोपी नाहीत, त्यांना योजना पंडित केसमध्ये उगाच अडकवण्यात आलेलं आहे. त्यांना सोडवण्यासाठी मी स्वतःच त्यांचं अपहरण केलं.'' अर्जुन सांगत होता.
''ते माझ्या लक्षात आलं साहेब, पण यांच्या विरुद्ध पुरावे मिळालेत ना?'' मंगेश
''सगळे बनावट पुरावे आहेत. योजना पंडितांचे हे काका लागतात, ते त्यांच्या पुतणीचा खून का करतील. लहानच मोठं केलं त्या मुलीचा खून हे का करतील?'' अर्जुन
''पण साहेब तुम्हाला हे कसे काय माहित?'' मंगेश
''मोठी स्टोरी आहे, सांगेन नंतर. खरा गुन्हेगार सापडेपर्यंत सध्यातरी यांना वाचवायचं आणि काही दिवस इथे ठेवायचं आहे.'' अर्जुन
''पण साहेब तुम्ही स्वतः जातीने या केसमध्ये लक्ष देताय त्यामुळे आपल्या सर्कलचे लोक चर्चा करता आहेत.'' मंगेश
''करू देत चर्चा, मी यामध्ये स्वतः का उतरलोय हे वेळ आल्यावर समजेल. आहे काही खास कारण.'' अर्जुन म्हणाला एवढ्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजला होता.
जुई आतमध्ये आली होती. अर्जुनला भेटून त्याच्यासोबत ती सरळ पेशंटच्या रूममध्ये गेली. तिच्या मागून मंगेश तिचे सामान घेऊन तिथे पोहोचला. अर्जुन आणि मंगेशच्या मदतीने तिने त्याच रूममध्ये ऑपरेशनच्या सेटअप करून घेतला. सगळे साहित्य तिने येताना तिच्या सोबत आणलेले होते. मंगेशच्या मदतीने तिने तयारी केली. बी.पी. , शुगर ताबडतोप चेक करून जुईने ऑपरेशन ला सुरुवात केली. अनास्थेशिया देऊन बेशुद्ध करण्यात आले आणि त्या काकांच्या खांद्याची गोळी बाहेर काढली. तिथे दोन-तीन टाके मारून ऑपरेशन पूर्ण केली. सोबत आणलेल्या मेडिसिन्स मंगेशकडे देऊन त्या देण्याचा टाईमिंग सांगितलं. ते काका अजून शुद्धीवर आले नव्हते. शुद्धीवर आल्यावर त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सूचना देऊन ती बाहेर येऊन फ्रेश झाली.
जवळपास अर्ध्या तासात सगळं आवरलं होत. मग ती बाहेरच्या रूममध्ये येऊन अर्जुनला भेटली. तो डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये बसलेला होता.
*****
''मावशी, मॅडम ना आत घेऊन जा, आणि घरची माहिती द्या.'' अर्जुन म्हणाला. आणि तो मोबाइल घेऊन त्यावर नंबर डायल करत बाहेर निघून गेला.
''मावशी काय झालं? तुम्ही हसता का?'' जुई त्यांना विचारात होती. तिला नवल वाटले.
''साहेब इथे येतात तेव्हा त्यांच्या सोबत कोण ना कोण पुरुष लोक असतात, आज पहिल्यांदा मॅडम दिसत आहेत. मला म्हातारीला बरं वाटल.'' म्हणत त्या जुईची बॅग उचलून वरच्या मजल्यावर निघाल्या.
''अच्छा! एरवी तुम्ही एकट्या राहता इथे?'' जुई आजूबाजूला बघत विचारत होती.
''नाही, माझे यजमान आहेत ना. ते मागच्या आवारात असतात. तब्येत बारी नाही न त्यांची, म्हणून आराम करतात.'' मावशी सांग होत्या.
''मागच्या आवारात म्हणजे ?'' जुई
''साहेबांच्या या बंगल्यामागे आमच्यासाठी राहायला एक घर बांधलेले आहे. तिथे आहेत ते. साहेबानी हि जागा घेऊन हा बंगाल बांधला. त्यावेळी आजूबाजूची कितीतरी एकर जागा स्वतःकडे घेऊन ठेवली आहे. सगळीकडे झाडं झुडपं आहेत म्हणा. पण जवळपास कुणी राहणार नाही. गाव वस्ती सोडून खूप आत आहे हा बंगाला. म्हणून आम्ही दोघे नवरा बायको इथेच राहतो.'' मावशी जुईला सांगत होत्या. तेव्हा जुई समजले कि हा अर्जुनचा बंगला आहे.
''मावशी मी डॉक्टर आहे. ते पेशन्ट बरे होइ पर्यंत इथेच आहे, तर तुमच्या मिस्टरांना बघायला उद्या येईन तिथे.''
''बर झालं डॉक्टर मॅडम, उदय या हो त्यानं बघायला. आता मी तुम्हाला घर दाखवते. इकडे या.'' म्हणत मावशींनी जुईला घराची माहिती द्यायला सुरुवात केली.
''खाली तुम्ही बसला होतात तो हॉल होता. त्याच्या उजव्या बाजूला ते पेशन्ट आहेत ती एक पाहुण्यांसाठी बनवलेला खोली आहे. आणि हॉलच्या डाव्या बाजूला अजून एक खोली आहे, आपले मंग्या भाऊ आणि फारुख भाई इथे आल्यावर त्या रूममध्ये थांबतात. हॉलपासून सरळ पुढे एक जेवणाची खोली आहे आणि त्याच्या सरळ पुढे जेवण बनवण्याच स्वयंपाक घर. आता आपण हॉलमधून जीन्यांनी वरती आलोय. या मजल्यावर दोन मोठ्या झोपण्याच्या खोल्या आहेत. विशेष म्हणजे या घरातील सगळ्या आराम खोल्यांनमध्ये सेपरेट बाथरूम आहेत. आणि या दुसऱ्या मजल्यावरच्या दोन्ही खोल्या मोठ्या प्रशस्त आहेत. साहेबांनी इथे सगळ्या गोष्टी स्वतःच्या आवडी नुसार करून ठेवल्या आहेत. साहेब या उजव्या रूममध्ये असतात. मला एकटीने साफसफाई जमत नाही. आणि साहेबांच्या आई-आणि मोठे साहेब आल्यावर त्या डाव्या खोलीत थांबतात. त्यामुळे डावी खोली बंद शक्यतो असते. वरती वरच्या मजल्यावर मोठं आवर आहे. ते सुद्धा सगळ्या बाजूंनी काचांच्या खिडक्यांनी बंद करून ठेवलेलं आहे. तिथे पन्नास माणसे आरामात झोपू शकतात. अशी सोया आहे.'' मावशींनी जुईला सगळ्या घराची ओळख करून दिली. सगळ्या खोल्या दाखवल्या.
*****
क्रमशः