ही कथा आहे एका अश्या मुलीची जिने बरीच स्वप्न पाहिली होती आपल्या वयात,पण काही कारणाने तिची स्वप्न अपूर्ण राहतात.काय आहे तिचं स्वप्न?करेल का ती ते पूर्ण ते या कथेत पाहायला मिळेल. --------------- "मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती वेद जाधव यांचे अचानक लग्न सांगलीचे आमदार भूषण विखे-पाटील यांची एकुलती एक कन्या गुंजन विखे-पाटील सोबत झाले आहे. या लग्नाचे नक्की कारण काय आहे?हे जाणून घ्यायची सगळयांना उत्सुकता लागली आहे.पण जाधव परिवार मीडियाला उत्तर द्यायला टाळत आहेत"एक रिपोर्टर हातात आपला माईक पकडून मोठ्याने ओरडतच टीव्हीवर बोलत असतो.ती न्युज पाहून तिचे डोळे भरतात. एका मोठ्या अश्या मॉर्डन बेडरूममध्ये ती लाल घागरा चुनरी घालून बसली होती.कितीतरी महागडे असे दागिने तिच्या गळ्यात होते.डोक्यावर सिंदूर आणि हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात त्याच्या नावाचे मंगळसूत्र होते.जे पाहून पुन्हा पुन्हा तिचे डोळे भरत होते.कारण हे सगळं होईल याची तिला कल्पना देखील नव्हती. मोठ्या परिवारातून ती देखील होती.त्यामुळे तिला आसपास असलेल्या श्रीमंत वस्तूंचे काही नवल वाटत नव्हते.
Full Novel
गुंजन - भाग १
गुंजन....भाग १ ही कथा आहे एका अश्या मुलीची जिने बरीच स्वप्न पाहिली होती आपल्या वयात,पण काही कारणाने तिची स्वप्न राहतात.काय आहे तिचं स्वप्न?करेल का ती ते पूर्ण ते या कथेत पाहायला मिळेल. --------------- "मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती वेद जाधव यांचे अचानक लग्न सांगलीचे आमदार भूषण विखे-पाटील यांची एकुलती एक कन्या गुंजन विखे-पाटील सोबत झाले आहे. या लग्नाचे नक्की कारण काय आहे?हे जाणून घ्यायची सगळयांना उत्सुकता लागली आहे.पण जाधव परिवार मीडियाला उत्तर द्यायला टाळत आहेत"एक रिपोर्टर हातात आपला माईक पकडून मोठ्याने ओरडतच टीव्हीवर बोलत असतो.ती न्युज पाहून तिचे डोळे भरतात. एका मोठ्या अश्या मॉर्डन बेडरूममध्ये ती लाल घागरा चुनरी घालून बसली ...अजून वाचा
गुंजन - भाग २
गुंजन...भाग २"विश्वास ठेवून बघ माझ्यावर एकदा!! लग्न झालं म्हणजे सगळं संपलं नाही. ही तर सुरुवात आहे सगळ्याची. प्रत्येक नवीन थोडासा वेळ लागतो. तुला डान्सर बनायचं आहे ना? मग आपण अस करू की तुला सगळ्या नृत्य साईडच्या स्पर्धेत भाग घेता येईल आणि तू फेमस होशील अस काहीतरी करू" वेद काहीसा विचार करत म्हणाला. तो आपला मोबाईल काढतो आणि त्यावर सर्च करतो. तेव्हा त्याला काहीतरी नेटवर मिळत तसा तो खुश होतो.गुंजन मात्र त्याच्याकडे फक्त पाहत असते."हे बघ. आपण जर अस काही केलं तर?"वेद तिच्यासमोर मोबाईल धरत बोलतो.त्याच बोलणं ऐकून ती मोबाईल मध्ये पाहते आणि थोडीशी विचारात पडते."नको,नको!!प्लीज, मला आता स्वप्न नाही ...अजून वाचा
गुंजन - भाग ३
भाग. ३ आज गुंजनचा जाधवांच्या कुटुंबातील पहिला दिवस होता लग्नानंतरचा. तरीही, तिला काही जाग आली नव्हती. काल खूप थकल्याने जाग आली नाही!!पण वेद मात्र लवकर उठून आपला नेहमीप्रमाणे फ्रेश झाला होता. लग्न झालं होतं त्याच हे जगाला माहिती होते. पण एवढ्या तडकाफडकी झाल्याने बाहेरील लोकांना नेमकं कारण जाणून घ्यायचे होते.त्याला मात्र कोणाला काही उत्तर द्यावेसे वाटत नव्हते, त्यामुळेच तो त्यांचे कॉल टाळत असतो. तो ऑफिस साठी तयार होत असताना त्याची नजर घड्याळाकडे गेली. तस त्याच्या कपाळावर किंचितश्या आठ्या पडल्या. "ही मुलगी एवढा वेळ झोपते का नेहमी?"तो आरश्यासमोर तयार होत मनातच बोलतो. त्याला आता तिची काळजी देखील वाटून राहते. तसा ...अजून वाचा
गुंजन - भाग ४
भाग ४. मागील भागात:- "गुंजन चॅनेलचे १ मिलियन सबस्क्रायबर झाले आहेत. त्यात तुझा व्हिडीओ २० लाख लोकांनी पाहिला आहे.त्यामुळे बऱ्याच इंडस्ट्रीकडून फोन येत आहे. हे तर आनंदाची गोष्ट आहे यार आणि तू कसा चेहरा करून बसली आहे. चल खुश हो!!"वेद हसूनच बोलतो. "व्हिडीओ कसा मिळाला तुम्हाला? तुम्ही ओळखता काय मला आधीपासून?"गुंजन त्याच्याकडे नजर रोखुन पाहत बोलते. तिचं ते बोलणं ऐकून तो शांत होतो. आतापासून पुढे:- वेद काहीवेळ शांतच राहतो. कारण गुंजनला काय सांगावे? याचा तो विचार मनातच करत असतो. पण त्याला तिच्यापासून काही लपवायचे नव्हते. त्यामुळे तो एक मोठा श्वास घेतो आणि सोडतो. "तुला मी जेव्हा पासून पाहिले ना? ...अजून वाचा
गुंजन - भाग ५
भाग ५. गुंजन आणि तो सोबतच खाली येतात. तसे, वेदच्या घरचे काही लोक रागातच गुंजनला पाहायला लागतात. त्यांच्या नजरा गुंजन काहीशी घाबरून वेदच्या जवळ थांबते. वेद तिचा हात घट्ट आपल्या हातात धरून शांत राहतो. ते पाहून ती लोक आणखीन खवळतात. "वेद, तुम्ही लग्न केलं आणि आम्हाला कळवले देखील नाही !! पण, आम्हांला त्याच काही वाटलं. आता तुमच्या बायकोने जे काही केलं ते आम्हाला बिलकुल पसंत नाही पडलं"एक मध्यम वयाची बाई त्याच्याजवळ येत रागातच म्हणाली. गुंजनला अजून धड वेदच्या परिवारासोबत ओळख देखील झाली नव्हती आणि त्यात आता ती लोक अशी बघत होती जस काय तिने खूपच मोठं चुकीचे केलं आहे? ...अजून वाचा
गुंजन - भाग ६
भाग ६. गुंजन आणि वेदने घर सोडले होते त्यांचे. पण गुंजनला आता ते दोघे कुठे राहणार? हे माहीत नव्हते. त्याच्या वर विश्वास तिला होता. काहीवेळाने वेदची गाडी थांबते. तसा वेद तिला बाजूला करतो. "सॉरी, तुझे काही स्वप्न असतील ना लग्नाला घेऊन? पण अफसोस माझ्यासोबत लग्न झाल्याने ते मोडले असेल? त्यामुळे मी सॉरी म्हणतो. आजपासून एक नवीन सुरुवात करूया का गुंजन?" वेद शांतपणे तिला म्हणाला. त्याला ती एक नजर करून पाहते. "मला नाही माहीत अहो, माझं काय आहे पुढे ते? पण तुम्ही मला कधीच सोडून जाऊ नका. नेहमी माझ्यासोबत रहा." गुंजन भरल्या डोळयांनी त्याला म्हणाली. किती तो शांत पणे सगळ्या ...अजून वाचा
गुंजन - भाग ७
भाग ७. "तुम्ही, इथं झोपा माझ्याजवळ." गुंजन हट्ट करत म्हणाली. कारण तिला वाटलं वेद सोफ्यावर जाईल झोपायला? याचा विचार ती म्हणते. वेद हसूनच तिच्या बाजूला पडतो. गुंजन खुश होऊन त्याच्या बाजूला झोपायला जात असते की, तेवढ्यात तिचा फोन वाजतो. तशी ती फोनवरच नाव पाहते आणि ते पाहून तिच्या कपाळावर आठ्या उमटतात.कारण नाव तिच्या वडिलांचे झळकत होत. ती तसाच फोन बाजूला ठेवत असते की, तेवढ्यात वेद तिच्या हातून फोन घेतो. "गुंजन, मी असताना तुला घाबरायची गरज नाही. कारण मी बोलणार आता यांच्यासोबत." वेद अस बोलून तो कॉल उचलतो. तो काही बोलणार तर पलीकडून बोलणं सुरू होतो. "काय ग अवदसे? तिथे ...अजून वाचा
गुंजन - भाग ८
भाग ८. "गुंजन$$$, हे सगळं तुझे बाबा करत होते? तरीही तू मला का बोलली नाही?"वेद चिडून विचारतो. तशी ती त्याच्यासमोर उभी राहते. "अहो, नका ना अस चिडू प्लीज!!" ती रिक्वेस्ट करत म्हणाली. तिच्या बोलण्यावरून कळून चुकले त्याला की, ती कधीही रडायला लागेल. त्यामुळे तो एक सुस्कारा सोडतो आणि काहीसा शांत होतो. "ओके, बाबा सॉरी. पण गुंजन, आणखीन काही झाल असत तर?त्यामुळे मला राग आला"वेद शांत होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. "हम्म...सॉरी" ती एवढंच कसतरी बोलते.कारण एका वे ने विचार केला तर वेद देखील चुकला नव्हता. तो तिच्या भल्यासाठी बोलत असतो. हे, तिला कळते. ती तशीच त्याच्या जवळ जाते ...अजून वाचा
गुंजन - भाग ९
भाग ९.मागील भागात:- "सॉरी" तो एवढंच बोलतो. पण गुंजन मात्र , चिडूनच गॅलरीत निघून जाते. तिला भयंकर राग आला त्याच्या बोलण्याचा. हे त्याला कळून चुकत. मग तो देखील, तिच्या मागे निघून जातो. आतापासून पुढे:- गुंजन गॅलरीत उभी राहते आणि रडायला लागते. वेदच बोलणं तिला जिव्हारी लागलं होतं. कारण आजवर वेदसाठी ज्या फिलिंग तिच्या मनात निर्माण झाल्या होत्या. त्या अजूनपर्यंत इतर कोणत्याही मुलाला पाहून झाल्या नव्हत्या!! वेदच्या स्वभावामुळे ती हळूहळू त्याच्या प्रेमात पडत होती. पण अजूनही तिने कबूल मात्र तोंडाने त्याला केले नव्हते. त्यामुळे वेदला तिचं मन कळत नव्हतं. आता देखील मस्करीत तो बोलून गेला. पण त्याच्या या बोलण्याने ती ...अजून वाचा
गुंजन - भाग १०
भाग १०. गुंजन दिल्लीला निघून गेली होती. पण इकडे वेदला मात्र घरी आल्यावर घर अस शांत वाटत होते. कारण नव्हती त्या घरात. आता तर त्याला तिची एवढी सवय झाली होती की, घरात उगाच तिचे असल्यासारखे भास होत होते. तो मनाला समजावत हॉल मधील सोफ्यावर शांत पणे मागे डोकं टेकवून डोळे बंद करून बसतो. पण तेवढ्यात त्याला काहीतरी आठवत तस तो झटकन डोळे उघडतो. "ओ, गॉड . गुंजन कडे माझा फोन नंबरच नाही आहे आणि तिचा देखील माझ्याकडे नाही आहे. आता कसा कॉन्टॅक्ट करू मी तिच्यासोबत? दिल्लीतील हॉटेलचा नंबर असेलच ना? त्यावर कॉल करून पाहतो मी" वेद अस स्वतःशीच बोलून ...अजून वाचा
गुंजन - भाग ११
भाग ११. आजचा गुंजनचा दिल्लीमधील दुसरा दिवस होता. काल उशिरा रात्री झोपल्याने, सकाळी तिला जागच आली नाही लवकर. वेदने कॉल केले तरीही मॅडम मस्त झोपल्याने, त्यांना त्याचे कॉल ऐकू आले नाही. शेवटी, गुंजन झोपेतच मोबाईल कंटाळून उचलते. "हॅलो, कोण?मला झोपू द्या ना!"गुंजन झोपेतच बोलते. "गुंजन,सकाळचे नऊ वाजले आहे"वेद काहीसा हसून हळू आवाजात बोलतो. त्याच ते बोलणं तिला आधीतर कळत नाही. पण, नंतर कळताच ती भयंकर शॉक होते. "क...काय ? नऊ वाजले? मी एवढा वेळ झोपून कशी राहिली?अहो..तुम्ही पण मला कस झोपू दिलात?"गुंजन घाईत उठतच आपलं बडबडतच त्याच्याशी बोलायला लागते. "गुंजन, तू नेहमी एवढा वेळ झोपते. यावेळी मी नव्हतो तुला ...अजून वाचा
गुंजन - भाग १२
भाग १२. वेदने गुंजनला काही सांगितले नव्हते, तो येणार आहे वगैरे? तिने कामच अस केलं होतं की, त्याला येणं पडले होते. वेदच प्लेन मध्यरात्री दिल्लीत पोहचते. तसा तो तिथून त्याच्या बिझनेस फ्रेंड्सला कॉन्टॅक्ट करून गाडी पाठवायला सांगतो. काहीवेळात वेदला घ्यायला एक मोठी महागडी अशी ब्लॅक कार येते. तसा वेद त्याची चौकशी करून आतमध्ये बसतो. "सर, आप ड्राईव्ह करेंगे क्या?" त्या कारचा ड्रायव्हर शॉक मधून विचारतो. कारण वेद ड्रायव्हिंग सीटला बसला होता. हे पाहून तो विचारतो. " हां!! आप को मैं आपके घर छोड देता हूं। क्योकी मुझे दिल्ली के सारे रास्ते पता हैं और अकेले घुमना पसंद हैं। इसलीए ...अजून वाचा
गुंजन - भाग १३
भाग १३. दुसऱ्या दिवशी गुंजनला पहाटे जाग येते. ती थोडीशी मागे सरकून मान वळवून वेदला पाहते आणि पाहतच राहते. वेद मस्त असा आपला शर्ट काढून तिला कुशीत घेऊन झोपला होता. त्यात त्याची शरीरयष्टी पाहून तिला कसतरी होत. उगाच पोटात गुदगुल्या केल्यासारखं वाटत. आज पहिल्यांदा ती त्याच शरीर पाहत होती. या आधी कधी तिने वेदला अस पाहिलं नव्हतं. वेदच शरीर पाहून ती नकळतपणे त्याच्या छातीवर स्वतःचा मुलायम असा हात ठेवते. "माझा नवरा, एवढा सेक्सी आणि हॉट आहे?हे आजच कळलं मला. म्हणून काय सगळ्या मुली यांना पाहत असतात?",गुंजन मनातच त्याच्या छातीवर हात फिरवत म्हणाली. तिला स्वतःचा हेवा देखील वाटत होता. "ते ...अजून वाचा
गुंजन - भाग १४
भाग १४. "गुंजन, उठा मॅडम. सकाळ झाली आहे.",वेद तिच्या गालावर स्वतःचे ओठ टेकवत प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला. तो असच करत होता. पण तरीही गुंजन डोळे उघडून पुन्हा डोळे बंद करत असायची. "नका ना छळू!! मला झोपू द्या तुम्ही",ती अस बोलून पुन्हा त्याच्या कुशीत शिरते. तो आता नाही मध्ये मान हलवतो. "गुंजन, अग आज दिल्ली पाहू या ना? मी तुला दिल्ली दाखवणार आहे. पण त्या नंतर मात्र , तू न घाबरता दिल्लीत वावरायचे आहे. हे दिल्ली शहर, कधी तुला आपलं करून घेईल? आणि कधी तुझ्या मनाची भीती कमी करेल? हे, तुझं तुला कळणार नाही. बघ, तू इथून निघताना ...अजून वाचा
गुंजन - भाग १५
भाग १५. काही दिवस गुंजन आणि वेद आपलं दिल्ली वगैरे फिरून आता आपल्या आपल्या ठिकाणी जाणार होते. वेद आणि आता पुन्हा साडे नऊ महिन्यानंतर ते दोघे एकमेकांना भेटणार होते. वेदच्या जाण्याची वेळ जवळ आली होती. म्हणून गुंजन सकाळपासूनच मुसमुसत होती. तिला अस रडताना पाहून तो पटकन तिला जवळ घेतो. "गुंजन, सोना अस करणार आता तू ? नको ना रडू. आपण पुन्हा भेटणार आहोत.",वेद तिला समजावत म्हणाला. पण तरीही तिला भरून येत होतं. कारण आता त्याची सवय झाली होती तिला. त्याने तिला या वातावरणात कस वावरायचे शिकवले , तरीही आपल्या माणसासोबत वावरण्यात एक वेगळंच असत. त्यामुळे ती रडत होती. "आपण ...अजून वाचा
गुंजन - भाग १६
भाग १६. स्थळ :- मुंबई, महाराष्ट्र. हल्ली गुंजन घरात नसल्याने वेदने स्वतःला कामात झोकून टाकले होते. घरी आल्यावर पुन्हा एकट राहावे लागणार हे माहीत असल्याने तो अस करत असायचा. गुंजनसमोर जरिही ती स्ट्राँग असा दाखवत असला, तरीही घरात आल्यावर मात्र तो हतबल व्हायचा!! जास्तच सवय तिची त्याला लागली असल्याने त्याला एकांत नको वाटत असायचा. पण घरी तर जावे लागणार होते. याचा विचार करून तो थोडा लेट घरी जायचा. गुंजनचे शो दिल्लीत चालू झाले होते. तो टीव्हीवर न चुकता ते पाहायचा. तिला अस डान्स करताना पाहून त्याचा थकवा कुठल्या कुठे गायब होत असायचा. आजही तो थोडा उशिराच घरी आला. बंगल्यात ...अजून वाचा
गुंजन - भाग १७
भाग १७. मागील भागात:- दिल्लीत गुंजन आपल्या रूममध्ये रात्रीची अचानक घाबरून उठून बसते. तिच पूर्ण अंग घामाने भिजून गेलं अस अचानक घाबरून उठल्याने तिच्या हृदयाचे ठोके जलद गतीने वाढले होते. नकळतपणे तिचा हात तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर जातो. तस तिला तिच्या मंगळसूत्राचा एक धागा तुटलेला दिसतो. त्या धाग्यातून काही काळे मणी बेडवर पसरलेले असतात. ते पाहून ती घाबरते. "वेदऽऽऽऽ", तिच्या तोंडून भितीने निघते. आतापासून पुढे:- गुंजन पॅनिक होऊन पटकन आपला मोबाईल हातात घेते आणि वेदचा नंबर डायल करून त्याला कॉल करायला लागते. दोन ते तीन वेळा रिंग होते आणि कॉल बंद होतो. असच पुन्हा पुन्हा तिच्या बाबतीत घडत राहत. तशी ...अजून वाचा
गुंजन - भाग १८
भाग १८. काल रात्रभर गुंजन मंगळसूत्र ओवत बसली होती. त्या नादातच ती मध्यरात्री कधीतरी झोपून गेली. सूर्याची कोवळी किरणे रूमच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश करून तिची रूम प्रकाशमय करतात. तसं त्या प्रकाशाने तिला जाग येते. गुंजन डोळे किलकिले करत आळस देते आणि भानावर येत आपल्या हातातील मंगळसूत्र पाहून भलतीच आनंदी होते. कारण ते मंगळलसूत्र तिने पूर्णपणे ओवून पुन्हा आधीसारखे केले होते. जणू काहीतरी मोठं अस तिने केले? अस तिला वाटत होतं. ती पटकन त्या मंगळसूत्रावर स्वतःचे ओठ टेकवते आणि तसच ते स्वतःच्या गळ्यात घालते. "माझं मंगळसूत्र बनल. बर झाल!! मी काल रात्री किती घाबरली होती त्यात वेद पण कॉल उचलत ...अजून वाचा
गुंजन - भाग १९
भाग १९. गुंजनचा परफॉर्मन्स तर बेस्ट झाला होता आणि तिला वन्स मोअर मिळाल्याने तिने पुन्हा एकदा सगळयांना नाचून दाखवलं आपला परफॉर्मन्स संपवून ती स्टेजच्या खाली उतरते. सगळे जण तिला चेंजिंग रुमपर्यंत जाईपर्यंत हात मिळवणी करून तिला अभिनंदन करत असतात. ती देखील हसूनच सगळयांना धन्यवाद म्हणत असते. सगळयांचे आभार मानून ती रूममध्ये पोहचते आणि हसूनच पटकन आपल्या मोबाईल वरून वेदला कॉल करते. "अभिनंदन , मिसेस वेद. खूप छान डान्स होता तुमचा. ", वेद हसूनच कॉल उचलल्या उचलल्या तिला म्हणाला. त्याचा तो आवाज आणि कौतुक पाहून तिला भरून येत. "थँक्यु, मिस्टर वेद. तुम्ही आज बिझी नाही का?",गुंजन आवाजावर कंट्रोल ठेवत विचारते. ...अजून वाचा
गुंजन - भाग २०
भाग २०. वेद तर जागी बसल्या बसल्या आईजवळ झोपून जातो. पण दिल्लीत मात्र गुंजन वेदने कॉल नाही उचलला म्हणून करत जागी राहते. मन उगाच तिचं अस्वस्थ होत होते. नकोते विचार देखील तिच्या मनात येऊन जातात. ती आपल्या मोबाईलकडे पाहतच रात्रीची बेडवर झोपून जाते. आज वेदला लवकरच जाग आली होती. त्याने उठून आधी आईला चेक केलं आणि नंतर मग तो तसाच आपलं आवरायला निघून गेला. आज आई घरात आहे त्यात तिला बरं नव्हतं म्हणून, तो ऑफिसला न जाण्याच ठरवतो. स्वतःच सगळं आवरुन खाली हॉलमध्ये येऊन आपला लॅपटॉप घेऊन काम करत बसतो. "आईची अशी अवस्था केली आहे या लोकांनी ना? आता ...अजून वाचा
गुंजन - भाग २१
भाग २१."आई? त्या इथे कसे काय?त्या घरात असताना तुम्ही अस करत होतात? त्यांनी पाहिलं ना तर माझ्याबद्दल गैरसमज करतील. वगैरे सोडून मी अस किस केलं तुम्हाला. ओ गॉड वेद तुम्हाला आधी सांगता येत नव्हतं का? त्यात माझी साडी पण अशी आहे? तुम्ही एकटे असशाल म्हणून सिव्हलेस आणि बॅकलेस घातला ब्लाऊज मी. पण आता मलाच कसतरी वाटत आहे. सासूबाई समोर अस काही घालून जायला.काय विचार करतील त्या माझा...",गुंजन गोंधळून त्याच बोलणं ऐकून भीतीने एकटीच त्याला पाहत बडबडत असते. तसा वेद तिची बडबड ऐकून हसूनच तिच्या तोंडावर स्वतःचा हात ठेवतो. तशी ती वैतागून त्याला पाहते. "किती बडबडत आहेस? अरे बाबा शांत ...अजून वाचा
गुंजन - भाग २२
भाग २२. गुंजनला येऊन एक दिवस देखील झाला नव्हता आणि तिने तर पूर्ण घराचा ताबा हाती घेतला. वेदने तर घरात असल्याने वेगळाच आनंदी राहत असायचा. तिची ही काही वेगळी अवस्था नव्हती. वेदच्या आईची काळजी घेत ती वेदला देखील हळूहळू वेळ देत होती. असेच एका रात्री वेद गुंजनला बेडवर जवळ घेऊन बसला होता. तो आपल्या उजव्या हाताची लांबसडक बोटे तिच्या हातात अडकवतो. तशी गुंजन गालात हसते. "अहो, तुम्ही ना खूप छान आहात!! आईला आणि मला जपून आपलं काम करत असतात. ",गुंजन प्रेमळ आवाजात म्हणाली. तिचा असा आवाज ऐकून वेद मागूनच तिला जवळ घेतो. "फक्त प्रेमळ? गुंजन एवढे दिवस तू मला ...अजून वाचा
गुंजन - भाग २३
भाग २३. पहाटे सहाच्या दरम्यान वेदला जाग येते. तो हळूच डोळे उघडून आपल्या बाजूला पाहतो. त्याच्या हातावर शांत झोपलेल्या चेहरा पाहून तो गालात हसतो. "माय लव्ह, गुड मॉर्निंग.",वेद तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. त्याच्या अश्या वागण्याने अंग चोरून घेऊन त्याच्या मिठीत शिरते. "वेद झोपू द्या ना मला. तुम्ही पण असेच झोपा!!",गुंजन झोपेतच त्याच्या पोटाभोवती हातांचा विळखा घालत म्हणाली. "गुंजन लव्ह यू. ",वेद हसूनच अस बोलून तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवतो. काहीवेळ तो तसाच तिला मिठीत घेऊन तिच्या केसांसोबत खेळत असतो. "सोना आता उठली नाही ना तू? तर मग मी पुन्हा रूमच्या बाहेर तुला जायला देणारं",वेद तिच्या कानाजवळ जात तिच्या ...अजून वाचा
गुंजन - भाग २४
भाग २४. गुंजन आणि वेदचे दिवस चांगले जात होते. पण इकडे जाधवांच्या घरी मात्र काही चांगल घडत नव्हते. कारण होती. ती आजवर जाधवांनी जी काम कधीच केली नव्हती. ती करायला लावत असायची. लिगली डेझीने जाधवांच्या प्रॉपर्टीवर अधिकार मिळवला होता. तसे पुरावे देखील तिच्याकडे होते. "वेद, अहो तुम्ही किती काम करता ना? मला बोलायचं आहे तुमच्याशी. तुम्ही दोन मिनिट इथे बसा!!", गुंजन आपला राग शांत करत म्हणाली. वेद रुम मध्ये इकडून तिकडे कॉल वर बोलत आपल फिरत होता. गेले दोन अडीच तास त्याच असेच चालू होत. गुंजनने दोनदा नाष्टा आणला होता त्याच्यासाठी. पण महत्त्वाचे काम असेल? असा विचार करून ती ...अजून वाचा
गुंजन - भाग २५
भाग २५. वेद गुंजनला सोडून ऑफिसला निघून येतो. ऑफिसला आल्यावर तो बाहेरच्या त्याचा वेट करत असलेल्या लोकांना आतमध्ये पाठवण्याचे कॉल करून देतो. त्याने कॉल केल्यावर काही वेळातच एक फॉरेन महिला आपल्या रुबाबातच त्याच्या केबिनच्या आत दार वाजवून येते. तसा वेद देखील त्या दिशेला पाहायला लागतो. "मिस्टर जाधव, नाईस टू मीट यू!!", ती महिला काहीशी हसूनच म्हणाली. तिचं बोलणं ऐकून वेदच्या चेहऱ्यावर भलीमोठी स्माईल येते. "डेझी, अजूनही तशीच आहेस तू?", वेद तिला उत्तर देत म्हणाला. "मग बदलली पाहिजे का? ज्यांच्यासाठी वाईट, त्यांच्यासाठी वाईट आहे मी. तुमच्यासाठी चांगली आहे", डेझी त्याच्यासमोर येत चेअरवर बसत म्हणाली. "मला हे माहित आहे. सध्या कामाचं ...अजून वाचा
गुंजन - भाग २६
भाग २६. गुंजनच सेमी फिनाले जवळ असल्याने ती खूपच स्वतः वर मेहनत घेत होती. कारण फिनालेला पोहचण्यासाठी तिला या चांगला परफॉर्मन्स करायचा होता. मगच ती शेवटच्या ठिकाणी पोहचणार होती. या कारणाने ती मेहनत घेत होती. वेद सोबत बोलणे देखील तिचे कमी झाले होते. पण काहीतरी मिळवायच होत तिला ते सुद्धा वेदसाठी त्यामुळे ती मनाची समजूत घालत असायची!! शेवटी सेमी फिनालेचा दिवस उजाडला. सगळीकडे या शो ची बरीच पब्लिसिटी करण्यात आली होती. महाराष्ट्रीय लोक तर आपली कोणीतरी स्पर्धेत आहे? हे जाणून तो शो पाहत असायचे. त्यात गुंजनने तिच्या डान्सच्या अदांनी बऱ्याच लोकांवर भुरळ पाडली होती. तिची स्टाईल एकदम युनिक असायची. ...अजून वाचा
गुंजन - भाग २७
भाग २७."वेदऽऽऽ", अस बोलून मागे वळून रडतच त्याला मिठी मारते. तसा तो देखील हसूनच तिला जवळ घेतो. यावेळी महाराष्ट्रीयन वेद जाधवला तिथं पाहून बऱ्याच स्टेजच्या खाली असलेल्या मुलींना शॉक बसतो. कारण वेद त्याच्या स्वभावाने आणि दिसण्याने कितीतरी मुलींचा क्रश बनलेला होता. त्यात आता त्याने गुंजनला जवळ घेतल्याने काही मुली तर आता मनातच चरफडत होत्या. पण वेदला याच काही देणं घेणं नव्हत. तो तर सध्या गुंजनच अचिव्हमेंट पाहून आनंदी होता. स्टेजच्या मागे राहून त्याने पूर्ण तिचा डान्स पाहिला होता. पण जस त्याला आतमध्ये जायला सांगितले, तसा तो आनंदी होऊन आतमध्ये आला. "तो मिसेस वेद आपको कैसे लगा हमारा सरप्राइज?", अँकर ...अजून वाचा
गुंजन - भाग २८
भाग २८. वेद आला स्पर्धा पाहायला हे पाहून गुंजन आनंदी तर होतीच पण तिने अजिबात स्वतः ची प्रॅक्टिस मिस्ड नव्हती. दोन दिवसांत तिने तिचा बेस्ट दाखवून बेस्ट असे स्वतः चे डान्स बसवले होते. वेद दिल्लीत राहून आपल काम देखील पाहत असायचा आणि तिथूनच आईची विचारपूस देखील करत असायचा. शेवटी या भव्यदिव्य स्पर्धेचा अंतिम दिवस उजाडतो. तसे काहीं स्पर्धक थोडेसे सकाळी इमोशनल होतात. कारण पुन्हा काय त्यांना हे सगळ मिळणार नव्हत. हा इकडचा थाट , इथले नवीन मित्र मैत्रिणी काही पाहायला मिळणार नव्हते पुन्हा यामुळे थोडेसे ते भावुक होतात. गुंजनला देखील कमी महिन्यात दिल्ली भावली होती. आधी याच दिल्लीत यायला ...अजून वाचा
गुंजन - भाग २९
भाग २९. "गुंजनऽऽऽ", वेद अस बोलून तिला उचलून आत घेतो. आता त्याला देखील काळजी लागली होती. तो आणून बेडवर आणि लगेच डॉक्टरला कॉल करतो. काही वेळातच डॉक्टर रात्रीचे वेद गुंजनच्या हॉटेल रूमवर पोहचतात आणि गुंजनला चेक करायला लागतात. "कुछ ज्यादा नहीं हुआ है सर। मॅडमने आज ज्यादा प्रॅक्टिस की है ना इसलिये उन्हे चक्कर आये है।"डॉक्टर गुंजनला चेक करत म्हणाले. यावर वेद काहीही न बोलता शांत राहतो. डॉक्टर गुंजनला योग्य ते उपचार देतात आणि गोळ्या वगैरे देऊन निघुन जातात. ते गेल्यावर वेद गुंजन जवळ बसतो. तो थोडस झुकून तिच्या गालावर फिरवतो. "खूप त्रास झालं ना आता माझ्यामुळे? सॉरी सोना. ...अजून वाचा
गुंजन - भाग ३०
भाग ३०. गुंजन आणि वेद आपल्या मुंबईतील त्यांच्या बंगल्यात पोहचतात. आतमध्ये बंगल्यात ते जायच्या आधी वेदची आई गुंजनला ओवाळते मग घरात घेते. "गुंजन, खूप छान वाटल आम्हाला तुमचं यश पाहून. तुमचा डान्स पण चांगला होता", वेदची आई आनंदात म्हणाली. आईला पाहून गुंजन थोडीशी भावुक होते आणि त्यांना मिठी मारते. तिच्या अश्या अचानक वागण्याने त्या गोंधळून वेदकडे पाहतात. वेद डोळ्यांनीच त्यांना शांत राहायला सांगतो. तश्या त्या भानावर येऊन गुंजनच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतात. "तुम्हाला माहित नाही आई, पण तुमच्या तोंडून कौतुक ऐकून एक वेगळीच फिलिंग वाटली. कारण माझ्या घरात कधीच माझं अस कौतुक झाले नव्हते. लहानणापासूनच मी मुलगी आहे ना ...अजून वाचा
गुंजन - भाग ३१
भाग ३१. गुंजनचा आता संसार चांगल्या प्रकारे सुरू झाला होता. आईच्या आणि वेदच्या साथीने तिने तिचं यू ट्यूब चॅनल सुरू ठेवलं होत. त्यावर आठवड्यातून एकदा तिचा डान्सचा व्हिडिओ पोस्ट होत असायचा. इतर मुली तिला फॉलो करून आपला डान्स सुधारत होते. वेदने डेझीच्या साहाय्याने त्याच्या घरातील लोकांना त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी जेल मध्ये पाठवलं होत. वेदच्या बाबांचे लग्न झालेले असताना देखील त्यांनी इतर बाईशी संबंध ठेवले या त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भोगवण्यासाठी जेल मध्ये पाठवण्यात आले. त्यांची पूर्ण संपत्ती वेदने स्वतःच्या आईला दिली. मायराला मात्र ट्रीटमेंटसाठी बाहेरच्या देशात वेदने पाठवून दिले. स्वतः डेझी आणि त्याचा मित्र अनय देखील ...अजून वाचा
गुंजन - भाग ३२
भाग ३२. अनय आणि मायराने आपले एकमेकांवरचे प्रेम स्वीकारले असल्याने, डेझीने वेदच्या परमिशनने त्यांचे लग्न लावून दिले. मायराची डिलिव्हरी जवळ असल्या कारणाने तिने तसे केलं. सध्या मायराला डॉक्टरांनी प्रवासाला बंदी केली असल्याने, मायरा मनात असताना देखील भारतात जाऊ शकत नव्हती. अनय तिला खूप जपत असायचा. तिला बाहेर फिरायला घेऊन जाणे, तिला आवडत ते बनवून देणे. अस छोट्या छोट्या गोष्टीतून तो तिला आनंदी ठेवत असायचा. जरासा थकवा आला की तिच्या डोक्याची, पायाची मालिश करून देणे. हे पण तो करत असायचा. मायराला त्याचे एवढ प्रेम पाहून कधी कधी स्वतःचा हेवा वाटत असायचा. "मायरा झोप लागत नाही आहे का? कम हिअर!!", अनय ...अजून वाचा
गुंजन - भाग ३३
भाग ३३."तुझ्यामुळे झालं सगळे. आता तुझी सोना आई बनणार आहे आणि तू बाबा", वेदची आई हसूनच त्याचा कान सोडत आईचे बोलणे वेदला काही कळत नाही. जेव्हा कळते तेव्हा मात्र चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन बदलतात. "काय? मी बाबा? सिरीयसली?",वेद विचारतो. त्याच्या बोलण्यावर गुंजन लाजून खाली मान घालते. तसा वेद आनंदी होऊन तिच्याजवळ जातो आणि पटकन तिला मिठीच मारतो. "ओहऽऽ ,गुंजन तुला मला काय दिले आहे ना? हे तुझं तुला देखील माहीत नाही. आज तू जे मागशील ते तुला मी देणार. ती फक्त आता एका जागी बसून आपल हुकूम सोडायचे. सगळे काही मी तुझ्यासमोर हजर करेन. लव्ह यू गुंजन. लव्ह यू. ", वेद ...अजून वाचा
गुंजन - भाग ३४
भाग ३४."अनय, अनय. मला खूप त्रास होत आहे. प्लिज, तुम्ही मला सोडून जाऊ नका", मायरा वेदनेने विव्हळत म्हणाली. मध्यरात्री दरम्यान तिला प्रस्तुती कळा यायला सुरुवात झाली होती. अनयने डेझीच्या मदतीने तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये आणले. "माऊ, थोडस पेन सहन कर. फक्त थोड.", अनय तिला धीर देत म्हणाला. खरतर तिचे रडणे पाहून त्याला देखील वाईट वाटत होते. पण तिच्यासमोर तो स्वतः ला मजबूत दाखवत होता. "खूप पेन करत आहे अनय. आपल्या बाळाला काही होणार नाही ना? मॉम मला माझी मॉम हवी आहे!! भाई आणि वहिनीला बोलावं ना माझ्यासाठी प्लीज.", मायरा डोळ्यात पाणी ठेवून म्हणाली. या क्षणी तिला तिच्या घरच्या लोकांची खूप ...अजून वाचा
गुंजन - भाग ३५ (अंतिम)
भाग ३५. (अंतिम) मायराला चार दिवसांनी डिस्चार्ज दिला जातो. आता तिचे बाळ आणि ती सुखरूप आहे कळल्याने वेदला, गुंजनला होतो. ते बाळाचा बारसा भारतातच करायचा अशी गोड गोड धमकी देतात. एवढ सगळं मायराने करून देखील गुंजन आणि वेद तिच्याशी फोनवर अस बोलत होते की, जणू तिने काही केलच नाही!! तिला तर त्यांचा हा चांगुलपणा पाहून खूप वाईट वाटायचं. पण जेव्हा जेव्हा ती दुःखी व्हायची तेव्हा अनय आणि तिची आई तिला समजावत असायची. मग ती पुन्हा स्वतः ला सावरत असायची. त्या छोट्याश्या बाळाला दहाव्या दिवशी मायरा आणि अनय आईसोबत भारतात घेऊन जायला लागतात. डॉक्टरांना विचारून ते प्रवास करायला लागतात. जेव्हा ...अजून वाचा