अर्जुन विषाद योगधृतराष्ट्र म्हणाला हे संजया, धर्मक्षेत्र असलेल्या कुरूक्षेत्रात युद्धासाठी तयार असलेले माझे पुत्र व पांडुकुमार काय करत आहेत ते मला सांग. संजय म्हणाला, पांडवांच्या सैन्याचा व्युह पाहुन दुर्योधन भीष्मा जवळ जाऊन म्हणाला, तुमचा शिष्य ध्रुष्टद्युम्नाने रचलेला व्युह पहा. पांडवाची ही प्रचंड सेना दले पहा.अनेक धनुर्धारी आहेत तसेच द्रुपद, सात्यकी, विराट हे ही रणांगणात भीम, अर्जुना समान शोभत आहेत.वीर असे ध्रुष्टकेतु व चेकितात, महान असे पुरूजित, कुंतिभोज, शैब्य, शूर असा ऊत्तमौजा आणि पराक्रमी युधामन्यु, द्रौपदीचे पुत्र व अभिमन्यु. द्विजश्रेष्ठा ! आता आपल्याकडील सेनानायक होण्यासारखे प्रधान वीर पण सांगतो. आपण स्वतः सारख्या व्यक्ति व भीष्म, कृपाचार्य, कर्ण, भुरिश्रवा, अश्वत्थामा आणि विकर्ण हे.

1

भगवद्गीता - अध्याय १

अर्जुन विषाद योगधृतराष्ट्र म्हणाला हे संजया, धर्मक्षेत्र असलेल्या कुरूक्षेत्रात युद्धासाठी तयार असलेले माझे पुत्र व पांडुकुमार काय करत आहेत मला सांग. संजय म्हणाला, पांडवांच्या सैन्याचा व्युह पाहुन दुर्योधन भीष्मा जवळ जाऊन म्हणाला, तुमचा शिष्य ध्रुष्टद्युम्नाने रचलेला व्युह पहा. पांडवाची ही प्रचंड सेना दले पहा.अनेक धनुर्धारी आहेत तसेच द्रुपद, सात्यकी, विराट हे ही रणांगणात भीम, अर्जुना समान शोभत आहेत.वीर असे ध्रुष्टकेतु व चेकितात, महान असे पुरूजित, कुंतिभोज, शैब्य, शूर असा ऊत्तमौजा आणि पराक्रमी युधामन्यु, द्रौपदीचे पुत्र व अभिमन्यु. द्विजश्रेष्ठा ! आता आपल्याकडील सेनानायक होण्यासारखे प्रधान वीर पण सांगतो. आपण स्वतः सारख्या व्यक्ति व भीष्म, कृपाचार्य, कर्ण, भुरिश्रवा, अश्वत्थामा आणि विकर्ण.हे ...अजून वाचा

2

भगवद्गीता - अध्याय २

संजय म्हणाला, करुणसागरात बुडालेला, डोळे अश्रुनी भरलेले व दु:खी अशा अर्जुनाला बघुन श्री भगवान म्हणाले हे असे विचार (कश्मल-पापाचे) तुला कसे सुचले. हे नरवरा हे तुला शोभत नाहीत. याने तुला किर्ती किंवा स्वर्ग मिळणार नाही. पार्था हे अयोग्य आहे. ही षंढता नको. मनाची दुर्बलता सोडुन लढण्यासाठी ऊठ.अर्जुन म्हणाला, भीष्म,द्रोण हे वंदनीय व पुजेच्या योग्यतेचे आहेत. हे मधुसुदना मी त्यांच्याशी कशासाठी लढू हे मला सांग.महात्मा, गुरुंना मारण्यापेक्षा मी भीकेला लागेन. असे रक्ताने भिजलेले भोग काय कामाचे?. त्याना मारुन मी कोणती ईच्छा करू. आम्ही जिंकु किंवा नाही हे कोणास ठाऊक. मी श्रेष्ठत्व जाणत नाही. लढाईला तयार असलेल्या ध्रुतराष्ट्र पुत्राना मी मारु ...अजून वाचा

3

भगवद्गीता - अध्याय ३

तृतीय अध्यायकर्मयोगअर्जुन म्हणाला, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असे सांगतोस, आणि मला युद्ध करण्यास सांगतोस हे कसे, माझे मन तुझ्या बोलण्यामुळे सापडले आहे. तू कृपया माझ्या हिताचा स्पष्ट मार्ग सांग.भगवान म्हणाले, माझ्या उपदेशात विरोधाभास नाही. बुद्धियोग सांगताना मी सांख्यमतही सांगितले. दोन्ही मार्ग एकच आहेत. कर्म केलेच नाही तर मुक्ति मिळणार नाही. आपल्या वाट्याला आलेले कर्म केेलेच पाहिजे. कर्म न करता आपण राहुच शकत नाही. जो मनुष्य कर्म करण्यास नाकारतो पण मनातुन विषयांचे चिंतन करत असतो तो स्वत:ला फसवत असतो. त्याला दांभिक म्हणावे.आसक्ति सोडुन कर्माचे आचरण करावे. स्वधर्माचे जो निष्काम वृत्तीने आचरण करतो त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. शास्त्राने नेमुन दिलेले कर्म करावे. ...अजून वाचा

4

भगवद्गीता - अध्याय ४

चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग श्री भगवान म्हणाले, हा अविनाशी योग मी प्रथम सूर्यदेवाना सांगीतला. सूर्य देवाने मनुला मनुने इक्ष्वाकुस सांगीतला़ अशा गुरु शिष्य परंपरेने अनेक राजांनी जाणला. परंतु आता ही परंपरा खंडित झाली आहे. तोच पुरातन योग अर्जुना मी तुला सांगत आहे. तू माझा सखा भक्त आहेस. तू हे दिव्य रहस्य ऐक. अर्जुन म्हणाला - तुमचा जन्म तर आजचा आहे. सूर्य देवांचा तर खुप पुर्वीचा आहे. मग तुम्ही सूर्यदेवाना योग सांगीतला हे कसे ते मला कळत नाही. श्री भगवान म्हणाले, अर्जुना ! तुझे माझे कितीतरी जन्म होउन गेले. मला ते आठवतात. तुला ते आठवत नाहीत. मी ईश्वर ...अजून वाचा

5

भगवद्गीता - अध्याय ५

पाचवा अध्यायकर्म संन्यास योगअर्जुन म्हणाला, तू ज्ञान सांगून संन्यासाची महती सांगतोस , आणि युद्धास तयार होण्यास सांगतोस. कोणत्या मार्गानं कल्याण होईल ते सांग. भगवान म्हणाले, संन्यास अथवा योगाने कल्याणच होते. निष्काम होऊन कर्म कर. सोपा कर्म मार्ग अनुसर. ज्याला इच्छा द्वेष नसतो तो संन्यासी असतो. अज्ञानी लोकांना सांख्य व योग भिन्न वाटतात, ज्ञानी लोकांना दोन्ही मार्ग एक वाटतात, व दोन्ही मार्गांमध्ये कल्याण होते. योग व सांख्य हे दोन्ही मार्गानी एकच गोष्ट प्राप्त होते. जो कर्म मार्ग अनुसरतो त्याचे कल्याण होते. कर्म मार्गाचे आचरण न करता संन्यास कठीण आहे. जो इंद्रियांवर विजय मिळवतो कर्म बंधन नसतात. तत्त्वज्ञ जरी पहात, खात, ...अजून वाचा

6

भगवद्गीता - अध्याय ६

सहावा अध्यायआत्म संयम योगश्रीभगवान म्हणाले, जो फळाची अपेक्षा न करता कर्म करतो तोच योगी असतो. योग आणि संन्यास एकच जो कर्म करत असूनही अनासक्त असतो तोच खरा योगी असतो म्हणजे अध्यात्मवादी. तो अग्निहोत्र आणि कर्म न करणारा नसतो. इंद्रिय कर्म करीत असली तरी फळाची आसक्ती नसते, स्वत: स्वत:स ऊद्धरणारा असतो. आत्मा त्याचा मित्र व तो त्याचाच शत्रू असतो. भगवान म्हणाले जो मन जिंकतो तो मनाचा मित्र व जिंकले नाही तो मनाचा शत्रु होतो. त्यांच्या मनात आपला परका मित्र शत्रू अशा भावना राहत नाहीत. सुखदुःख, थंड-गरम, मान-अपमान या भावना रहात नाहीत. तो ज्ञानाने संयमी व अध्यात्मात स्थिर झालेला असतो.त्या योग्याला ...अजून वाचा

7

भगवद्गीता - अध्याय ७

श्री भगवान म्हणाले पार्था ! माझ्या आश्रयाने मन माझ्यापाशी ठेवून संशय सोडून मी तुला सांगत असलेला पूर्ण योग ऐक. आत्मज्ञान व प्रपंच पूर्णपणे सांगतो. हे तुला एकदा समजलं की तुला अन्य समजण्यासारखे कांही राहणार नाही. सिद्धि मिळवण्यासाठी हजारातून एखादाच प्रयत्न करतो, त्यातून एखादाच मला यथार्थाने जाणतो. धरा, जल, अग्नि, वायु, नभ, मन ,बुद्धी आणि अहंकार अशी ८ रूपांची माझी प्रकृती आहे. तिला अपरा म्हणावे. आणि दुसरी परा प्रकृती आहे ती या जगाला धारण करते व तीच जीव भूत चैतन्य आहे. या दोन्हीपासून सर्व प्राणी व जग उत्पन्न झाले आहे. मीच सर्व जगाचा आदि आणि अंत आहे. हे धनंजया, माझ्याहून ...अजून वाचा

8

भगवद्गीता - अध्याय ८

आठवा अध्यायअक्षरब्रह्म योगअर्जुन म्हणाला, ब्रह्म, अध्यात्म, कर्म कसे जाणावे?. अधिभूत, अधिदैव म्हणजे काय? अधियज्ञ म्हणजे काय? या देहात कोण मृत्यू जवळ आला असता योगी तुला जाणतात हे कसे ते मला समजले नाही. श्री भगवान म्हणाले जे अविनाशी आहे तेच ब्रह्म व त्याचा स्वभाव म्हणजे अध्यात्म. सर्व भूतमात्रांना प्राण्यांना त्यांच्या भौतिक वाढीसाठी, प्रगतीसाठी करावे लागणाऱ्या गोष्टींना कर्म म्हणतात. नाशिवंत परिवर्तनशील भौतिक प्रकृती म्हणजेच अधिभूत. जीव हाच अधि दैव, आणि यज्ञ म्हणजे मी पुरुषोत्तम (यज्ञांचा अधिष्ठाता). जो मृत्यु समीप आला असता माझे स्मरण करतो व देहत्याग करतो तो माझ्यात विलीन होतो. हे कौंतेया, अंतकाळी माणसाला ज्याची आठवण होते, त्याचे चित्त ज्या ...अजून वाचा

9

भगवद्गीता - अध्याय ९

भगवद्गीता अध्याय ९वा.मी हे सर्व जग व्यापले आहे, पण त्यात न दिसता. सर्व भूतमात्रांच्यात मी आहे पण मी त्यांच्यांत माझे योग ऐश्वर्य पहा. हे सर्व विश्व माझ्या ठायी आहे. हे सर्व जग माझाच विस्तार आहे. वारा सर्वत्र वाहात असतो तरी नभात असतो तसे सर्व भूतमात्र माझ्यात राहतात. कल्पाचा अंत होतो तेव्हा सर्व माझ्यात विलीन होतात. व कल्पाचा आरंभ होतो तेव्हा मी सर्व भूतमात्रांना मी निर्माण करतो. मी ही कर्मे करीत असलो तरी ती मला बद्ध करत नाहीत. मी या सर्व करण्यापासून अनासक्त, अलिप्त असतो. सर्व भौतिक सृष्टि माझ्या अधिन आहे. माझ्या इच्छेनुसार तीची उत्पत्ति होत व नाश होत असतो.माझ्या ...अजून वाचा

10

भगवद्गीता - अध्याय १०

१० विभूति योग. श्री भगवान म्हणाले, हे प्रिय महाबाहो, माझे हे तुझ्या हितासाठी सांगत असलेले अनमोल असे ज्ञान पुन्हा महर्षी माझा उद्भव जाणत नाहीत कारण देवता व महर्षींचा उद्भव माझ्या ठायी आहे. त्यांचे आदिकारण मी आहे.अनादि, जन्मरहित व सर्वेश्व़र अशा मला जो मनुष्य मला जो जाणतो तो पाप मुक्त होतो. प्राणिमात्रांचे सर्व भाव जसे की मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, क्षमा, सत्य,सुख आणि दुःख, जन्म मृत्यू, अहिंसा, समता, समाधान, तप, दान, यश अपयश, बुद्धि, निर्मोहता, ज्ञान, तसेच संशय, भया पासुन मुक्ति इत्यादि वृत्ति माझ्या पासुन उत्पन्न होतात. सात ऋषी तसेच त्यापुर्वीचे चार महर्षि व मनुंचा जन्म माझ्या मुळे झाला आहे व ...अजून वाचा

11

भगवद्गीता - अध्याय ११

११. विश्व़रूपदर्शन योग.अर्जुन म्हणाला ! तुम्ही मला अध्यात्माचा उपदेश केलात. त्या तुमच्या उपदेशाने माझ्यातील मोहभावना पूर्णपणे नष्ट झाली आहे. कमलनयना ! मी तुझ्या कडून उत्पत्ति व नाशासंबंधी विस्तारानेऐकले व तुझे अविनाशी माहात्म्य ही ऐकले. हे परमेश्वरा ! तू तुझ्या स्वरूपाविषयी सांगितलेस त्यामुळे मला तुझे ईश्र्वरी रूपाचे ऐश्र्वर्य पहाण्याची इच्छा आहे. हे प्रभू ! मला ते रूप पाहणें शक्यअसेल तर हे योगेश्व़रा ! मला तुमचे अव्यय रूप दाखवा. श्रीभगवान म्हणाले, हे पार्था ! माझी शेकडो, हजारो अशी रूपे पहा. माझे अनेक असे दिव्य आकार व वर्ण पहा. माझ्या ठायी असलेले आदित्य, मरूत, रुद्र अश्विनी व वसूंना पहा. तू पूर्वी कधी ...अजून वाचा

12

भगवद्गीता - अध्याय १२

भक्ति योगजय श्रीकृष्ण अर्जुन म्हणाला , जे योगी योग्य रीतीने तुझी भक्ति करतात व तुझ्या निराकार रूपाची उपासना करतात कोण श्रेष्ठ सिद्ध योगी समजावा. श्री भगवान म्हणाले, जो माझी मनापासून भक्ति करतो, माझीच उपासना करतो व माझ्या वर पूर्ण श्रद्धा ठेवतो तो उत्तम योगी समजावा. जे योगी इंद्रियांवर नियंत्रण ठेवून अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य, अचल, स्थिर, अशा माझ्या स्वरूपाची पूजा करतात व सर्वांना समान मानतात व सर्वांच्या हिताचे कार्य करतात ते योगी मला प्राप्त करतात. अव्यक्त ब्रह्म उपासना ही कष्टाची स ...अजून वाचा

13

भगवद्गीता - अध्याय १३

अध्याय १३महाभूते (५), अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृति, दहा इंद्रिये, मन, इंद्रियांचे पाच विषय, इच्छा, द्वेष, सुख, दु:ख, देह व संयोग, चेतना, धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसह क्षेत्र असे म्हणतात.( इंद्रिये- ज्ञानेंद्रिये - डोळे, कान, नाक, जिभ, त्वचा. २- कर्मैंद्रिय - वाणी, हात, पाय, उपस्थ, गुदद्वार . मन हे अतरिंद्रिय. पाच इंद्रिय विषय - शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. )विनम्रता, दंभ नसणे, अहिंसा, क्षमाशीलता, सरळपणा, चित्त शुद्धि, गुरूची सेवा करणे, संयम, स्थिरता, इंद्रियांचे ठिकाणी अनासक्ती, अहंकार नसणे, तसेच जन्म, मृत्यू, म्हातारपण, रोग, यांमधील दोष ध्यानात ठेवणे, आसक्ति नसणे, पत्नी, पुत्र, घर इ. कशातही गुरफटून न राहणे, समतोल वृत्ति, इष्ट, अनिष्ट ...अजून वाचा

14

भगवद्गीता - अध्याय १४

भगवद्गीता -अध्याय चौदावा.गुणत्रय विभाग योगश्री भगवान म्हणाले, मी तुला पुन्हा एकदा सर्व ज्ञानातले श्रेष्ठ असे ज्ञान सांगतो जे जाणून मुनींना परम सिद्धि मिळाली. हे ज्ञान मिळवून जो आपल्या आध्यात्मिक गुणांचा विकास करतो तो माझ्यासारखे दिव्य स्वरूप प्राप्त करतो. असा‌ मनुष्य सृष्टीआरंभी न जन्म घेतो न प्रलयाच्या वेळी मरण पावतो. सर्व महद् ब्रह्म म्हणजेच सृष्टि ही माझी योनी असून मी तिथे गर्भ ठेवतो व सर्व प्राण्यांची उत्पत्ति हे अर्जुना ! त्यातूनच होते. हे कौंतैया , सर्व योनींमध्ये जे जे देह प्रकट होत असतात ती योनी म्हणजे प्रकृति असून त्या सर्वांचा पिता मी आहे. प्रकृति चे तीन गुण सत्व, रज, तम. ...अजून वाचा

15

भगवद्गीता - अध्याय १५ , १६

भगवद्गीता अध्याय १५पुरूषोत्तमयोगमूळ वर व फांद्या खाली असलेला व ज्याची पाने म्हणजे वेद आहेत असा एक अश्वथ्थ वृक्ष आहे वृक्षाला जो जाणतो तो वेदज्ञ जाणावा. या संसार रूपी वृक्षाचे पोषण त्रिगुण करतात. विषयांचे अंकुर फुटलेले असतात याच्या मुळ्यांचा विस्तार खाली ही होत असतो आणि या मुळ्या मनुष्याला कर्मानुसार बांधतात.या वृक्षाचे यथार्थ स्वरूप कळत नाही.याचा आदि, अंत, व आधार समजत नाही. परंतु माणसाने अनासक्ती रूपी शस्त्राने तोडले पाहिजेजिथुन परत येता येत नाही असे स्थान शोधावे व मनुष्याने या जगाचा उद्भव त्यापासून झाला त्या आदि पूरुषास शरण जावे.अभिमान व मोह यापासून मुक्त, जो अध्यात्मात स्थिर आहे, सर्व कामनांमधून सुटलेला व सुख ...अजून वाचा

16

भगवद्गीता - अध्याय १७

सतरावा अध्यायश्रद्धात्रयविभागयोगअर्जुन म्हणाला हे कृष्णा ! जे लोक श्रद्धेने पुजा करतात पण त्यांना शास्त्र माहित नसते त्यांच्या मनाची स्थिती कोणती समजावी सत्व, रज कां तम ?. श्री भगवान म्हणाले, माणसाच्या स्वभावानुसार त्याची श्रद्धा असते.त्याचा जसा गुण असतो तशी त्याची श्रद्धा बनते. सात्त्विक मनुष्य देवाची भक्ति, पुजा करतो, राजस मनुष्य यक्ष राक्षसांची पुजा करतात तर तामसी भूत प्रेत आदिंची पुजा करतात. अहंकारी वृत्तीने, दांभिक पणे, काही इच्छा बाळगु शास्त्राचा आधार न घेता जर कोणी तप करीत असेल तर तो स्वत:च्या देहातील इंद्रियांना कष्ट देतो व देहात कसणाऱ्या मलाही यातना देतो. तो असुर समजावा. माणूस जे भोजन (अन्न) घेतो तेंही त्याच्या ...अजून वाचा

17

भगवद्गीता - अध्याय १८ (१)

भगवद्गीता - १८- मोक्षसंन्यास योग.अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ! केशी राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, मला संन्यास व त्याग यांची जाणून घ्यायची इच्छा आहे.श्री भगवान म्हणाले , ज्ञानी लोक कर्म फलाच्या त्यागाला त्याग म्हणतात. फलाच्या आशेने केलेल्या कर्माचा त्याग म्हणजे संन्यास असे म्हणतात. कांहीं ज्ञानी लोक सर्व सकाम कर्माना त्याज्य मानतात. पण कांहीं विद्वान यज्ञ, दान, तप अशी कर्मे करावीत असे म्हणतात. हे भरतश्रेष्ठा ! आता माझा निर्णय ऐक. हे नरोत्तमा ! त्याग तीन प्रकारचा सांगितला आहे. यज्ञ, दान, तप ही तीन कर्मे केलीचं पाहिजेत. ज्ञानी लोक ही यज्ञ, तप, दान करून पवित्र होतात. माझे असे निश्चित मत आहे की ...अजून वाचा

18

भगवद्गीता - अध्याय १८ (२)

भगवद्गीता अ.१८-२हे धनंजया, मी आता तुला गुणांनुसार बुद्धि आणि धैर्याचे जे तीन प्रकार होतात ते सांगतो. उचित, अनुचित कार्य काय करावे काय करू नये, भय आणि धैर्यामधील फरक, मोक्ष, यांची जाणीव असते ती सात्विक बुद्धि.हे अर्जुना, जी धर्म ,अधर्म कोणता, योग्य -अयोग्य कार्य कोणते ते जाणत नाही ती राजस बुद्धि समज.मोहाने आणि अज्ञानाने भ्रमित झालेली, धर्माला अधर्म समजते, सर्व गोष्टीत उलटा समज करून घेते व चुकीच्या मार्गाला जायला लावते ती तामसी बुद्धि समजावी. मन, प्राण व इंद्रियांच्या क्रियांवर संयम राखणारी, धैर्याने व योग अभ्यासाने धारण केलेली व विचारांपासून न ढळणारी अशी स्थिर बुद्धि सात्त्विक समजावी. हे अर्जुना ! जी ...अजून वाचा

19

भगवद्गीता - अध्याय १८ (३)

भगवद्गीता अ.१८-३तू माझा जीवलग असल्याने मी तुला हे गुह्यतम ज्ञान सांगत आहे आणि तुझ्या हितासाठी सांगतो ते ऐक. तू भक्त हो, माझी उपासना कर, मला नमस्कार कर, असे केलेस तर मी प्रतिज्ञेने तुला सांगतो की तू मला प्राप्त करशील. कारण तू माझा आवडता आहेस. तू अज्ञान सोडून मलाचं शरण ये. तू तसें केलेस तर मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. तू याची अजिबात काळजी करू नकोस. ज्याच्या मनात भक्तिभाव नाही व जो तपाचरण करत नाही, ज्याला हे ऐकण्याची इच्छा नाही व जो मला मानत नाही अशा कोणालाही हे सांगू नये. जो हे परम रहस्य माझ्या भक्तांना सांगेल तो माझा ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय