भगवद्गीता - अध्याय १८ (२) गिरीश द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भगवद्गीता - अध्याय १८ (२)

भगवद्गीता अ.१८-२

हे धनंजया, मी आता तुला गुणांनुसार बुद्धि आणि धैर्याचे जे तीन प्रकार होतात ते सांगतो.
उचित, अनुचित कार्य कोणते, काय करावे काय करू नये, भय आणि धैर्यामधील फरक, मोक्ष, यांची जाणीव असते ती सात्विक बुद्धि.
हे अर्जुना, जी धर्म ,अधर्म कोणता, योग्य -अयोग्य कार्य कोणते ते जाणत नाही ती राजस बुद्धि समज.
मोहाने आणि अज्ञानाने भ्रमित झालेली, धर्माला अधर्म समजते, सर्व गोष्टीत उलटा समज करून घेते व चुकीच्या मार्गाला जायला लावते ती तामसी बुद्धि समजावी.
मन, प्राण व इंद्रियांच्या क्रियांवर संयम राखणारी, धैर्याने व योग अभ्यासाने धारण केलेली व विचारांपासून न ढळणारी अशी स्थिर बुद्धि सात्त्विक समजावी.
हे अर्जुना ! जी बुद्धि धर्म, अर्थ, काम यांतील फलाच्या ठिकाणी आसक्ति निर्माण करते ती राजस समजावी.
जी बुद्धि झोप,भय, दु:ख आणि मोह यांच्या पलीकडे जाऊ शकतं नाही , इंद्रिये, मन, प्राण याची आसक्ति सोडत नाही अशी धृति ही तामसी समजावी.
हे भरतश्रेष्ठा ! सुखाचे पण तीन प्रकार असतात. मनुष्याला जे सुख मिळते व दु:खाचा अंत होतो, ते सुखाचे तीन प्रकार ऐक.
जे प्रथम विषासारखे वाटते पण ज्याचा परिणाम अमृता सारखा होतो असे आध्यात्मिक प्रसन्नतेपासून मिळणारे सुख सात्त्विक समजावे.
जे इंद्रिये व विषयोपभोगात सुख मानतात पण ज्याचा परिणाम विषासारखा असतो ते सुख राजस समजावे.
आळस, निद्रा व कर्तव्याचा विसर पडल्यामुळे मोहात पाडते व सुरूवातीपासून शेवट पर्यंत स्व साक्षात्काराकडे जाउ न देता मोहांत गुंतवून ठेवते ते सुख तामसी समजावे.
हे अर्जुना ! सत्व, रज, तम, या त्रिगुणांपासून मुक्त अशी व्यक्ति पृथ्वी, ग्रहलोक, व देवलोकांत पण सापडणार नाही.

हे अर्जुना, आपल्या कर्मामध्ये मग्न राहून कर्म केले असता सिद्धि मिळते. स्वकर्मांशी संलग्न राहिल्याने सिद्धि कशी मिळते ते ऐक. त्या परमेश्व़राने हे जग व्यापले आहे व ज्याच्यामुळे या जगाची, सर्व प्राणिमात्रांची उत्पत्ति झाली आहे अशा परमेश्व़राची पूजा मनुष्याने आपल्यास प्राप्त झालेल्या कर्माद्वारे केली तर त्यांस सिद्धि प्राप्त होते. जरी नेमून दिलेल्या कर्माच्या आचरणात कांहीं दोष असले व परक्याच्या कर्माचे आचरण चांगले वाटले तरी प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेली कर्मे करावीत. नियत कर्म केल्याने पाप लागतं नाही. जन्माप्रमाणे मिळालेल्या कर्मांचा त्याग करू नये. ती जरी दोषपूर्ण वाटली तरी ती करावी कारण धुर जसा अग्नीला झाकतो तसेच सर्व कर्मांमध्ये कांहीं ना काही दोष असतात. आसक्ति न ठेवता मन ताब्यात ठेवून, भौतिक भोगांची इच्छा न ठेवणाऱ्या आत्मसंयमी अशा मनुष्याला संन्यासाचे फल प्राप्त होते, म्हणजेच श्रेठ अशी कर्मबंधनातून मुक्तिची सिद्धि प्राप्त होते.
हे कौंतेया ! अशी परमसिद्धि मिळाल्यावर ब्रह्माची प्राप्ती कशा रीतीने होते ते थोडक्यात ऐक. कारण हीच ज्ञानाची परम सीमा आहे.
शुद्ध बुद्धिने, धैर्याने , मनाचा निश्चय करून इंद्रिय विषयांचा त्याग करून, प्रेम, द्वेष सारख्या भावना सोडून एकांतवासात राहून, अल्प आहार घेउन कायिक, वाचिक व मानसिक संयम करतो व ध्यान व योगात मग्न राहून वैराग्य वृत्तीने भक्ति करतो, बल, गर्व, काम, लोभी वृत्ती, क्रोध व भौतिक वस्तुंचा संग्रह करण्याची इच्छा न ठेवणारा, आपलं मन शांत ठेवणारा असाचं मनुष्य , हे अर्जुना ! परम ब्रह्म स्थानाचा अनुभव घेण्यास व साक्षात्काराच्या अवस्थेस योग्य होतो.
असा ब्रह्मभुत मनुष्य प्रसन्नचित्त झालेला असतो. तो कशाची इच्छा करीत नाही, कसला शोक करीत नाही, समानतेची भावना ठेवतो, त्याला श्रेष्ठ अशी माझी भक्ति प्राप्त होते. मी (भगवंत ) कसा आहे , माझी व्याप्ती काय आहे हे तो मनुष्य भक्तिनेचं जाणतो व असा तत्वत: मला जाणणारा भक्त माझ्या परमधामात प्रवेश करू शकतो.
सर्व कर्मे करीत असताना जो माझ्या आश्रयाने व कृपेने व भक्तिने करतो तो शाश्वत पद प्राप्त करतो. म्हणजे भगवंताच्या साक्षीने व भगवंताच्या सेवेसाठी कर्मे करतो तो.
तू सर्व कर्मे मनापासून व निश्चित भक्तिभावाने मला अर्पण करून भक्तियोगाचा आश्रय घेऊन माझ्या ठायी एकरूप होण्याचा प्रयत्न कर.
सर्व कर्मे करताना तू माझे ध्यान ठेवून करशील तर कुठल्याही संकटातून तरून जाशील.
पण जर तू अहंकाराने माझे ऐकले नाहीस तर तुझा सर्वनाश होईल. तू क्षत्रिय आहेस व तुझी कर्मे क्षात्रभावाची आहेत व मिथ्या अहंकाराने तू लढाई करणार नाही असे म्हणत असशील तर ते चुकीचे आहे, कारण तुझ्या क्षत्रिय धर्माला अनुसरून तुला युद्ध करावेचं लागेल.
मोहामुळे स्वाभाविक असे कर्म तू टाळतं आहेस ( युद्ध ) पण प्रकृति च्या स्वाधीन होऊन तुला ते कर्म करावेचं लागेल.
हे अर्जुना ! परमेश्व़र हा सर्वांच्या हृदयात वास करतो व तो सर्वांना आपल्या माया शक्तिने यंत्राप्रमाणे फिरवत असतो.
हे अर्जुना, त्यालाच पूर्ण श्रद्धेने शरण जा. त्याच्या कृपाप्रसादाने तुला शांती व श्रेष्ठ असे शाश्वत स्थान प्राप्त होईल. मी तुला हे ज्ञानातील परम गोपनीय असे ज्ञान सांगितले आहे तरी याचा तू पूर्ण विचार करून तुझ्या इच्छेला येइल तसे वर्तन कर.