भगवद्गीता - अध्याय १८ (३) गिरीश द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भगवद्गीता - अध्याय १८ (३)

भगवद्गीता अ.१८-३
तू माझा जीवलग असल्याने मी तुला हे गुह्यतम ज्ञान सांगत आहे आणि तुझ्या हितासाठी सांगतो ते ऐक.
तू माझा भक्त हो, माझी उपासना कर, मला नमस्कार कर, असे केलेस तर मी प्रतिज्ञेने तुला सांगतो की तू मला प्राप्त करशील. कारण तू माझा आवडता आहेस.
तू अज्ञान सोडून मलाचं शरण ये. तू तसें केलेस तर मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. तू याची अजिबात काळजी करू नकोस. ज्याच्या मनात भक्तिभाव नाही व जो तपाचरण करत नाही, ज्याला हे ऐकण्याची इच्छा नाही व जो मला मानत नाही अशा कोणालाही हे सांगू नये.
जो हे परम रहस्य माझ्या भक्तांना सांगेल तो माझा परम भक्त नि:संशय मला प्राप्त करेल. मानवामध्ये असा भक्त मला सर्वात प्रिय आहे व भविष्यात प्रिय राहील.
या धर्म संवादाचे जो अध्ययन करेल त्याने ज्ञानयज्ञाने माझीच पूजा केली असे मी समजेन. श्रद्धा ठेवून व शंका न ठेवता जो मनुष्य हे ऐकेल तो पापातून मुक्त होईल व पुण्यलोकात जाईल.
हे पार्था !
तू अत्यंत एकाग्र मनाने हे ऐकलेस ना ?
हे धनंजया ! तुझे अज्ञान यामुळे नष्ट झाले का ?.
अर्जुन म्हणाला , माझा मोह नष्ट झाला आहे. मी तुझ्या कृपेने भानावर आलो आहे. मला माझ्या कर्तव्याची जाणीव झाली आहे. माझा सर्व संदेह नष्ट झाला असून मी आता तुझ्याच आज्ञेचे पालन करीन.
संजय म्हणाला, वासुदेव श्रीकृष्ण व अर्जुन या दोन महान पुरूषांमधील महत्त्वपूर्ण व अदभूत असा संवाद मी ऐकला. व्यास मुनींच्या कृपेने हे परम गुह्य ज्ञान (योग) मी साक्षात योगेश्व़र श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतं असतांना ऐकले आहे.
हे राजा ! हा अदभूत व पुण्यदायक असा संवाद आठवला की मला पुन्हा पुन्हा आनंद होत आहे. मी जे श्रीकृष्णाचे रूप मी पाहिले त्यामुळे मला वारंवार आश्र्चर्य वाटते व माझ्या आनंदाला सीमा राहात नाही.
हे राजा ! त्यामुळे माझे असे निश्चित मत झाले आहे की सर्व योगांचा परम इश्व़र असा जो श्रीकृष्ण व श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन जेथे एकत्र आहेत तेथेंच सामर्थ्य, ऐश्व़र्य व विजय असेल. यश असेल.
अठरावा अध्याय पूर्ण.
जय श्रीकृष्ण.
भगवद्गीता वाचन.
श्री विष्णू म्हणाले जो मनुष्य गीतेचे नित्य पठण करतों त्याला मोक्ष प्राप्त होतो. ज्या घरात भगवद्गीता पठण होते, किंवा ऐकली जाते, ऐकवली जाते तेथे मी स्वतः असतो. जो मनुष्य अठरा अध्याय शांत चित्ताने पठण करतो तो ज्ञानी होतो. नऊ अध्याय वाचणारास गोदानाचे, सहा अध्याय वाचणारास सोमयागाचे, तीन अध्याय वाचणारास गंगास्नान केल्याचे फळ मिळते. जो मनुष्य गीता पठण करित असतां मृत्यू पावतो तो मनुष्य योनीत राहतो. केवळ भगवद्गीता असा शब्द ज्याच्या मुखातून मरताना येतो त्याला शुभ गति प्राप्त होते. गीता वाचनाबरोबर गीता माहात्म्य वाचतो तो उत्तम गति प्राप्त करतो.
कुरुक्षेत्र - कुरुक्षेत्र मैदान हे कुरू राजाने शुद्ध केले होते म्हणून त्याला कुरुक्षेत्र म्हणतात. कुरू राजाला देवराज इंद्राने वर दिला होता की जो येथे युद्धात अथवा तप करून मृत्यू पावेल त्याला स्वर्ग प्राप्त होईल.
पंचरत्न गीता gs

श्री विष्णू सहस्त्रनाम
ही नावे गुणविशेषणे आहेत. शरीर वर्णन, उत्पत्ती, प्रलय, भक्ती, ज्ञान, कार्य व प्राप्त कसा होतो हे दर्शवणारी आहेत.
ही विखुरलेली आहेत. ती अर्थाप्रमाणे थोडीच नावे आता एकत्र केली आहेत. पण काम चालू आहे.
उत्पत्ती - सर्वव्यापी विश्वम- सर्व विश्वाचे कारणरुप. भूतभावन- प्राणिमात्रांची उत्पत्ती करणारा. भूतकृत- भूतमात्रास उत्पन्न करणारा. भूतकृत -भूतमात्रास उत्पन्न करणारा . धाता -विश्वाला धारण करणारा. विश्वकर्मा -जगाची रचना करणारा. ज्येष्ठ - सर्वांचे आदिकारण. सर्वादि- सर्व भूतांचे आदिकारण. विष्णू - सर्वव्यापी. विश्वम- सर्व विश्वाचे कारणरुप.
शरीरवर्णन- श्रीमान -वक्षस्थलावर लक्ष्मी धारण करणारा. पुष्कराक्ष- कमलनेत्र. महास्वनः- वेदरुप अंत्यंत गंभीर आवाज असणारा. लोहिताक्ष-लाल डोळे असलेला.
भक्तांसाठी - मुक्तानां परमा गती:- मुक्त पुरुषांची सर्वश्रेष्ठ गती. भावनः- सर्व भोक्त्यांची कर्माची फले उत्पन्न करणारा. पवित्रम् - सर्वांना पावन करणारा. मंगलं परम् -अशुभ नष्ट करून शुभाची प्राप्ती करून देणारा. शरणम- दुःखी लोकांचा आश्रय.
ज्ञान- अग्राह्य - कर्मेंद्रियानी घेता न येणारा. मेधावी- अनेक ग्रंथांचे ज्ञान धारण करण्याचे सामर्थ्य असलेला. सर्वयोगविनि:सृत:- सर्व योगसाधनांनी जाणता येणारा. प्रभूत:- ज्ञान ऐश्वर्य इ. गुणांनी संपन्न.
कार्य- भूतभृत् - भूतमात्रांचे पोषण करणारा. केशव - केशी दैत्याला मारणारा.