कुंकू सौभाग्याचे

(3)
  • 120
  • 0
  • 966

...असं म्हणतात मुली हया परक्या असतात, आणि हे बऱ्याच अंशी खरे आहे. तीचे स्वतःचे घर कूठे असते...?? लग्न होईपर्यंतच तीच्या आई बाबाचे घर तिचे स्वतःचे घर असते लग्नानंतर ती तिच्या आईच्या घरी फक्त एक पाहुणी असते आणि सासरच्या घरी ती दुसऱ्याची मुलगी म्हणून असते... आणि हीच तिची ओळख अखेर पर्यंत असते. म्हणजे ती कुठेही असो परकी च असते. मुलीला घरची लक्ष्मी म्हणतात पण ही लक्ष्मी तिचे संपूर्ण आयुष्य तिच्या अस्तित्वाच्या शोधात घालवते. आणि अशा परिस्थितीत ती विधवा झाली तर त्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होउन जाते .... नाही ती माहेरी सुखान राहु शकत आणि नाही सासरी तीला सुख मिळत.…

Full Novel

1

कुंकू सौभाग्याचे - 1

.....असं म्हणतात मुली हया परक्या असतात, आणि हे बऱ्याच अंशी खरे आहे.तीचे स्वतःचे घर कूठे असते...?? लग्न होईपर्यंतच तीच्या बाबाचे घर तिचे स्वतःचे घर असते लग्नानंतर ती तिच्या आईच्या घरी फक्त एक पाहुणी असते आणि सासरच्या घरी ती दुसऱ्याची मुलगी म्हणून असते... आणि हीच तिची ओळख अखेर पर्यंत असते. म्हणजे ती कुठेही असो परकी च असते.मुलीला घरची लक्ष्मी म्हणतात पण ही लक्ष्मी तिचे संपूर्ण आयुष्य तिच्या अस्तित्वाच्या शोधात घालवते. आणि अशा परिस्थितीत ती विधवा झाली तर त्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होउन जाते ...अजून वाचा

2

कुंकू सौभाग्याचे - 2

.......सीमा त्याच कपाटाजवळ बसून तिचे जुने संभाषण आठवून रडत होती.खूप उशीर झाला होता आणि सीमा तयार होऊन अजून बाहेर नव्हती, म्हणून तिची आई स्वतः तिला भेटायला गेली."सीमा... सीमा...!! तू तयार आहेस की नाहीस....?? अजून किती वेळ लागेल, रात्र होईल मग...??"सीमाला हाक मारून सीमाची आई सीमाच्या खोलीत पोहोचली, पण सीमा अजूनही त्याच कपड्यात बसून रडत असल्याचे दिसले."जेव्हा तू बाहेर आली नाहीस, तर मला वाटलंच तू इथे बसून रडत असेल...!!सीमाची आई सीमाकडे गेली आणि तिला तिथून उचलायला लागली."उठ इथून आणि वॉशरूमला जा, फ्रेश होऊन ये...!"सीमाच्या आईने काहीशा कडक आवाजात तिला खडसावले."आई, तू जा पिहुसोबत, मला खरच बर नाही वाटत...!""तुला असं कसं ...अजून वाचा

3

कुंकू सौभाग्याचे - 3

..... सीमा रडत रडत तिच्या खोलीत गेली आणि बेडवर पडली... आणि कार्तिकचा फोटो छातीशी घट्ट घेउन मिठी मारून रडू आयुष्यातून असं का निघून गेलास...?? जायचंच होंतं तर मला सोबत घेतलं असतं, तर आज मला लोकांचे असे टोमणे ऐकावे लागले नसते...!!""सीमा बेटा... लोकांच्या बोलण्याला असं मनावर घेऊ नकोस, लोक जे काही बोलतील ते म्हणतील...!!ऊठ...चल, तुझा भाऊही येणार आता, चल माझ्याबरोबर, स्वयंपाक करूया...!!सीमाची आई सीमाचे मनोरंजन करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. शेवटी, ती आई होती ती आपल्या मुलीला असे रडताना कसे पाहू शकली असती."आई, तू जा, मला थोडा वेळ एकटे सोड... मी तुला आधीच सांगितले होते की मी कुठेही बाहेर जानार ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय