"ए बैला! उठ पटकन, नाहीतर शाळेत जायला घाई घाई करशील!!"आईच्या ओरड्याने एक मुलगा आळस देऊन उठला. त्या ओरड्याचा खास काही फरक पडला नव्हता. आळशी बैलाने काय केलं असेल. तो बेडरूम मध्ये जाऊन पुन्हा झोपला. आईला मात्र वाटत होते कि गेला असेल तयारी करायला, पण बघते तर काय हा अजून इथे झोपलाय. आई मधला नीरज चोप्रा जागा झाला . तिने लगेच बाजूला जी तिची ऑर्थोपेडीक चप्पल घेतली, ह्ये असा निशाणा लावला थेट त्याच्या तोंडावर चापकन कानाखाली बसली.
नाते जन्मापलिकडचे - भाग 1
"ए बैला! उठ पटकन, नाहीतर शाळेत जायला घाई घाई करशील!!"आईच्या ओरड्याने एक मुलगा आळस देऊन उठला. त्या ओरड्याचा खास फरक पडला नव्हता.आळशी बैलाने काय केलं असेल. तो बेडरूम मध्ये जाऊन पुन्हा झोपला. आईला मात्र वाटत होते कि गेला असेल तयारी करायला, पण बघते तर काय हा अजून इथे झोपलाय.आई मधला नीरज चोप्रा जागा झाला . तिने लगेच बाजूला जी तिची ऑर्थोपेडीक चप्पल घेतली, ह्ये असा निशाणा लावला थेट त्याच्या तोंडावर चापकन कानाखाली बसली.त्याच्या माराणे तो ताडकन जागा झाला. समोर त्याला काली माता चं दर्शन घडलं.. एका हातात झाडू, एका हातात लाटणं, एका हातात गरम गरम उलथनी आणि एका हातात ...अजून वाचा
नाते जन्मापलिकडचे - भाग 2
ती पुन्हा त्याला शोधू लागली. तिची इच्छा होती एकदातरी त्याचे दर्शन घडावे. त्याचं नाव होतं शिव..यांच्या भूतकाळ्यातल्या कहानीची एक पाहूया..... ~वैदेही अगदी लहान असताना."अगं सुखदा..पटापट लंगडी घाल,नाहीतर आर्य कधीच पकडला जाणार नाही."ती ओरडून सांगत होती. आर्य तिचा बालपणीचा मित्र बरं का. ती दोघे जेव्हा ते या सोसायटीत राहायला आले तेव्हा पासून मित्र आहेत. म्हणू शकता कि सोसायटी जेव्हा सुरु झाली तेव्हा पासून आहेत हे. वैदेही तेव्हा सिनियर केजी मध्ये असावी,आणि सुखदा तिला चौथी-पाचवीत असताना भेटली.खरेतर आर्य मुळे या दोघांची ओळख झाली. आर्य आणि सुखदा दोघे एकाच शाळेत होते.त्यांच्या सोबत अजून तीन चार जन खेळत होते.त्यांचे नाव म्हटले तर दिशा, ...अजून वाचा
नाते जन्मापलिकडचे - भाग 3
"हो चालेल कि, नक्की खेळू शकतो ️"ती लोकं खेळू लागली. शिव ला वैदेही ने तिच्या टीम मध्ये घेतले. त्या त्यांचे छान जमू लागले."छान खेळतेस गं तू ""थँक्स ↕️"पहिल्यांदा ते एका-मेकाशी बोलले होते. वैदेही उत्साहित झाली होती. सुरवातीला तिला वाटायचं कि का बोलू मी ह्याच्याशी, मी नाही बोलणार.पण आता जेव्हा प्रत्यक्षात त्यांच बोलणं झालं तेव्हा तिला ते बोलणं हवंहवं सं वाटत होता.काही सुरवाती अनपेक्षित पेक्षा देखील अनपेक्षित असतात.असेच ते लोकं खेळू लागले.या अगोदर तिला एका मुलावर क्रश होता. पण तो ही सोसायटी सोडून गेला होता. जे काही थोडंफार बोलणं व्हायचं ते देखील आता बंद झालं होतं.असच एक दिवशी खेळताना..या वेळेस ...अजून वाचा
नाते जन्मापलिकडचे - भाग 4
"मला काय होतय!?? हेच तर प्रेम नाही ना ?!"पहला नशा पहला खुमार~~नया प्यार है नया इंतज़ार~कर लू मैं क्या हाल~ऐ दिल ए बेकरार~मेरे दिल ए बेकरार तू ही बता~पहला नशा पहला खुमार~~बरोबर वेळेला बॅकग्राऊंडमध्ये हे गाणं वाजलं. जणू ती तिच्यासाठी एक खुनच होती.ती त्या गाण्याच्या दिशेने बघू लागली.. हळूच तिने डोळे मिटले. समोर शिवची आकृती उभी ठाकली.ती आकृती हळूच मागे वळली. आता शिव चा चेहरा दिसत होता. त्याने तिच्याकडे बघून त्याची प्रसिद्ध attractive smile वैदेहीला दिली. वैदेहीचे मन त्यात न्हाऊन निघाले. हे प्रेम रुपी पीस अलगद तिच्या हृदयावरून फिरला असावा असं तिला वाटले.. त्यात मंद हवा तिच्या अंगाला स्पर्श ...अजून वाचा
नाते जन्मापलिकडचे - भाग 5
"वैदेही, एवढी साधी राहू नकोस!कोणाला तुझा फायदा घेऊन देऊ नकोस"खोल आवाजात तो मनातच बोलला"Hmm.."तिने रिप्लाय केलं. तिला तेव्हा हे का..,असे उमगले नव्हते."मला जेवायला बोलावलंय, मी जाते "असं बोलून ती जेवायला निघून गेली. शिव मात्र इथे विचारात होता."खूपच भोळा स्वभाव आहे हिचा.. निर्मळ आहे खूप.मला फील होतय हे आतून.ह्या जगाला इतकं निर्मळ मन अजिबात deserve नाही करत..पण --असो, मी तिला तयार करेलच;आणि ह्या निर्मळ मनाला सांभाळणारा देखील आहेच तिच्या आयुष्यात." मंद हसत तो आपल्या कामात व्यस्त झाला.आता ह्या लोकांनी सकाळी वॉल्क ला जायचे ठरवले होते. सगळ्या कोण? तर फक्त वैदेही, पायल, यधण्या आणि कधी कधी असली तर दिशा आणि सिद्धी.सगळे ...अजून वाचा
नाते जन्मापलिकडचे - भाग 6
असच ते लोकं दररोज सायकलिंग ला जात असत. एक दिवस आर्य ने देखील त्यांना बघितले होते. तो देखील येऊ वैदेहीने काही वाईट वाटून घेतले नाही. उलटून आनंदाने त्याचे स्वागत केले.श्रुष्टि देखील त्यांच्यात सामील झाली.वळण इथे येते.जेव्हा केव्हा ती यायची तेव्हा तेव्हा शिव तिची मस्ती करत असे.या मस्तीला वैदेही 'त्यांच्यात जवळीक वाढेल ' याचा अलार्म समजायची. शिव देखील थोडेफार वैदेहीकडे दुर्लक्ष करायचा. याचे तिला वाईट वाटू लागले;पण त्याने नंतर तिला त्या मस्तीत सामील केले म्हणून तिचे मन स्थिरावले.******शिवजयंती जवळ येत चालली होती. त्यांच्या सोसायटी मध्ये पहिल्यांदाच हा सोहळा साजरा होणार होता. सगळीकडे तयारीची लगबग सुरु होती.इथे मैत्रिणींच्या कट्ट्यात 'ए तू ...अजून वाचा
नाते जन्मापलिकडचे - भाग 7
"नौटंकी, हिला बरोबर माहिती आहे कि मी तिला भलं मोठं lecture देईल ह्यावरून, म्हणून अशी नाटकं करतेय " गालातच हसली."चला आता बाहेर जायचं आहे. खरं सांगायचं गेले तर धास्ती वाढतेय हृदयात. माझं काय होणार आहे माहित नाही." निश्वास टाकत ती बाहेर गेली.दोघीही बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये पधारल्या. दोघीही एकी मेकीला बघून थक्क होत्या.यधण्या ने ताजा हिरव्या रंगाची नऊवारी नेहसली होती,काठ चंदेरी आणि त्याला राणी पिंक ची बॉर्डर. गळा मस्त सोनेरी ठुशी आणि आणि नाजूक पेंडंट ने सजलेलं. नाकाशी प्रेस वाली नथ,कानात छोटे सोनेरी झूमके, हातात हिरव्या बांगड्या आणि चेहऱ्यावर ती चंचलता! नजरेत आपल्या bestie प्रति माया.तिथेच दुसरीकडे वैदेही भगव्या रंगाची,प्रुशियन ...अजून वाचा
नाते जन्मापलिकडचे - भाग 8
वैदेही हॉल च्या आत प्रवेशली. शिव ची आकृती त्या गर्दीत देखील लख्ख चमकून येत होती. त्याने अबोली रंगाचा रेशमी घातला होता.फेटा बांधून घेण्यासाठी तिथे उभा होता. तिला तो पाठमोरा होता.त्याच्या आकर्षक पाठ कडे बघताना वैदेहीला आनंद होत होता."चेहऱ्यासोबत त्याची पाठ देखील किती आकर्षक वाटते हो."ती हलकीच हसली.पण तिचं हृदय मात्र मॅरेथॉन धावत होतं..."मी कशी सामोरे जाणार आहे त्याला, तत, पप झालं तर??त्याला मी nervous आहे हे कळलं तर?शांत वैदेही शांत बी पॉसिटीव्ह "ती कोमल पावलांनी त्याच्याकडे वळली. पायातील पैंजणांचा कोमल 'छुम छुम'त्या हॉल मध्ये घुमला.इथं शिवच्या मनात."अरे,आज वैदेही ताई पाडेकर आल्या नाहीत का?कमाल आहे.."वैदेहीच्या पैंजणांचा आवाज आल्यावर "एवढे कोमल,पण ...अजून वाचा
नाते जन्मापलिकडचे - भाग 9
यधण्या तिच्या नृत्यबद्धल कौतुक करत होती. वैदेहीने तिचे आभार मनात विचारले "बरं तू ते पाहिले का?"FLASHBACKएका कोपऱ्यात वैदेहीने यधण्याला गं काय झालं? असं का बाजूला आणलंस मला.. क्या करणे वाली हो मेरे साथ हा.."स्वतःच अंग झाकत ती घाबरायची acting करत होती."ए गप्प असं काही नाही आहे. मला तुला एक गोष्ट सांगायची आहे " तिने आजूबाजूकडे नजर फिरवली. "बोल ""अगं तुला माहित आहे, शिव माझ्याकडे नजर चोरून बघण्याचा प्रयत्न करत आहे.. मी हे मागापासून बघत आहे.""Oooतेरे सौंदर्यने किसीका तो दिल चुरा लिया लगता है "तिला चिडवत ती म्हणाली. वैदेही हलकीच लाजली पण तिने लगेच आपल्या भावनांवर ताबा मिळवला."चूप.. पण मला ...अजून वाचा
नाते जन्मापलिकडचे - भाग 10
"प्रेम हेच असतं का? कि काही वेगळं दडलं आहे या एका शब्दामागे.. जे मला अजून उमजलं नाही आहे?" असंख्य मनाशी कल्लोळ माजवत होते. जेवण्यासाठी पुन्हा बोलावणी आली म्हणून ती निघून गेली.हळू हळू वैदेही आणि शिव चं भेटणं कमी व्हायला लागलं होतं.. तो फक्त कधीतरी खेळायला यायचा. शिव आणि सिद्धी मधील जवळीक वाढली होती हे तिला स्पष्ट दिसून येत होतं..त्याचा तिला हळू हळू हेवा वाटायला लागला होता.सिद्धीचा नाही तर त्या जवळीकचा. कारण त्या जवळीक मुळे शिव सतत सिद्धी मागे फिरत असे, सगळीकडे त्याला त्याच्या आजूबाजूला सिद्धी हवी असे.वैदेहीपासून लांब होतं चालला होता. तिच्याशी खूप निवडकच बोलायचा.चॅट वर देखील वैदेही मेसेज ...अजून वाचा
नाते जन्मापलिकडचे - भाग 11
"Bestfriend"चे वजन एवढे हलके असते का?? कि कधी ते नातेच फुलले नव्हते??"या एका प्रश्नाने वैदेहीच्या हृदयात अनामिक भीती जागृत फक्त वापर करण्यात आलाय का?ज्या वयक्तीवर मनापासून विश्वास ठेवला तिच व्यक्ती माझा वापर तर करत नाही आहे ना.."डोळ्याशी अश्रू तरळले."सगळे माझा वापरच का करतात?? मी एवढी मूर्ख आहे का कि कोणाच्याही जाळ्यात लगेच अडकते."तिचा आवाज कातरला.मोबाईल वर शिवचा मेसेज आला.."सिद्धिशी बोलत होतास का?"भलेही तो मेसेज होता पण तिच्या मनाने मात्र कोरडा प्रश्न विचारला होता."हो. तिच्याशी बोलत होतो. तुला कसं कळलं?"त्याने गमतीत विचारलं."जेव्हा चॅट ला फुल इग्नोर करून गायब झालास ना, तेव्हाच कळलं " स्वतःची वेदना सांगण्याचा प्रयत्न तिने केला."ओह अच्छा, ...अजून वाचा
नाते जन्मापलिकडचे - भाग 12
"Well i already knew about it"वैदेही खोटे बोलत नव्हती ह्याची खात्री शिव ला पटली."Oh, nice.तुला सांगू, जेव्हा केव्हा ती तेव्हा मी एका वेगळ्याच दुनियेत हरवून जातो गं.. ती गर्दीत पण उजळून दिसते..""Ohh""मी एके दिवशी माझी बाईक घेऊन फिरत होतो.. संध्याकाळची वेळ होती, गर्दीची वेळ होती.. मी चौकत पोहोचलो तेव्हा ती समोरून येत होती तिच्या स्कूटर वर..आता मला एक सांग एवढ्या गर्दीत आपल्याला कोणी पटकन स्पॉट होईल तरी का? त्याचं उत्तर आहे नाही, पण ती त्या गर्दीत पण चमकून दिसली.. तिला लगेच स्पॉट केलं मी.... नेमका तेव्हाच मला असे वाटू लागेल कि वेळ मंदावला आहे.. एका क्षणासाठी मी या भ्रमात ...अजून वाचा
नाते जन्मापलिकडचे - भाग 13
काही दिवसांपूर्वी..वैदेहीला शिवचा मेसेज आला."हेय... फ्री आहेस?""अ.... मी तुला काही वेळानी करते मेसेज.. सध्या माझा अभ्यास चालू आहे""ठीके "शिवच्या :-"मी बरोबर करत आहे ना? जिथे या जगात मला कोणावरच विश्वास नाहीये तिथे हिने माझा विश्वास जिंकून घेतलाय.. मला वाटलं होतं या जगात मी एकटा आहे, कोणीच समजून घेणारं नाहीये..."सुस्कारा सोडत.."पण मला समजून घेणारी व्यक्ती माझ्याच जवळ होती हे माहित नव्हते "चेहऱ्यावर हलकेच स्मित आले."एवढ्या लहान वयातच ती mature आहे.. आणि मुख्यतः या जगात, या कली युगात लगेच सापडणार नाही.. अशी pure soul आहे .. कदाचित म्हणूनच तिला या गोष्टी पटकन समजतील... पण कोण आहेस तू? का मी तुझ्याकडे आकर्षित ...अजून वाचा
नाते जन्मापलिकडचे - भाग 14
"वैदेहीकडून ही गोष्ट काढून घेतली पाहिजे.. सध्या जमणार नाही पण लवकरच मी तिला विचारेल."शिव विचारत हरवला."पण मी काढू कसं?"पण मिश्किल हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटले."अपने पास सारे प्रश्नो का उत्तर होता है. Hehehe".आपल्या कामात तो व्यस्त झाला.भूतकाळ समाप्त.पण त्या गुपितासोबत त्याला तिच्या मनातील त्या गोष्टीचं ओझं देखील जाणवलं."काळजी नको करुस वैदेही तुझं ओझं मी हलकं करेल."पुन्हा वर्तमानात........"कसं सांगू यार... कळत नाहीये "अत्यंत त्रासलेल्या स्वरात वैदेही म्हणते." होईल ते होईल, या एका गुपितामुळे मला आमचं नातं बिघडलेलं नकोय "काळजीपूर्वक ती म्हणते.अखेर तो दिवस उजाडतो."मी तुला सांगतेय.. Type करायला वेळ लागेल म्हणून थोडी वाट बघ कारण बरंच काही सांगायचं आहे """ती सुरु ...अजून वाचा