नाते जन्मापलिकडचे - भाग 12 lekhani द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नाते जन्मापलिकडचे - भाग 12

"Well i already knew about it"वैदेही खोटे बोलत नव्हती ह्याची खात्री शिव ला पटली.
"Oh, nice.तुला सांगू, जेव्हा केव्हा ती येतेना.. तेव्हा मी एका वेगळ्याच दुनियेत हरवून जातो गं.. ती गर्दीत पण उजळून दिसते.."
"Ohh"
"मी एके दिवशी माझी बाईक घेऊन फिरत होतो.. संध्याकाळची वेळ होती, गर्दीची वेळ होती.. मी चौकत पोहोचलो तेव्हा ती समोरून येत होती तिच्या स्कूटर वर..
आता मला एक सांग एवढ्या गर्दीत आपल्याला कोणी पटकन स्पॉट होईल तरी का? त्याचं उत्तर आहे नाही, पण ती त्या गर्दीत पण चमकून दिसली.. तिला लगेच स्पॉट केलं मी.... नेमका तेव्हाच मला असे वाटू लागेल कि वेळ मंदावला आहे.. एका क्षणासाठी मी या भ्रमात गेलो होतो कि कोणीच नाहीये रस्त्यावर, सगळे शांत आहे, फक्त ती आणि मी आहे.. तेव्हा तिने माझ्या डोळ्यात बघितले होते, मला काहीतरी अनामिक ओढ अशी जाणवून गेली....
तिचं हास्य देखील सुखावणारं होतं... ते हास्य बघूनच बरं वाटतं होतं."तो पुन्हा त्या क्षणात हरवून गेला.

वैदेहीला थोडी possessive होणे सहाजिकच आहे, पण आपल्या मनावर त्याचे नियंत्रण मिळवून दिले नाही.
"चांगले आहे."
"तुला एक गुपित सांगू?"
"सांग "
"मला तारुण्यात कितीतरी मुली आवडल्या होत्या.. एक दोन तर शाळेच्याच होत्या. एक आपल्या इथली सांची नावाची मुलगी, त्या नंतर सिद्धी.नववीत असताना युतिका आहे बघ.. तिची बहीण रिया मला आवडायची.. खरं प्रेम करत होतो आम्ही एकमेकांवर.आम्ही तर २ वर्ष रेलशनशिप मध्ये होतो.. मायला तेव्हा तर असं वाटायचं कि कोणत्याही मुलाने तिच्याकडे बघितले तरी त्याला ठोकून काढीन...नंतर तिच्या घरी कळलं आणि मग लांबच झालो. तरी देखील आम्ही इन्स्टा वर बोलायचो... पण नंतर नंतर मलाच कळू लागलं कि आपलं काही होणार नाही.. म्हणून मी तिला मला विसरण्याससाठी समजावलं.तिला तर मी खूप समजावलं, तेव्हा जाऊन कुठे तिने मला सोडण्याचा निर्णय घेतला...तिला एक आश्वासन दिले, कि तुझा मित्र म्हणून नेहमी तूझ्या सोबत असेल. हवे तेव्हा बोलाव.. तिने मान्य केले."
हे सगळं वाचून वैदेही थक्क होती..पण तिने एक गोष्ट सांगितली,

"दोन वर्षाचं रिलेशन ह्याला खऱ्या प्रेमासोबत confuse करू नकोस.immature प्रेमाला लोकं खरं प्रेम समजून बसतात.. जी कि पहिली पायरी असते.."
"Hmmmm.. ते जाऊदे.. पण मला आता वेदिकावर प्रेम व्हायला लागलंय.."वैदेही हलकेच  स्मित देते.. ह्याने तिच्या सांगण्यावर अजिबात लक्ष दिलेले नसते हे तिला कळते.ती त्याला काही ओळी पाठवते,
"व्याख्येमध्ये अडकणारं प्रेम नसतं,
ते तर डोळ्यांतील अश्रूंत लपलेलं असतं.
समजलं तर भावनांचा अथांग सागर आहे,
नाही समजलं तर फक्त शब्दांचा खेळ आहे."
"🤔"
"जेव्हा खरोखर प्रेम करशील तेव्हा याचं गांभीर्य तुला कळेल "
"🤷‍♂️. मला काम आहे मी जातो "
"ठीक आहे "

तो ऑफलाईन गेला. वैदेही मात्र संथ बसलेली असते. ओठांवर हसू असते पण डोळ्यात दुःख असते..
"कदाचित माझं प्रेम त्याला दिसतच नसेल, म्हणूनच तो अजून अजान आहे... मी कुठे कमी पडतेय का??"भावनिक होत ती म्हणाली.
"माझ्या या प्रेमासाठी कोणी हक्काचं माणूस असेल??? कि मी एकट्यातच आयुष्य काढेल आणि अशीच 'एकटी' मरेल?"कटू शब्द तिच्या तोंडून बाहेर पडत होते..तिच्या विचारात हरवण्या ऐवजी तिने आपलं मन कुठेतरी गुंतवायचं निश्चित केलं.ती आपली गेम खेळत बसली. दुपारचा विश्रांतीचा वेळ होता.

काही दिवसांनी शिवचा पुन्हा तिला मेसेज आला.वैदेही तेव्हा नुकतीच कॉलेज ला निघालेली असते.
"वैदेही.. तू काहीतरी लपवतेस माझ्याकडून.. मला दिसतंय "वैदेही गोंधळली..
"नाही मी काही नाही लपवत आहे "चॅट वर भावना कळत नव्हत्या पण मात्र इथे वैदेही तिचं गोंधलेलं मन शांत करायचा प्रयत्न करत होती.
"नाही... मला स्पष्ट दिसतंय कि तू काहीतरी लपवून ठेवलंय.. आणि मला सांगत नाही आहेस.. आणि माझ्या 'त्या रुपाला' हे मुळीच आवडत नाही.. त्याला पटकन राग येतो... कदाचित त्या मुळे तू माझ्या मनातून पण उतरू शकतेस.. आणि मी काहीच नाही करू शकत.. कारण शेवटी तो माझ्यात आहे ,मी कोण नाही.. तर त्याचा एक दास आहे!"
वैदेही घाबरली होती. तिला मुळीच हा दुरावा सहन झाला नसता...

तिला नंतर उमगले, तिने काय लपवून ठेवले होते... 
पण कसं सांगावं हे तिला कळत नव्हते.
खरेतर वैदेही silently प्रेम करणारी होती.. तिला माहित होते तिला समोरून हे कबूल करणं कधीच जमलं नसतं... "जर तो माझ्यापासून लांब झाला तर?? आमची मैत्री जशी आहे तशी राहिली नाही तर??? हे एकच नाते त्याने कायमचे तोडले असते तर..??"  ह्या सगळ्या विचारांमुळे..प्रत्येक मुलीची हीच एक भीती असते.

ती निश्चित करते सांगून टाकायचे.
"बरं मी तुला सांगेल, पण आज नाही.. उद्या सांगेल दुपारी."तो मान्य करतो.

आता इथे वैदेही विचारात असते.. आपण कसं सांगू त्याला??


आता शिव त्याच्या कोणत्या रूप बद्धल बोलत असतो.. आणि हे वैदेहीला केव्हा माहित पडते?? ती पुढे काय निर्णय घेईल या साठी नक्की वाचत राहा ✌️✨